तुम्ही लैंगिक दृष्ट्या समाधानी आहात काय ?

Submitted by इनामदार on 23 November, 2016 - 23:20

भारतातले बलात्कारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. सर्वाधिक बलात्कार करणाऱ्यांच्या यादीत भारताचा जगात चौथा नंबर लागतो असे केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी काही दिवसापूर्वीच सांगितले आहे. यासाठी त्यांनी याबाबत मिळालेल्या एका अधिकृत आकडेवारीचा संदर्भ दिला आहे. या आकडेवारीत अर्थात केवळ पोलिसांकडे नोंद झालेल्या घटनांचा समावेश असणार. पण नोंद न झालेल्या घटना याहून कित्येक पटींनी अधिक असतील. त्या विचारात घेता भारत जगातील सर्वाधिक बलात्कार होणारा देश आहे कि काय असे वाटू लागते. आणि हे खरेच भयावह व चिंताजनक आहे. म्हणून या मागची कारणे शोधणे अत्यंत महत्वाचे ठरते.

बलात्कारांच्या वाढत्या प्रमाणामागे जी काही कारणे आहेत त्यात समाजातील वाढते लैगिक असमाधान हे एक प्रमुख कारण आहे. या पार्श्वभूमीवर मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय यावर एका धाग्यावर विचारमंथन आधीपासून सुरु आहेच. पण त्याच बरोबर लैगिक समाधानाच्या बाबतीत आपल्याकडे किती सामाजिक समतोल आहे हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. म्हणून हा सर्वेक्षण स्वरूपाचा धागा सुरु करत आहे.

तुम्ही लैंगिक दृष्ट्या समाधानी आहात काय? या नाजूक प्रश्नाला मायबोलीच्या सभासदांनी आपला आयडी वापरून प्रतिसाद देणे प्रायव्हसीच्या दृष्टीने योग्य होणार नाही. म्हणून यासाठी पर्यायी उत्तरे म्हणून पहिले आठ प्रतिसाद मीच दिले आहेत. आपल्याला त्यातील केवळ एकच पर्यायी उत्तर Vote up करायचे आहे. (अर्थात कुणाला वेगळा प्रतिसाद द्यायचा असेल तर अजिबात हरकत नाही. पण प्रत्येकाने निदान योग्य पर्यायाला Vote up तरी करावे अशी अपेक्षा आहे)

एकच नम्र व कळकळीची विनंती आहे कृपया एकपेक्षा अधिक पर्यायांना Vote up करू नका.

जास्तीत जास्त सभासदांनी Vote up करावे म्हणून हा धागा अधून मधून (सातत्याने नव्हे) वर आणला जाईल. पर्यायांना भरपूर Vote up मिळाले कि निष्कर्षाबाबत चर्चा करता येईल.
(टीप: अनेकांचे एकापेक्षा अधिक आयडी आहेत, ड्यू आयडी आहेत. तरीही या सगळ्याची एकत्रित गोळाबेरीज होऊन काय निष्कर्ष येतात ते पाहूया)

चला तर मग आत्ताच करा आपला पर्याय Vote up!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशा समाजविघातक आणि विकृत मूल्ये बाहेर फेकणाऱ्या मालिकांच्या विरोधात देशभर पालकांनी आणि प्रेक्षकांनी रस्त्यावर येऊन निदर्शने करण्याची वेळ आता आलेली आहे.)>>>>>

कोन करनार ??
ज्यांचे नुकसान या मालिके मुळे होत आहे, ते लोक मुर्खासारखे चविने टिव्ही बघत बसलेले असतात...
हे लोक अशा चंगल्या आंदोलनात का सामिल होतिल? त्यापेक्शा एखाद्या मुख्य पात्राला अचानक मालिके बाहेर काढले तरच हे मुर्ख लोक अशी आंदोलन करतिल.
एकुन काय .. समाजात मुर्ख आनि विक्रुत लोकांची काही कमि नाही... त्यांना जागे करन्याचा प्रयत्न करुनहि फरसे काहि हाति लागेल असे वाटत नाहि.

आपलीच सत्ता असल्यावर कसलं आलंय समाधान ? कित्येक जणींनी आत्महत्या केली आणि ती यांच्यामुळेच हे उघडकीला आले तरी राजीनामा न देणा-यांच्या समर्थकांनी या विषयावर विलाप करावा इतका कोडगेपणा पुरोगामी होण्यासाठी गरजेचा आहे का ?

लेखकूची या धाग्यावरची मतं पण वाचण्यासारखी आहेत.
https://www.maayboli.com/node/78514

हा आयडी एक सातत्याने लैंगिक विचारांनी ग्रस्त असलेला रोगट आयडी आहे. प्रशासकांनी याचे विविध आयड्यांवरून झालेले लिखाण लक्षात घेऊन भविष्यात ही घाण मायबोलीवर फिरकणार नाही याची दक्षता घ्यावी.

Pages