तुम्ही लैंगिक दृष्ट्या समाधानी आहात काय ?

Submitted by इनामदार on 23 November, 2016 - 23:20

भारतातले बलात्कारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. सर्वाधिक बलात्कार करणाऱ्यांच्या यादीत भारताचा जगात चौथा नंबर लागतो असे केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी काही दिवसापूर्वीच सांगितले आहे. यासाठी त्यांनी याबाबत मिळालेल्या एका अधिकृत आकडेवारीचा संदर्भ दिला आहे. या आकडेवारीत अर्थात केवळ पोलिसांकडे नोंद झालेल्या घटनांचा समावेश असणार. पण नोंद न झालेल्या घटना याहून कित्येक पटींनी अधिक असतील. त्या विचारात घेता भारत जगातील सर्वाधिक बलात्कार होणारा देश आहे कि काय असे वाटू लागते. आणि हे खरेच भयावह व चिंताजनक आहे. म्हणून या मागची कारणे शोधणे अत्यंत महत्वाचे ठरते.

बलात्कारांच्या वाढत्या प्रमाणामागे जी काही कारणे आहेत त्यात समाजातील वाढते लैगिक असमाधान हे एक प्रमुख कारण आहे. या पार्श्वभूमीवर मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय यावर एका धाग्यावर विचारमंथन आधीपासून सुरु आहेच. पण त्याच बरोबर लैगिक समाधानाच्या बाबतीत आपल्याकडे किती सामाजिक समतोल आहे हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. म्हणून हा सर्वेक्षण स्वरूपाचा धागा सुरु करत आहे.

तुम्ही लैंगिक दृष्ट्या समाधानी आहात काय? या नाजूक प्रश्नाला मायबोलीच्या सभासदांनी आपला आयडी वापरून प्रतिसाद देणे प्रायव्हसीच्या दृष्टीने योग्य होणार नाही. म्हणून यासाठी पर्यायी उत्तरे म्हणून पहिले आठ प्रतिसाद मीच दिले आहेत. आपल्याला त्यातील केवळ एकच पर्यायी उत्तर Vote up करायचे आहे. (अर्थात कुणाला वेगळा प्रतिसाद द्यायचा असेल तर अजिबात हरकत नाही. पण प्रत्येकाने निदान योग्य पर्यायाला Vote up तरी करावे अशी अपेक्षा आहे)

एकच नम्र व कळकळीची विनंती आहे कृपया एकपेक्षा अधिक पर्यायांना Vote up करू नका.

जास्तीत जास्त सभासदांनी Vote up करावे म्हणून हा धागा अधून मधून (सातत्याने नव्हे) वर आणला जाईल. पर्यायांना भरपूर Vote up मिळाले कि निष्कर्षाबाबत चर्चा करता येईल.
(टीप: अनेकांचे एकापेक्षा अधिक आयडी आहेत, ड्यू आयडी आहेत. तरीही या सगळ्याची एकत्रित गोळाबेरीज होऊन काय निष्कर्ष येतात ते पाहूया)

चला तर मग आत्ताच करा आपला पर्याय Vote up!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ,मी अविवाहीत असून लैंगिकदृष्ट्या समाधानी आहे.माझ्या जीवनात मला आलेले दोन चार लैंगिक अनुभव मला परिपुर्तीची जाणिव करुन देतात ,निदान मानसिक पातळीवर तरी.बाकी बरेच पुरुष व स्त्रीया हायपरसेक्शुल असतात.त्यांचे मत जाणून घ्यायला आवडेल.
@ प्रशासक ,माझा प्रतिसाद नियमात बसत नसेल तर उडवावा.

सिंथेटिक जिनियस, प्रतिसादबद्दल धन्यवाद. कृपया आपला पर्याय Vote up! करा

मी विवाहित स्त्री/पुरुष आहे , लैंगिकदृष्ट्या समाधानीपण आहे; पण त्याचा विवाहीत असण्याशी संबंध नाही असा एक पर्याय हवा होता नै!

@साती: लैगिक समाधान वैवाहिक संबंधातून मिळत नसेल व तरीही कोणी लैंगिकदृष्ट्या समाधानी असेल तर त्या व्यक्तीने "मी अविवाहित स्त्री/पुरुष आहे व लैंगिकदृष्ट्या समाधानी आहे" हा पर्याय निवडणे योग्य ठरेल.

(कारण, इथे वैवाहिक जीवनाचा उल्लेख हा त्याचा लैगिक समाधानाशी असलेल्या संबंधामुळे आहे. पण तसा संबंध जर नसेल तर ह्या संदर्भात ती व्यक्ती अविवाहित असल्यासारखीच आहे)

@दीप्स: त्याविषयी मी धाग्यातच लिहिले आहे ना कि ते जाणून घेणे का महत्वाचे आहे.

@दिनेश. तो संबंध आहे कि नाही किंवा अजून काय निष्कर्ष येतात ते खूप votes मिळाली कि कळेल. सामाजिक शिस्तीचा भाग म्हणून वैवाहिक बंधने पाळणाऱ्या समाजात लैगिक समाधान कितपत आहे हे कळणे महत्वाचे.

अविवाहीत!
समाधानी की असमाधानी याबाबत कन्फ्यूज.

सविस्तर रात्री लिहितो.

या विषयावर रात्री लिहिण्यातच खरी मजा...

असे काही नसून आता कामात बिजी आहे म्हणून

ऋन्मेष कन्फ्युज असल्याने आपल्यालाच प्रश्ण विचारतील त्यांची कथा लिहून की नक्की काय समजावे मग आणखी एक धागा की आता कसे ते कन्फ्युज नाहीत. आधी कन्फ्युज होण्याची कारणं वगैरे साठी दुसरा धागा.
असा आपला समज....
आपल्याला फुकटचा टाईमपास.

समाधान वैवाहिक संबंधातून मिळत नसेल व तरीही कोणी लैंगिकदृष्ट्या समाधानी असेल तर त्या व्यक्तीने "मी अविवाहित स्त्री/पुरुष आहे व लैंगिकदृष्ट्या समाधानी आहे" हा पर्याय निवडणे योग्य ठरेल.>>

बापरे!
असोच!

('मी स्वतःबद्दल स्त्री आहे की पुरुष याचा आणि लैंगिक समाधानाचा विचारच करत नाही' असा एक पर्याय द्या माझ्यासाठी.)

कोणत्या स्वरूपाचा प्रश्न, कोणत्या फोरम वर कशा पद्धतीने विचारावा याला काही नियम लागू असावेत...

(आय टी मधे प्रत्येक माहिती पब्लिक, प्रायव्हेट, कॉन्फिडेन्शियल या प्रकारात वर्गीकरण करून ठेवतात, फक्त एक सन्दर्भ म्हणून सांगीतले)
इथे तुम्ही वैयक्तिक स्वरूपाची माहीती सर्रास पब्लिक फोरम वर विचारत आहात...हे अयोग्य आहे. (हेमवैम)

@कुरुडी: >> इथे तुम्ही वैयक्तिक स्वरूपाची माहीती सर्रास पब्लिक फोरम वर विचारत आहात...हे अयोग्य आहे.

हि वैयक्तिक गोष्ट आहे याची मला पूर्ण कल्पना आहे म्हणून मी धाग्यात स्पष्ट लिहिले आहे...
आपला आयडी वापरून प्रतिसाद देणे प्रायव्हसीच्या दृष्टीने योग्य होणार नाही. म्हणून यासाठी पर्यायी उत्तरे म्हणून पहिले आठ प्रतिसाद मीच दिले आहेत. आपल्याला त्यातील केवळ एकच पर्यायी उत्तर Vote up करायचे आहे.

केवळ Vote up केल्याने ते कुणी केले आहे हे फोरम वाचणाऱ्या कुणालाहि दिसत नाही. त्यामुळे त्यातून कुणाविषयी यासंबंधी वैयक्तिक काहीही कळून येत नाही. फक्त संख्याशास्त्रीय माहिती संकलित होईल.

संवाद निश्चितपणे दीर्घकालीन ..... लैंगिक समाधान अनेक प्रकार आहेत, आणि आपल्या गरजा ओळख करुन, तो आपल्या जोडीदारासह बोलणे सोपे असू शकते.....

खरंतर मी विवाहित पुरुष आहे पण सध्या समाजात लैंगिक स्वैराचार बोकाळलाय असा माझा समज आहे म्हणून मी चौथा पर्याय निवडला. मला आशा आहे बाकी लोकांनीही त्यांचे पूर्वग्रह बळकट करणारे पर्याय निवडले असतील.

अरेच्या, मी कितीही पर्यायांवर क्लिक करू शकतो की. मस्तच.

तर अशा या शास्त्रीय पद्धतीने निघालेल्या निष्कर्षांवरची चर्चा वाचायला आवडेल

दिनेश. तो संबंध आहे कि नाही किंवा अजून काय निष्कर्ष येतात ते खूप votes मिळाली कि कळेल. सामाजिक शिस्तीचा भाग म्हणून वैवाहिक बंधने पाळणाऱ्या समाजात लैगिक समाधान कितपत आहे हे कळणे महत्वाचे...

मला वाटते आपला समाज हे बंधन पाळतो, हे एक फार मोठे चुकीचे गृहितक असू शकते. त्याबाबत अभ्यास होणेही कठिण आहे.

>> अरेच्या, मी कितीही पर्यायांवर क्लिक करू शकतो की. मस्तच.

धाग्यात उल्लेख केलाच आहेच. पुन्हा एकदा:


सर्वांना कळकळीची विनंती आहे कृपया एकपेक्षा अधिक पर्यायांना Vote up करू नका.

(मायबोलीवर एकच पर्याय निवडून Vote देण्याची सोय सध्या तरी अस्तित्वात नाही. असेल तर मला माहिती नाही. कृपया आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित)

>> लैगीक असं काई नसतया, लैंगिक असतया.

दुरुस्ती केली आहे. सुचवल्याबद्दल धन्यवाद.

यात सविस्तर लिहिण्याजोग काय आहे ऋन्मेष ? अ ओ, आता काय करायचं
>>>>
अ ओ आता काही नाही करायचं, गंमत केली ओ Happy

पण मी खरेच कन्फ्यूज आहे की मी समाधानी आहे की नाही याबाबत. तुर्तास तर नक्की ते कन्फ्यूजन कोणत्या नेमक्या शब्दांत मांडावे याबाबतही कन्फ्यूज आहे. अन्यथा एखादा धागा काढायचा चान्स हातचा जाऊ दिला नसता Wink

अविवाहीत! समाधानी की असमाधानी याबाबत कन्फ्यूज. सविस्तर रात्री लिहितो.>>> अबे ऋन्म्या काही भलतं सलतं लिहु नकोस Proud

बाकी समाधानाची पार वाट लावलीय हे वर दिसतयचं Proud

शेवटचे तीन प्रतिसाद Rofl आहेत

वर्जिनिटी आणि लैंगिक समाधान आणि असमाधानाचा काही संबंध आहे का? का सेल्फ सॅटिस्फॅक्शन पण समाधान गटात येतं?

@रीया: Good question

>> वर्जिनिटी आणि लैंगिक समाधान आणि असमाधानाचा काही संबंध आहे का?
नाही.

>> सेल्फ सॅटिस्फॅक्शन पण समाधान गटात येतं?
हो.

आपले मत नोंदवणाऱ्या सर्वांना धन्यवाद.

काल पासून आतापर्यंतच्या मतांचे विश्लेषण:

एकूण मते: ७१ (स्त्रिया: ३६ पुरुष: ३५ ; विवाहित: ४९ अविवाहित: २२ ; समाधानी: २९ असमाधानी: ४२)

प्रत्येकाने एकाच पर्यायाला Upvote करावे असे आवाहन केले होते त्याचा सर्वांनी आदर केला असेल अशी अपेक्षा बाळगतो. (त्यातूनही काहींनी जर एकापेक्षा अधिक मते दिली असतीलच तर अशा मतांची संख्या एकूण मतांच्या तुलनेत कमी असेल असे मानतो)

मत नोंदविणारे स्त्री व पुरुष संख्येने जवळजवळ समानच आहेत (३५ व ३६) यामध्ये असमानाधानी पुरुष २० आहेत व असमाधानी स्त्रिया २२.

आतापर्यंतच्या मतांवरून दिसून येते कि लैंगिक असमाधान असणाऱ्यांची संख्या खूपच जास्त आहे.

अजून मतांची प्रतीक्षा करूया. मायबोलीवर असणाऱ्या आपल्या सर्व मित्र/मैत्रीणीना पण मत नोंदवायला सांगा.

सस्मित, फ्री सेक्सचं लायसन्स मिळणार Proud
पॅरा २ वाच ना लेखाचा

बलात्कारांच्या वाढत्या प्रमाणामागे जी काही कारणे आहेत त्यात समाजातील वाढते लैगिक असमाधान हे एक प्रमुख कारण आहे. या पार्श्वभूमीवर मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय यावर एका धाग्यावर विचारमंथन आधीपासून सुरु आहेच. पण त्याच बरोबर लैगिक समाधानाच्या बाबतीत आपल्याकडे किती सामाजिक समतोल आहे हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. म्हणून हा सर्वेक्षण स्वरूपाचा धागा सुरु करत आहे.

@साती: >> 'मी स्वतःबद्दल स्त्री आहे की पुरुष याचा आणि लैंगिक समाधानाचा विचारच करत नाही' असा एक पर्याय द्या माझ्यासाठी

सॉरी तुमचा हा प्रतिसाद समहाऊ माझ्याकडून वाचला गेला नाही. अहो असे प्रत्येक केस साठी वेगळे पर्याय दिले तर विश्लेषण करणे अवघड होईल. माफ करा.

@सस्मित: >> हे विश्लेषण करुन काय करणार?
बलात्काररुपी स्फोटांमागे समाजमनात कोंडलेली असमाधानाची वाफ किती कारणीभूत आहे त्याचा अंदाज घेणे हा हेतू. हो पण समाजात प्रचंड लैगिक असमाधान आहे हे कळले. पुढे काय? असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर मी नाही तर आपण सर्वांनी शोधायचे आहे.

@ इनामदार, आपण हा छान उपक्रम राबवताय. आपली कामाची चिकाटीही कौतुकास्पद आहे. आपल्या हेतूचा सच्चेपणा नक्कीच वाखानण्याजोगा आहे. पुढील वाटचालीकरिता आपणांस शुभेच्छा!!!

>>समाजात प्रचंड लैगिक असमाधान आहे हे कळले. पुढे काय? असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर मी नाही तर आपण सर्वांनी शोधायचे आहे.

बापरे, मला आता या धाग्याची भयंकर भिती वाटू लागली आहे, भ्यॅSSSS Sad

फ्री सेक्सचं लायसन्स मिळणार >>>> ऑ? फ्री म्हणजे???? Lol

बलात्काररुपी स्फोटांमागे समाजमनात कोंडलेली असमाधानाची वाफ किती कारणीभूत आहे त्याचा अंदाज घेणे हा हेतू. हो पण समाजात प्रचंड लैगिक असमाधान आहे हे कळले. पुढे काय? असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर मी नाही तर आपण सर्वांनी शोधायचे आहे.>>>>>>>>>>> बापरे Uhoh

Pages