तुम्ही लैंगिक दृष्ट्या समाधानी आहात काय ?

Submitted by इनामदार on 23 November, 2016 - 23:20

भारतातले बलात्कारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. सर्वाधिक बलात्कार करणाऱ्यांच्या यादीत भारताचा जगात चौथा नंबर लागतो असे केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी काही दिवसापूर्वीच सांगितले आहे. यासाठी त्यांनी याबाबत मिळालेल्या एका अधिकृत आकडेवारीचा संदर्भ दिला आहे. या आकडेवारीत अर्थात केवळ पोलिसांकडे नोंद झालेल्या घटनांचा समावेश असणार. पण नोंद न झालेल्या घटना याहून कित्येक पटींनी अधिक असतील. त्या विचारात घेता भारत जगातील सर्वाधिक बलात्कार होणारा देश आहे कि काय असे वाटू लागते. आणि हे खरेच भयावह व चिंताजनक आहे. म्हणून या मागची कारणे शोधणे अत्यंत महत्वाचे ठरते.

बलात्कारांच्या वाढत्या प्रमाणामागे जी काही कारणे आहेत त्यात समाजातील वाढते लैगिक असमाधान हे एक प्रमुख कारण आहे. या पार्श्वभूमीवर मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय यावर एका धाग्यावर विचारमंथन आधीपासून सुरु आहेच. पण त्याच बरोबर लैगिक समाधानाच्या बाबतीत आपल्याकडे किती सामाजिक समतोल आहे हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. म्हणून हा सर्वेक्षण स्वरूपाचा धागा सुरु करत आहे.

तुम्ही लैंगिक दृष्ट्या समाधानी आहात काय? या नाजूक प्रश्नाला मायबोलीच्या सभासदांनी आपला आयडी वापरून प्रतिसाद देणे प्रायव्हसीच्या दृष्टीने योग्य होणार नाही. म्हणून यासाठी पर्यायी उत्तरे म्हणून पहिले आठ प्रतिसाद मीच दिले आहेत. आपल्याला त्यातील केवळ एकच पर्यायी उत्तर Vote up करायचे आहे. (अर्थात कुणाला वेगळा प्रतिसाद द्यायचा असेल तर अजिबात हरकत नाही. पण प्रत्येकाने निदान योग्य पर्यायाला Vote up तरी करावे अशी अपेक्षा आहे)

एकच नम्र व कळकळीची विनंती आहे कृपया एकपेक्षा अधिक पर्यायांना Vote up करू नका.

जास्तीत जास्त सभासदांनी Vote up करावे म्हणून हा धागा अधून मधून (सातत्याने नव्हे) वर आणला जाईल. पर्यायांना भरपूर Vote up मिळाले कि निष्कर्षाबाबत चर्चा करता येईल.
(टीप: अनेकांचे एकापेक्षा अधिक आयडी आहेत, ड्यू आयडी आहेत. तरीही या सगळ्याची एकत्रित गोळाबेरीज होऊन काय निष्कर्ष येतात ते पाहूया)

चला तर मग आत्ताच करा आपला पर्याय Vote up!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजसी,
कोणीतरी दोघांनी मजा मारली म्हणून जन्माला आलो आपण, आणि आपल्या मुलभूत गरजा भागाविण्याची जबाबदारी सरकारची कशी काय? नागरिकशास्त्र मध्ये फक्त रस्ते, दिवे, पाणी -सांडपाणी, कायदा-सुव्यवस्था होतं की.
>>>>>>

राजसी, शाळेतले नागरीकशास्त्र मला आठवत नाही. मी पुस्तकी अभ्यास नेहमी पासिंग पुरते करायचो. पण रस्ते, दिवे, सांडपाणी हे नंतर आले ना, त्या आधी अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा पुरवण्यास सरकार बांधील नाही का? ईनफॅक्ट तुम्ही पाणी असेही लिहिलेय. ते अन्न मध्येच आले ना? रेशनवर अन्नधान्य हे सरकारच पुरवते. जरा कांद्याबटाट्याचा भाव वाढला तर आपण नाक्यावरच्या वाण्याला नाही तर सरकारलाच शिव्या घालतो ना? निवारा म्हणाल तर तो देखील सरकारच पुरवते. स्वत: बांधून किंवा ईतरांनी बांधलेल्या निवार्‍याला मान्यता देऊन आणि वीजपाण्याच्या सुविधा पुरवून..

असो, हे झाले नागरीक शास्त्र, काही चुकले असेल तर कर्रेक्ट करा.
पण कोणीतरी दोघांनी मजा मारून संतान जन्माला घातली असे म्हणून सरकार कशी आपली जबाबदारी झटकणार ते नाही समजले. आणि झटकलीच तर मग रस्ते-दिवे-सांडपाण्याला का हे मजामारो तत्व लागू नाही?

ते ही असो, बॅक टू धागा, आपलेच वाक्य, कोणीतरी दोघांनी मजा मारली - हेच तर गंडलेले कन्सेप्ट आहे. जेव्हा जेव्हा कोण्या दोघांमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित होतात तेव्हा दोघेही मजा मारतात हाच तर चुकीचा समज आहे. त्यातला एखादा लैंगिकदृष्ट्या असमाधानी असू शकतो ना? आपल्याला मजा येतेय तर आपल्या पार्टनरला देखील मजा येतच असणार हे आपणच ठरवायचे का?

चला ठिक आहे आता हे पण असो, पण मी कुठे सरकारकडून काही फुकट अपेक्षा ठेवतोय. आम्ही असमाधानी जीव याबदल्यात कर भरायला तयार आहोत ना. आम्हाला काळा सेक्स नकोच आहे मुळी Happy

ऋ हाहा आज दुपारीच काय हो? फिदीफिदी >>>

भास्कराचार्य, हम जहा जाम उठा लेते है वही दिन ढल जाता है Wink .... हे अति तेथे माती च्या चालीवर वाचा Happy

खरंय,
दोघांनी मजा मारली, दोघांना लैंस मिळाले असे झाले असते तर अश्या धाग्यांची मूळात गरजच पडली नसती.
Happy

बोलू द्या श्री मला आज बोलू द्या, आज पहिल्यांदा कोणीतरी कुठेतरी आम्हा अतृप्तलिंगी जीवांना त्यांचे मत त्यांच्या समस्त्या ईतक्या आपुलकीने विचारतोय. आज बनू द्या मला भारतीय लैंगिक असमाधानाचा जनक ..

आधी अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा पुरवण्यास सरकार बांधील नाही का----- नाही.

रेशन म्हणजे फुकट नाही कमी किमतीत, सवलतीच्या दरात. मुळात काही पैसे इव्हन रेशन ग्राहकाकडे असावे लागतात. त्यामुळे कमी दर्जाच्या वस्तू मिळतात ना? रेशनवर. रेशनवर ज्यांची आयुष्य गेली ते समाधानी आहेत / होते हे तुम्हाला खात्रीलायक माहित आहे का? शाळा सोडून रेशनच्या रांगेत उभे राहणारी मुलं समाधानी आहेत असे म्हणायचे आहे का?
जे कर भरतात तेच लोक लोक फक्त रेशन चे खातात का? रेशनच्या रांगेत उभी असणारी जनता १००% करदात्री असते का?

पाणीपुरवठा, रस्ते, वीज ह्या मूलभूत गरजा नाहीत. ह्या नसतांना सुद्धा लोक जगत होते.

मजा मारली हा शब्दप्रयोग मी उपहासाने केला होता. शरीर संबंध म्हना.

There are so many things for which you can or can't be satisfied about starting with the kind of parents you have, kind of kids you get, education, job, quality of life, getting or not not getting decent uber cab .... How do you decide if you are satisfied or not. समाधान ही मनाची अवस्था (स्थिती) आहे असा मला वाटत. If someone decides that I am satisfied then he /she can be or else be a topmost taxpayer of the country that doesn't buy or enable you for satisfaction especially from government or for that matter anyone else .

@सोनू.: >> तुम्ही समाधानी / असमाधानी असल्याने बलात्कार कराल / केलाय का ? हा प्रश्नही पाहिजे ना? तरच या समाधान्/असमाधान याचे बलात्काराशी कोरिलेशन आहे का ते कळेल ना?

हा प्रश्न विचारायची मला गरज वाटली नाही कारण याबाबत आधीच Richard Felson या संशोधकाने याबाबत संशोधन केले आहे. लैंगिक वासनेची पूर्ती (समाधान मिळवणे) हीच बलात्कारामागची प्रेरणा असते असे त्यांचे संशोधन सांगते. तुम्ही फारतर याविषयी गुगल वर जास्त माहिती वाचू शकता. माझा हेतू फक्त लैगिक समाधानाच्या बाबतीत आपल्याकडे किती सामाजिक समतोल आहे हे जाणून घेणे इतकाच आहे.

पण समजा कोणी संशोधन केले नसते तर लैंगिक समाधान/असमाधान याचे बहुतांश बलात्कारांशी कोरिलेशन स्वाभाविक आहे असे आपणास वाटत नाही का? बहुतांश बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तीकडून झालेत/होतात असे पोलीस रेकॉर्ड सांगते (याविषयी सुद्धा गुगलवर विपुल संदर्भ सापडतील). उदाहरणार्थ, समजा त्या दोन व्यक्ती मित्र-मैत्रीण आहेत. कालांतराने मित्राला मैत्रिणीविषयी शारीरिक आकर्षण निर्माण झाले. तिने नकार दिला. सातत्याने नकार देत राहिली. अन एक दिवस त्याने तिच्यावर बलात्कार करून आपली नैसर्गिक भूक भागवली. किंवा पुरुषाने ओळखीचा गैरफायदा घेत बलात्कार करून आपली शारीरिक भूक भागवली असेही अनेक केसेस मध्ये घडते.

आता या उदाहरणात

१. त्याची लैंगिक भूक निर्माणच झाली नसती. किंवा,
२. लैंगिक भूक निर्माण झाली असती पण तिचे वेळीच समाधान पण झाले असते (तिच्याकडून वा अन्य मार्गांनी). किंवा,
३. लैंगिक भूक असूनही काही कारणांमुळे दबूनच राहिली

तर त्याने बलात्कार केला असता का ? अर्थातच नसता. कारण लैंगिक भूकच जिथे नाही किंवा योग्य मार्गांनी शमलेली आहे किंवा न शमता दबलेलीच राहिली तर तिथे बहुतांश बलात्कार होतीलच कसे? (मी बहुतांश म्हणतोय. कारण अन्य बलात्कारांमध्ये लैंगिक समाधानापेक्षा वर्चस्व गाजवणे वगैरे बाकीच्या प्रेरणा जास्त असतात). म्हणजेच लैंगिक असमाधानाचे आणि बलात्काराचे नक्कीच कोरिलेशन आहे. नाही का?

बरं,
तुम्ही सिंजींच्या धाग्यावरचे प्रतिसाद नीट वाचले नाहीत तर! विचारमंथन वगैरे लिहीलात म्हणून म्हटलं.

ऋ, विषय बदलल्याबद्दल सॉरी रे!

राजसी,

रेशन म्हणजे फुकट नाही कमी किमतीत, सवलतीच्या दरात.
>>>
अर्थातच, फुकट का देतील? ते अपेक्षित नसतेच. पण जीवनावश्यक वस्तू सर्वांना उपलब्ध व्हाव्यात आणि त्या देखील वाजवी दरात हे अपेक्षित असतेच ना?

रेशनवर ज्यांची आयुष्य गेली ते समाधानी आहेत / होते हे तुम्हाला खात्रीलायक माहित आहे का
>>>>
रेशन उपलब्धच करून दिले नसते तर त्यांची अवस्था काय असती हा मुद्दा आहे.

पाणीपुरवठा, रस्ते, वीज ह्या मूलभूत गरजा नाहीत. ह्या नसतांना सुद्धा लोक जगत होते.
>>>>
तर सरकार आपल्याला का हवेय याचे उत्तर द्या. उगाच आपण निवडणूकांवर किंबहुना या या शासनव्यवस्थेवर खर्च करतोय का?

ईंग्लिशला पास, ते नाही समजत Happy

>> तुम्ही सिंजींच्या धाग्यावरचे प्रतिसाद नीट वाचले नाहीत तर! विचारमंथन वगैरे लिहीलात म्हणून म्हटलं.
वाचले आहेत. तिथे माझेही काही आहेत. जे काय आहे त्याला विचारमंथन म्हणावे कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न Happy

>>ऋ, विषय बदलल्याबद्दल सॉरी रे!
तुमचा या धाग्याला शंभरावा प्रतिसाद होता आणि तोच खरेतर मूळ विषयाला धरून होता. धागा वापस रुळावर यायला त्यामुळे मदत झाली. म्हणून मीच तुम्हाला धन्यवाद लिहायला हवे होते ते राहून गेले.

१ ) मी स्त्री आहे का पुरुष या बद्दल कन्फयुज आहे तरी सुद्धा मला लैंगिक समाधान मिळते किव्वा मिळत नाही मी इतरांच्या दृष्टीने स्त्री असूनही स्त्री कडून
२ ) मी स्त्री आहे का पुरुष या बदल कन्फयुज आहे तरी सुद्धा मला लैंगिक समाधान मिळते किव्वा मिळत नाही मी इतरांच्या दृष्टीने पुरुष असूनही पुरुषाकडून
असे पण दोन पर्याय द्या कि Happy
<<बोलू द्या श्री मला आज बोलू द्या, आज पहिल्यांदा कोणीतरी कुठेतरी आम्हा अतृप्तलिंगी जीवांना त्यांचे मत त्यांच्या समस्त्या ईतक्या आपुलकीने विचारतोय. आज बनू द्या मला भारतीय लैंगिक असमाधानाचा जनक .>> बोल बाबा बोल अगदी भरभरून बोल .:)

Happy

आरोपीच्या पिंजऱ्यात कोणीतरी उभं हव म्हणून सरकार तर सरकार. बघा सरकारकडून समाधान मिळतंय का ते? मग मिळालं तरी ते वाजवी दरातील असल्याने त्याच क्वालिटीचे असणार. मग म्हणू नका सरकारनी रेशन चे समाधान वाटले आम्हाला पंचतारांकित समाधान हवे होते. ग्राहकाच्या ऐपतीप्रमाणे त्या दर्जाचे प्रॉडक्त मिळणार.

@ऋन्मेऽऽष: अन्न वस्त्र निवारा या मुलभूत गरजांची पूर्तता झाली नाही तर सरकारने मदत करायला हवी हे समजू शकतो. लैंगिक गरज हि नैसर्गिक आहे व म्हणून ती मुलभूत आहे. पण तिची पूर्तता होण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करायला समाजातूनच जर विरोध होत असेल तर सरकार तरी काय करणार? सरकार म्हणजे समाजातलेच प्रतिनिधी ना? तहान लागली. पाणी पाहिजे. सरकार देईल. पण समजानेच ठरवले असेल कि कितीही तहान लागू दे घरातलेच पाणी प्यायचे. घरातून मिळत नसेल तर तडफडले तरी हरकत नाही पण बाहेरचे पाणी नाही म्हणजे नाही. आता जिथे लोकांचीच तहान भागू नये म्हणून लोकांनीच कंबर कसली असेल तर सरकार तरी काय करणार? मग एक तडफडणारा दुसऱ्यावर पाळत ठेवतो कि हा चोरून कोठे पाणी पीत तर नाही ना?

कुठल्या संस्थेतर्फे चाललाय हा सर्व्हे ? उद्दीष्टं काय आहेत ? एका मायबोलीवर धागा काढून सर्व्हे होणार का ?

काही लोक सिरीयसली करत असलेलं काम अशा प्रकारे उथळपणे जगजाहीर मनोरंजनासाठी वापरावं का ? जे कुणी गंभीरपणे या प्रश्नांकडे सामाजिक समस्या म्हणून पाहतात त्यांनाही अशा उथळपणाने संकोचल्याप्रमाणे नाही का वाटणार ? इतक्या प्रतिष्ठीत वेबसाईटवर असा उथळपणा ?

@सपना हरिनामे: हा जागतिक इनो संस्थेतर्फे सर्व्हे सुरु आहे. जशी जागतिक युनो संस्था आहे ना तशीच हि आमची इनो. इथे आम्ही सगळे इनो पावडर खाऊन सर्वेला बसतो. इनोमुळे पचायला मदत होते. म्हणून संस्थेचे नाव पण इनो. युनो मानवी हक्कांसाठी तर इनो शारीरिक हक्कांसाठी. शरीराला आराम मिळावा म्हणून काम करते. इनो पावडर नव्हे हो. मी आमच्या इनो बद्दल सांगतोय. Proud असो जरा जास्तच सिरीयस बोललो. Lol

मग मिळालं तरी ते वाजवी दरातील असल्याने त्याच क्वालिटीचे असणार.
>>>>
सरकार रेशनमध्ये सडलेले अन्नधान्य वाटते जे गोरगरीबांनी खाण्यायोग्य नसते असे म्हणायचे आहे का आपल्याला?

पण तिची पूर्तता होण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करायला समाजातूनच जर विरोध होत असेल तर सरकार तरी काय करणार?
>>>>

तुमचा सर्व्हे बघा.
५० टक्के लोकं असमाधानी आहेत. याचा अर्थ ते विरोध करणार नाहीत.
उरलेले ५० टक्के समाधानी लोकं सारेच विरोध करतीलच असे नाही. ज्या लोकांमध्ये पोटदुखी असते की आपल्याला गरज नाही तर ईतरांनाही मिळू नये असेच लोकं विरोध करतील. असे त्यात टक्के असतील असा आपला अंदाज? आणि मग सरकार अल्पमतात असलेला विरोधाविरुद्ध जाऊ शकणार नाही का?

बा ऋन्मेषा , इनामदारांची ही प्रश्नावली तुझ्या गफ्रेंला का नाही विचारीत बरे ? काय सांगावे, नशीब जोरावर असेल, तर तुझ्या अतृप्त आत्म्याला एकदाची शांती मिळेल अन् आम्हाला स्वजो-शाखा पासून मुक्ती.;) :p

नसाल तर करायचे काय? बलात्कार? वेश्यागमन?

अहो लैंगिक सुख नसेल तरी जरा दुसरीकडे लक्ष वळवा. परोपकार, संशोधन, अश्या इतर काही गोष्टी करता येण्याजोग्या आहेत.

अहो लैंगिक सुख नसेल तरी जरा दुसरीकडे लक्ष वळवा. परोपकार, संशोधन, अश्या इतर काही गोष्टी करता येण्याजोग्या आहेत. >>

अहो ही नैसर्गिक उर्मी आहे, रिकामा वेळ घालवायचा उपाय नाही. जशी पोटाची भूक आहे तशीच शरीराची भूक म्हणा हवं तर. बलात्कार/जबरस्तीचे समर्थन बिलकुल नाही, पण परस्पर संमती असताना लैंगिक सुख लपून छपून का मिळवावे लागते ? एखाद्या ठिकाणी नाही मिळाले, तर दुसऱ्या ठिकाणी ते योग्य त्या मार्गाने मिळवण्यास बाकीच्यांची हरकत का असावी ? या नैसर्गिक गोष्टी दडपून असा नेमका कोणता फायदा होतोय हेतरी कळू द्या.

अशा भीष्मप्रतिज्ञा प्रत्येकाला झेपतातच असे नाही. सरळ मार्गाने मिळाले तर ठीक, नाहीतर कधी ना कधी कोणाचाही पाय वाकडा पडू शकतो.

>> पण परस्पर संमती असताना लैंगिक सुख लपून छपून का मिळवावे लागते ? एखाद्या ठिकाणी नाही मिळाले, तर दुसऱ्या ठिकाणी ते योग्य त्या मार्गाने मिळवण्यास बाकीच्यांची हरकत का असावी ? या नैसर्गिक गोष्टी दडपून असा नेमका कोणता फायदा होतोय हेतरी कळू द्या.

हे खरे प्रश्न आहेत. संपूर्ण सहमत. समाजात इतके असमाधान असूनही यावर चर्चा करणे हे सुद्धा काही स्वयंघोषित संस्कृती रक्षकांना निषिद्ध वाटते. मग ते लोक टिंगलटवाळीचा मार्ग अवलंबतात.

@ऋन्मेऽऽष: >> ज्या लोकांमध्ये पोटदुखी असते की आपल्याला गरज नाही तर ईतरांनाही मिळू नये असेच लोकं विरोध करतील.
इथेच तर खरी गम्मत आहे. कारण यांच्यापेक्षा असमाधानी लोकच (कि जे संख्येने जास्त आहेत) खूप विरोध करतात. "आपल्याला मिळाले नाही तर इतरांनाही मिळू द्यायचे नाही" हि वृत्ती त्यात असते. त्याला ते फक्त संस्कृती रक्षणाचा मुलामा देतात. याव्यतिरिक्त लैंगिक पार्टनरच्या बाबतीत जी पजेसिव्ह वृत्ती असते ती सुद्धा भारतीय समाजात अतिप्रमाणात आहे. "अमुक स्त्री बरोबर बोलत का होतास?" असा जाब नवऱ्याला/बॉयफ्रेंडला विचारणाऱ्या स्त्रिया किंवा केवळ संशयावरून बायकोला मारहाण करणारे नवरे. हे सगळे लुजर्स आहेत. तेच लैंगिक मोकळीक असण्याला अडथळे बनून राहतात.

इथेच तर खरी गम्मत आहे. कारण यांच्यापेक्षा असमाधानी लोकच (कि जे संख्येने जास्त आहेत) खूप विरोध करतात. "आपल्याला मिळाले नाही तर इतरांनाही मिळू द्यायचे नाही" हि वृत्ती त्यात असते.
>>>>>>

तुम्ही काय मदत वाटताहेत यावर ते अवलंबून आहे.

उदा. एका ग्रूपमधील काही लोकांचे दात मजबूत आहेत तर काहींचे कमजोर जे खाताना दुखतात, त्यांना खायला त्रास होतो आणि खाण्याचा आनंद उचलू शकत नाहीत.
आता तुम्ही त्या ग्रूपमध्ये लाडूवाटप केले तर साहजिकच आहे ज्यांना दातदुखी आहे त्यांनाच पोटदुखीही होणार. कारण पुन्हा चांगले दात असलेलेच या लाडवाचा फायदा उचलणार.
पण जर आपण त्या आधी काही दात मजबूत करायचे औषध वाटले तर चित्र वेगळे असेल आणि ईथे हेच अपेक्षित आहे.
थोडक्यात आजही आम्हा लोकांचा प्रॉब्लेम तुम्हाला समजतच नाहीये. तुम्ही काय आमची मदत करणार Sad

या देशात सव्वाशे कोटी लोकसंख्या आहे
दरवर्षी एक नवीन देश तयार होईल इतकी त्यात वाढ होत आहे.
स्त्रियांना आदर सन्मान असलेली संस्कृती आहे
इथे देवीच्या रुपात स्त्रीची पूजा होते आहे

तरीही,

या देशात लैंगिक असमाधान आहे
स्त्रियांवरील अत्याचारात सतत वाढ होत आहे
देशात आणि राजधानीत सुद्धा स्त्री असुरक्षित आहे
बलात्कारात देश जगात अव्वल ठरू पाहत आहे

Happy

पण जर आपण त्या आधी काही दात मजबूत करायचे औषध वाटले तर चित्र वेगळे असेल आणि ईथे हेच अपेक्षित आहे. >>> वर ज्या वेगाने सुसाट सुटला होता त्यावरुन मला वाटलं तु असं लिहितोयस की काय ,' ज्यांचे दात मजबुत असतील ते लाडु चावुन ज्यांचे दात कमजोर असतील त्यांना देतील . ' Lol

चे दात मजबुत असतील ते लाडु चावुन ज्यांचे दात कमजोर असतील त्यांना देतील .

>>>
श्री, आपला हा एटीट्यूड ईंग्लंडच्या राणीसारखा आहे. मी याबाबत आमच्या लईंगिक असमाधानी संघटनेतर्फे आपला निषेध व्यक्त करू ईच्छितो.

@ऋन्मेऽऽ: लाडू आणि ते खाणाऱ्यांचे उदाहरण इथे गैरलागू आहे. समाधान फक्त खाणाऱ्याला मिळते. कारण लाडू निर्जीव आहे. याउलट इथे मात्र दोघांना समाधान मिळणे अपेक्षित आहे. त्यातील एकाला (स्त्री वा पुरुष) निर्जीव समजून तुम्ही बलात्काराचे समर्थन करत आहातच शिवाय ज्यांना तो करता येत नाहीत त्यांची बाजू समजावून घेण्याची अपेक्षा करत आहात.

@atuldpatil: हो. समाजात प्रचंड विरोधाभास आहेच.

ईनामदार, तुम्ही लाडू ला सेक्सुअल पार्टनर म्हणून घेतले आहे बहुधा. मी पार्टनरसोबत करायच्या क्रियेला ईथे लाडू म्हणत आहे. आकलनात गल्लत केलीत तर तर्क भन्नाटच निघणार यात शंका नाही Happy

अच्छा. सॉरी माझ्याकडून इंटरप्रीटेशन चुकीचे झाले.

असो. तर सामाजिक असमाधानाचे कारण "कमजोर दातांमुळे अनेकांना लाडू खाता येत नाहीत" हे आहे. आणि म्हणून "दात मजबूत करायला औषध द्यायला हवे"... असे तुमचे मत आहे.

आता इथे दात आणि औषध कशाला म्हणत आहात? पुन्हा काहीतरी भलतेच इंटरप्रीटेशन व्हायला नको म्हणून विचारत आहे. जर लाडू म्हणजे शारीरिक सुख असेल तर दात म्हणजे ते सुख घेण्याची वृत्ती? आणि मग औषध म्हणजे काय?

अहो ही नैसर्गिक उर्मी आहे...........................होतोय हेतरी कळू द्या.

बरीच वर्षे परदेशात राहिल्यामुळे मला भारतीय परिस्थितीची कल्पना नाही, जे काही कळते ते मायबोली वाचून, म्हणून मी असले लिहितो.

भारताने प्रचंड, नेत्रदीपक प्रगति केली आहे.

सगळे तंत्रज्ञान परकीयांकडून घ्यावे लागते, इतरांनी फेस्बूक, मायक्रोसॉफ्ट, गूगल काढले, काँप्युटर, औषधे, विमाने, अगदी सायकलीसुद्धा इ. सर्व शोधून काढले की हे तिथे नोकरी करून पोट भरणार- स्वतः तसले काही करणार नाहीत. आयते मिळते.

संशोधन, तंत्रज्ञान इ. वरचे धागे लुप्त झाले - लैंगिक सुख, सिनेमे यांचे धागेच धागे!

आता काही उरलेच नाही - निरनिराळ्या देशातील खाद्यपदार्थ, लैंगिक सुख, असल्या नैसर्गिक उर्मी एव्हढेच उरले आता. असे दिसते.

तेंव्हा जास्त लिहिण्यापेक्षा एकच सुचवतो -
जसे एकजात सर्वांनी जुनी भारतीय पद्धति सोडून परकीयांसारखे कपडे, भाषा स्वीकारली तसे करा. म्हणजे लपून छपून काही करावे लागणार नाही. कदाचित परदेशातच कुणितरी यावर मार्ग काढला की भारतीय तसे करतील.

कारण कायदेशीरपणे वेश्याव्यवसाय सुरू केला तरी त्याचा फायदा घेणार्‍यांबद्दल तुमची वृत्ति तशीच, म्हणजे पुनः लपून छपून!!

आज बनू द्या मला भारतीय लैंगिक असमाधानाचा जनक>>>> Rofl

मी पार्टनरसोबत करायच्या क्रियेला ईथे 'लाडू' म्हणत आहे>>>> व्वा, काय कोडवर्ड दिलाय रुनम्याने.

अगं, ऐकतेस का, आज लाडू करूया म्हणतोय! Happy

"लैंगिक समाधान" म्हणजे नेमके काय?

कुठे एसी रुममधे थंडीत मिटिंगमधे ताटकळून बसलेले अस्ताना, वा प्रवासात यष्टीमधुन जात असताना, आधी पाणी/चहा/कोल्ड्रीन्क वगैरे घटाळल्यामुळे, अतिशय जोराची लघविला लागलेली असते, अन तो वेग दाबुन ठेवता ठेवता नाकीनव येतात..... अन जेव्हा का त्या परिस्थितीतुन सुटका होते, लॅटरिनला जाउन तो वेग/प्रेशर हलके करता येते, लैंगिक समाधान म्हणजे तेव्हांचेच ते सुख-समाधान धागाकर्त्याला अपेक्षित आहे का? Wink Proud

कृपया जाणकारांनी खुलासा करावा !

ऑन अ सिरियस नोट. दुसर्‍या बीबीवर सिम्बा यांनी समलिंगी लोकांकडून तरुणांना केलेले सहेतूक स्पर्श आणि इतर
काही बाबींचा उल्लेख केला आहे. पुढच्या प्रतिसादात त्यांनी आणखी खुलासाही केला आहे.

ती चर्चा या बीबीवर जास्त संयुक्तीक आहे.

इकडचे रेलवंत प्रतिसाद इकडे टाकतो आहे,

पुरुषांकडून होणार पुरुषांचा विनयभंग
लिंबू टिम्बु याला रॅगिंग वगैरे नाही म्हणत, बायकांचा होतो तसाच, प्रॉपर विनयभंग मुलांचाही होतो (मुले = 17-18 यर्स तो 30-35 वर्षे)

मी स्वतः 16-17 वर्षांपासून मफतलाल बाथ या मुंबईतील स्पोर्ट संकुलात पोहायला जात आहे,
पोहण्याच्या पोशाखात असताना, पाण्यात चुकून होणारे सहेतुक स्पर्श,
कॉमन शॉवर मध्ये टक लावून पाहणे, victim च्या समोर मुद्दाम सरकणारा टॉवेल, हे सगळे अनुभवले आहे,
आणि यात विनयभंग करणारी व्यक्ती 25-45 वयोगटातील व्यवस्थित संसार असणाऱ्या होत्या हे विशेष.

मुंबई लोकल ट्रेन, यात कॉलेज च्या वयात अंकल टाइप माणसाकडून विचित्र अनुभव न आलेला पुरुष विरळा,

हे सगळे बदलत्या काळानुसार, अलीकडच्या 5-10 वर्षातील थेरं नाहीयेत, तर या गोष्टी 20 एक वर्ष तरी अस्तित्त्वात आहेत.
कोणाला त्या कार्पेट खाली दडवून ठेवायच्या असतील तर ते करोत बापडे.

पण माझ्या अनुभवावरून तरी,
पुरुषांचा विनयभंग होतो, होऊ शकतो,
स्त्री किंवा पुरुषांकडून.

संपादन

दिनेश. | 2 December, 2016 - 12:54
सिम्बा, हे अगदी खरे आहे.

गेल्या काही वर्षात मुंबई ( आणि इतर शहरातूनही ) गे अ‍ॅक्टीव्हीटी फार वाढलेली आहे. रात्री जरा उशीर ( अगदी जराच म्हणजे आठ , नऊ वाजल्यानंतर ) झाला तर स्टेशनवरची टॉयलेट्स, ट्रक पार्किंगच्या जागा, बाहेरगावच्या बस पार्किंग जागा.. इथे असे काहीसे सहज नजरेला पडते. असे संबंध परस्पर संमतीने होत असतील तर समाजाला हरकत घ्यायचे कारणच नाही पण अनेक तरुण मुलांना जो त्रास दिला जातो, तो मात्र नक्कीच आक्षेपार्ह आहे.

या तरुण मुलांना तक्रार करण्यासाठी, अगदी जवळच्या लोकांना हे सांगण्यासही लाज वाटते. पोलिसांना हे माहित नसते असे अजिबात नाही, पण ते देखील काणाडोळा करतात किंवा लुटालूट करतात.

सिम्बा | 2 December, 2016 - 13:05
दिनेश दा,
या गे ऍक्टिव्हिटीज नसतात, तर लैगिक दृष्टया अतृप्त लोकांचा लैगिक भूक भागायवाचा प्रकार असतो,
आणि जिथे खरीददार असतात, तिकडे विक्रेते येणारच,

माझे काही गे मित्र आहेत, त्यांच्याशी बोलताना समजले,
आज एका मुलाला/पुरुषाला लैगिक भूक भागवायला मुलगी/स्त्री मिळण्या पेक्षा ( परस्पर संमतीने संबंध ठेवणारी, वन नाईट स्टॅन्ड ठेवणारी पण वेश्या/कॉल गर्ल नव्हे) मुलगा मिळणे जास्त सोपे आहे.

अशा पद्धतीने भेटणारी पुरुष/मुले सगळीच गे असतात असे नव्हे,
हेट्रो sexual माणसे, आपल्या इच्छा शमवायला इकडे येत असतात,
आधी गे स्पेस मध्ये ऍक्टिव्ह असणारा मुलगा, लग्न झाल्यावर त्या वर्तुळातून बाहेर पडतो/कॉन्टॅक्ट कमी करतो अशा बऱ्याच केसेस आहेत.

असो.... धाग्याचा विषय खूप वेगळा आहे,

दिनेशदा,
"समलिंगी लोकांकडून केले जाणारे स्पर्श " असे मी म्हणत नाहीये,
Sexually frustrated/ अतृप्त लोक असे करतात असे मी म्हणतोय
या मध्ये गे आणि हेट्रो दोघे हि आले,
माझ्या अनुभवाप्रमाणे, यात हेट्रो sexual लोक (आपल्या सामाजिक नॉर्म प्रमाणे, बायको संसार असणारे) जास्त होते.

@नन्द्या४३: भुकेल्या आणि उपाशी पोटी प्रगती झालेली नाही. होणारही नाही. तहान, भूक, झोप, सेक्स या नैसर्गिक उर्मी आहेत. त्या दडपून ठेवून संधोधन आणि तंत्रज्ञान यामध्ये प्रगती करावी अशी तुमची अव्यवहारी अपेक्षा आहे. तुम्ही समस्या नीट मांडली आहे. पण तिचे उत्तर जे आहे ते मात्र तुम्हाला मंजूर नाही.

@अॅमी: लोकसत्तेत मंगला सामंत यांनी लिहिलेला जो लेख मी पूर्वी वाचला होता पण आता संदर्भासाठी सापडत नव्हता, त्याच्या लिंक या धाग्यावर शेअर केल्याबद्दल शतशः आभार. अतिशय अभ्यासपूर्ण आणि वैज्ञानिक पद्धतीने या लेखाची मांडणी केली आहे. हा धागा वाचणाऱ्या सर्वांनी आवर्जून वाचावा म्हणून लेख इथे पेस्ट करत आहे.

लैंगिकतेचे शमन की दमन?

भाग १

निसर्गाने सजीवांच्या जगण्यासाठी दोन मुख्य आधारस्तंभ निर्माण केलेले आहेत. त्यापैकी एक अन्नाची भूक आणि दुसरी लैंगिक भूक! प्राणी व्यक्तिश: जगण्यासाठी अन्नाची भूक आणि दुसरी लैंगिक भूक ही संपूर्ण प्राणिजात टिकून राहण्यासाठी, अशी निसर्गाची व्यवस्था आहे. या दोन्ही भुका ‘पेरिफेरल नव्‍‌र्हस सिस्टीम’ आणि ‘सेंट्रल नव्‍‌र्हस सिस्टीम’ यांच्या दरम्यान होणाऱ्या संदेश-आदेशाच्या परिवहनातून परस्पर सहकार्याने विशिष्ट हार्मोन्स निर्मितीद्वारे निर्माण केल्या जातात आणि त्यानुसार प्राणिजातीला पवित्रे घेण्यास भाग पाडले जाऊन शमविल्या जातात. त्याकरिता ब्रेनमध्ये, या दोन भुकांचा ‘प्रीवायिरग सेटअप’ उत्क्रांतीमधून नक्की झालेला असतो; त्यामुळे त्या कोणत्याही प्राण्यांच्या ऐच्छिक नियंत्रणाखाली नसतात. शिवाय या दोन भुकांअभावी सजीव प्राणी विनाशाकडे जातात. मात्र विनाशाप्रती संघर्ष करण्याच्या सजीवांच्या आंतरिक गुणधर्मातून या भुका शमविण्याचा प्रयत्न सर्व प्राणी करतात. बुद्धिमान मनुष्यप्राणी तर हा प्रयत्न आटोकाट करतो. जसं, अन्नाच्या भुकेसाठी चोरी, मारामारी आणि लैंगिक भुकेसाठी जबरदस्तीच्या संबंधाची गुन्हेगारी!

ब्रेनमधील प्रीवायिरग संदर्भात संशोधक मांजराचे उदाहरण देतात. घरातील खातंपितं मांजर, त्याला उंदीर वा पक्षी दिसल्यास त्यावर झडप घालतं, त्याला ठार मारतं आणि त्याला खाण्याचाही प्रयत्न करतं. हे मांजर भुकेलेले नसते, तरी अन्न म्हणून त्याचे ठरलेले भक्ष्य मिळवून खाण्याचा त्याच्या मेंदूमध्ये सेट झालेला प्रोग्राम आणि त्यानुसार त्याच्या वर्तन-प्रेरणा (instinct) त्याला नियमित खाणे मिळूनही बदललेल्या नसतात. मालकाला कितीही वाटलं की, आपल्या पोट भरलेल्या मांजराने उंदराच्या वाटेला जाऊ नये, तरी निसर्गापुढे ना मांजराचे काही चालत, ना माणसाचे! हे उदाहरण आपल्याला बरंच काही सांगून जातं. उदा. स्त्री-पुरुष शरीरसंबंधाचा मुद्दा ‘खात्या-पित्या मांजरा’प्रमाणे विवाहाची सोय करून सोडविण्याचा माणसाने प्रयत्न केलेला असला तरी, स्त्री-पुरुष मुक्तआकर्षण आणि मुक्त शरीरसंबंधाकडे असणारी त्याची ओढ, याबाबतच्या नैसर्गिक मेंदूच्या कार्यप्रणालीाुढे आपले कुणाचेच काही चालत नाही; आणि विवाहबाह्य़ संबंधाच्या वाढत्या प्रमाणामुळे विवाहप्रथेची हतबलता उघड होते. विवाह हा नैसर्गिक मुक्त शरीरसंबंध काबूत ठेवण्याचा एक संस्कार असला, तरी मेंदूच्या कार्यपद्धती बदलण्यास तो असमर्थ ठरतो.

भारतासारख्या देशात विवाहप्रथा अनिवार्य म्हणून ठामपणे पाय रोवून असूनसुद्धा लैंगिक गुन्हे आणि िहसा-हत्येचे अन्य गुन्हे यांचे प्रमाण सतत वाढत चाललेले आपण पाहतो. यामागे अनेक कौटुंबिक, सामाजिक,आर्थिक, मानसिक आणि विषमतेची कारणे आहेतच. पण त्याचबरोबर गेली अनेक शतके आपण लैंगिकतेबाबत बाळगत असलेला सदोष, चुकीचा दृष्टिकोन, हे एक महत्त्वाचे कारण आपण लक्षात घेतलेलं नाही. विनयभंग, बलात्कार, मुलींची छेडछाड यांसारख्या गुन्ह्य़ांवर होणाऱ्या चर्चा आणि प्रतिक्रियांमधून कायदे कडक होणे वा त्याची कठोर अंमलबजावणी, पोलीस संरक्षण वाढविणे, पुरुषांची मानसिकता बदलणे अशा सूचना पुढे आणल्या जातात. हेल्पलाइन वाढवल्या जातात. शहरात निषेध फलकांसहित मोर्चे काढले जातात. पण दुर्दैवाने केव्हाही असं तपासलं जात नाही की लैंगिक गुन्हे वाढण्यामागे मुळामध्ये स्त्री-पुरुष शरीरसंबंधांच्या नियमनाची केलेली पायाभरणी चुकलेली तर नाही ना? लैंगिक भुकेसंदर्भात निसर्गाने केलेली योजना आणि आपण आपल्यावर घालून घेतलेली शरीरसंबंधाची बंधने, यामुळे स्त्री-पुरुषांच्या लैंगिक गरजेचे शमन किती होते की फक्त दमनच होत आहे ? अन्याय होत राहिला आहे का? स्त्रियांवरील अन्यायाबद्दल अनेकदा चर्चा होतात. त्या व्हायला पाहिजेतच. पण पुरुषाची कामेच्छा, त्याच्या कामपूर्तीतील अडथळे आणि त्यातून त्याची होणारी लैंगिक आणि मानसिक कोंडी हा विषय कधी चर्चेच्या ऐरणीवर येत नाही. वर्षांनुवर्षे ‘विवाह’ या असमान मापदंडाने स्त्री व पुरुषांची लैंगिकता समान करण्याचे अशक्य प्रयास चालूच राहिलेले आहेत.

पहिल्या प्रथम एक लक्षात घेतलं पाहिजे की विवाहप्रथा ही समाजात नैतिकता आणण्यासाठी योजलेली नाही. तर नांगराच्या शोधानंतर उदयास आलेल्या जमीनदारशाहीमधील जमीनदारांच्या मालमत्तेला वारसा मिळावा आणि त्याकरिता जमीनदारांचे पितृत्व समजण्यासाठी आणली गेली आहे.

विवाहप्रथा नसताना प्राचीन काळात स्त्री-पुरुष संबंध मुक्त होते. तेव्हा स्त्रियांना मुले होत होती. ती मातृकुळात प्रेमाने वाढवली जात होती. स्त्री व पुरुष हे एकमेकांना कोणत्याही बंधनाविना प्राप्त होत असल्यामुळे लैंगिक चारित्र्य असा काही वेगळा विषय तेव्हा चर्चेला नव्हता. सर्व स्त्रिया-पुरुष एकमेकांना उपलब्ध असणे हे ऐच्छिक असल्यामुळे वेश्याव्यवसाय असा शरीरसंबंधाचा वेगळा फाटा नव्हता. पुरुषांना त्यांची कामवासना फसवणूक करून शमविण्याची वेळ येत नव्हती. पती संकल्पना नसल्यामुळे गर्भधारणेचा विषय स्त्रीच्या इच्छेवर होता. लेकुरवाळ्या स्त्रिया खूण म्हणून डोक्यावर मातीचा पट्टा ओढून पुरुषांना ‘शरीरसंबंध नको’ चा इशारा देण्याची प्रथा आफ्रिकेच्या आकिक्य जमातीत आढळते; असे इव्हलीन रीड नोंदवते. आज यापैकी काही जमातींनी विवाहप्रथा स्वीकारली. पण तत्पूर्वी तरुण मुला-मुलींना विवाहपूर्व शरीरसंबंधाची संधी देऊन लग्नाचा निर्णय होत असतो. शिवाय पुरुष कुळाला वारस देणे हा त्यांच्या लग्नाचा मूळ हेतू नसल्याने, मुलीला लग्नापूर्वी कोणापासूनही झालेली संतती पुढे होणाऱ्या नवऱ्याकडून सहजपणे स्वीकारली जाते. अर्थात् त्यामुळे अनाथ मुले ही संकल्पना तिथे अज्ञात आहे. थोडक्यात ‘स्त्री-पुरुष मुक्त शरीरसंबंध’ ही निसर्गाची नैतिक कल्पना जिथे स्वीकारलेली आहे, तिथे वरील प्रकारची समाजव्यवस्था आपोआप आकाराला येते.

आपण विवाहाद्वारे स्त्री-पुरुष मुक्त संबंधाची नैसर्गिक कल्पना झुगारून दिलेली आहे. आणि स्त्री-पुरुष निष्ठेच्या संबंधावर समाज उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु निसर्गाने पतीशिवाय अन्य पुरुषापासून स्त्रीला मूल होऊ नये, असे तद्अनुषंगिक बदल स्त्री-शरीरात किंवा तिच्या मेंदूमध्ये नवे प्रोग्राम आणून केलेले नाहीत. त्यामुळे मानवीजीवनात स्थिती अशी झालेली आहे की, माणसाला मूल होण्याचे शरीरनियम निसर्गाचे, परंतु शरीरसंबंधाचे नियम मात्र माणसाचे! यामुळे मानवीमनात आणि शरीरात जो एक आंतर्विरोध निर्माण झालेला आहे, त्याला सामोरे जाताना, त्याचा तत्काळ परिणाम हा समाजातील लैंगिक गुन्हेगारीत परावर्तित होणं अपरिहार्य ठरतं. कारण शरीरसंबंधावर विवाहाच्या बंधनामुळे मेंदू आणि हार्मोन्सच्या नैसर्गिक कार्यात हस्तक्षेप केल्यासारखे होते. ज्याचे परिणाम निव्वळ लैंगिकतेपुरते मर्यादित न राहता, ते स्त्री-पुरुषांमध्ये मानसिक अशांती, अस्वस्थता, प्रक्षोभ, विकृती अशा पद्धतीने दृश्य होऊ लागतात. हे समजण्यासाठी थोडी हार्मोन्सबद्दल माहिती होणं आवश्यक आहे. हार्मोन म्हणजे शरीरग्रंथीतून स्रवणारी केमिकल्स वा रसायनं!

माणसामध्ये टेस्टास्टेरॉन हे कामवासना जागृत करणारं ‘सेक्स हार्मोन’ आहे. हे हार्मोन अतिप्राचीन असून, ते मणकेधारक प्राणिजातीपासून उत्क्रांत झालेलं आहे. ते स्त्री व पुरुष दोघांमध्येही आहे. पुरुषांमध्ये ते स्त्रीपेक्षा २० ते ४० पटीने जास्त असतं. अर्थात पुरुषाची कामेच्छा ही स्त्रीच्या तुलनेत तीव्र आणि तातडीची (urgent) असते. पुरुषामध्ये शरीरसंबंधाची आतुरता असणे आणि त्याने त्याकरिता पुढाकार घेणे, हे टेस्टास्टेरॉन या रसायनांचे परिणाम असतात. याउलट स्त्रीची कामवासना सौम्य असते. तिच्यामध्ये टेस्टास्टेरॉनचं प्रमाण अल्प असतं. आणि तिला लैंगिक उत्तेजित होण्यास टेस्टास्टेरॉनबरोबर इस्ट्रोजन आणि ऑक्सिटोसीन या हार्मोन्सचीसुद्धा गरज असते. त्यामुळे कामातुर होण्यास स्त्री थोडा अधिक वेळ घेते. पुरुषाच्या तीव्र कामवासनेतून स्त्रीवर लैंगिक हल्ले होऊ नयेत याची काळजी निसर्गाने स्त्री-पुरुष संबंध मुक्त ठेवून घेतलेली आहे. आजच्या विवाहाच्या पाश्र्वभूमीवर, जिथे विनयभंग, छेडछाड, बलात्कार, ब्लॅकमेलिंगसारखे गुन्हे घडतात. तिथे निसर्ग स्त्री पुरुषाच्या कामवासनेचे शमन कसं करतो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

स्त्री व पुरुषाची सेक्स अर्र्ज (आवेग)आणि सेक्सपूर्तीची गरज ही त्यांच्या प्रजोत्पादनामधील भूमिकेनुसार निसर्गाने नियोजित केलेली दिसते. एक तर, मूल झाल्यावर त्याचे पालनपोषण व संगोपन हे निसर्गत: स्त्रीचे कार्य, निसर्ग समजतो. त्याकरिता तिला वेळ, मानसिक निवांतता आणि मोकळेपणा मिळावा म्हणून पुढील बाळंतपण रोखण्यासाठी, स्त्रीबाजूने कामवासनेचे नियंत्रण होत असते. माता स्त्री, बाळाला जोपर्यंत अंगावर पाजते तोपर्यंत तिच्यामधील प्रोलॅक्टिन हार्मोन स्त्री बीजनिर्मिती (म्हणून मासिकपाळी) रोखून धरतं हा त्याचा पुरावा आहे. आणि आफ्रिकन आकिक्यू जमातीतील स्त्री कपाळावर मातीचा पट्टा लावून पुरुषांना इशारा देते, हे या निसर्गनियमाचं सोशल वर्जन आहे. त्याकरिता स्त्रीची सेक्स ड्राइव्ह मंदावण्याची गरज असते. विवाहित पुरुषांना मूल झालेल्या आपल्या पत्नीबाबत हा अनुभव येत असतो.

शिवाय निसर्गनियमाप्रमाणे बहुतेक प्राणिजातीतली मादी स्वत:च्या इच्छेनुसार नराला समागमासाठी जवळ येऊ देते. मनुष्यप्राणी हा ‘नॉन सीझनल ब्रीडर’ अर्थात कोणत्याही काळात प्रजोत्पादन करू शकणारा आहे आणि कोणत्याही हंगामात तो प्रेम आणि सेक्स करू शकतो, असं असलं तरी समागमाची इच्छा अन्य मादींमध्ये ज्याप्रमाणे तिच्या हार्मोनल लेव्हल प्रमाणे ठरते, तेच तत्त्व स्त्रीमध्ये शिल्लक आहे. पण फक्त मुक्त शरीरसंबंध असणाऱ्या समाजव्यवस्थेत, स्त्रीवरील आफ्रिकन स्त्रीप्रमाणे पुरुषाला दूर ठेवू शकते. मात्र विवाहप्रणीत कुटुंबात जिथे स्त्रीला शरीरसंबंधासाठी एका पुरुषाबरोबर बांधून टाकलेली आहे, त्या समाजात स्त्रीची समागमाची नैसर्गिक इच्छाप्रवणता मारली जाते. ती पुरुषाहाती देऊन, स्त्रीची कामेच्छा नियंत्रित करणाऱ्या हार्मोनल लेव्हलकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं. त्याचे परिणाम स्त्री-पुरुष दोघांनाही भोगावे लागतात. पुरुषाची कामवासना उद्दीपित झाली, तरी त्याच्या पत्नीची हार्मोनल पातळी समागमासाठी सुसंगत असेल असं नाही. परंतु समाजातील अन्य कुणा स्त्रीची हार्मोनल पातळी, समागमासाठी त्या वेळेस अनुकूल असू शकते स्त्री-पुरुष मुक्त शरीरसंबंधाचा निसर्गाचा उद्देश नेमकेपणाने इथे लक्षात येतो. आपली कामवासना, पत्नीची अनुकूलता नाही म्हणून दडपून टाकण्याचा अन्याय पुरुषावर होऊ नये पण त्याचबरोबर पुरुषाच्या तीव्र कामवासनापूर्तीसाठी कोणत्याही स्त्रीला लैंगिक जबरदस्तीचा सामना करावा लागू नये म्हणून मुक्त संबंधांद्वारे अन्य स्त्रियांची उपलब्धता वाढवून निसर्ग समतोल साधत असतो.

निसर्गाची मुक्त संबंध व्यवस्था स्वीकारलेल्या आपल्या पूर्वजांच्या आजच्या आदिवासी रूपातल्या अवशेषात लैंगिक गुन्हे म्हणूनच आढळत नाहीत. एच. एल. देवराय हे मेघालयातील अशा जेन्शिया ट्राइबबद्दल लिहितात, “sex crimes like rape, abduction, seduction etc. are unknown here.”

विवाहनिर्मित समाजव्यवस्थेत सेक्स क्राइम मुक्त समाज हे स्वप्नरंजन आहे. कारण विवाहाला पुरुषाचे पितृत्व अपेक्षित असल्याने, स्त्रीच्या मुक्त लैंगिक इच्छेवर पुरुष गेले अनेक शतके ताबा ठेवून आहे. हा ताबा घट्ट धरून ठेवण्याच्या प्रयत्नातून प्रथम लैंगिक आणि मग त्यातून पुढे मानसिक समस्या व गुन्हे आकाराला येतात. विवाहपूर्व संबंधाला सुद्धा आपल्या समाजाची मान्यता नसल्यामुळे, तरुणांना चोरून कराव्या लागणाऱ्या संबंधातून, गुन्ह्य़ाची साखळी कशी तयार होते, ते पुढील लेखात पाहणारच आहोत.

पुन्हा हार्मोनवर येताना, सांगावं लागेल की टेस्टास्टेरॉन हे सेक्स हार्मोन पुरुषाची कामवासना ज्वलंत ठेवत असलं तरी, ते पुरुषाने स्त्रीवर बलात्कार करावा किंवा हिंसक व्हावं, याकरिता पुरुषाला प्रोत्साहन देणारं नाही. हे महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. तसं असतं तर सर्वच पुरुष हिंसक दिसले असते. सर्व पुरुष बलात्कार करणारे झाले असते. पुरुषांमध्ये टेस्टास्टेरॉन हार्मोन हे स्त्रीच्या पातळीपेक्षा वरच्या पातळीत जरी असलं तरी, पुरुषाला त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडता येण्यासाठी ती पातळी मेन्टेन असणं आवश्यक आहे.

तरीसुद्धा टेस्टास्टेरॉन हे खूप संवेदनशील केमिकल आहे. समाजातील बऱ्या-वाईट घटना, प्रगतीला मारक आणि संघर्षांचं वातावरण, कौटुंबिक वाईट परिस्थिती, अपमानित जीवन, शिवाय प्रसारमाध्यमातून सेक्स किंवा हिंसक घटनांचं प्रसारण अशा प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत पुरुषांमधील टेस्टास्टेरॉन नॉर्मल पातळीपेक्षा खूप वर चढतं. त्याचप्रमाणे शरीरातील अन्य हार्मोन्स जी आपल्यामध्ये लय साधत असतात, त्यापैकी एक सेरॉटोनीन हार्मोन हे माणसाला वास्तवतेचं भान, सारासार विचारशक्ती देणारं आहे. मेंदूला शांत ठेवणारे ते रसायन आहे, जे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा मूलत: जास्त असते. पण ते टेस्टास्टेरॉनशी फटकून असतं. अर्थात् समाजातील प्रतिकूल वातावरणामुळे टेस्टास्टेरॉन जेव्हा वर चढतं तेव्हा सेरॉटोनीन हार्मोन्सची पातळी खाली घसरते आणि पुरुषाच्या सारासार विचारशक्तीवर परिणाम होतो. मेंदू अशांत आणि प्रक्षुब्ध होतो. सेरॉटोनीनचा प्रभाव गेल्यामुळे टेस्टास्टेरॉनचा पुरुषावरील अंमल वाढतो आणि तो आक्रमकता व हिंसकता याचा बळी होतो.

आपल्या मेंदूच्या क्रिया आणि हार्मोन्स लेव्हल यांच्या निकोप परिणामांसाठी शास्त्रज्ञ भोवतालाचं महत्त्व का सांगतात?

(लेखिका: मंगला सामंत - mangala_samant@yahoo.com)

लैंगिकतेचे शमन की दमन?

भाग २

निसर्गत: माणसाच्या ब्रेनमध्ये झालेल्या प्रिवायरिंग सेटअपमुळे विवाहप्रथा आणूनसुद्धा स्त्री-पुरुषांमध्ये असणारा मुक्त आचरणाचा कल आपण रोखू शकलेलो नाही. यासंबंधीची शरीरशास्त्रीय माहिती आपण मागील लेखात घेतली. विवाहामुळे स्त्री-पुरुष संबंधांचे नियमन होत राहणार आहे, या कल्पनेत (किंवा भ्रमात) आपण राहिल्याने लैंगिक भावनांची दडपणूक (दमन) कधीपासून सुरू झाली, हे आपल्याला कळलेलेच नाही; आणि आज स्त्रियांवर होणाऱ्या पुरुषांच्या हल्ल्यातून हे दमन विकृतपणे समोर येताना दिसत आहे.

विवाहाने प्रस्थापित केलेल्या पुरुषप्रधान समाजात जर स्त्री-पुरुषांची कामवासना योग्य प्रकारे शमविण्याचा विचार आपण करणार असू, तर पहिल्या प्रथम पोटाच्या भुकेप्रमाणे लैंगिक भुकेची अनिवार्यता समजून घेता आली पाहिजे. जसे पोटाची भूक व्यवस्थित भागत असेल तर आपण अन्नसेवन समाधानाने, आनंदाने करतो. पण जे भुकेलेले असतात, ते अन्नावर तुटून पडताना आपण पाहतो. मात्र इथे आपण त्यांची उपासमार समजून घेतो. माणसांनी अन्नावर तुटून पडणे वाईट दिसते म्हणून त्यांची ती भूक, अन्न मिळू न देता दमन करण्याचा विचार कधी कुठे होत नाही. उलट त्यांना अन्न मिळण्याची सहज सोय करण्याचा प्रयत्न होतो. लैंगिक भुकेची नेमकी हीच स्थिती आहे. तरीसुद्धा ती सहजपणे भागविण्यात समाज अडथळे उभारतो. विवाहाचं वय वाढून सुद्धा विवाहपूर्व लैंगिक शमन हे अनैतिक ठरवतो. तेव्हा उपासमारीची स्थिती निर्माण होऊन ती भूकवासना अनावर होते. त्यातून मग मिळेल त्या मार्गाने स्त्री-पुरुषांनी शरीरसंबंधाचा प्रयत्न करणे, चोरून वेश्यागमन करणे, ब्ल्यू फिल्म्स पाहणे, बलात्कार, छेडछाड, विनयभंग, लैंगिक रॅगिंग, लहान मुलांचे लैंगिक शोषण म्हणजेच एकप्रकारे ‘तुटून पडणे’ ही सेक्सक्रिया सर्वत्र, म्हणजे चित्रपटांतून, कुटुंबातून, मैत्रीमधून, सामाजिक गुन्ह्य़ांतून आणि अगदी वैवाहिक संबंधातूनही दिसते. पण गंमत म्हणजे या गुन्ह्य़ांमागील खऱ्या कारणांना बगल देऊन स्त्रिया अंगप्रदर्शन करतात, म्हणून पुरुष गुन्हे करतात, असा दिशाभूल करणारा युक्तिवाद नेहमी केला जातो. आपल्याला वरवर विचार करण्याची सवय लावली गेल्याने असे युक्तिवाद अगदी चटकन पटतात. पण जगातल्या सर्व आदिवासी समाजात स्त्रिया या सर्वासमक्ष उघडय़ा अंगाने फिरत असतात, पण त्यांच्या समाजात हे लैंगिक गुन्हे अज्ञात आहेत, हे मागील लेखात आपण पाहिले. उलट आपल्याच समाजातले लोक या स्त्रियांचे फोटो आणि व्हिडीओ काढून आपले भुकेलेपण दाखवतात. तेव्हा प्रश्न हा शरीर उघडे टाकण्याचा नसून, आपल्या समाजात लैंगिक भावनेचे शमन आदिवासी समाजानुसार होत नाही. त्यामुळे कुठेही शरीराचा थोडासा भाग जरी उघडा दिसला की, अरे पाहा, पाहा, अशी आपली मानसिकता प्रक्षुब्ध होत असते. स्त्रीला संपूर्ण बुरखा घालायला लावणाऱ्या समाजात (देशात) स्त्रीचा उघडा हात जरी दृष्टीस पडला तरी पुरुष उत्तेजित होऊ शकतात. याउलट फ्री सेक्स असणाऱ्या पाशात्त्य देशात स्त्री-शरीराचे सवंग कुतूहल नसल्याने तोकडे पेहराव केलेल्या स्त्रिया अवतीभोवती असल्या तरी तेथील पुरुष रिलॅक्स असतात. जिच्याविषयी आकर्षण तिचे नखही दृष्टीस पडू नये अशा समाजात क्रौर्य, हिंसा आणि विकृतीने भरलेले तालिबानी पुरुष जन्म घेतात, हा योगायोग नाही.

आपल्या समाजात लैंगिक कामना शमविण्याच्या वाटा अतिशय युक्तीने चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून त्यांचे निर्माते दाखवत असतात. बहुसंख्येने हे निर्माते पुरुषच असतात. अर्थात पुरुषांच्या कामवासनेची होत असलेली कोंडी त्यांच्या परिचयाची असते. म्हणून मग स्त्रीचे अंगप्रदर्शन, सेक्श्युअल नृत्य, बेडसीन्स हा सर्व मसाला प्रत्येक चित्रपटात ठासून भरला जातो. जे पाहून पुरुषवर्ग उत्तेजित होतो. ते पाहण्यास चित्रपटाला गर्दी होते आणि निर्मात्याचा धंदा जोरात होतो. परंतु उत्तेजित होऊन चित्रपटगृहाबाहेर पडलेल्या पुरुषांना कामवासना शमविण्याचा सन्माननीय मार्ग उपलब्ध असतोच असे नाही. आपल्या देशात तर अशा पुरुषांमध्ये अविवाहित तरुण, घटस्फोटित पुरुष तसेच नोकरीनिमित्त पत्नीला सोडून दुसऱ्या ठिकाणी राहणारे असंख्य पुरुष अशी मोठी यादी सांगता येईल. पुरुषांची नैसर्गिक कामवासना शमविण्यासाठी काही क्षेत्रात महिनोन्महिने किंवा काही वर्षेसुद्धा स्त्रीसहवास त्यांना मिळू शकत नाही. यामध्ये बांधकाम साईटवरचे कामगार पुरुष, इंजिनीअर्स, ठेकेदार, मोठे व्यावसायिक किंवा बोटीवर असणारे पुरुष, लष्करातील पुरुष अशा सर्वाचा समावेश असतो. प्रगतीकडे सतत धावणाऱ्या माणसाने अशा पुरुषांच्या लैंगिक गरजेचा विचार कधी केलेला नाही. त्यामुळे या पुरुषांचे समलैंगिक संबंध, विवाहबाह्य़ संबंध किंवा शेवटी बलात्कार अशी न टाळता येणारी स्थिती मानवी जीवनात ठाण मांडून बसलेली आहे. या कृत्यांना फक्त गुन्हा समजून सोडून देणे, हा अविचार आहे.

जगभरात विवाहसंस्था सर्वत्र असली तरी प्रत्येक संस्कृतीत सेक्सबाबत असणारा दृष्टिकोन हा त्या त्या देशातील गुन्ह्य़ाचे प्रमाण ठरवतो. सेक्स दृष्टिकोन जितका उदार, जितका निकोप तितकी ती संस्कृती नवनव्या तंत्रज्ञानास सहजपणे सामावून घेत असते. आपण जेव्हा पाश्चिमात्य चित्रपटातील सेक्सप्रदर्शन जसेच्या तसे उचलले, तेव्हा त्या समाजात फ्री सेक्स रूढ आहे आणि आपल्याकडे ती कल्पनाही सहन होत नाही, हे लक्षातच घेतले गेले नाही. उलट भुकेल्या माणसास जेवणाचे ताट दाखवून ते काढून घेतल्याप्रमाणे सेक्सविषयीचा हा खेळ खेळून भारतीय मानसिकतेचा छळ करण्यासाठी या कल्पना प्रसारमाध्यमांकडून वापरल्या जात आहेत. ज्यामुळे आपला समाज झपाटय़ाने विकृतीकडे चालला आहे. भारतीय मुली ज्या पाश्चात्त्य देशात शिक्षण वा नोकरी करीत आहेत, त्यांच्यावर बलात्कार वा तत्सम लैंगिक हल्ले झाल्याच्या बातम्या आपण ऐकत नाही. मात्र भारतात आलेल्या परदेशी स्त्रियांवर बलात्कार होत असतात आणि बलात्कार करून त्यांची हत्याही होत असते. या स्त्रियांना गर्दीमध्ये भारतीय पुरुषांच्या हस्तस्पर्शाचासुद्धा जेव्हा ‘प्रसाद’ मिळतो तेव्हा त्या आपल्या या संस्कृतीने चकित होतात. स्त्री-पुरुषांची आपल्या समाजात कोंडून घातलेली लैंगिक इच्छा आणि त्यातून पुरुषांची स्त्रीबाबत तयार झालेली भोगवादाची मानसिकता त्याचे हे वरील परिणाम म्हणावे लागतात.

मात्र पुढे पुढे निव्वळ लैंगिक भावनेची कोंडी या थेट कारणांवर अनेक पांघरुणे आपल्या भोवतालामधून पडत गेली. संशोधक ज्याचा उल्लेख करतात, त्या ‘भोवताल’मध्ये अनेक विषय आणि व्यक्ती असतात. म्हणजे पालक, शिक्षक, नातलग, शेजारी, मित्रमैत्रिणी, शिक्षण, आर्थिक परिस्थिती, विविध प्रसारमाध्यमे समाजातील विवाह, धर्म, कुटुंब, न्याय, शासन अशा संस्था व त्यांचे संस्कार वगैरे! पितृत्वासाठी प्रथमच निसर्गव्यवस्थेला डावलून बंधनातल्या शरीरसंबंधाची कल्पना प्रस्थापित करणारी विवाहकल्पना निसर्गाच्या रेटय़ापुढे वाहून जाऊ नये म्हणून पुरुषांनी धर्मग्रंथ लिहून त्यातून स्त्रियांची योनिशूचिता आणि पातिव्रत्य याचे स्तोम मांडण्यात आले. ते मोडणाऱ्या स्त्रियांना शिक्षा सांगण्यात आल्या. त्यातून पुढे पुरुषाला झुकते माप देणारी संस्कृती उदयाला येऊन आपल्या समाजात पुरुषांसाठी नवस व त्याचे कौतुकसोहळे स्त्रियांनी करण्याच्या परंपरा निर्माण करून पुरुषाला संस्कृतीने अधिकच श्रेष्ठ पदावर बसविले.

विवाहसंस्था, धर्मसंस्था यांच्या संस्काराचे परिणाम कुटुंबसंस्थेवर झाले. स्वत:च्या पितृत्वासाठी विवाहित स्त्रीच्या लैंगिक इच्छेवर पतीचा असणारा सातत्याने पहारा तसेच विवाहापूर्वी स्त्रीला मातृत्व येऊ नये म्हणून अविवाहित स्त्रीवरसुद्धा ठेवली जाणारी नजर याची परिणती, पुरुषांची मानसिकता, स्त्रीबाबत मालकी हक्काची भावना बाळगणारी होऊन बसली आहे. पुरुष स्वामी आणि स्त्री त्याच्या आधीन अशा निसर्गविरोधी असणाऱ्या आपल्या स्वयंभू कल्पनेतून मुला-मुलींवर जन्मल्यापासूनच संस्कार कुटुंबातूनच केले जातात. त्याकरिता ‘बॉय कोड’चा वापर करून मुलगा पाच-सहा वर्षांचा झाला की त्याच्या भावनाशील, संवेदनशील असण्याचे हसे केले जाते. मुलगा घाबरला, रडला किंवा लाजला तर तू पुरुष आहेस, स्ट्राँग पाहिजेस, याची त्याला सारखी जाणीव करून दिली जाते. त्याची मानसिक, भावनिक गरज लक्षात न घेता त्याला ‘मम्माज बॉय’ असे हिणवून त्याच्या आईपासून तोडण्यास सातव्या-आठव्या वर्षांपासून सुरुवात केली जाते. मुलींसारखे रडतोस काय, नि लाजतोस काय? अशा प्रकारे प्रत्येक वेळी त्या मुलामध्ये तो मुलीपेक्षा विशेष असल्याची भावना निर्माण केली जाते. त्यामुळे एकीकडे स्त्रीसारखं हळूवार व्यक्त न होऊ शकणारा, आणि दुसरीकडे पुरूषी कामभावना दडपणारा असा अहंकारी पण द्विधा मनस्थितीचा पुरूष कुटुंबात मालक म्हणून जेव्हा घडविला जातो तेव्हा स्त्री व पुरुषांमधील सर्वच स्नेहसंबंधांची पुरती दैना होते. आई-मुलगा, बहीण-भाऊ, पती-पत्नी, मित्र-मैत्रीण यापैकी कोणतेही नाते समपातळीत आणि निकोप राहत नाही. शिवाय मुलींची संवेदनशीलता किंवा त्यांच्या प्रतिक्रिया या चुकीच्या किंवा मूर्खपणाच्या आहेत, या बालपणीच्या संस्करांमुळे स्त्री आपल्यापेक्षा कमी दर्जाची आहे, या भावनेतून पुरूष कुटुंबातील किंवा समाजातील स्त्रीबरोबर तुच्छतने किंवा हिंसकतेने व्यवहार करतो. बालवयातील संस्कार म्हणून दुरूस्त होणं गरजेचं आहे.

कुटुंबामध्ये पती-पत्नीने एकमेकांना प्रेमाने जवळ घेणे, प्रेमाने चुंबन घेणे हे आपल्या संस्कृतीत मुलांच्यादेखत ‘वाईट संस्कार’ समजले जातात. पण आश्चर्य म्हणजे मुलांसमोर पत्नीचा पाणउतारा करणे, तिला मुलांदेखत मारणे हे मात्र वाईट संस्कारात येत नाही! एका तीन वर्षांच्या मुलाचे वडील त्याच्या आईला हातात मिळेल ते फेकून मारताना पाहून हा मुलगा घाबरून रडत असे. पण नंतर तेच ते पाहून आई ही मारण्यासाठी असते, असा त्याचा समज झाला आणि आईने त्याला काही शिस्त लावली की आपली खेळणी तिच्यावर फेकून तो मारू लागला. स्त्रीविषयीची सन्मानाची भावना अशी पायरी पायरीने खाली उतरवली जाते. ज्यातून पुढे समाज स्त्री-भ्रूणहत्या करायला मागेपुढे पाहत नाही. (‘युनिसेफ’तर्फे कौटुंबिक हिंसाचाराबाबत एक धक्कादायक सव्‍‌र्हे काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये पत्नीला मारणे योग्य आहे, असे ५७ टक्के पुरुषांनी सांगितले तर पत्नीला मारायला हरकत नाही, असे सुमारे ५३ टक्के स्त्रियांनी सांगितले. अचंबित करणाऱ्या या मतांचे मूळ हे टीव्ही मालिकांमध्ये आहे. मालिकेतला एखादा पती पत्नीचा अवमान करणारा, हात पिरगळणारा, वस्तू फेकणारा दाखवलेला असतो तरी ती पत्नी त्याला जवळ घेऊन ‘तू तिथे मी’ म्हणत प्रेमाने त्याच्या छातीवर डोके टेकते तेव्हा तरुणांचा समज होतो की मुलींना असेच पुरुष आवडतात. पत्नीला मारणे हा पुरुषार्थ आहे. त्यामुळेच पत्नी प्रेम करते. तर याच मालिकांमधून समजूतदार, मनमिळाऊ पुरुष हा बहुधा हतबल आणि अपमानित होणारा दाखवतात. त्याची खुद्द आईसुद्धा त्याची मानहानी करताना दाखवतात. काही मालिकांत अशा पुरुषाला मतिमंद किंवा वेडासुद्धा दाखवतात. अर्थात मुलींवर मनमिळाऊ पुरुष म्हणजे कचखाऊ पुरुष, असा संस्कार होतो. याऊलट या मालिका गुंड प्रवृत्तीचा, आक्रमक पुरुष यशस्वी दाखवतात. मुख्य म्हणजे मुलींना असा पुरुष बाहेरच्या जगापासून सुरक्षा देण्याच्या कुवतीचा वाटतो. जो आपल्या अंगावर धावून येईल, तोच बाहेरच्यांना धडा शिकवील या एकूण समजुतीतून ‘युनिसेफ’कडे तशी मते स्त्री-पुरुषांनी नोंदविलेली दिसतात. यातून स्त्रीमनात बाहेरच्या जगातील असुरक्षिततेची असणारी धास्ती तर दिसतेच पण टीव्ही मालिकासुद्धा मनमिळाऊ पुरुष अपयशी दाखवून किती घातक संस्कार बाहेर टाकतात हेसुद्धा उघड होते. अशा समाजविघातक आणि विकृत मूल्ये बाहेर फेकणाऱ्या मालिकांच्या विरोधात देशभर पालकांनी आणि प्रेक्षकांनी रस्त्यावर येऊन निदर्शने करण्याची वेळ आता आलेली आहे.)

राजकारण क्षेत्रात आपल्याकडे स्त्रीवर बलात्कार करून किंवा तिच्याशी विवाहबाह्य़ संबंध ठेवून हत्या करणारे काही जण आहेत. स्वत:च्या पत्नीला मारणारे, विनयभंग करणारे पोलीस आहेत. गैरवर्तन करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी ज्यांची नेमणूक आहे तेच स्वत: असे दुसऱ्याला उद्ध्वस्त करणारे गुन्हे करून, वर पुन्हा निर्दोष सुटतात. ही वस्तुस्थिती सामान्य समाजकंटकांना, रोडरोमियोंना हिंमत देऊन बिनधास्त करणारी आहे. आपल्या देशात स्त्रीविरोधी गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढण्याचे हे फार महत्त्वाचे कारण आहे. थोडक्यात, विवाहसंस्था, धर्मसंस्था, संस्कृती कुटुंबसंस्था, प्रसारमाध्यमे, शासनसंस्था वगैरे या भोवतालच्या घटकांद्वारे बाहेर पडणारी घातक मूल्ये व संस्कार, आधीच ज्यांचे लैंगिक दमन झाल्यामुळे मनोवस्था प्रक्षुब्ध आणि विकृत झालेली आहे, त्यांना हिंसक बनविण्याची महत्त्वाची कामगिरी कशी पार पाडतात हे इथे लक्षात येईल.

मग अशा समाजव्यवस्थेतील बलात्कारासारख्या गुन्ह्य़ासाठी अगदी फाशी जरी बजावली तरी तो त्या गुन्हेगार व्यक्तीपुरता मर्यादित उपाय ठरतो. तो हवाच. पण त्यामुळे भविष्यातले गुन्हे थांबत नाहीत हे दिल्लीच्या घटनेनंतरसुद्धा ज्या बेशरमपणाने बलात्काराचे गुन्हे घडत आहेत त्यावरून लक्षात येईल. फाशी शिक्षा देण्यात धोका असा आहे की, बलात्काराचा पुरावा म्हणून असणाऱ्या त्या स्त्रीची निश्चित त्यामुळे हत्या होईल. म्हणून आमरण जन्मठेप ही अधिक चांगली शिक्षा ठरेल. स्त्रिया-मुलींनी तिथल्या तिथे प्रतिकार करावा असे काही मार्ग सुचविले जात आहेत. उदा. डोळ्यात मिरची पावडर टाकणे, गुंडाच्या ओटीपोटात लाथ मारणे वगैरे. तरी ते यशस्वी होतीलच असे नाही.

म्हणून मग व्यक्तिगत शिक्षा किंवा व्यक्तिगत प्रतिकार याच्यापलीकडे जाऊन ही लढाई अखेर या व्यवस्थेच्या विरोधात लढण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. दिल्लीच्या घटनेसंबंधीच्या मोर्चात मोठय़ा संख्येने पुरुषही होते, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट. खरोखरच दुर्वर्तनी पुरुषांपेक्षा सद्वर्तनी पुरुषांची संख्या भारतात जर जास्त असेल तर अशा गुन्ह्य़ासंदर्भातील परिस्थितीच्या नियंत्रणाची सूत्रे त्यांना सांभाळता आली पाहिजेत. जिथे कुठे स्त्रीची छेड काढण्याचा प्रयत्न असेल तिथे १०-१२ पुरुषांनी एकदम या गुंडाला घेरले पाहिजे. त्यापैकी किमान एकाला तरी त्यांनी पोलीस चौकीत नेले पाहिजे आणि तिथे त्याच्या कुकर्माचा पाठपुरावा याच सज्जन पुरुषांनी ठिकठिकाणी संघटना स्थापून केला पाहिजे, म्हणजे ते गुंड सहजी सुटणार नाहीत. या कामी त्यांना टीव्ही चॅनेल्सची मदत होऊ शकते. पुरुषांची ही नेमकी भूमिका महिलांना अपेक्षित आहे. घटना घडून गेल्यानंतर मेणबत्ती-मोर्चात सामील होऊन निव्वळ सहानुभूती प्रदर्शन हे प्रत्येक वेळेस सज्जन पुरुषांना शोभा देणारे ठरणार नाही.

सर्व स्त्रियांनीसुद्धा अशा घटनांसंदर्भात एकदा तरी सार्वजनिक संपाची हाक दिली पाहिजे. शिक्षण संस्था, अन्य सरकारी खाती, आयटी क्षेत्र, खासगी कंपन्या, बँका, अंगणवाडय़ा, मनोरंजन क्षेत्र, बचत गटातील स्त्रिया, उद्योजक व व्यावसायिक स्त्रिया, कामगार-मजूर स्त्रिया व गृहिणी या सर्वानी दोन दिवस तरी आपापली कामे बंद ठेवून एक प्रकारे महिलांशिवाय चालवून दाखवा देश, असे आव्हान या व्यवस्थेपुढे ठेवून आपली ताकद दाखवली पाहिजे आणि स्त्रियांच्या प्रश्नांची दखल घेण्यास व्यवस्थेला भाग पाडलं पाहिजे.

बलात्कारकर्त्यांला कोणती शिक्षा द्यावी असे वाटते, असा प्रश्न मी एका तरुणाला केला असता तो म्हणाला, अशा पुरुषांचे लैंगिक खच्चीकरण हाच या घृणास्पद वृत्तीवरचा उपाय मला वाटतो. पुरुषाला त्याचे लिंग म्हणजे मर्दानगीचा मानबिंदू वाटत असतो. पण त्याचा त्याने कुणाला उद्ध्वस्त करण्याकरिता दुरुपयोग केला असेल तर त्याचा हा नैसर्गिक परवाना आपण रद्द करायला पाहिजे. लैंगिक खच्चीकरणामुळे त्याला आयुष्यभर समागमसुखापासून वंचित राहण्याचे दु:ख भोगावे लागेल आणि ते त्याने भोगलेच पाहिजे. कारण कुणा निरपराध स्त्रीला किंवा बालिकेला त्याने उद्ध्वस्त केलेले आहे याची जन्माची आठवण त्याला राहिली पाहिजे. स्त्रिया अनेक शतके लैंगिक मानहानी सोसत आहेत. तेव्हा आता अशा वृत्तीच्या पुरुषालासुद्धा ही मानहानी भोगतानाच्या होणाऱ्या वेदना कळल्या पाहिजेत. म्हणून फाशीऐवजी लैंगिक खच्चीकरणाचा कायदाच अशा हीन वृत्तीला दहशत बसवेल असे मला वाटते.

आहे का असा कायदा चालवून घेण्याची हिम्मत विविध सत्तेवरच्या पुरुषांमध्ये?

(लेखिका: मंगला सामंत - mangala_samant@yahoo.com)

@limbutimbu: जाऊ द्या हो साहेब, "लैंगिक समाधान" चा अर्थ कळत नसेल तर इतका त्रास नका घेऊ. अर्थ न कळणाऱ्यांसाठी नाहीच आहे हा धागा Happy

लेख चांगलाच आहे तरीपण परीपूर्ण वाटला नाही. आपल्याच नव्हे तर इतर संस्कृतीतही "ब्रम्हचर्य" हि संकल्पना होतीच आणि आहेही.

अशा स्वरुपाच्या लेखात जेव्हा आकडेवारी दिली जाते तेव्हा त्यावरुन काढलेले निष्कर्ष पण मूळ अभ्यासातलेच असावेत, असे मला वाटते. इथे लेखिका अशी मते नोंदवणारे स्त्री पुरुष, यांचा संबंध मालिकांशी जोडते. पण ही मते नोंदवणारे कितीजण नियमित पणे मालिका बघतात, हे मात्र सांगत नाही. अर्थात हा कुठल्याही सांख्यिकी अभ्यासाचा तोकडेपणा आहे. निवडलेले लोक ( सॅम्पल ) हे पूर्ण प्रतिनिधित्व करणारे असतेच असे नाही.

बलात्काराच्या लैंगिक खच्चीकरणाचा उपाय तर अनेक लेखकांनी मांडला आहे ( उदा जयवंत दळवी यांचे पुरुष नाटक ) पण असे खच्चीकरण केलेला पुरुष, अन्य शारीरीक किंवा इतर मार्गांनी अन्याय करू शकणार नाही का ?

आणि केवळ याच लेखनात नाही तर प्रसारमाध्यमात सगळीकडेच आफ्रिका ( आणि आफ्रिकेतील एक जमात ) असा सर्वसाधारण उल्लेख आढळतो. माझे १२ वर्षांहून अधिक काळ वास्तव्य या खंडात ( हो आफ्रिका हे खंड आहे ) आहे. प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी आहे. आफ्रिका असा उल्लेख करताना फक्त सबसहारन देशांचाच संदर्भ दिला जातो, तोही चुकीचाच आहे. अश्या स्वरुपाच्या अभ्यासपूर्ण लेखात असा उल्लेख मला खटकला.

>>@limbutimbu: जाऊ द्या हो साहेब, "लैंगिक समाधान" चा अर्थ कळत नसेल तर इतका त्रास नका घेऊ. अर्थ न कळणाऱ्यांसाठी नाहीच आहे हा धागा स्मित

असल्या उपेक्षा करणार्‍या आणि फक्त निवडक लोकांसाठी धागा आहे असे सांगणार्‍या वृत्तीचा तिव्र निषेध Angry
त्यांना अर्थ कळत नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सांगा विषद करून.

इनामदार,

मंगला सामंतांचे दोन्ही लेख 'विचारमांडणीच्या' बाबतीत खूप आवडले. दिनेश ह्यांचे स्टॅटिस्टिक्सबाबतचे मत पटले. (मी नोकरी करत असताना नेहमी म्हणायचो की स्टॅटिस्टिक्सवरून नेमका निष्कर्ष कधीच काढता येत नाही.) पण दिनेश ह्यांचा 'ब्रह्मचर्य' हा मुद्दा समजला नाही.

कपाळावर मातीचा पट्टा ओढणारीच स्त्री एखाद्या पुरुषाला आवडली आणि त्याने बळजबरी करायचा प्रयत्न केला - असे होऊ शकणार नाही का त्या समाजात? की झाले तर त्याला होऊ शकणारी शिक्षा इतकी त्वरीत व भयंकर असते (/असायची) की त्याचे धाडसच होणार नाही?

लिंबूटिंबूंना काय म्हणायचे आहे ते समजले नाही.

>> असल्या उपेक्षा करणार्‍या आणि फक्त निवडक लोकांसाठी धागा आहे असे सांगणार्‍या वृत्तीचा तिव्र निषेध राग
त्यांना अर्थ कळत नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सांगा विषद करून.

दोन गोष्टी आहेत: १. ज्या पद्धतीने प्रश्नकर्त्याने प्रश्न विचारला आहे त्यावरून त्यांना अर्थ कळवून घ्यायचा नव्हे तर केवळ टिंगलटवाळी करायचा हेतू आहे हे स्पष्ट होते. आणि ते स्पष्ट असूनही तुम्ही त्यांची बाजू घेत असाल तर तुम्हीही त्याच प्रकारात येता हे सुद्धा स्पष्ट आहे. २. लैंगिक समाधान याचा अर्थ समजून सांगण्यासाठी हा धागा नाही. ज्यांना तो अर्थ माहित आहे त्यांच्यासाठी हि चर्चा आहे. आणि त्या सर्वांनी योग्य त्या प्रतिक्रिया देऊन आधीच या चर्चेत सहभाग घेतलेलाही आहे.

कोणास जर लैंगिक समाधान म्हणजे काय हे माहित करून घ्यावयाचे असेल तर त्यांनी त्यासाठी वेगळा धागा जरूर काढावा.

>> मंगला सामंत यांचा अजून एक लेख https://lekhsangrah.wordpress.com/2010/07/03/विवाहाच्या-उत्क्रांतीचा/

हो हे आधी वाचले होते आणि यातूनच विवाह संस्कृती विषयीचे काही मुद्दे या व अन्य एका धाग्यात मी मांडले आहेत.
मूळ लिंक शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

कोणास जर लैंगिक समाधान म्हणजे काय हे माहित करून घ्यावयाचे असेल तर त्यांनी त्यासाठी वेगळा धागा जरूर काढावा.
>>>>

छान मुद्दा आहे.
मी स्वत:ला लैंगिक असमाधानी समजतो. पण समजा लैंगिक समाधानाचा मी काढलेला अर्थच चुकीचा असेल तर...
म्हणजे आधी त्याची व्याख्या स्पष्ट केली पाहिजे. पण मला नवीन धागा काढायला संकोच वाटतोय. कारण आज जी गोष्ट बारा लोकांना माहीत आहे ती उद्या बत्तीस लोकांना समजेल.

मालिकेतला एखादा पती पत्नीचा अवमान करणारा, हात पिरगळणारा, वस्तू फेकणारा दाखवलेला असतो तरी ती पत्नी त्याला जवळ घेऊन ‘तू तिथे मी’ म्हणत प्रेमाने त्याच्या छातीवर डोके टेकते तेव्हा तरुणांचा समज होतो की मुलींना असेच पुरुष आवडतात. पत्नीला मारणे हा पुरुषार्थ आहे. त्यामुळेच पत्नी प्रेम करते. तर याच मालिकांमधून समजूतदार, मनमिळाऊ पुरुष हा बहुधा हतबल आणि अपमानित होणारा दाखवतात. त्याची खुद्द आईसुद्धा त्याची मानहानी करताना दाखवतात. काही मालिकांत अशा पुरुषाला मतिमंद किंवा वेडासुद्धा दाखवतात. अर्थात मुलींवर मनमिळाऊ पुरुष म्हणजे कचखाऊ पुरुष, असा संस्कार होतो. याऊलट या मालिका गुंड प्रवृत्तीचा, आक्रमक पुरुष यशस्वी दाखवतात. मुख्य म्हणजे मुलींना असा पुरुष बाहेरच्या जगापासून सुरक्षा देण्याच्या कुवतीचा वाटतो. जो आपल्या अंगावर धावून येईल, तोच बाहेरच्यांना धडा शिकवील या एकूण समजुतीतून ‘युनिसेफ’कडे तशी मते स्त्री-पुरुषांनी नोंदविलेली दिसतात. यातून स्त्रीमनात बाहेरच्या जगातील असुरक्षिततेची असणारी धास्ती तर दिसतेच पण टीव्ही मालिकासुद्धा मनमिळाऊ पुरुष अपयशी दाखवून किती घातक संस्कार बाहेर टाकतात हेसुद्धा उघड होते. अशा समाजविघातक आणि विकृत मूल्ये बाहेर फेकणाऱ्या मालिकांच्या विरोधात देशभर पालकांनी आणि प्रेक्षकांनी रस्त्यावर येऊन निदर्शने करण्याची वेळ आता आलेली आहे.)>>>>>>.स ह म त

Pages