थंडीसाठी गरम गरम सूप रेसिपी - ३ (क्रीम ऑफ मशरूम सूप)

Submitted by विद्या भुतकर on 13 December, 2016 - 22:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२-३ कप पातळ काप केलेले छोट्या आकाराचे मश्रूम. (इथे खूप मोठेही मिळतात, मला ते आवडले नाहीत. )
१ बटाटा
१ गोल्डन रंगाचा कांदा
४ मोठ्या पाकळ्या लसूण
१ टे.स्पू. बटर
ऑलिव्ह ऑइल
थाईम (या herb मुळे सूपला खास चव येते. त्यामुळे जवळपास मिळत असल्यास नक्की वापरा. नाहीतर इटालियन सिझनिंग चालेल.)
मीठ, मिरेपूड
१ चमचा मैदा किंवा गव्हाचे पीठ

क्रमवार पाककृती: 

मश्रूम पुसून, कापून घ्यावेत. मी जास्त जाड काप करत नाही. बटाटा आणि कांद्याचे अर्धा इंच आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. लसणाचेही बारीक काप करून घ्यावे.

कापलेल्या कांदा, बटाटा, लसूण आणि मश्रूम एका भांड्या मध्ये घालून त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑईल, थाईम (हे नसेल तर इटालियन सिझनिंग), मिरेपूड आणि मीठ घालून घ्यावे.

सर्व मिश्रणाला तेल, मीठ नीट लागल्या नंतर ते एका ट्रे मध्ये घालून ओव्हनमध्ये १८०-२०० डि. सें. तापमानाला अर्धा तास ठेवावे. (ओव्हन नसेल तर हेच मिश्रण थोडे बटर घालून भांड्यात शिजेपर्यंत परतता येते. ) पण ओव्हनमध्ये लसूण खरपूस होतो आणि मश्रूमही. कांद्याचेही पापुद्रे मस्त ब्राऊन होतात.

अर्धा तास ओव्हनमध्ये राहिल्यानंतर हा ट्रे बाहेर काढून घ्यावा. मश्रूम एकदम आकसून आलेले असतील. बटाटे शिजले आहेत की नाही हे तपासून पाहावे.

मिश्रण मिक्क्सरमध्ये प्युरी करून घ्यावे.

एका भांड्यात ऑलिव्ह ऑइल आणि थोडे बटर घालून त्यात चमचाभर मैदा किंवा गव्हाचे पीठ घालावे.
पीठ थोडे भाजून त्यात हवे असल्यास दूध किंवा क्रीम घालू शकतो. मी अर्धा कप दूध घालते. दूध एकसारखे पिठात मिक्स होऊन थोडे घट्ट होते.

या मिश्रणात आता केलेली प्युरी घालावी.

साधारण एक उभा पेला तरी पाणी लागते. तरीही सूप किती घट्ट किंवा पातळ हवे आहे यावर ठरवून पाणी घालावे.
सूप उकळी आल्यावर गॅस बंद करावा.

थोडी मिरेपूड आणि मीठ घालून ब्रेकक्रम सोबत सूप सर्व्ह करावे. आम्ही यात वरून भाजलेल्या सूर्यफुलाच्या बिया टाकतो. छान कुरकुरीत लागतात.

Screen Shot 2016-12-12 at 3.54.58 PM.pngIMG_0637.JPG12804752_1056010377806270_451638744205560439_n.jpg

वाढणी/प्रमाण: 
अन्दाजे चार जण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, पाककृती विभागात जमलं कि लिहायला. या विभागात लिहिताना फोटो टाकायची सोय नाही, पण त्यासाठी वर ज्या लिन्क्स दिल्या आहेत, त्या इतरत्र कॉपी करून घ्या, मग इथे पाककृती संपादन करायला घ्या. त्यात या लिन्क्स पेस्ट करा आणि मग परत पाककृती सेव्ह करा. आता पाककृतीतच फोटो दिसतील.

Thank you Dinesh for your help. Pictures are now in recipe. Happy

VIdya.

जरा जास्तीच खटाटोप आहे असे नाही का वाटते? ते रोस्टेड पोटॅटो- मशरुम्स वगैरे तसेच खाल्ले जातील आधीच!

मस्तच रेसीपी, सूप मध्ये काय घातले आहे ते शीर्षकात दिले तर बरे पडेल जसे बटरनट स्क्वाश सूप,
मशरूम सूप. मिनिस्ट्रोन सूप. फिलिप्सचा एक सूप मेकर मिळतो त्यात तुकडे व मसाले घातले की सूप तयार होते. बरोबर सूपस च्या रेसेपी पण आहेत.

नॉरचे रेडीमेड सूप मिळते तेच वापरते मी. हे जास्त चांगले आहे.

जरा जास्तीच खटाटोप आहे असे नाही का वाटते? ते रोस्टेड पोटॅटो- मशरुम्स वगैरे तसेच खाल्ले जातील आधीच! >> हो होऊ शकते. पण सूप हे रोजच्या भाजी पोळी पेक्शा सोपे वाटते मला. एक्दा ओव्हन्मधे ठेवले की दुसरे काही जास्त लागत नाही मग.. बाहेर काढल्यावर्ची फोडणी फक्त ५ मि. असो.

सर्वान्चे आभार. Happy