तुम्ही लैंगिक दृष्ट्या समाधानी आहात काय ?

Submitted by इनामदार on 23 November, 2016 - 23:20

भारतातले बलात्कारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. सर्वाधिक बलात्कार करणाऱ्यांच्या यादीत भारताचा जगात चौथा नंबर लागतो असे केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी काही दिवसापूर्वीच सांगितले आहे. यासाठी त्यांनी याबाबत मिळालेल्या एका अधिकृत आकडेवारीचा संदर्भ दिला आहे. या आकडेवारीत अर्थात केवळ पोलिसांकडे नोंद झालेल्या घटनांचा समावेश असणार. पण नोंद न झालेल्या घटना याहून कित्येक पटींनी अधिक असतील. त्या विचारात घेता भारत जगातील सर्वाधिक बलात्कार होणारा देश आहे कि काय असे वाटू लागते. आणि हे खरेच भयावह व चिंताजनक आहे. म्हणून या मागची कारणे शोधणे अत्यंत महत्वाचे ठरते.

बलात्कारांच्या वाढत्या प्रमाणामागे जी काही कारणे आहेत त्यात समाजातील वाढते लैगिक असमाधान हे एक प्रमुख कारण आहे. या पार्श्वभूमीवर मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय यावर एका धाग्यावर विचारमंथन आधीपासून सुरु आहेच. पण त्याच बरोबर लैगिक समाधानाच्या बाबतीत आपल्याकडे किती सामाजिक समतोल आहे हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. म्हणून हा सर्वेक्षण स्वरूपाचा धागा सुरु करत आहे.

तुम्ही लैंगिक दृष्ट्या समाधानी आहात काय? या नाजूक प्रश्नाला मायबोलीच्या सभासदांनी आपला आयडी वापरून प्रतिसाद देणे प्रायव्हसीच्या दृष्टीने योग्य होणार नाही. म्हणून यासाठी पर्यायी उत्तरे म्हणून पहिले आठ प्रतिसाद मीच दिले आहेत. आपल्याला त्यातील केवळ एकच पर्यायी उत्तर Vote up करायचे आहे. (अर्थात कुणाला वेगळा प्रतिसाद द्यायचा असेल तर अजिबात हरकत नाही. पण प्रत्येकाने निदान योग्य पर्यायाला Vote up तरी करावे अशी अपेक्षा आहे)

एकच नम्र व कळकळीची विनंती आहे कृपया एकपेक्षा अधिक पर्यायांना Vote up करू नका.

जास्तीत जास्त सभासदांनी Vote up करावे म्हणून हा धागा अधून मधून (सातत्याने नव्हे) वर आणला जाईल. पर्यायांना भरपूर Vote up मिळाले कि निष्कर्षाबाबत चर्चा करता येईल.
(टीप: अनेकांचे एकापेक्षा अधिक आयडी आहेत, ड्यू आयडी आहेत. तरीही या सगळ्याची एकत्रित गोळाबेरीज होऊन काय निष्कर्ष येतात ते पाहूया)

चला तर मग आत्ताच करा आपला पर्याय Vote up!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अजूनही कन्फ्यूजच आहे,
पण जर मी असमाधानी असा पर्याय निवडला तर मला समाधानी करण्यासाठी काय उपाययोजना राबवल्या जातील हे जाणून घेण्यास उत्सुक आहे

पण जर मी असमाधानी असा पर्याय निवडला तर मला समाधानी करण्यासाठी काय उपाययोजना राबवल्या जातील हे जाणून घेण्यास उत्सुक आहे>>>>>>>>>>> अरे ए Lol

घाबरण्यासारखे काय आहे मला नाही कळले.

>> असमाधानी असा पर्याय निवडला तर मला समाधानी करण्यासाठी काय उपाययोजना राबवल्या जातील हे जाणून घेण्यास उत्सुक आहे

करेक्ट. चर्चा होणे महत्वाचे. पण "माझ्यासाठी काय करताय" असे विचारण्यापेक्षा उपाय व पर्याय सुचवणे जास्त उपयोगाचे. केनेडीनी म्हटले होते "देश माझ्यासाठी काय करतोय यापेक्षा मी देशासाठी काय करतोय हे महत्वाचे" Happy

पण मी स्वता असमाधानी असेल तर मी दुसर्‍याला कसा समाधान देऊ शकतो.
हे म्हणजे एखादा भिकार्‍याकाडे जाऊन त्याच्या वाटीतील आठाणे उचलण्यासारखे झाले नाही का..

अवांतर - केनेडी कोण? आपल्या देशाचे होते का? नाव तर इंग्लिश वाटतेय.

पण जर मी असमाधानी असा पर्याय निवडला तर मला समाधानी करण्यासाठी काय उपाययोजना राबवल्या जातील हे जाणून घेण्यास उत्सुक आहे>> ऋन्म्या डोक्यावर पडलायस का?? Rofl

आणि हे प्रत्येक वेळी देशासाठी काहीतरी करा आणि देशभक्त बना फॅड आता या गोष्टीत तरी नको. मी देशासाठी टॅक्स भरतो हे पुरेसे आहे, आता सरकारने मी लैंगिकदृष्ट्या कसा समाधानी राहील हे बघण्याची जबाबदारी उचलायलाच हवी. हवा तर याचा वेगळा कर आकारा

अवांतर - केनेडी कोण? आपल्या देशाचे होते का? नाव तर इंग्लिश वाटतेय.>>>>>>:राग: तुझ्या एन ए एन ए ची टांग! जॉन एफ केनेडी अमेरीकेचे माजी अध्यक्ष होते. माबोवर टाईमपास करण्या ऐवजी जी के वाढवुन स्वजोचा करोडपती पण बघ.:दिवा:

>> पण मी स्वता असमाधानी असेल तर मी दुसर्‍याला कसा समाधान देऊ शकतो.
ज्यांना समस्या आहे तेच अनेकदा समस्येवर चांगले उपाय सुचवू शकतात. किंबहुना समस्या नक्की काय आहे हे तरी त्यांच्यामुळे चांगले कळू शकते.

>> केनेडी कोण?
गुगल वर फक्त "JFK" सर्च करा

आता सरकारने मी लैंगिकदृष्ट्या कसा समाधानी राहील हे बघण्याची जबाबदारी उचलायलाच हवी. हवा तर याचा वेगळा कर आकारा>>>>:हहगलो: अगं आईगं आवरा याला.:हहगलो:

जॉन एफ केनेडी अमेरीकेचे माजी अध्यक्ष होते. >> हो माहीत आहे, नसते तरी गूगल करून पटकन शोधले असते. ते मुद्दाम विचारले आहे. त्यांनी त्यांच्या देशवासीयांना काय सांगितले ते ते लोकं बघून घेतील ना, हा त्यामागचा उद्देश. आपल्या महापुरुषांनी म्हटलेय की तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा. त्याच धर्तीवर आताच्या राज्यकर्त्यांनी असे म्हणायला नको का की तुम समय पे टॅक्स भरो हम तुम्हे लैंगिक समाधान देंगे

निधी, मी सिरीअस आहे.
जर मी ईथे एवढा मोठा गौप्यस्फोट करणार असेल की मी लैंगिकदृष्ट्या असमाधानी आहे तर कोणीतरी मला समाधानी करायची जबाबदारी उचलायलाच हवी ना. ईथे कोणीतरी मी सरकारकडून अपेक्षा करतोय ईतकेच. की मी फक्त माझे हसे उडवायला ईथे हे सांगणार आहे. मला काहीच फायदा नाही उलट नुकसानच होणार आहे.. अश्याने मग कोण स्वताहून प्रामाणिकपणे कबूल करेन ईथे असे..

आपल्या महापुरुषांनी म्हटलेय की तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा. त्याच धर्तीवर आताच्या राज्यकर्त्यांनी असे म्हणायला नको का की तुम समय पे टॅक्स भरो हम तुम्हे लैंगिक समाधान देंगे>>>> आप महान हो!

मी काल हा धागा वाचला. अगदी सोपे पर्याय होते. त्यातील निम्मे-निम्मे पर्याय स्त्री-पुरुष पैकी एकालाच लागू असल्याने आणि मला मी पुरुषच आहे याची नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के खात्री असल्याने निम्मे पर्याय बाद झाले. पण उरलेल्या निम्म्या पर्यायांनीही मला गोंधळून टाकले. ईतके की रात्रभर हाच विचार करत होतो. अगदी कुंडीतले गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या तोडून "मी समाधानी आहे" मी समाधानी नाही" असा खेळही खेळून झाला. पण समाधानकारक उत्तर काही मिळाले नाही. म्हणून मग आज ऑफिसला दांडी मारून याचा सोक्षामोक्ष लावायचे ठरवले..

ऋन्म्या,
तुला खरंच कुठे ठेवू नी कुठे नको!

घरी गेल्यावर दृष्टं काढून घे आईकडून!
नाहीतर मी ऑनलाईन काढलीय असं समज!

गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या तोडून "मी समाधानी आहे" मी समाधानी नाही" असा खेळही खेळून झाला. >>> बरोबर अगदी असंच करुन पर्यायावर प्लस करायचं होतं. Lol

जर मी ईथे एवढा मोठा गौप्यस्फोट करणार असेल की मी लैंगिकदृष्ट्या असमाधानी आहे तर कोणीतरी मला समाधानी करायची जबाबदारी उचलायलाच हवी ना.

तु बुकमायछोटु वर एक छोटु बुक कर तुझ्यासाठी.

निधी, तुम्ही बिनधास्त हसू शकता. आम्हा असमाधानी लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे की लोकं हसतील या भितीने ते अगदी डॉक्टरकडेही जात नाहीत. पण मी तुमच्या हसण्याकडे दुर्लक्ष करून आम्हा सर्वांसाठी एक आदर्श ठेवणार आहे Happy

>> आताच्या राज्यकर्त्यांनी असे म्हणायला नको का की तुम समय पे टॅक्स भरो हम तुम्हे लैंगिक समाधान देंगे

राज्यकर्ते तुमच्या माझ्या सारखेच ह्याच समाजातून आलेले असतात. समाजाला मान्य नसेल तर राज्यकर्ते काही करू शकत नाहीत. (उदाहरणार्थ, डान्स बार अनेक देशात व्यवस्थित सुरु आहेत. सरकारमान्य आहेत. ह्याच समस्येवर उपाय म्हणून. पण आपल्या देशात त्यावर बंदी घातली गेली आहे. कारण आपल्या समाजाला म्हणजे तुम्हा आम्हाला ते मान्य नाही. म्हणून सरकारने बंद केले)

म्हणजेच लैंगिक समाधानासाठी काय हवे हे आपणच आधी सुचवायला हवे. ते सगळ्यांना मान्य होईलच असे नाही पण सुचवायला तर काय हरकत आहे?

म्हणजेच लैंगिक समाधानासाठी काय हवे हे आपणच आधी सुचवायला हवे.
>>>
याच्याशी सहमत, सुचवायचे काम आम्हालाच करावे लागणार. बघता बघता तुम्ही मला एक धागाही सुचवला या बद्दल धन्यवाद. त्याचसोबत एक नापासांची चिंता सारखी संघटनाही बनवावी लागणार. एकट्याच्या आवाजाला कोण ऐकतोय ईथे. एक मेणबत्ती मोर्चा सारखा पाकळ्या खुडलेले गुलाब हातात धरून एक मोर्चाही काढावा लागणार.

ऋ, तुझ्या असमाधानी असण्यावर मी कशाला हसेन?? तु ज्या पद्धतीने हा मुद्दा मांडलायस त्यावर हसू आलं मला.
तु टाईमपास करतोयस किंवा जरा गंमत करतोयस असा माझा समज झाला होता/आहे. म्हणून मी हसले. साॅरी अगेन. Happy

@Nidhii: साॅरी ऋ. पण तुझे प्रतिसाद वाचून मला खरंच हसू आवरत नाहीये रे.

तुमचेच आवडीचे वाक्य: हसताय ना? हसत रहा!!! Happy

>> संघटनाही बनवावी लागणार. एकट्याच्या आवाजाला कोण ऐकतोय

सहमत. आप सारखी MAAP (मुक्त आदमी औरत पार्टी) बनवू आपण Lol

अरे लोक्स तुम्ही अजून केनेडीमध्येच अडकून पडला आहात. त्यांचा देश याबाबतीत फार पुढे निघून गेला आहे. तिथे लैंगिक समाधानाचा ओवरडोस झालाय. तिथले लोक एकांत शोधत आहेत. आपण आपले प्रॉब्लेम्सबद्दल बोलूया ईथे. आजवर एकातरी पक्षाचा निवडणूक अजेंडा असा होता का की आम्ही या देशात सर्वांचे लैंगिक पोषण करू? गेला बाजार प्रेमी युगुलांसाठी काही उद्याने राखून ठेवू? काय अन्न वस्त निवारा या तीनच मूलभूत गरजा आहेत का आपल्या? पुस्तकातले हे धडे बदलायची वेळ आली आहे आता ..

ओये बाकी काही कर फुलांची कशाला वाट लावतो?? राग
>>>
पाकळ्या खुडलेल्या गुलाबांना बघून लोकांचा जीव तुटतो ईथे पण लैंगिक भावना कुस्करलेल्या मानवी मनांना कोणी विचारत नाही Sad

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद शोधून हसत राहायचे बस. स्मित
>>>
+७८६
हसत राहायचे आणि लोकांना हसवत राहायचे. दुसरे जमले की पहिले असे काही वेगळे जमवावे लागत नाही.
मध्येच मला सेंटी फिलॉसॉफी मारायचा मोह काही आवरत नाही. अवांतराबद्दल क्षमस्व.
पण कितीही आनंदी असलो तरी ही लैंगिकदृष्ट्या असमाधानी असायची सल आहेच हा मनात. गैरसमज नको. मला आपल्या सहानुभुतीची गरज आहे.

आजवर एकातरी पक्षाचा निवडणूक अजेंडा असा होता का की आम्ही या देशात सर्वांचे लैंगिक पोषण करू? गेला बाजार प्रेमी युगुलांसाठी काही उद्याने राखून ठेवू? काय अन्न वस्त निवारा या तीनच मूलभूत गरजा आहेत का आपल्या? पुस्तकातले हे धडे बदलायची वेळ आली आहे आता ..

येस्स. नाऊ यू आर टॉकिंग. यू गॉट द पोइन्ट.

>> होय ओ इनामदार, मी कायम हसतच असते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद शोधून हसत राहायचे बस. स्मित
तुम्ही आतून खूप दु:खी आहात? एनीवेज, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद घेणे म्हणजेच जगणे.

येस्स. नाऊ यू आर टॉकिंग. यू गॉट द पोइन्ट.
>>>
किती पॉईंट? काय प्रश्नमंजूषा स्पर्धा चालू आहे का ईथे पॉईंट द्यायला Sad

ऋनम्या तु इथे स्पष्टपणे बोलतोयस , हे चांगलेच आहे.पण मायबोलीवर नियमांच्या पुढे जाऊ नकोस .तुला काही कानमंत्र हवे असतील तर मला संपर्कातुन मेल कर.

सिंथेटीक जिनिअस, तुम्हाला मेल करतो. पण काही पिवळी पुस्तके आणि निळ्या चित्रफिती सुचवून माझे आयुष्य गुलाबी करणार असाल तर निराशा पदरी पडेल .. खूप अपेक्षेन पाहतोय मी आपल्या सर्वाकडेच Happy

बस काय ऋन्म्या ,माझ्यावर विश्वास नाही काय.तू मेल तर कर ,व काय प्रश्न आहे मला सांग.फक्त त्रोटक विचारु नको.

ऋन्मेष ,
रजा घेऊन घरी बसलायस हे सांगितलंस हे बरं केलंस.
मघापासून हापिसातनं, हापिसचं नेट वापरून टी पी न करणारा हा मुलगा आत्ता यावेळी माबोवर कसा या विचाराने मला प्रचंड नैतिक दडपण आलं होतं!

हसत राहायचे आणि लोकांना हसवत राहायचे. दुसरे जमले की पहिले असे काही वेगळे जमवावे लागत नाही.>> +१.

पण कितीही आनंदी असलो तरी ही लैंगिकदृष्ट्या असमाधानी असायची सल आहेच हा मनात. गैरसमज नको. मला आपल्या सहानुभुतीची गरज आहे.>> Happy

कोणीतरी दोघांनी मजा मारली म्हणून जन्माला आलो आपण, आणि आपल्या मुलभूत गरजा भागाविण्याची जबाबदारी सरकारची कशी काय? नागरिकशास्त्र मध्ये फक्त रस्ते, दिवे, पाणी -सांडपाणी, कायदा-सुव्यवस्था होतं की.

बलात्कारांच्या वाढत्या प्रमाणामागे जी काही कारणे आहेत त्यात समाजातील वाढते लैगिक असमाधान हे एक प्रमुख कारण आहे. ..... पण त्याच बरोबर लै........ म्हणून हा सर्वेक्षण स्वरूपाचा धागा सुरु करत आहे.
>> मग तुम्ही समाधानी / असमाधानी असल्याने बलात्कार कराल / केलाय का ? हा प्रश्नही पाहिजे ना? तरच या समाधान्/असमाधान याचे बलात्काराशी कोरिलेशन आहे का ते कळेल ना?

Pages