दादाच्या फर्माईशीनुसार कुत्रा घरी आणायचे ठरवले आहे. पूर्वतयारी झाली आहे. म्हणजेच घरच्या सर्वांची मनाची तयारी झाली आहे. कारण आमच्याकडे पर्यायच नाही. आईबाबांनी दादाकडून एक वचन घेतले आहे. सून आम्ही आमच्या पसंतीची आनणार. बाकी तू कोणालाही घरी घेऊन ये. म्हणून दादाचे मित्रमैत्रीणी अधूनमधून आमच्या घरी येत जात राहतात. पण बहुधा आता त्याचे कुठेतरी जुळले असावे. म्हणून घरच्यांनी वैतागून स्वत:च्या पसंतीची सून ही अट मागे घ्यावी यासाठी त्याने घरच्यांना त्रास द्यायला कुत्रा घरी आणायचे ठरवले आहे. मुक्या प्राण्यांचा वापर लोक कसे करतील सांगता येत नाही. तरी खाण्यासाठी करण्यापेक्षा हे केव्हाही चांगलेच.
तर आता रस्त्यावर कुत्रा दिसला तर फूटपाथ बदलून चालणारी, आणि दोन कुत्रे दिसल्यावर आल्या पावली परत फिरणारी आमच्या घरची साधीभोळी माणसं. त्यांनीही बहुधा दादासाठी कुठेतरी मुलगी शोधून ठेवली असावी. कारण ते दादाचा हा प्लान हाणून पाडायाच्या पुर्ण तयारीत आहेत. घरी एखादे नवीन बाळ, वा गेला बाजार आयुष्यातील पहिली कार घ्यावी तश्या उत्साहात हल्ली रोज कुत्र्याच्या आगमनाची चर्चा चालते. ती एक मजेशीर असते. पुन्हा कधीतरी सांगते. पण परवा मात्र येणार्या कुत्र्याला / कुत्रीला नाव काय ठेवायचे याची चर्चा चालू होती. हो, कुत्रा की कुत्री अजून ठरलेले नाही. ते तितकेसे महत्वाचेही नाही. आमच्यासाठी दोन्ही सारखेच. तर त्याचे नाव काय ठेवायचे याचा विचार करता नेहमीची आपली टॉम-टॉमी-टायगर, निकी-मिकी-सूझी, जिमी-जॉनी-जेनी ईत्यादी भारतात प्रचलित असलेली ईंग्रजी नावे एकेकाच्या तोंडावर आली. ते ऐकून आमची आज्जी पटकन म्हणाली, मेल्यांनो ईंग्रजी नाव काय ठेवता रे. मराठी नाव ठेवा एखादे. आपल्या बाळांना आपण अशी ईंग्रजी नावे ठेवतो का? मग कुत्र्यांना तरी का ते इंग्रजी नाव ठेवायचे?
पॉंईंट आहे आज्जी. आम्ही एकसूरात म्हणालो आणि मराठी नावे शोधायला लागलो.
बाबा म्हणाले, मोती ?
आम्ही म्हणालो - श्या, तो तर साबण असतो.
आई म्हणाली - टिपू ?
आम्ही म्हणालो - नाह, त्यापेक्षा सुलतान नाव चांगलेय.
आजोबा म्हणाले - शेरू ?
ओये शेरू पाजी, कि गलं करतंया. मराठी नावं सुचवा ... हे आज्जी म्हणाली, आणि आमची गाडी ईथेच अडकली.
तर बघा, जरा धक्का द्या. आमच्याकडे येणार्या छानश्या गोंडस कुत्र्याच्या पिल्लाला तितकेच गोडुले मराठी नाव सुचवा.
पत्रिका त्याची बनवायचा विचार नाहीये. त्यामुळे अक्षर कुठलेही चालायला हरकत नाही.
तेवढे पुढे आडनाव सरकार शोभेल असे बघा 
अॅडवान्समध्ये धन्यवाद म्हणते,
अर्चना सरकार
सपना हरिनामे | 12 January,
सपना हरिनामे | 12 January, 2017 - 23:50 नवीन
कुत्रा मराठी आहे का पण ? >>>
अहो मराठी काय..तो भारतीय आहे का ते पण विचारा ?
Out of curiosity खेड्या मधील उदाहरण सोडल्यास....शहरा मध्ये प्युअर भारतीय असे कोणते ब्रिड चे कुत्रे लोंक पाळतात ?
खेड्या मध्ये सोडल्यास..>> हे
खेड्या मध्ये सोडल्यास..>> हे तुम्ही मॅटर ऑफ फॅक्ट लिहिताय म्हणजे कुत्रा खेड्यात कसा सोडायचा याचा निर्णय लागलेला दिसतोय.
तस नाही हो.. मी काही मित्रा
तस नाही हो..
मी काही मित्रा कडे Combai आणि Chippiparai हि भारतीय जातीची कुत्री पाहिली आहेत..
पण मोस्ट्ली खेडया मध्येच... म्ह्णुन विचारल..
नाहीतर अर्चनाच कुत्र आसायच इलायती आणि आपण त्याला "खंड्या" आन "बंड्या" संबोधल तर कस वाटेल..
त्या कुत्र्याच्या भावनाचा आदर राखला गेला पाहिजे ..!!
इथली एखादी ID तुम्हाला आवडत
इथली एखादी ID तुम्हाला आवडत नसेल तर... >>>>> आमीरने एका कुत्र्याचे नाव शाहरूख ठेवलेले ते आठवले. शाहरूख मेरे पाव चाट रहा था वगैरे मुक्ताफळेही उधळलेली बहुधा ..
@ नाव, सरकार आडनावाला सूट होणारे, कुत्री असेल तर राणी ठेवा... राणी सरकार

कुत्रा असेल तर राजा सरकार नको. राजाबाबू चालेल. पुढे सरकार न लावताही भारदस्त वाटेल
कुठल्यातरी चित्रपटात (बहुधा खूबसूरतमध्ये) कुत्र्याचे नाव बाबूभाई होते.
आपला मराठी बाणा म्हणून बाबूराव.. यापुढे आपटे हे आडनाव फ्री येते
फ्री वरून आठवले, जिओ हे नाव सुद्धा मस्त आहे.
मी लहान असताना आजोबांनी एक बिबट्या पाळलेला. त्याचे नाव लिओ होते.
पुढे आजोबा त्याला आपल्यासोबत घेऊन गेले.
आजोबा म्हणजे माझे खरेखुरे आजोबा. हल्ली चित्रपटांत जनावरांची नावेही आजोबा ठेवतात.
पण ही आयडीयाही काही वाईट नाही.
बाबा नाव ठेऊ शकता.. फुल्ल संजय दत्त स्टाईल
बाबा वरून आठवले. आमच्या कॉलेजमध्ये एका मित्राला आम्ही गुटखा नाव ठेवलेले.. आपण सुपारी ट्राय करू शकता. नाहीतर मावा.. एकदम हटके ना बावा !! हे बावा नाव सुद्धा काही वाईट नाही. थोडी भावासारखी आपलेपणाची फिलिंग येते ..
आमच्या कुत्रीचं नाव -
आमच्या कुत्रीचं नाव - मार्गी
=)) )
इंग्रजी वाटते, आहे मराठी,
उच्चारही स्पष्ट होतात ( कोणत्याही स्केलमध्ये
नानाकळा | 13 January, 2017 -
नानाकळा | 13 January, 2017 - 00:20 नवीन
आमच्या कुत्रीचं नाव - मार्गी
>>>
छान नाव...अर्थ काय याचा....
मी काढलेला अर्थ....अनोळखी येणार्या पाहुण्याना व्यवस्थीत मार्गाला लावते ती = मार्गी
हॉटडॉग सुद्धा मस्त फूडी नाव
हॉटडॉग सुद्धा मस्त फूडी नाव आहे.
"बिल्ला द डॉग" असं सौथेंडियन नेमिंग स्टाईलनेही नाव ठेऊ शकता.
रंग दे बसंती मधील फिरंगी
रंग दे बसंती मधील फिरंगी हिरोईनीचे नाव सू होते
तुम्ही मराठी कुत्रीचे नाव छू ठेवू शकता.
जाउ दे ऋन्मेऽऽष मित्रा...
जाउ दे ऋन्मेऽऽष मित्रा... सरकार बाईना क्लसिकल अस काही तरी नाव हवाय बहुतेक "सारमेय" सारख...
आपल खंड्या, बंड्या, भु, छु , राणा, वाघ्या असला नाही आवडनार त्यान..
"मिराज" ठेवा = डायरेक्ट जेट
"मिराज" ठेवा = डायरेक्ट जेट विमानच.. युनिक आणि भारतिय पण वाटत..
आणि कोणत्याही स्केलमध्ये उच्चारही स्पष्ट होतील..
आणी कुत्र वेगान धावनार्या जातिच असेल तर एकदम सुट होइल.. "मिराज" ...!!!
शेजारी कुत्र्याला आडनावानेच
शेजारी कुत्र्याला आडनावानेच संबोधतात हे लक्षात असु द्या
आमच्या गावचा हा किस्सा. मी, साबु, साबा मागच्या अंगणात होतो, आपापली कामे करत. तेवढ्यात साबु म्हणाले, नेने आले. मी न पाहताच म्हणाले की हो? चहा ठेवते. तर साबा म्हणे अग हे नेने. बघते तर त्यांचा कुत्रा नेहमीप्रमाणे फेरी मारत आमच्या अंगणात आलेला.
मी तर 'सरकार' अथवा 'रावसाहेब'
मी तर 'सरकार' अथवा 'रावसाहेब' यापैकी ठेवले असते.
टॉम्या भिंतीला जाऊन टेकला >>
टॉम्या भिंतीला जाऊन टेकला >>
खूप भारी आणि खुमासदार शैलीत
खूप भारी आणि खुमासदार शैलीत लिहिलंय तुम्ही अर्चनाजी .. मजा आली वाचताना
कुत्रे किंवा मांजर मला खूप खूप आवडतात इव्हन माणसांपेक्षाही कारण ती कधी "hurt " करत नाहीत !!!
मला सुचलेली नावे :
मराठी नाव : पिकू , राऊ, सर्जा , राया
इंग्रजी :लव्हली, ब्लॅकी , हैप्पी सिंग किंवा नुसता हैप्पी
अजून पण नावे सुचतील पण सध्या इतकीच सुचताहेत
"राणा" ठेवा , "राणा"
"राणा" ठेवा , "राणा" सरकार
नाहीतर "राणाजी" ,स ग ळे आदबी ने बोलावतील
आमच्या कुत्र्याचे नावच श्वान
आमच्या कुत्र्याचे नावच श्वान होते. त्याचा पुढे वान्या झाला.
तो इथे भेटेलः http://www.maayboli.com/node/1633
मोरपंखीस, ती आता रात्र आहे
मोरपंखीस, ती आता रात्र आहे म्हणून मला जरा टपोरी नावे सुचत आहेत.. जरा उजाडू लागले की वळतो मी सुद्धा हळूहळू क्लासिकल कडे..
आमच्या नाक्यावरील काही भटक्या कम पाळीव कुत्र्यांची नावे., (सुचवत नाहीये, बस्स धाग्याला अनुसरून आहेत म्हणून टाकतोय)
.. लाली, कजरी, कल्लू, बाबल्या...
एका बोक्याचे नाव पि़ंकूडा होते. चायनीज सूप शिवाय दुसरे काही खायचा नाही.
आमच्या कुत्र्याचे नावच श्वान
आमच्या कुत्र्याचे नावच श्वान होते. >> ईथे एक मानव नावाचे आयडी आहेत ना. तसे झाले हे
त्याचा पुढे वान्या झाला.>>> दुकान टाकले का त्याने?
लाली, कजरी, कल्लू,
लाली, कजरी, कल्लू, बाबल्या...
एका बोक्याचे नाव पि़ंकूडा होते. चायनीज सूप शिवाय दुसरे काही खायचा नाही. >>>>>>>
This is too much..!!!!
आमच्या कुत्र्याचे नावच श्वान होते. >> ईथे एक मानव नावाचे आयडी आहेत ना. तसे झाले हे
>>>>
आणि हे म्हणजे कळसच....!!!!
अरे ऋन्मेऽऽष हासुन हासुन खुर्चीतुन पडलो लेका ...
शेजारी तेलगु मुलगी बसते...विचारल काय झाल !! आता काय सांगु तिला... जाउदे म्हंटल...!!!
अहो मोरपंखी अॅक्चुअली हे टू
अहो मोरपंखी अॅक्चुअली हे टू मच होते. गंमत म्हणून लिहिलेले नाही तर सत्य आहे. कोणाच्या घरचा पाळलेला नव्हता. आमच्या बिल्डींमम्ध्ये पडीक असलेला आणि आमच्यातल्या काही मार्जारप्रेमी पोरांनी लाडावून ठेवलेला बोका होता. नालायकांना क्रिकेट बॉलसाठी पाच पाच रुपये काढायला जड जायचे पण त्याला दहा-दहा रुपये काढून चायनीज गाडीवरचे सूप पाजायचे. आणि स्वतः सुके नूडल्स खायचे.
लालूप्रसाद आठवा - हरीप्रसाद
लालूप्रसाद
आठवा - हरीप्रसाद (सदमा फेम).
भारी प्रतिसाद आलेत. ह्या
भारी प्रतिसाद आलेत.
ह्या निमित्ताने वान्या (तो इथे भेटेलः http://www.maayboli.com/node/1633), हरिणी परत एकदा भेटले.
कुत्रा मराठी आहे का पण हा
कुत्रा मराठी आहे का पण
हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आमचे एक मित्र इथून भारतात कायमचे जायला निघाले होते, म्हणून कुत्रीला पण न्यायचे होते. त्यांना येथील बर्याच जणांनी सुचवले की तिथे तिला सारखे मराठी ऐकायला लागले आजूबाजूला, तर तिच्यावर मानसिक परिणाम होतील, म्हणून तिला कुत्र्यांच्या सायकॉलॉजिस्ट कडे न्या.
सुदैवाने ते पुण्याला चालले होते, तिथे कोण मराठी बोलते आजकाल? त्यातून इथून तिथे गेलेल्या माणसांशीच काय, कुत्र्यांशी सुद्धा लोक त्यांच्या कोकाटे फेम इंग्रजीतून बोलत होते. पुढे ती कुत्री वारली - कदाचित तिचे वय झाले असेल,
पण काही लोकांना वाटले की भारतीयांचे इंग्रजी ऐकून ती घाबरून गेली व त्यामुळेच आजारी पडली!!
पुढे माझे मित्र इकडे परत आले - भारतात काय जमत नाही एकदा इकडची सवय झाल्यावर.
अजून दुश्यंत नाव कसे कोणी
अजून दुश्यंत नाव कसे कोणी सुचवले नाही
शुभ्रा सम्राट युवराज
शुभ्रा
सम्राट
युवराज
वान्याला परत भेटायचा मोह
वान्याला परत भेटायचा मोह होतोय. भेटणार.
पारु, अजून कुणी "म्याकमिलन" ही नाही सुचवलं!
कु. ऋ, एकदा वान्याला भेटून ये! ट्डोपा मटीरियल आहे वान्या.
जटायू (पक्ष्याला पण चांगलं
जटायू (पक्ष्याला पण चांगलं आहे हे नाव >>> पक्षी ? पोपट, बदक, कोंबडी हेच पक्षी पाळलेले पाहीलेत आजवर. काही जण इमू पाळतात. यातल्या कुणाला जटायू हे नाव शोभेल ?
धृष्टद्युम्न हे नाव भारदस्त
धृष्टद्युम्न हे नाव भारदस्त वाटतेय. कुत्र्याला मल्याळी समजत असेल तरी हे नाव चालेल..
त्याचा पुढे वान्या झाला.>>>
त्याचा पुढे वान्या झाला.>>> दुकान टाकले का त्याने?
ह्या धाग्यात 'उंदराच्या धाग्याचं' पोटेन्शियल दिसतंय. आणि नेमकी आता माबो बंद रहाणारे. अरेरे!!!
कुत्र्याला 'सरकार' आडनाव का
कुत्र्याला 'सरकार' आडनाव का लावणार? नै म्हणजे तो काय लग्न करणार की घरात इतर कुणाचे लग्न असले की "आमच्या माणसाच्या लग्नाला यायचं हं!" म्हणून त्याचे ही नाव पत्रिकेवर छापणार??
Pages