नेट/पॉर्न/चॅटच्या व्यसनातून सुटून पुन्हा कामात व्यग्र होण्यासाठी काय करावे?

Submitted by एक मित्र on 28 November, 2016 - 13:40

सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. माझ्या याआधीच्या पोष्ट मधून मी माझ्या मनात दीर्घकाळ सलत राहिलेल्या छोट्या छोट्या अपमानास्पद गोष्टींना कसे हाताळायचे यावर आपल्या सर्वांना सल्ला विचारला होता. त्यावर आपण सर्वांनी जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. खरेच त्यामुळे त्या छोट्या छोट्या काटेरी गोष्टी माझ्या डोक्यातून निघून गेल्या. विशेषतः "मला यात अपमानास्पद काहीच वाटले नाही" अशा ज्या प्रतिक्रिया होत्या त्या वाचून मी गुदगुल्या केल्याप्रमाणे हसत होतो. एखादी अवघड समस्या अनपेक्षितपणे चुटकीसरशी सुटल्यावर खुश झाल्याने जे हसू येते तो प्रकार. तुम्हा सर्वांच्यामुळे खूप काही शिकायला मिळाले.

आज अजून एक समस्या तुमच्यासमोर मांडत आहे. हि समस्या माझ्याप्रमाणेच इतर अनेकांना छळत असावी म्हणून प्रातिनिधिक आहे असे वाटल्याने मांडायचे धाडस करत आहे.

मी तसा कामात खूप सिन्सियर आहे. कंपनीत माझे खूप चांगले रेप्युटेशन आहे. माझ्याकडून कोणतेही काम अपेक्षेपेक्षा खूपच चांगल्या प्रकारे पार पाडले जाते म्हणून बॉस लोक नेहमी माझ्यावर खुश असतात. आजवर माझे अप्रेजल कधीही खराब झालेले नाही. कामात असताना मला इतर काहीही सुचत नाही. फक्त कामाचा आणि कामाचाच विषय डोक्यात असतो. काम परिपूर्ण आणि पूर्ण दोषविरहीत असले पाहिजे असे मला कटाक्षाने वाटते. काम पूर्ण झाले नसेल त्यात अडचणी येत असतील आणि त्या सोडवाव्या लागत असतील तर त्या नादात कधीकधी तर मी जेवतही नाही.

पण... इथे खूप मोठा पण आहे. पण हे सगळे कामात व्यग्र असतानाच. जेंव्हा दिलेले काम संपते किंवा तो प्रोजेक्ट संपतो आणि रिकामा वेळ मिळतो तेंव्हा माझ्या सत्यानाशाला सुरवात होते. हा काळ माझ्यासाठी अत्यंत कठीण असतो. कितीही कंट्रोल केले तरी या घसरणीवरून घसरण्यापासून मी स्वत:ला वाचवू शकत नाही. बघता बघता माझी घरंगळायला सुरवात होते. हि घसरण असते टाईमपास करण्याच्या सवयीची. नेट वर चाट करणे, पॉर्न पाहणे इत्यादी अत्यंत घाणेरड्या सवयींची. तुम्हाला वाटत असेल रिकामा वेळ असल्यावर हे तर अनेकजण करतात. यात काय विशेष. पण कृपया पुढे वाचा माझ्या बाबत हे किती भयंकर थराला जाते.

काम नसण्याच्या काळात मी सुरवातीला या सर्व गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवायचा प्रयत्न करतो. पण एका क्षणी वाटते फक्त पंधरा मिनिटेच टीपी करू. आणि सुरवात होते. फेसबुकवर काही फेक आय डी काढून ठेवले आहेत. मी तिथे लॉगीन करतो. तिथे अनेक घाणेरडे घाणेरडे ग्रुप आणि पेजेस लाइक करून ठेवलेत. फेसबुक वरचा रेड्लाईट एरियाच आहे हा सगळा. खऱ्या प्रोफाईल असलेले सभ्य लोक इकडे फिरकत नाहीत. आणि इकडचे कोणी तिकडे फिरकत नाहीत. दोन वेगळी जगं आहेत. त्यामुळे इकडच्या गोष्टी बर्याचदा फेसबुकला कोणी रिपोर्ट पण करत नाहीत. कोण करणार? कारण जे इथे येतात त्यांना तेच हवे असते म्हणून येतात. इथे काहीही कामधंदे नसलेलं सगळं पब्लिक येऊन काहीही चित्रे वगैरे पोष्ट करत असतात. सगळी मादक आणि प्रोवोकेटीव. अर्धनग्न स्त्रिया किंवा जोड्या (कारण फेसबुकला पूर्ण नग्नता वर्ज्य आहे). सुरवातीला हि चित्रे फक्त बघणे इतकेच ठरवलेले असते. पण बघता बघता मीही त्या गटारात कधी लोळायला सुरवात करतो माझे मलाच कळत नाही. बघता बघता या चित्रांखाली कॉमेंट टाकणे सुरु होते. माझ्यासारखे असंख्य जण कोमेंटी टाकत असतात. त्या चित्राचे वर्णन करण्यापासून ते "इथे कुणी मुलगी/स्त्री भेटायला तयार आहे का?" अशी विचारणा करणे इथपर्यंतच्या कोमेंट्स असतात. त्या वाचता वाचता मी पण तसे लिहायला सुरवात करतो. मुली/बायकांच्या अकौंटवरून पण काही कोमेंट्स असतात. त्यांना भरपूर रिप्लाय पण आलेले असतात. अर्थात इथे जवळजवळ सगळ्या मुलींच्या व बायकांच्या प्रोफाईल खोट्या असतात. मुलांनीच टाइमपासला बनवलेल्या. तरीही एखादी खरी असेल (आणि काही असतातही खऱ्या मुली) अशा आशेने सगळे त्यांना रिप्लाय करत असतात. बायकांची प्रोफाइल बनवून टीपी करणारी टुकार मुले आणि त्यांना बळी पडलेले आशाळभूत आंबटशौकीन असा तो सगळा ओंगळवाणा खेळ असतो. त्यातल्या अनेक जणींना (!) मी मेसेज पण टाकतो. त्यातल्या काहींचे रिप्लाय येतात. चाट करताना त्यातील खऱ्या मुली कोण व मुलींचे आयडी घेतलेला टगे कोण हे बरेचदा ओळखून येते. तर कधी कधी अनेक दिवस/महिने चाट करूनही ते कळत नाही.

पण एव्हाना माझे डोके मात्र पूर्णपणे बाद झालेले असते. एकेकाळी फक्त कामाचे विचार डोक्यात असणारा मी आता मात्र कुणीतरी स्त्री/मुलगी भेटायलाच हवी या हट्टाने पेटलेला असतो. वेगवेगळ्या फोटो खाली आणि विविध ग्रुप वर दणादण पोष्ट टाकणे. अनेक मुलीना मेसेज पाठवणे. कुणी आली तिच्याशी (कि त्याच्याशी?) चाट करणे यातच अनेक तास घालवत असतो. दिवसच्या दिवस वाया जातात. मेंदूला शीण येतो. पण मन मानत नाही. डोक्यात फक्त सेक्सचे विचार असतात. काम पूर्णपणे नकोसे झालेले असते. सतत फेसबुकच्या त्या फेक अकौंट वर जाऊन कुणाचा मेसेज/रिप्लाय आलाय का पहा असे सुरु होते. नाहीतर मग पोर्न साईट वर जाऊन अश्लील व्हिडीओ पहात बसतो. तोपर्यंत कुणाचातरी रिप्लाय/मेसेज आलेला असतो. मग पुन्हा तासनतास चाट, कोमेंट्स, मेसेजेस. काही वेळाने त्यातून बाहेर पडून पुन्हा व्हिडीओज. असा सिलसिला सुरु राहतो. नेट/पॉर्न/चॅटच्या विळख्यात मी आता पूर्ण जखडला गेलेला असतो.

आणि मग इकडे नवीन काम/प्रोजेक्ट येतो. कामाचे डिस्कशन सुरु होते, मला नवीन काम दिले जाते. डेडलाईन पण ठरते. मग आठ पंधरा दिवस जातात. मग रिव्यू मिटिंगला मुडदा गेल्या सारखा मी पाय ओढत जातो. कारण मिटींगमध्ये सांगण्यासारखे मी काहीच केलेले नसते. करणार कधी? दिवसच्या दिवस ह्यातच काढलेले असतात. मग मिटिंग मध्ये काहीतरी थापा मारून वेळ निभवून परत येतो. आता नाईलाजाने का असेना काम करावेच लागेल असे वाटल्याने कामाला सुरवात करतो खरी. पण अजिबात मन लागत नाही. कामात किरकोळ अडचण जरी आली तरी तितके निमित्त पुरे पडते. मी पुन्हा पॉर्नच्या सडक्या जगात प्रवेशता होतो. पुन्हा ते दुष्टचक्र सुरु होते. एव्हाना त्याचे परिणाम खऱ्या जगात पण दिसायला सुरु होतात. कधी काळी जुन्या प्रोजेक्ट टीम मध्ये असलेल्या कलीग्ज, महिनोन्महिने जिच्या संपर्कात पण नाही अशा जुन्या मैत्रिणी, फेसबुकच्या खऱ्या अकौंट वर असलेल्या मैत्रिणी यांना पण मी उगीचच हाय हेलो चे मेसेज टाकायला सुरवात करतो. त्यातल्या काही जणींना माझे अचानक मेसज येणे विचित्र वाटते. काहीजणी समजून जातात आणि माझे मेसेजेस इग्नोर करतात. एकदोन जणींना तर मी "भेटूया का?" असेही विचारून बसलो होतो. नंतर माझे मलाच ओशाळल्यागत झाले. एकीकडे अनोळखी अथवा ओळखीची कुणीच आपल्याला भेटत नाही म्हणून मनाची तडफड सुरु होते. तर दुसरीकडे काम सोडून हे उद्योग करण्यात वेळ घालवल्याने स्वत:लाच स्वत:ची घृणा येते.

कर्तव्याच्या जगातून व्यसनाच्या जगात जाणे सहज आहे. पण व्यसनाच्या जगातून पुन्हा कर्तव्याच्या जगात परतने त्याहून कितीतरी अधिक कठीण असते. याचा अनेकदा मी अनुभव घेतला आहे. या घाणेरड्या व्यसनातून बाहेर कसे पडता येईल याविषयी मला तुमची मदत हवी आहे. कामात नसताना "असले उद्योग" करण्यापेक्षा चांगली पुस्तके वाचणे किंवा अन्य काम करणे असे काहीजण सुचवतील. पण मला ते ठावूक आहे. माझी समस्या हि आहे कि कधी गम्मत म्हणून जरी पॉर्न पाहिले किंवा फेसबुक वर टाईमपास केला तरी त्यात वाहवत न जाता पुन्हा कामाच्या मानसिकतेत तत्काळ परत कसे येता येईल याविषयी चर्चा अपेक्षित आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे. वाईट आहे अवस्था. मी सध्या ऑफिसमधुन काम नसताना, माबो टाईमपास न करणे यासाठी उपाय शोधत आहे. ईयर एन्ड रिव्युज तोंडावर आहेत. काही ईंप्रोवमेंटल प्रोडक्टिव्ह काम अपेक्षित आहे आणी मी माबोवर आहे. हा धागा बघुन जाग आली. जाते. बाय बाय.

कुठलीही गोष्ट जी व्यसन बनू शकते त्या जवळ गंमत म्हणून जरी गेलं, ती केली की माणूस त्यात फसतो, ओढला जातो. दॅट्स जस्ट हाऊ आवर ब्रेन वर्क्स.
तुमच्या लिहिण्यातून काही जाणवत असेल तर तो आहे गिल्ट, जो स्वाभाविक आहे पण स्वतःला जास्त त्रास करुन घेऊ नका. कसं आहे, कुठलंही व्यसन लागलं की त्यातून बाहेर पडायला जरा धैर्य/हिंमत लागते. त्या करता आधी आपण स्वत:ला माफ करायची गरज असते.
स्वतःला माफ करणे म्हणजे आपण जे करतोय ते बरोबर आहे असं नाही तर, आता ही सवय लागली आहे पण त्यामुळे आपण माणूस म्हणून पुर्ण वाया गेलेलो नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हे एकदा लक्षात घेतलं की माणूस कमीत कमी काही चांगली पावलं उचलू शकतो ह्यातून बाहेर पडण्याकरता.
ह्या अशा व्यसनांनी इतरांना त्रास होतोच (जर तुम्ही विवाहित असाल तर) पण जास्त त्रास हा तुम्हाला स्वतःलाच होतो. एखादी सवय का लागली आणि ती अवॉईड कशी करता आली असती हा विचार करत बसलं की आणखिन गिल्ट वाढतो, माणूस आणखिन उदास होऊन आणखिन त्याच सवयीत आणखिन खोल गुंतला जातो.नाहीतरी मी वाईटच माणूस आहे, आता लागलीच आहे सवय तर त्यातून मिळतय ते सुख तरी आणखिन अनुभवतो असं काहीसं ते दुष्टचक्र होउन बसतं.
Porn surfing is not a big deal, so just try taking some time off and do something else for a change. इतर गोष्टी आवडायला त्यांची ओळख होणं गरजेचं आहे. ओळख होऊन त्यात थोडा वेळा घालवून पुढे गोडी लागली की मग आपोआप त्या गोष्टीत जास्त वेळ जाईल. तुमच्या द्सर्‍या काही आवडी असतील त्याना अनुसरुन काही करता येइल का बघा. कुठल्या वेगळ्या विषयावर वाचन, खेळणे, काही छंद असेल तर तो ही बघा.

छान विषय मांडलात, अभिनंदन Happy

जर तुमची टेंडेंन्सी वाहावत जाण्याची असेल तर तुम्ही यातून पुर्णपणे बाहेर कसे पडता येईल यावरच उपाय शोधणे उत्तम. कंट्रोल मोड मध्ये कसे करायचे वगैरे भानगडीत पडू नका. टोटल दूर कसे जाता येईल हेच बघा.

दोन उपाय पटकन डोक्यात आलेले,

१) गर्लफ्रेंड - पण ही काही घाईगडबडीत शोधायची गोष्ट नाही. मुळात ती गोष्ट नसून व्यक्ती आहे. योग्य अशीच मिळायला हवी. पण ती शोधायला घेतली तरी यापासूंन लांब राहायला मदत होईल. कारण ती शोधाशोध सुद्धा एक फन असते.

२) छंद - तुम्हाला कोणताही पॅशनेट छंद नाही का? शोधा, आठवा, बाहेर काढा कुठेतरी आत एखादी लपलेली आवड. उदाहरणार्थ, मला स्वत:ला कामाव्यतिरीक्त जो वेळ मिळतो तो मायबोलीवरच पुरत नाही, बाकीचे ईतर छंद जोपासत, फॅमिली आणि गर्लफ्रेंडला वेळ देत, कामावर परीणाम न होता कसे वेगवान लाईफ जगतो हे माझे मला माहीत. ४८ तासांचा दिवस का नाही आणि आपल्याला पायाच्या बोटांनेही टाईप का करता येत नाही असे कित्येकदा वाटते.

आणि हो, तुम्ही एकंदरीतच वर्कोहोलिक नाही आहात, काम हे तुमचे पॅशन नाहीये. म्हणजे पॉर्नच्या व्यसनातून बाहेर पडलात तरी तो वाचलेला वेळ तुम्ही कामावर खर्च करू शकत नाही. त्यामुळे पुन्हा फावला वेळ मिळत किंवा काढत तिथेच ओढले जाणार. त्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे किंवा आणखी काही तुम्हाला शोधावेच लागणार.

हो श्री, मला माझे अनुभव लिहायचा मोह झालेला. पण उगाच त्यांना हे सोडायच्या जागी नवे नवे धंदे सुचतील म्हणून मोह आवरला Happy

आणि हो एक मित्रा, छंद शोधायचे झाल्यास ईंटरनेट न लागणारा शोधशील. अन्यथा उघडला लॅपटॉप आणि गेलास पुन्हा चुकीच्या मार्गाला असे होऊ शकते.

@ ऋन्मेष, ४८ तासांचा दिवस का नाही आणि आपल्याला पायाच्या बोटांनेही टाईप का करता येत नाही असे कित्येकदा वाटते.>>> हे बाकी लई भारी!!!

मलाही नेहमी असंच वाटतं, पण ते वाचनाच्या बाबतीत. शरीराचे काहीही झालं तरी चालेल पण वाचनाकरिता शेवटपर्यंत डोळे शाबूत रहावेत हीच माझी इच्छा.

असं वाटतंय की काम आणि मौजमजा-टाईमपास या दोघांच्या विचित्र कात्रीत तुमचं मन अडकलय. एक करू गेलं की मनाचा लंबक हट्टाने दुसऱ्या बाजूला जातोय, अन या गडबडीत कुठलेच काम धड होत नाहीये.

पोरीची जवळीक इतकीच हवीहवीशी वाटतेय का? मग ऋन्मेषने सांगितल्याप्रमाणे पटकन मनाजोगती गर्लफ्रेंड पकडा पाहू. एकदाचे काय ते तुमच्या मनाप्रमाणे होऊन जाऊ द्या. एकदा आत्मा थंड झाला की दुसऱ्या करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी दिसायला लागतील. या नादात वाहवत जाल आणि कामाकडे दुर्लक्ष होईल असे वाटू देऊ नका. शिरा कितीही गोड लागला, तरी रोजच्या रोज खाववत नाही. Happy

हवं तर नोकरी आणि छोकरी दोन्हीकडे एकसाथ प्रयत्न चालू द्या. दोन्हीपैकी एकजरी जमली, तरी तुमच्या मनासारखेच होईल. दोन्ही गोष्टी जुळून आल्या तर सोन्याहून पिवळे. असे समजा की आत्त्ता असमाधानी जरूर असेन, पण समाधान मिळवण्यासाठी माझे प्रयत्न तर चालू आहेत. प्रयत्न चालू ठेवले, तर एक ना एक दिवस हवी असणारी गोष्ट नक्की मिळेल. पण एकीच्या नादात दुसरी हातातून निसटतय असे वाटून घेऊ नका. अशाने दोन्हीतल्या एकाही गोष्टीत तुमचे मन लागायचे नाही.

यु नीड अ वुमन इन युअर लाईफ.एखादी मैत्रिण मिळवा,तिच्याशी निकोप नाते ठेवा .कामाकडे लक्ष द्या,मी कामधंदा करणे कधी जास्त मनावर घेतले नाही,त्याचे परिणाम भोगत आहे.

खरंच यातून बाहेर पडावंसं वाटत असेल, तर आधी ती सगळी फेसबूक अकाऊंट्स डिलीट करून टाका.
स्मार्टफोनवरून फेसबूक काढून टाका.
तुमचं जेन्युइन फेसबूक अकाऊंटही काही महिने डि-अ‍ॅक्टिव्हेट करा.

आणि मग मुक्तांगण गाठा.

First..Congratulations and I applaud you for accepting that you have a problem and your seeking help for it.

From the post, I cannot guess your age (maybe in late 20s?)
A) if you are in your late 20s/Unmarried this is still in OK range (You will be fine once you get married..hopefully) but if it is affecting your work thats not a good sign and you should try counselling. (I believe this is an issue for many of today's youths and there is help available).
I dont know if there is something called sexoholics anonymous (similar to Alcoholics Anonymous)
in India, if so you can try going to that.

B) If you are married/have kids etc this is really a problem and you need immediate psychiatric help.

Wish you all the best for the future.

youtube पण वापर....

गीता सर्च कर...

रामानंद सागर यांची " hiunduism - bhagwat gita - part1" इतकच बघ.

फरक नाही पडला तर चर्चा करु.

आजकाल भारतात गर्ल्फ्रेंड काय अंब्याच्या टोपलीत आंबे पडले असतात तश्या पडल्या असतात का, की आपली एक शोधायची बर्‍यापैकी?

नि नेट नको म्हणून गर्लफ्रेंड? काही अनुभव आहे का गर्लफ्रेंड म्हणजे काय ताप असतो? भीक नको पण .... अशी अवस्था होईल!!

Light 1 Happy

As most suggested, you seems to be alone and need a girl friend or someone to communicate. Love sometime is powerful enough to drown these addictions if you are able to find right pair.

As you show addictive tendencies, stay away from alcohol and smoking. Don't take that first sip or puff.

To get out of current addiction which is more like OCD, try following

1) Identify trigger which makes you turn to porn.
2) Take control using following tools

- Delay ( I will do it but after 15 min). After 15 min, urge would die down most time
- Walk away. Completely walk away from Internet and start doing something else like walk down a park, talking to friend, coffee with friends etc
- Restrict. (I will only do this and not that). Divide addiction and restrict each time like only 15 min, no message send today, will not visit certain site etc
- Do the apposite. As urge force you to internet, go there and do exactly apposite. Just read news. Read on subject you like,

Never negotiate with the urge or say this is one last time. It never works.

Slowly take back control. Divert energies and time into something else like playing an instrument, reading books, painting.

Hope it helps.

@ avdhut, व्वा:, आपण फारच मोलाचा सल्ला दिला आहे. आपले अभिनंदन!!! आणि कौतुकसुद्धा!!! खरंच! आपण सांगितलेल्या पद्धतीने आपण कुठल्याही व्यसनावर मात करू शकतो. मी आपली हि पोस्ट नक्कीच संग्रही ठेवणार आहे.

सर्वांच्या प्रतिक्रियांबद्द्ल खूप खूप धन्यवाद. आधार वाटला, गम्मत वाटली आणि थोडी काळजी पण वाटली.

आधार अशासाठी कि यातून बाहेर पडायला काहींनी स्टेप्स दिल्या आहेत. तसेच "पोर्न वाईट नसते आपण वाईट असतो" अशा वाक्यांमधून hint मिळाली. वैद्यबुवा, mansmi18, shrikkk यांनी आधार दिला.

ऋन्मेष च्या प्रतिक्रियांमुळे तणाव हलका झाला. हो बरोबर आहे "कंट्रोल मोड" मला जमणारा नाही तेंव्हा या दलदलीतून बाहेर पडणे हेच सध्याचे ध्येय आहे. मला कामाच्या मोड मध्ये जायचे आहे जिथे मी खूप वेगळा असतो. मी वर्कोहोलिक होतो. त्याकाळात मला पोर्नच काय तर फेबु आणि मायबोलीवर सुद्धा यायची इच्छा होत नाही. पण खूप छान असते ती अवस्था. असो. ऋणमेष, सिंथेटिक जिनियस, विलभ, नन्द्या४३ यांच्या प्रतिक्रियांमुळे हलके वाटले.

मानसोपचार तज्ञाची गरज आहे अशा प्रतिक्रियांमुळे मला राग नक्कीच नाही आला पण काळजी जरूर वाटली. जी माझी भीती आहे आणि जे मी लिहायचे टाळले होते तेच या लोकांनी कसे ओळखले याचे आश्चर्य वाटले. मला स्वत:ला हि अनेकदा वाटले कि मानसोपचार तज्ञाकडे जावे लागेल कि काय. पण त्याची गरज नाही असे वाटले. पण आता मी या ऑप्शनचा पण विचार करेन. अनिश्का., ललिता-प्रीति धन्यवाद.

सचिन काळे, तुमचे अगदी बरोबर आहे. avdhut यांनी खरेच मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांची पोस्ट नक्कीच संग्रही ठेवण्यासारखी आहे. त्यातल्या त्यात हे वाक्य:

Never negotiate with the urge or say this is one last time. It never works.

मास्टरपीस ! या वाक्यात खूप काही दडले आहे. मी हे माझ्या कामाच्या ठिकाणी व घरीसुद्धा लिहून ठेवणार आहे. कारण माझी नेमकी चूक इथेच होत होती. फक्त एकदाच, फक्त पंधराच मिनटे असे करून मी प्रत्येक वेळी माझ्यातल्या वाईट प्रवृत्तींना संधी देत असे. पण नाही. वाईट प्रवृत्तीला (स्वत:मधली किंवा इतरांमधली) कधीच संधी देऊ नये. शेवटची नाही वा थोडा वेळ सुद्धा नाही. सरळ तोडूनच टाकावे. avdhut सर मान गये. खूप खूप धन्यवाद.

मानसोपचार तज्ञाची गरज आहे अशा प्रतिक्रियांमुळे मला राग नक्कीच नाही आला पण काळजी जरूर वाटली. जी माझी भीती आहे आणि जे मी लिहायचे टाळले होते तेच या लोकांनी कसे ओळखले याचे आश्चर्य वाटले. मला स्वत:ला हि अनेकदा वाटले कि मानसोपचार तज्ञाकडे जावे लागेल कि काय. पण त्याची गरज नाही असे वाटले. पण आता मी या ऑप्शनचा पण विचार करेन. अनिश्का., ललिता-प्रीति धन्यवाद.>>>>>> मानसोपचार तज्ञांकडे जाण्यात आजिबात कमीपणा नाही. ते उलट बरोबर शब्दात सांगतील आणि योग्य मार्ग पण सुचवतील. तज्ञांकडे जावं लागलं म्हणजे आपल्याला मानसिक आजार आहे ही भिती बाळगायची आजिबात गरज नाही (तशी भिती मनात असेल तर). ह्या सगळ्याचा बागुलबुवा इतर लोकांनी करुन ठेवला आहे. कुठल्याही क्षेत्रातल्या एक्स्पर्ट्सचा सल्ला घ्यायला आजिबात कचरलं नाही पाहिजे की कुठेही कमीपणा वाटला नाही पाहिजे. It will only help you.

मानसोपचार तज्ञाची गरज आहे अशा प्रतिक्रियांमुळे मला राग नक्कीच नाही आला पण काळजी जरूर वाटली. जी माझी भीती आहे आणि जे मी लिहायचे टाळले होते तेच या लोकांनी कसे ओळखले याचे आश्चर्य वाटले.
>>>>>

हा हा हा
अहो असे काही नाहीये, ईथे तुम्ही "ब्रांडेड मोजे घ्यायचेत" असा धागा काढला तरी तुम्हाला पाचपन्नास जणांकडून मानसोपचार तज्ञांना भेटून या असे सल्ले भेटतील. मला स्वतःला सदुसष्ट हजार तीनशे बहात्तर वेगवेगळ्या सभासदांकडून अडतीस लाख पाचशे बावन्न वेळा हा सल्ला ईथे मिळालाय Wink

जोक्स द अपार्ट, मानसोपचार काही गैर नसले तरी तसे काही नसतानाही उगाच जाण्यात हशील नाही. म्हणजे उगाच कोणी तुम्हाला फसवून पैसे उकळायला नकोत म्हणून हे बोलतोय.

त्या आधी मस्त पैकी डिअर जिंदगी बघून या, तो पिक्चर सगळा या मानसिक आजारावरच आहे, तो बघूनच फरक पडला तर दोनशे रुपयांत काम होईल. पॉपकॉर्न खाणार असेल तर चारशे.
सविस्तर ईथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/60941

विचारांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. Happy Thoughts जॉईन करा. हजारो जणांना उपयोग झाला आहे. कित्येकांची आयुष्ये बदलली आहेत. पुण्यात त्यांचा खूप मोठा आश्रम आणि निवासी शिबिरे असतात असे ऐकले आहे.

> एक मित्र,
> मुलीच्या कंसेंट ने अफेअर/लग्न करा.

इतके सोपे नाई ओ असते तर हा धागा निघाला नसता Happy

> विचारांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. Happy Thoughts जॉईन करा. हजारो जणांना उपयोग झाला आहे. कित्येकांची आयुष्ये बदलली आहेत. पुण्यात त्यांचा खूप मोठा आश्रम आणि निवासी शिबिरे असतात असे ऐकले आहे.

हे मी ट्राय केले आहे त तात्पुरता फरक पडतो. पुन्हा कही दिवसनी तेच.

ह्या धाग्यला अनेक महिन्यानि रिप्लाय देतोय करण शेवटचे अनेक प्रतिसाद बघितले नव्हते. धन्यवाद.

>> अजून प्रॉब्लेम आहे का? एक आयडिया देऊ का?

हो नक्की द्या पण गांभीर्याने देणार असाल तरच द्या. तुमचे अनेक प्रतिसाद टिंगलटवाळी करणारे किंवा उपहासात्मक असतात म्हणून म्हटले.

तुमच्या बोलण्याचे मनावर घेतले नाही...
हा आहे उपाय -समजा तुम्हाला एकदम तलब लागलीय पॉर्न बघण्याची तर अशा वेळी पॉर्न नका लावू ,सरळ हस्त मैथुन करून रिलीज करून घ्या. आणि हस्त मैथुन मध्ये काहीही चुकीचे नाहीय- hope u know that.
त्यानंतर तुम्हाला पॉर्न बघायची इचछा होणार नाही.
पॉर्न च्या जाळ्यातून नक्कीच सुटाल !

हे मी गांभीर्याने सांगत आहे.

च्रप्स, जनरली लोक जे नंतर करतात पण ते तुम्ही आदी करायला सांगताय Happy पण तरीही उपाय म्हणन याकडे पहिले तरी फारसे उपयोग होईलसे वाटत नाही. तासभराने पुन: तेच फिलिंग येणार. नाही का. असो. पण गंभीरपणे त्यबद्दल सुचवलेत त्यबद्दल धन्यवाद.

mi_anu यांनी सुचवलेला पर्याय परिणामकारक आहे पण अवघड सुद्धा आहे...

Your behavior seems to be compulsory behavior. Let go off past... easier to say than done Happy
As u have said, this has become more of regular issue with many. Try to have some real pleasure, on regular basis than watching porn. Invest yourself emotionally somewhere... many people have already suggested lot of ways to over come your problem... you can definitely try to get out of it soon.
If you are addicted to physical pleasure, which disrupts your office work, then try releasing that pressure in the morning.... it will help you concentrate more on your regular work definitely. Trust me Happy

च्रप्स, जनरली लोक जे नंतर करतात पण ते तुम्ही आदी करायला सांगताय
>>>>

मग आधी करू नका. बघायला सुरुवात झाल्या झाल्या करा. जे नेहमी अर्धा तास पॉर्न पाहणे एंजॉय करत असाल त्याऐवजी पाचच मिनिटात खेळ खल्लास होऊ लागला तर चस्का आपोआप कमी होईल.

Pages