नेट/पॉर्न/चॅटच्या व्यसनातून सुटून पुन्हा कामात व्यग्र होण्यासाठी काय करावे?

Submitted by एक मित्र on 28 November, 2016 - 13:40

सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. माझ्या याआधीच्या पोष्ट मधून मी माझ्या मनात दीर्घकाळ सलत राहिलेल्या छोट्या छोट्या अपमानास्पद गोष्टींना कसे हाताळायचे यावर आपल्या सर्वांना सल्ला विचारला होता. त्यावर आपण सर्वांनी जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. खरेच त्यामुळे त्या छोट्या छोट्या काटेरी गोष्टी माझ्या डोक्यातून निघून गेल्या. विशेषतः "मला यात अपमानास्पद काहीच वाटले नाही" अशा ज्या प्रतिक्रिया होत्या त्या वाचून मी गुदगुल्या केल्याप्रमाणे हसत होतो. एखादी अवघड समस्या अनपेक्षितपणे चुटकीसरशी सुटल्यावर खुश झाल्याने जे हसू येते तो प्रकार. तुम्हा सर्वांच्यामुळे खूप काही शिकायला मिळाले.

आज अजून एक समस्या तुमच्यासमोर मांडत आहे. हि समस्या माझ्याप्रमाणेच इतर अनेकांना छळत असावी म्हणून प्रातिनिधिक आहे असे वाटल्याने मांडायचे धाडस करत आहे.

मी तसा कामात खूप सिन्सियर आहे. कंपनीत माझे खूप चांगले रेप्युटेशन आहे. माझ्याकडून कोणतेही काम अपेक्षेपेक्षा खूपच चांगल्या प्रकारे पार पाडले जाते म्हणून बॉस लोक नेहमी माझ्यावर खुश असतात. आजवर माझे अप्रेजल कधीही खराब झालेले नाही. कामात असताना मला इतर काहीही सुचत नाही. फक्त कामाचा आणि कामाचाच विषय डोक्यात असतो. काम परिपूर्ण आणि पूर्ण दोषविरहीत असले पाहिजे असे मला कटाक्षाने वाटते. काम पूर्ण झाले नसेल त्यात अडचणी येत असतील आणि त्या सोडवाव्या लागत असतील तर त्या नादात कधीकधी तर मी जेवतही नाही.

पण... इथे खूप मोठा पण आहे. पण हे सगळे कामात व्यग्र असतानाच. जेंव्हा दिलेले काम संपते किंवा तो प्रोजेक्ट संपतो आणि रिकामा वेळ मिळतो तेंव्हा माझ्या सत्यानाशाला सुरवात होते. हा काळ माझ्यासाठी अत्यंत कठीण असतो. कितीही कंट्रोल केले तरी या घसरणीवरून घसरण्यापासून मी स्वत:ला वाचवू शकत नाही. बघता बघता माझी घरंगळायला सुरवात होते. हि घसरण असते टाईमपास करण्याच्या सवयीची. नेट वर चाट करणे, पॉर्न पाहणे इत्यादी अत्यंत घाणेरड्या सवयींची. तुम्हाला वाटत असेल रिकामा वेळ असल्यावर हे तर अनेकजण करतात. यात काय विशेष. पण कृपया पुढे वाचा माझ्या बाबत हे किती भयंकर थराला जाते.

काम नसण्याच्या काळात मी सुरवातीला या सर्व गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवायचा प्रयत्न करतो. पण एका क्षणी वाटते फक्त पंधरा मिनिटेच टीपी करू. आणि सुरवात होते. फेसबुकवर काही फेक आय डी काढून ठेवले आहेत. मी तिथे लॉगीन करतो. तिथे अनेक घाणेरडे घाणेरडे ग्रुप आणि पेजेस लाइक करून ठेवलेत. फेसबुक वरचा रेड्लाईट एरियाच आहे हा सगळा. खऱ्या प्रोफाईल असलेले सभ्य लोक इकडे फिरकत नाहीत. आणि इकडचे कोणी तिकडे फिरकत नाहीत. दोन वेगळी जगं आहेत. त्यामुळे इकडच्या गोष्टी बर्याचदा फेसबुकला कोणी रिपोर्ट पण करत नाहीत. कोण करणार? कारण जे इथे येतात त्यांना तेच हवे असते म्हणून येतात. इथे काहीही कामधंदे नसलेलं सगळं पब्लिक येऊन काहीही चित्रे वगैरे पोष्ट करत असतात. सगळी मादक आणि प्रोवोकेटीव. अर्धनग्न स्त्रिया किंवा जोड्या (कारण फेसबुकला पूर्ण नग्नता वर्ज्य आहे). सुरवातीला हि चित्रे फक्त बघणे इतकेच ठरवलेले असते. पण बघता बघता मीही त्या गटारात कधी लोळायला सुरवात करतो माझे मलाच कळत नाही. बघता बघता या चित्रांखाली कॉमेंट टाकणे सुरु होते. माझ्यासारखे असंख्य जण कोमेंटी टाकत असतात. त्या चित्राचे वर्णन करण्यापासून ते "इथे कुणी मुलगी/स्त्री भेटायला तयार आहे का?" अशी विचारणा करणे इथपर्यंतच्या कोमेंट्स असतात. त्या वाचता वाचता मी पण तसे लिहायला सुरवात करतो. मुली/बायकांच्या अकौंटवरून पण काही कोमेंट्स असतात. त्यांना भरपूर रिप्लाय पण आलेले असतात. अर्थात इथे जवळजवळ सगळ्या मुलींच्या व बायकांच्या प्रोफाईल खोट्या असतात. मुलांनीच टाइमपासला बनवलेल्या. तरीही एखादी खरी असेल (आणि काही असतातही खऱ्या मुली) अशा आशेने सगळे त्यांना रिप्लाय करत असतात. बायकांची प्रोफाइल बनवून टीपी करणारी टुकार मुले आणि त्यांना बळी पडलेले आशाळभूत आंबटशौकीन असा तो सगळा ओंगळवाणा खेळ असतो. त्यातल्या अनेक जणींना (!) मी मेसेज पण टाकतो. त्यातल्या काहींचे रिप्लाय येतात. चाट करताना त्यातील खऱ्या मुली कोण व मुलींचे आयडी घेतलेला टगे कोण हे बरेचदा ओळखून येते. तर कधी कधी अनेक दिवस/महिने चाट करूनही ते कळत नाही.

पण एव्हाना माझे डोके मात्र पूर्णपणे बाद झालेले असते. एकेकाळी फक्त कामाचे विचार डोक्यात असणारा मी आता मात्र कुणीतरी स्त्री/मुलगी भेटायलाच हवी या हट्टाने पेटलेला असतो. वेगवेगळ्या फोटो खाली आणि विविध ग्रुप वर दणादण पोष्ट टाकणे. अनेक मुलीना मेसेज पाठवणे. कुणी आली तिच्याशी (कि त्याच्याशी?) चाट करणे यातच अनेक तास घालवत असतो. दिवसच्या दिवस वाया जातात. मेंदूला शीण येतो. पण मन मानत नाही. डोक्यात फक्त सेक्सचे विचार असतात. काम पूर्णपणे नकोसे झालेले असते. सतत फेसबुकच्या त्या फेक अकौंट वर जाऊन कुणाचा मेसेज/रिप्लाय आलाय का पहा असे सुरु होते. नाहीतर मग पोर्न साईट वर जाऊन अश्लील व्हिडीओ पहात बसतो. तोपर्यंत कुणाचातरी रिप्लाय/मेसेज आलेला असतो. मग पुन्हा तासनतास चाट, कोमेंट्स, मेसेजेस. काही वेळाने त्यातून बाहेर पडून पुन्हा व्हिडीओज. असा सिलसिला सुरु राहतो. नेट/पॉर्न/चॅटच्या विळख्यात मी आता पूर्ण जखडला गेलेला असतो.

आणि मग इकडे नवीन काम/प्रोजेक्ट येतो. कामाचे डिस्कशन सुरु होते, मला नवीन काम दिले जाते. डेडलाईन पण ठरते. मग आठ पंधरा दिवस जातात. मग रिव्यू मिटिंगला मुडदा गेल्या सारखा मी पाय ओढत जातो. कारण मिटींगमध्ये सांगण्यासारखे मी काहीच केलेले नसते. करणार कधी? दिवसच्या दिवस ह्यातच काढलेले असतात. मग मिटिंग मध्ये काहीतरी थापा मारून वेळ निभवून परत येतो. आता नाईलाजाने का असेना काम करावेच लागेल असे वाटल्याने कामाला सुरवात करतो खरी. पण अजिबात मन लागत नाही. कामात किरकोळ अडचण जरी आली तरी तितके निमित्त पुरे पडते. मी पुन्हा पॉर्नच्या सडक्या जगात प्रवेशता होतो. पुन्हा ते दुष्टचक्र सुरु होते. एव्हाना त्याचे परिणाम खऱ्या जगात पण दिसायला सुरु होतात. कधी काळी जुन्या प्रोजेक्ट टीम मध्ये असलेल्या कलीग्ज, महिनोन्महिने जिच्या संपर्कात पण नाही अशा जुन्या मैत्रिणी, फेसबुकच्या खऱ्या अकौंट वर असलेल्या मैत्रिणी यांना पण मी उगीचच हाय हेलो चे मेसेज टाकायला सुरवात करतो. त्यातल्या काही जणींना माझे अचानक मेसज येणे विचित्र वाटते. काहीजणी समजून जातात आणि माझे मेसेजेस इग्नोर करतात. एकदोन जणींना तर मी "भेटूया का?" असेही विचारून बसलो होतो. नंतर माझे मलाच ओशाळल्यागत झाले. एकीकडे अनोळखी अथवा ओळखीची कुणीच आपल्याला भेटत नाही म्हणून मनाची तडफड सुरु होते. तर दुसरीकडे काम सोडून हे उद्योग करण्यात वेळ घालवल्याने स्वत:लाच स्वत:ची घृणा येते.

कर्तव्याच्या जगातून व्यसनाच्या जगात जाणे सहज आहे. पण व्यसनाच्या जगातून पुन्हा कर्तव्याच्या जगात परतने त्याहून कितीतरी अधिक कठीण असते. याचा अनेकदा मी अनुभव घेतला आहे. या घाणेरड्या व्यसनातून बाहेर कसे पडता येईल याविषयी मला तुमची मदत हवी आहे. कामात नसताना "असले उद्योग" करण्यापेक्षा चांगली पुस्तके वाचणे किंवा अन्य काम करणे असे काहीजण सुचवतील. पण मला ते ठावूक आहे. माझी समस्या हि आहे कि कधी गम्मत म्हणून जरी पॉर्न पाहिले किंवा फेसबुक वर टाईमपास केला तरी त्यात वाहवत न जाता पुन्हा कामाच्या मानसिकतेत तत्काळ परत कसे येता येईल याविषयी चर्चा अपेक्षित आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेट नव्हे पण मला फ्रीसेल खेळत बसण्याचे व्यसन जडले आहे - अनेक वर्षांपूर्वी हा खेळ काँप्युटरवर नवीन आला तेंव्हा पासून. साधारणपणे कामाच्या वेळी असले करत बसले तर बॉस येऊन दम देतो, पण आमच्याकडे तसे काही झाले नाही. मी एकदा निवांत खेळत बसलो असता माझा बॉस आला - त्याने विचारले की हे काय आहे, सॉलीटेअर का? मी म्हंटले नाही - मायक्रोसॉफ्टने हे मुद्दाम तयार केले. अधून मधून हे केल्यावर कळते की आपल्या सिस्टिम्स बरोबर चालल्या आहेत की नाही. मग बॉस म्हणाला मी पण जाऊन बघतो माझ्या काँप्युटरवर. पाच मिनिटात परत आला नि म्हणाला माझ्या काँप्युटरमधे काही गडबड आहे - यू लूज असा मेसेज येतो. मी म्हंटले ते दुरुस्त कसे करायचे मला माहित आहे. - तू इथे बसून असे असे काम कर, तोपर्यंत मी बघून येतो. मग मी त्याच्या ऑफिसात जाऊन थोडा वेळ खेळून एक डाव परत चालू केला नि त्याला बोलावले नि दाखवले की पहा आता यू विन असे आले. पण आता तू हे करू नको, सारखे सारखे करशील तर कदाचित काँप्युटर कायमचा बिघडेल. मी येऊन करून जात जाईन.

रम्य ते २५ वर्षांपूर्वीचे ऑफिस जीवन. आजकाल म्हणे दुपारी १०-१५ मिनिटे नॅपहि घेऊ देत नाहीत! बरे झाले मी रिटायर झालो.

चांगला विषय मांडालास
ऋन्मेऽऽष : उत्त्तम, आवडल आपल्याला

एक मित्र
केल मैथुन किंवा हस्त मैथुन आणि झालास रीकामा इतक सोप हे नाही.
मनातला गाळ रीकामा केल्यावर तो परत भरणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

अवधूत यांनी खूप छान सल्ला दिला. ही फक्त एक मनाला जडलेली सवय असू शकते ज्यामधून हुम्ही निश्चीत बाहेर येउ शकता. आवश्यक वाटल्यास मानसोपचार तज्ञाची मदत आवश्य घ्या.

आज जरी अनेक वेळा एकटे असल्या मुळे तुम्ही काही एकाग्रता घालवणार्या गोष्टी करत असलात आणि योग्य जोडीदार मिळवणॅ हा त्यावरचा उपाय असला तरीही, परिस्थीतीतून पळुन जाण्यासाठी जोडीदार मिळवण्याची घाइ केलित तर परिस्थीती अजुनहि बिघडू शकते. तुम्हाला कदाचित योग्य जोडीदार मिळेल किंवा मिळणारही नाही. ज्या पुर्वीच्या मैत्रिणी तुमच्या पुर्वी योग्य जोडीदार बनू शकल्या नाहीत त्या आता बनतील हि अवस्तव आशा तर नाही ना याचा विचार करा.

जर त्या तुमच्या कडे दुर्लक्श करीत असतील तर, त्या त्यान्चे हित पहात आहेत आणि तुम्ही तुमच्या गरजा पूर्तिचे प्रयत्न करत आहात यामध्ये तुम्ही किंवा त्या अयोग्य किंवा वाइट नाही आहात असा वस्तूनिष्ट द्रुश्टिकोन तुम्हाला मदत करेल.

यामध्ये तुम्ही स्वतःला ज्या परिस्थीति मध्ये समजत आहात, त्याच परिस्थीती मध्ये नक्कि खरच आहात ना याचाही एक आढावा घ्या. तुम्ही स्वतःची अयोग्य सेल्फ असेस्मेंट करत असाल किंवा तुम्ही केलेली सेल्फ असेस्मेंट वस्तूनिष्ट नसेल तर तेही एक तुमच्या आताच्या किंवा यापुढे उद्भवू शकणारया समस्यानचे कारण असू शकते. जसे तुमचे ओफिस मधले रेप्युटेशन चांगले आहे आणि हे सगळे विषय काम सम्पल्यावरच निर्माण होतात, आणि तुम्हाला प्रोजेक्ट रेव्यु मध्ये काम अपूर्ण असल्यामुळे काही तरी सन्गून बाहेर पडावे लागते हे दोन्ही कसे शक्य आहे?

योग्य वेळी योग्य मानसोपचार तज्ञाची आवश्य भेट घ्या.

सर्वांचे पुनः एकदा आभार. माफ करा पण तो हस्त मैथुन वाला उपाय पटत नाही नाही केल्या. म्हणजे कायमसाठी परिणामकारक वाटत नाही.

>>> तुमचे ओफिस मधले रेप्युटेशन चांगले आहे आणि हे सगळे विषय काम सम्पल्यावरच निर्माण होतात, आणि तुम्हाला प्रोजेक्ट रेव्यु मध्ये काम अपूर्ण असल्यामुळे काही तरी सन्गून बाहेर पडावे लागते हे दोन्ही कसे शक्य आहे? >>>

तेच मी पुढे डिटेल मध्ये लिहिले आहे सर. थोडक्यात असे कि, काम नसण्याच्या काळात जर माझी गाडी रुळावरून घसरली तर नवीन प्रोजेक्ट आल्यानंतर ती पुन: रुळावर आणायला मला प्रचंड प्रयास लागतात. पण वस्तुनिष्ठपणे परिस्थितीकडे पाहण्याचा आपला सल्ला आवडला. धन्यवाद.

सध्या तरी मी या फेज मधून बराच बाहेर आलो आहे. पुढचे माहित नाही. सर्व प्रतिसादकर्ते यांचे पुन्हा आभार.

माफ करा पण तो हस्त मैथुन वाला उपाय पटत नाही नाही केल्या. म्हणजे कायमसाठी परिणामकारक वाटत नाही.
>>> अहो काही दिवस ट्राय करून बघा.. आधीच काय नाही,नाही.

विपश्यना करण्याबाबत काही विचार केलात का....

इगतपुरीला जाऊन रहा, त्यांचा एक कोर्स करा, ते इंटरनेट काय, मोबाईलही देत नाहीत ताब्यात. सात्विक जेवण, सात्विक राहणी.

आणि जशा सवयी जडतात तशा प्रयत्ने सवयी मोडतात सुद्धा.

बघा एकदा प्रयत्न करून, अन्यही काही फायदे झाले तर चांगलेच आहे. नाहीच झाले तर निदान प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे समाधान तरी राहील

>>विपश्यना करण्याबाबत काही विचार केलात का....
येस, हा एक चांगला उपाय ठरू शकतो. इगतपुरीलाच जावे लागेल असे नाही,
त्यांची केंद्रे इतर शहरांमधे (पुणे, मुंबई, इ.) पण आहेत असे ऐकले होते.

ध्यान धारणेची सवय नसेल तर विपश्यना अवघड जाईल.

आर्ट ऑफ लिव्हिंगची सुदर्शन क्रिया हा एक पर्याय आहे. अनेक मनोकायिक आजारांसाठी ती सुचवली आहे.
https://www.artofliving.org/in-en/sudarshankriya-research

मी स्वतः शिक्षक असल्याने मी अनुभवावरून सांगू शकतो. अनेक मनोरूग्ण बरे होताना पाहीले आहेत.
नुकत्याच एका बायपोलार पेशंटच्या गोळ्या बंद झाल्यात.
एक मुलगा दिसेल त्या बाईला स्कॅन करायचा अगदी कोणीही अपवाद नव्हती. सतत तेच विचार . तो ही बर्‍यापैकी रोगमुक्त होताना पहातोय.

अधिक आपण पर्सनल चॅटवर बोलू.

उपयुक्त धागा आहे.. धागा लेखकाच्या समश्येवर बहुतांश उपाय देखील सुचविल्या गेलेत.. माझ्या मते कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट आहे. कुठलीही सवय किंव्हा व्यसन एका ठरविक काळापर्यंत ठीक पण नंतर तिचे दुष्परिणाम दिसून येतात. पण त्याचा एवढा मोठा बाऊ करून घेण्याची काही गरज नसते. एकादी गोष्ट आपण चुकीची करतोय, हे आपल्या मनाला पटलं कि मन त्याच गोष्टीवर जास्त विचार करत राहते.. अर्थात हा विचार नकारत्मक दिशेने होत असल्याने आपली सवय किंव्हा व्यसन दूर करण्यासाठीची जी काही पॉझिटिव्ह एनर्जी असते तीसुद्धा यात नष्ट होण्याचा धोका असतो. त्यामुळं अशा वेळी नकारात्मक विचार आवर्जून टाळावेत. श्याक्यतो सकारात्मक गोष्टींच्या सहवासात वेळ घालवावा. ऋन्मेष यांनी चांगला मार्ग सुचविला आहे एकादी मैत्रीण आणि आवडत्या छंद जोपासणे. मैत्रीण हा पर्याय श्यक्य नसेल तर सरळ लग्नाचा विचार करण्यासही हरकत नाही. शेवटी मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक आहे.. आपण एकादी गोष्ट मनाशी ठामपणे ठरविली तर ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी सहजपणे वाट निर्माण होत असतात..

ध्यान धारणेची सवय नसेल तर विपश्यना अवघड जाईल.
>> असे काही नाहीये. लगेच इथे आर्टऑफलिव्हिंग ची मार्केटींग सुरु केली का गुगु?

लग्न केले/ गर्ल फ्रेंड मिळाली म्हणजे पॉर्न पाहण्याची सवय सुटेल असे लोक का मानतात?
पॉर्न साईट पाहणारे मेजोरीटी लोक अविवाहित असतात वगैरे काही डेटा आहे का कोणाकडे?

लग्न केले/ गर्ल फ्रेंड मिळाली म्हणजे पॉर्न पाहण्याची सवय सुटेल असे लोक का मानतात?

>> बायको/गर्लफ्रेंड किंवा नवरा/बॉयफ्रेंड असेल तर त्या व्यक्तीला लैंगिक समाधान असेल त्यामुळे पॉर्न पाहिले जाणार नाही अशी समजूत याला कारणीभूत आहे. पण हा समज योग्य असेलच असे नाही. हा धागा पहा:

https://www.maayboli.com/node/60915

एकपत्नीव्रत, विवाह संस्कृती वगैरे आदर्श मानले जात असलेल्या आपल्या देशात लैंगिक असमाधान किती आहे याचा अंदाज येईल. पॉर्नच्या व्यसनाचा हा धागा एक प्रातिनिधिक आहे. एका सर्वे नुसार जगात पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत भारत तिसऱ्या नंबरला आहे. तसेच बलात्कारांच्या प्रमाणात सुद्धा भारत आघाडीवर आहे. आश्चर्य काहीच नाही.

परत वाचला धागा. परत परत दोन तीनदा वाचला. तुमची समस्या तुम्हीच लिहिली आहे. तुमची समस्या ही आहे की तुम्हाला ही सवय सोडायचीच नाही आहे. तुम्हाला हे व्यसन न सोडता व्यसनाचा आनंद घ्यायचा आहे. स्वतःच्याच सवयीने तुम्हाला किती जखडून टाकले आहे हे कदाचित लक्षात येईल आता. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर मला रोज दहा बाटल्या दारु प्यायची आहे पण तिचा दुष्परिणाम नको असा काहीतरी उपाय तुम्ही मागत आहात. रोज चेनस्मोकींग करायची आहे पण फुफ्फुसांवर परिणाम नको व्हायला. तर मित्रा, असं काही नसतं.

तुम्हाला एक घाव दोन तुकडे उपाय करायला हवा. एक तर ते सगळे फेक अकाउंट डिलिट मारा. परत कधीच जायचेच नाही. ही कल्पना कठीण वाटत असेल तर अल्लामालिक. सिगरेट्पासून दारू पोर्न पर्यंत सगळी व्यसने अशीच एका झटक्यात ज्यांनी सोडली आहेत तेच यशस्वीपणे या व्यसनांपासून कायम दूर राहू शकले आहेत हे बघितले आहे.

दुसरा उपाय व्यसनमुक्तीकेंद्र.

एका दिवसात व्यसन सुटत नसते हो.. रोज 5 कप चहा पिणारा सुरुवातीला 3 कप,नंतर 2 कप नंतर डेली 1 कप, अर्धा, नंतर दोन दिवसाला अर्धा..असे हळू हळू सोडावे व्यसन म्हणजे मानसिक स्थिती पण ठीक राहते.

मानसिक स्थिती ठिक राहणे हे सगळे फुकटचे लाड आहेत. मनुष्याच्या मनात शंभर हत्तीचं बळ असतं, ते बळ निग्रह नावाच्या एका छोट्याशा माहुताच्या तालावर नाचतं. माहुत नसेल तर शंभर हत्ती धुमाकूळ घालतातच.

जे आहे ते ठीक आहे, जोपर्यंत तुमच्या व्यसनाचा दुसर्याला त्रास होत नाही, तोपर्यंत चालु द्या.
तुम्हाला त्रास होतोय पण व्यसन सोडवत नाही असं असेल तर व्यायाम चालु करा. सगळी शक्ती व्यायामात खर्च करा. दुसरं काही करायला ताकद आणि वेळही मिळणार नाही.

च्रप्स यांनी सुचवलेला हस्तमिथुनचा उपाय वापरायच्या आधीच त्यावर काट मारणे हे काही पटले नाही.
काहीतरी ठोस आणि प्रॅक्टीकल पाऊल उचललयाशिवाय नुसते मनाची तयारी करायचे, मन दुसरीकडे गुंतवायचे वगैरे याला अर्थ नाही.

एकपत्नीव्रत, विवाह संस्कृती वगैरे आदर्श मानले जात असलेल्या आपल्या देशात लैंगिक असमाधान किती आहे याचा अंदाज येईल. पॉर्नच्या व्यसनाचा हा धागा एक प्रातिनिधिक आहे. एका सर्वे नुसार जगात पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत भारत तिसऱ्या नंबरला आहे. तसेच बलात्कारांच्या प्रमाणात सुद्धा भारत आघाडीवर आहे. आश्चर्य काहीच नाही.

इनामदार, अगदी बरोबर लिहीलेत.भारतात मूळ मुद्दा पुरुष १५ व्या वर्षी याबाबत शहाणे होतात आणि त्यांना रिलीज ची संधी किमान २६ व्या वर्षानंतर लग्न करुन मिळते.(ती वेगळ्या प्रकारे मिळवणारे रोगांना बळी पडतात.मैत्री, नो स्ट्रिंग्स अटॅचड,टिंडर वाले फंडे फक्त मोठ्या शहरात.त्यातही समाजाचे जजिंग आणि चोरटेपणामुळे लूटमार, गैरव्यवहार हा धोका खूप आहे.)
स्त्रियांचे शोषण, त्याबद्दल सहानुभूती या मुद्द्याला महत्व देताना कुठेतरी वयात आलेल्या पुरुषांचा कोंडमारा हा मुद्दा समाजात इग्नोर्ड आहे.

कुठेतरी भारत (आणि सर्व रिस्ट्रिक्टेड देश) चुकतायत. १० महिन्याच्या लहान लहान बाळं असलेल्या 'स्त्रिया'ही लोक सोडत नाहीयत.सोसायटी इज ट्राइंग टु टेल समथिंग.

>> पुरुष १५ व्या वर्षी याबाबत शहाणे होतात आणि त्यांना रिलीज ची संधी किमान २६ व्या वर्षानंतर लग्न करुन मिळते.
>> सोसायटी इज ट्राइंग टु टेल समथिंग.

+१११

आर्टऑफलिव्हिंग ची मार्केटींग सुरु केली का गुगु?>>
मेघपाल
अरे अनुभवाचे बोल आहेत.
मला कमिशन मिळत असेल तर मार्केटिंग शब्द बरोबर आहे.

ध्यान धारणेची सवय नसेल तर विपश्यना अवघड जाईल.
हे आपण कोणाच्या अनुभवाने लिहिले? आर्टऑफ्लिविंग ही एक पैसेखाऊ धंदेवाईक योजना आहे. विपश्यना ऐच्छिकदानयोजना. बाकी जैसी जिसकी इच्छा

Pages