बायका पुरुषांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे.जेव्हापासून मला समजायला लागले आहे तेव्हापासून मी आजुबाजुला बघतो की पुरुष ज्या गोष्टी करतात त्या केल्या की बायकांना आपले मेटल सिद्ध् केल्याचा फील येतो.
१. पुरुष सिगरेट पितात ,करा त्यांचे अनुकरण. मग बेफिकीरीत सिगरेट फुकणार्या बायका स्वतःला पुरुषांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा ' लूक ' देत असतात
२. पुरुष जिन्स ,टी शर्ट वापरतात .मग बायकाही त्यांचे अनुकरण करतात.शोभत नसेल तरीही जिन्स टीशर्ट घालून फिरणार्या बायका सर्रास दिसतात.पुरुषाला ऑल डेनिम माचो लुक देते,तसा क्वचीत बायकांना असा लुक कॅरी करता येतो.पण नाही, पुरुष करतात ,तर आम्हीही करणार,हा अट्टाहास कशासाठी?
३. पुरुष मोटारसायकल चालवतात ,ती त्यांना जमतेहि .पण बाजारत गिअरलेस गाड्यांची फौज उभी असताना या बायकांनाहि मोटार सायकल चालवायची असते.भले ही चालवताना फेफे उडाली तरी हरकत नाही. या पुढे जाऊन काही चवळीच्या शेंगा बुलेटही चालवतात ,आमच्यासारखे पामर त्यांच्यापासून जीव वाचवायला अंतर ठेऊनच गाडी चालवतात
४फोरव्हिलर चालवणे हा खास पुरुषी प्रांत.पण घुसघोरी करणार नाही त्या बायका कसल्या.वडील,भाऊ,आणि नवरा यांना बकरा बनवून कारमध्ये शेजारी बसवले जाते,इतर वेळी मल्टीटास्कींग असणार्य बायका मात्र इथे गडबडतात.ॲक्सलेटर दे असे सांगितले की ब्रेक देतात व ब्रेक दाबायला सांगितले की ॲक्सलेटर देतात.आणि वर यांना ऑटोमॅटीक कार नको असते,यांना हवी असते स्टीक शिफ्ट कार.मग चढावर गाडी थांबल्यावर यांना हाफ क्लच द्यायचे सुचत नाही.मग कार मागे जायला लागली की यांना इंजिनचा आवाज कमी व स्वतःच्या ह्रदयाचे ठोके ऐकायला येतात.अरे काय वेडेपणा आहे हा?
५.दारु ही खास पुरुषांसाठी बनवलेली गोष्ट आहे,पण आजकाल बायकांनी त्यात प्राविण्य मिळवले आहे ,इतके की बिअर मागवली की त्यात सोडा टाका ही त्यांची फर्माईश असते.
तर बायकांनो जरुर पुरुषांना कॉपी करा ,त्यात गैर काही नाही. पण ज्या गोष्टी मुदलातच आपल्यासाठी नाहीत त्याचा अट्टाहास धरु नका.कॉपी अशी करा की बघणारा बघत राहीला पाहीजे.पुरुषांचे एकच उदाहरण देतो,पाककला हा बायकांचा प्रांत ,पण पुरुषांनी तिथे असे प्राविण्य मिळवले आहे की बहुतांश जगप्रसिद्ध शेफ हे पुरुष आहेत.उदा.भारतात संजीव कपूर,जागतिक पातळीवर गॉर्डन रॅमसे.
तर बायकांनो ,पुरुषांना कॉपी करणे म्हणजे आपण मॉड् झालो हा कन्सेप्ट मनातून काढून टाका.तुमची स्वतःची अशी exclusive क्षेत्रे तयार करा.पुरुषांना बेंचमार्क ठरवून भलतेच काहीतरी करण्याचा प्रकार सोडून द्या,after all ,men are men .
छान लिहिला आहे लेख. अगदीच
छान लिहिला आहे लेख. अगदीच विचार करायला लावणारा आहे. माझं संपुर्ण मत परिवर्तन झालं आहे. या एका छोट्याशा लेखाने माझे डोळे उघडले. मी स्वतःला बदलायचं ठरवलं आहे.
लेखकाने बॉम्ब फेकला आहे. लोकांना माहित आहे फुसका आहे तरी .....................................................
पण मला मजा आली.
मने
मने
मनिमाऊ, आता साड्यांचा नवा
मनिमाऊ,
आता साड्यांचा नवा ष्टॉक आणा, जीन्स फेकून द्या.
टू - फोरव्हीलरचं लायसन जाळून टाका.
बार रिकामा करा!
बार रिकामा करा! >>
बार रिकामा करा! >> माझ्यासारख्या गरीबाला त्यातील सामान दान करून!
आणि मने साड्या नेसून डोक्यावर
आणि मने साड्या नेसून डोक्यावर पदर घेऊन कम्प्लसरी
:जीवन डोर तुम्ही संग बांध्दी किंवा मै तुल्सी तेरे आन्गन की गायचं
एका वेळेला किती साड्या
एका वेळेला किती साड्या नेसायच्या आहेत? प्रत्येक गाण्याला एक का?
Manomau, You may day !!
Manomau, You may day !!
you may day?>> you made my
you may day?>>
:d
you made my day म्हणायचंय का?
सिंजी, धागा उचकवण्याच्या
सिंजी,
धागा उचकवण्याच्या हेतूने काढला असला तरी अगदीच फुसका.
सिगरेट पिणे हे व्यसन आहे. 'लुक' देण्यासाठी कुणी सिगरेट पीत नाही. जमिनीवर ६ इंच स्नो असताना तलफ आली म्हणून ऑफिसबाहेर उभे राहून सिगरेट ओढणारे स्त्री-पुरुष फक्त केविलवाणे दिसतात.
पुरुषाला ऑल डेनिम माचो लुक देते,तसा क्वचीत बायकांना असा लुक कॅरी करता येतो.>> मुळात उत्तम शरीर सौष्ठवाचा अभाव स्त्री-पुरुष दोघांतही दिसून येतो. त्यामुळे पुरुषाला ऑल डेनिम माचो लुक देते हेच सरसटीकरण. हे म्हणजे अमुक प्रकारच्या कपड्यात स्त्री सेक्सी दिसते असे सरसकटीकरण केल्यासारखे.
पुरुष मोटारसायकल चालवतात ,ती त्यांना जमतेहि >> पुन्हा सरसकटीकरण. ३० वर्षांपूर्वी मी कॉलेजमधे होते तेव्हाही माझ्या मैत्रीणी जीप, मोटरसायकल चालवायच्या. आता सूनही चालवते. काहीजणी जमत नाही तर गीअरलेस वाल्या चालवायच्या/चालवतात. त्याचवेळी मोटरसायकल ,स्कुटर झेपते म्हणणारे मुलगे/पुरुषही होते/आहेत. ज्याला त्याला कळत आपल्याला काय झेपेल ते. तेव्हा उगाच घाबरु नका. भीतीमुळे गडबडून अपघात होण्याचा संभव अधिक.
फोरव्हिलर चालवणे हा खास पुरुषी प्रांत.>> तुम्हाला स्वतःला गाडी चालवायला शिकणार्या स्रीयांचा वाईट अनुभव आला असेलही पण त्याचे सरसकटीकरण फार हास्यास्पद. आणि विनोद निर्मिती म्हणून लिहिलं असेल तर आउट डेटेड! फोरविलर काय घेवून बसलात १८ विलर चालवतात बायका. मस्त पैकी ट्रक आणि त्याला मागे हॉर्स ट्रेलर. ट्रक चालवणारी व्यक्ती एक सामान्य आई. स्प्रिंग/समर मधले हे नेहमीचे दृश्य . रोज लेकरांना स्कुलबसने सुखरुप शाळेत नेणारी बसलेडी , रात्री पार्टी संपल्यावर टल्ली झालेल्या जोडीदारासाठी डेसिग्नेटेड ड्रायवर असणारी गर्लफ्रेंड/पत्नी, अतिशय धोक्याच्या भागात रसद पोहोचवणारी मिलिटरीतली स्त्री नेहमीच्या बघण्यातली . भारतात नात्यातले दोन पुरुष ड्रायविंग करत नाहित. त्यांना रोज कामावर नेणे-आणणे हे काम त्यांच्या पत्नीचे. त्यात एक आजच्या पिढीतली आणि एक मागल्या पिढीतली.
दारु ही खास पुरुषांसाठी बनवलेली गोष्ट आहे>>अभ्यास फारच कमी पडतोय. प्राचिन भारतात स्री-पुरुष दोघेही मद्यपान करत असत. फक्त पुरुषांनी दारु प्यायची वगैरे पुरुषांनी स्त्रीयांसाठी केलेले बर्यापैकी नवे नियम. त्यातही ज्या घरात मद्यपानाला परंपरेने संमती आहे, शिष्ठाचाराला धरुन आहे तिथे स्त्रीयाही मद्यपान करतात. मस्त माजघरात बसुन करतात. आता जिथे परंपरेने मद्यपानालाच घरात संमती नाही तिथे पुरुषच मागल्या पिढीपर्यंत बाहेर चोरुन मद्यपान करायचे, स्त्रीयांसाठी मद्यपान नाही हेही गृहितक स्वतःच मांडायचे. सगळाच नवखेपणातला गोंधळ!
you made my day. मला
you made my day.
मला इंग्लीश येत नाही हो सातीजी. तुमच्या हसण्याची सोय झाली हेच माझं समाधान.
(हा डायलॉग इथेच चौथ्या पाचव्यांदा लिहीलाय. मोबाईल मधून काहीतरी झाले असावे... )
स्वाती २ उत्तम प्रतिसाद. पण
स्वाती २
उत्तम प्रतिसाद. पण बहुधा इथे लॉजिकल प्रतिसादाची अपेक्षा नसावी. पालथ्या घड्यावर पाणी आहे.
कोणता प्राणी? (पुन्हा एकदा
कोणता प्राणी?
(पुन्हा एकदा हसायची सोय केल्याबद्दल तुमच्या मोबाईलला धन्यवाद , सपनाजी!)
स्वाती २ उत्तम प्रतिसाद. पण
स्वाती २
उत्तम प्रतिसाद. पण बहुधा इथे लॉजिकल प्रतिसादाची अपेक्षा नसावी. पालथ्या घड्यावर पाणी आहे> +१११११
सातीजी, तुम्हाला दिलेल्या
सातीजी, तुम्हाला दिलेल्या प्रतिसादात स्मायली आहे असे समजावे.
(यात पण )
स्वाती२ यांची पोस्ट वाचून
स्वाती२ यांची पोस्ट वाचून एनपीआरवर ऐकलेली ही लाइफ स्टोरी आठवली-
http://www.npr.org/2016/09/23/494917455/on-the-road-for-decades-and-not-...
कुठल्याही प्रकारचं वाहन चालवणे ही पुरुषांची मक्तेदारी समजणार्या सर्वांच्याच थोबाडीत मारेल अशी रियल लाइफ स्टोरी आहे.
१. पुरुष सिगरेट पितात ,करा
१. पुरुष सिगरेट पितात ,करा त्यांचे अनुकरण.
>>>
हा पुरुषांचा अपमान नाही का वाटत? सिगारेट पिणे ही गोष्ट पुरुषार्थाशी जोडल्यासारखी वाटतेय.
२. पुरुष जिन्स ,टी शर्ट वापरतात
>>>
अरेच्चा! हे देखील पुरुषार्थाचे लक्षण म्हणूनच आले आहे का
३. पुरुष मोटारसायकल चालवतात ,ती त्यांना जमतेहि .
४. फोरव्हिलर चालवणे हा खास पुरुषी प्रांत.
>>>
ये हुई ना कुछ बात. असे काही तरी सांगा.
फक्त एक शंका आहे, ज्यांना हे जमत नाही त्यांना पुरुष गटातून वगळायचे का?
५. दारु ही खास पुरुषांसाठी बनवलेली गोष्ट आहे
>>>
हा पाचवा आणि शेवटचा मुद्दा वाचल्यानंतर आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला.
तुम्हाला पुरुष नाही तर सलमान खान बोलायचे आहे. बायकांनी त्याची बरोबरी करणे चूकच या आपल्या मताशी सहमत
तुम्ही पुरुषार्थाचे काही चुकीचे नियम बनवलेत पण एकाही पुरुषाने याविरुद्ध आवाज उठवला नाही याचे मात्र अंमळ आश्चर्य वाटते.
पुरुषांमध्ये एकही तृप्ती देसाई नाही का?
{{{ पुरुषांमध्ये एकही तृप्ती
{{{ पुरुषांमध्ये एकही तृप्ती देसाई नाही का? }}}
नाही हो. सगळेच अतृप्त कसाई आहेत.
सगळेच अतृप्त कसाई आहेत>>
सगळेच अतृप्त कसाई आहेत>>
सगळेच अतृप्त कसाई आहेत>> हाहा
सगळेच अतृप्त कसाई आहेत>> हाहा
सगळेच अतृप्त कसाई आहेत>> >>
सगळेच अतृप्त कसाई आहेत>> >>
अतृप्त कसाई
अतृप्त कसाई

प्रतिसाद १०० च्या घरात
प्रतिसाद १०० च्या घरात पोहोचले तरी आता सिंथेटिक जिनिअस आता काय इथे फिरकायचे नाहीत.
सगळेच अतृप्त कसाई आहेत>> >> हाहा
रतिका | 23 November, 2016 -
रतिका | 23 November, 2016 - 06:28 नवीन
प्रतिसाद १०० च्या घरात पोहोचले तरी आता सिंथेटिक
जिनिअस आता काय इथे फिरकायचे नाहीत.>>>>>>> एकजणीने जरी लॉजिकल आर्ग्य्मेंट केले असते तर आवडले असते,कुणीच लॉजिकल लिहीलेले नाही ,वैद्यबुवा सोडून.
अय्या, वैद्यबुवा पुरुष
अय्या, वैद्यबुवा पुरुष म्हणुन त्यांनाच फक्त acknowledge केलं आहे का? आम्ही इकडे डेनिम्स जाळुन, नोकरी सोडुन साड्यांची शॉपिंग करायला आलो. एवढी मी तुमची भक्त होवुन सुद्धा मी इल्लॉजिकलच?
इथे लॉजिकल प्रतिसाद द्यायला
इथे लॉजिकल प्रतिसाद द्यायला हा बीबी मुळात लॉजिकल आहेच कुठे? मागे जेव्हा जेव्हा पालथा घडा क्लब मेंबरांनी असे बीबी काढले आहेत तेव्हा त्यावर लॉजिकल चर्चा करून झाल्या आहेत लोकांच्या. पुन्हा तेच म्हणजे शिळ्या कढीला ऊत.
बायकांनी आता काय काय करायला
बायकांनी आता काय काय करायला पाहीजे याची यादी बनवावी
१. नव-याला धनी , कारभारी ,इकडूनची स्वारी वगैरे म्हणायला सुरुवात करावी,
२. नऊवारी साडी नेसणे, डोईवर पदर घेणे , परपुरूष दिसला की पदर धरघेणे
३. पतीचे व्रत घेणे. पतिव्रता ऑफ द इयर खिताब मिळवणे हा सर्वोच्च सन्मान समजावा
४. सासू - सासरे यांची मनोभावे सेवा करावी.
५. एकत्रित घरात राहणे. सर्वांसाठी रांधा वाढा, उष्टी काढा हे व्रत घ्यावे
६. परपुरूष असतील तिथे नोकरी करणे हे पाप समजावे
७. नव-याने सवत आणलीच तर पिंगा गाण्यावर नृत्य करावे ( ते अलाउड असेल)
८. करमणूक म्हणून श्रावणात झुले झुलणे, भोंडला, मंगळागौर, हळदीकुंकू असे सर्व कार्यक्रम साग्रसंगीत करणे
९. वटपौर्णिमा मनोभावे करावी, सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाला रिक्वेस्ट करावी. (या कार्यक्रमाला जीन्स मधे जाऊ नये हे सांगणे न लगे)
१०. सर्व वयाच्या स्त्रियांनी शिक्षण थांबवावे , सर्टिफिकेट्स परत करावी.
इत्यादी इत्यादी
सगळ्याच बायका सगळ्याच बाबतीत
सगळ्याच बायका सगळ्याच बाबतीत पुरुषांची बरोबरी करत नाहीत.
आजकाल माझ्या बायकोने गाडी चालवणे साफ बंद केले आहे, जिथे जायचे तिथे गाडीने जायचे नि गाडी मीच चालवायची. तसेच कचरा गोळा करून टाकणे असली कामे पुरुषांची समजून ती कधीहि करत नाही!
अतृप्त कसाई
अतृप्त कसाई
बम्प
बम्प
अपने मुंह मिया
अपने मुंह मिया मिट्ठू!!!
Imperial Blue च्या सगळ्या Ads आठवल्या. आता त्याही काही पुरूषद्वेष्ट्या स्त्रियांनी बनवल्यात असं म्हणतील बहुधा.
Men will be men...seriously.
Pages