बायका पुरुषांची बरोबरी का करतात?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 20 November, 2016 - 07:46

बायका पुरुषांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे.जेव्हापासून मला समजायला लागले आहे तेव्हापासून मी आजुबाजुला बघतो की पुरुष ज्या गोष्टी करतात त्या केल्या की बायकांना आपले मेटल सिद्ध् केल्याचा फील येतो.
१. पुरुष सिगरेट पितात ,करा त्यांचे अनुकरण. मग बेफिकीरीत सिगरेट फुकणार्या बायका स्वतःला पुरुषांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा ' लूक ' देत असतात
२. पुरुष जिन्स ,टी शर्ट वापरतात .मग बायकाही त्यांचे अनुकरण करतात.शोभत नसेल तरीही जिन्स टीशर्ट घालून फिरणार्या बायका सर्रास दिसतात.पुरुषाला ऑल डेनिम माचो लुक देते,तसा क्वचीत बायकांना असा लुक कॅरी करता येतो.पण नाही, पुरुष करतात ,तर आम्हीही करणार,हा अट्टाहास कशासाठी?
३. पुरुष मोटारसायकल चालवतात ,ती त्यांना जमतेहि .पण बाजारत गिअरलेस गाड्यांची फौज उभी असताना या बायकांनाहि मोटार सायकल चालवायची असते.भले ही चालवताना फेफे उडाली तरी हरकत नाही. या पुढे जाऊन काही चवळीच्या शेंगा बुलेटही चालवतात ,आमच्यासारखे पामर त्यांच्यापासून जीव वाचवायला अंतर ठेऊनच गाडी चालवतात
४फोरव्हिलर चालवणे हा खास पुरुषी प्रांत.पण घुसघोरी करणार नाही त्या बायका कसल्या.वडील,भाऊ,आणि नवरा यांना बकरा बनवून कारमध्ये शेजारी बसवले जाते,इतर वेळी मल्टीटास्कींग असणार्य बायका मात्र इथे गडबडतात.ॲक्सलेटर दे असे सांगितले की ब्रेक देतात व ब्रेक दाबायला सांगितले की ॲक्सलेटर देतात.आणि वर यांना ऑटोमॅटीक कार नको असते,यांना हवी असते स्टीक शिफ्ट कार.मग चढावर गाडी थांबल्यावर यांना हाफ क्लच द्यायचे सुचत नाही.मग कार मागे जायला लागली की यांना इंजिनचा आवाज कमी व स्वतःच्या ह्रदयाचे ठोके ऐकायला येतात.अरे काय वेडेपणा आहे हा?
५.दारु ही खास पुरुषांसाठी बनवलेली गोष्ट आहे,पण आजकाल बायकांनी त्यात प्राविण्य मिळवले आहे ,इतके की बिअर मागवली की त्यात सोडा टाका ही त्यांची फर्माईश असते.
तर बायकांनो जरुर पुरुषांना कॉपी करा ,त्यात गैर काही नाही. पण ज्या गोष्टी मुदलातच आपल्यासाठी नाहीत त्याचा अट्टाहास धरु नका.कॉपी अशी करा की बघणारा बघत राहीला पाहीजे.पुरुषांचे एकच उदाहरण देतो,पाककला हा बायकांचा प्रांत ,पण पुरुषांनी तिथे असे प्राविण्य मिळवले आहे की बहुतांश जगप्रसिद्ध शेफ हे पुरुष आहेत.उदा.भारतात संजीव कपूर,जागतिक पातळीवर गॉर्डन रॅमसे.

तर बायकांनो ,पुरुषांना कॉपी करणे म्हणजे आपण मॉड् झालो हा कन्सेप्ट मनातून काढून टाका.तुमची स्वतःची अशी exclusive क्षेत्रे तयार करा.पुरुषांना बेंचमार्क ठरवून भलतेच काहीतरी करण्याचा प्रकार सोडून द्या,after all ,men are men .

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nice

अर्र, असं करतात का आजच्या बायका? चूकच आहे, का करतात बरं असं?
अहो जिनियस, हे वाचा बरं. ह्युमन्स ऑफ बॉम्बे मध्ये जस्ट वाचलं फेसबुकवर. आता हे काम खरं पुरुषांचंच. त्यातही बायका बरोबरी नी लुडबुड करायला लागल्या. लोकंही चालवून घेतात म्हणजे कम्मालच झाली बै.

>>“My father was a freedom fighter, and my whole life I’ve wanted to be like him— to make a difference for my country. Even though I’m a certified doctor, my heart always longed to serve the country.
A major event that happened early on in my life was meeting my partner — I found my entire world in one person. What started off as an innocent attraction turned into a lifelong bond — at 18 we knew we wanted to spend the rest of our lives together and our parents didn’t approve so we set out on our own since then.
He knew that I wanted to empower myself and do something for the country so as a stepping stone, he began to train me in martial arts. We would go to work all day and at night train until sunrise…with every passing day I felt more independent and powerful. I wanted to become a commando trainer and I was so determined that I trained harder than ever before.
Once, when my husband and I were in Pune we passed a group of army men who were training in the morning. We approached them, told them who we were and asked them if they would like us to demonstrate our form of training and they agreed. Since then, we haven’t looked back. We began to train army personnel all over the country and I became India’s first woman commander trainer.
As time went by and my commitment to this cause grew, my in-laws disapproved of me, the woman of the house undergoing such intense training and one day asked us to leave their home. My husband and I moved into this small clinic space, which is the only place we had at that but this is something that brought us even closer together. Those were difficult days— I’ve sold a lot of my jewellery to make ends meet but I have absolutely no regrets. I spent most of my youth in freezing high altitudes, scorching hot deserts, dense jungles and hostile LOCs and I loved every minute of it.

So while I am a doctor, I pride myself on the fact that since the past 20 years I have trained without any compensation over 20,000 Indian soldiers from every elite force including the NSG BlackCats, IAF Guards, Indian Navy Marcos, BSF and many more. In fact, after the 26/11 attacks, I was called in to train the police of 16 cities. There have been many lows in my life — on the family front, on the health front — I’ve been injured very fatally multiple times and on the financial front as well…but I didn’t stop. >>

बघा की, आता बिचार्‍या ऋन्म्याला धागे काढण्यात टशन द्यायलासुद्धा बायका यायला लागल्या. असं का करत असतील? Uhoh

Wah wah!! Yala ch purogami addekar mhantat ka? Mala tar kattekar id ch vatla aadhi.
Same ch philosophy distey.

अमुक एक गोष्ट पुरुषी आणि अमुक एक गोष्ट बायकी असं काही नसतं ओ! तुम्हाला साडी नेसायची असेल तर खुशाल नेसा की! मुली, बायका साडी आणि जीन्स दोन्ही मस्त मिरवू शकतात म्हणून किती तो पोटशूळ Light 1

पॉपकॉर्नचा अक्खा पुडा आणा कोणीतरी प्लिज >>>>> माह्याकडं चुरमुर्‍याचा चिवडा हाये, तो चालल का?:दिवा: शेंगदाणे बी बक्कळ वतलेत माह्या जावेने. लय शेंगा खाती ती.:फिदी:

कुठलीहि गोष्ट बायकांची किंवा पुरूषांची मक्तेदारी असू नये . एखादि व्यक्ति स्त्री म्हणून जन्माला आली म्हणजे तीने अमुक एक गोष्ट करूच नये किंवा हेच करावे असे काहि नसते . हेच पुरूषांच्या बाबतीतही .... लेख समाजातील संकुचित विचारांचे प्रतिनिधित्व करणारा वाटला .

लेख समाजातील संकुचित विचारांचे
प्रतिनिधित्व करणारा वाटला>>>>>> संकुचीत वगैरे काही नाही हो, बायकांनी पुरुषांना का बेंचमार्क ठरवले आहे हा माझा मुद्दा आहे .

तुम्हीही त्यांची बरोबरी करा.
साडी नेसा पंजाबी ड्रेस स्कर्ट ए लाईन ड्रेस घाला.
जास्त टशन दाखवायची असेल तर सासुरवाडीला रहायला जा. नोकरी करता करता सासू सासरे मेव्हण्याशी जुळवून घेत घेत स्वैपाक पाणी मुले सांभाळणे इतर घरकाम करा.
अडनाव नाव बदलून बायकोचे लावा. तिच्या नावचे कुंकू मंगळसूत्र वगैरे घाला.
अगदी नाकावर टिच्चून तुम्हीही त्याची बरोबरी करा.
अरे हाय काय अन नाय काय!

सगळं मुसळ केरात घालू नका. धीर धरा. जमाना नक्की बदलेल. पुढील १०० वर्षांत पुरूष मुलांना जन्म देण्यासाठी बायकांशी स्पर्धा करतील, बाळंतपणाची पगारी रजा एंजॉय करतील, ब्रेस्ट फीडिंग चांगले की फॉर्म्युला दूध - यांवर अटीतटीने चर्चा करतील. पुरूषांच्या मेनापॉझविषयी भरभरून बोलतील. घरी, दारी, हापिसात, सोशल साईट्सवर आणि मित्रमंडळींत नव्या रेसिप्या, बालसंगोपन, गृहव्यवस्थापन, मुलांचे आजार, घराची स्वच्छता यावर भरभरून विचार मांडतील. झालेच तर घरातील आजारी, वृध्दांची सेवा करण्यासाठी कार्यालयातून बिनपगारी रजा / स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्ण वेळ त्यांच्या सेवेत घालवतील.
.
.
.
.
मग अशा धाग्यांची व चर्चांची गरजच भासणार नाही. तुम्ही फक्त पुढची १०० वर्षे धीर धरा!

तुम्हीही त्यांची बरोबरी करा.>>>>>> हे आर्ग्युमेंट नाही होत
हो ,आर्ग्युमेंट कसे करायचे ते ही आता पुरुषांनी शिकवायचे का?

जिनियस, हा धागा वेळेवर काढल्याबद्दल आभार. इकडे थॅन्क्सगिव्हिंगची सुट्टी येते आहे. त्यावेळी वेळ जात नसेल तर इथे टाईमपास करायला मजा येईल, जरी घिसापिटा विषय असला तरी.

मस्तं धागा हो सिंजी.
सारखं मेलं त्या मोदीकाकांना नावं ठेवून ठेवून कंटाळा आला होता.
आता जरा बायका पुरुषांना हवी तेवढी नावे ठेवता येतील.

किती जेलस व्हाल हो...कळलं की तुमच्या पोटात दुखतय..:)
बायका पुरूषांची बरोबरी करतात हे कुणी सांगितलं तुम्हाला? बायका तुमच्या पेक्षा जास्त कर्तबगार होत्या, आहेत आणी राहतील..:)

१. पुरूषांनी काखा-बगला व अंगावरील नको असलेले केस लेझर ट्रीटमेंटने कायमचे काढावेत की नाहीत?
२. कोणत्या प्रकारचे कपडे पुरूषांनी घातले की शरीर सौष्ठवपूर्ण व कमनीय दिसते? शरीराचे भाग झाकणे सुसंस्कृत व सभ्य पुरूषाचे लक्षण आहे का? पुरूषांनी घातलेले तंग कपडे किती तंग असावेत, कमरेखाली घसरणारे व पोटाचे वर सरकरणारे कपडे किती इंच खाली घसरावेत / वर सरकावेत?
३.सार्वजनिक ठिकाणी वारंवार गुप्तांगाजवळपास हात नेण्याची वा तेथील कपडे अॅडजस्ट करायची / खाजवायची भारतातील भारतीय पुरूषांची सवय कितपत अनुकरणीय / सभ्य / स्वागतार्ह आहे? काही उपाययोजना?
४. रस्त्यावर तोंडात जर्दा पानतोबरा / गुटखा तंबाखू ठेवून पचापच थुंकणारे महान आत्मे असतात त्यांचे हे फॅशन स्टेटमेंट सभ्य पुरूषांनी आत्मसात करावे का?

.
.
.
.
.
.
.
.
पुढील धाग्यांसाठी विषय सुचवलेत.

धाग्याकर्त्याने मांडलेल्या मुद्याशी सहमत,
आणि याच कारणामुळे मला कधी कधी या बायकांचा हेवा वाटतो.
जे पुरुष करतात, जे पुरुषी म्हणून ओळखले जाते, ते या बायका बिनधास्त करू शकतात.
पण जे या बायका करतात, जे बायकी म्हणून ओळखले जाते, ते पुरुषांनी केले तर गहजब होतो. त्यांना नको नको त्या नावाने चिडवले जाते. आणि या चिडवण्यात बायकांपेक्षा आपली पुरुषजातच आघाडीवर असते Sad
म्हणूनच म्हणावेसे वाटते,
व्हाई शूड ‘गर्ल्स’ हॅव ऑल द फऽऽन !! ---- धाग्याची जाहीरात - http://www.maayboli.com/node/52681

दारू आणि सिगरेट च्ं म्हणाल तर ती प्यायची कि नाही हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मला त्याचा अनुभव नाही पण तुमचा गाडी चालवण्याचा मुद्दा काही पटला नाही . आमच्याकडे स्प्लेंडर आहे. मी तिच वापरते कॅालेजला जाण्यासाठी . यात मुलं चालवतात मग मी पण चालवणार असा हट्ट नाही . पप्पा स्प्लेंडर वापरायचे मग घरचीच गाडी आहे म्हटल्यावर मी पण तीच गाडी शिकले . त्यामुळे घरची गाडी येत असताना फक्त मी मुलगी आहे म्हणून ती चालवायची नाही हे काहि मम्मी पप्पांना पटले नाही व त्यांनी तु हिच गाडी घेऊन जा कॅालेजला असे सांगितले. मी चांगली गाडी चालवू शकते अगदि गावी गेल्यावर कुठल्या वयस्कर आजी आजोबांना कुठे सोडायचे असेल तर ते विश्वासाने माझ्या गाडीवर बसतात . मुलगी आहे हिला गाडी नीट येत असेल का असा विचार ते करत नाहीत . मी भावासोबत गावी जाते तेव्हा तो आधिच ५०-६० कि मी लांबून आलेला असतो मग त्याला विश्रांति म्हणून पुढचे ५७ कि मी अंतर म गाडी चालवत . यात कुठेही मी कशी मुलांसारखी गाडी चालवू शकते हा अट्टाहास नाही . गाडी चालवणे हे स्किल आहे ..... कधी गरज पडेल काही सांगता येत नाही . एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी स्कूटी उपलब्ध नसेल तर ऐन वेळी मला बाईक चालवायला नाही येत म्हणून वाईट वाटून घेण्यापेक्षा बाईक असो किंवा फोर व्हिलर जर शिकण्याची संधी असेल तर शिकावी , मुलगा असो किंवा मुलगी. यात कुठेही मुलांना बेंच मार्क मानण्याचा प्रश्नच येत नाही .

माझ्या वरील मतावरून कुणाला असं ही वाटेल की ही स्वत:चं कशाला सांगत बसली.... तर सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की स्त्रियां सगळ्या गोष्टी बरोबरी करण्यासाठीच करतात असं काही नसतं आणि गाडी चालवणे हा पुरूषांच प्रांत नाही हे मी स्वत:च्या अनुभवावरून म्हणू शकते इतकचं

हे लिखाण संस्कृती मधे? विनोदी लेखनमधे हवं ना? कोणाची संस्कृती? स्वतःच्या गळ्याला चिमटा काढून सांगा तुम्हाला शप्पत असं खरोखरचं वाटतं?
नसेल तर विनोदी लेखनात हलवा.
असेल तर - नमस्कार. पाय कुठे आहेत तुमचे?

आँ!!

अतिशय विनोदी लिहीलय.. जाम हसले..

मुद्दा क्र. 2 नुसार सगळ्या पुरूषांना जीन्स टीशर्ट शोभते.. अय्या ऐतेन..

आणि खरंच दारू बिडी पुरूषांच्याच शरीराचा बिघाड करायलाच बनलीयेत.. कशाला बरोबरी करायची..? इतकी प्या किनई की बास.. बायका बघतच राह्यल्या पाहिजेत .. तुमची अशा क्षेत्रातली कर्तबगारी वाचायला आवडेल..

मूळात भारतीय पुरुष पाश्चात्य पुरूषांची बरोबरी करू पहातात यावर धागा काढा बघू आधी!!
पुरुष जिन्स ,टी शर्ट वापरतात .>> हे मूळात पाश्चात्य पुरुष वापर्त होते. भारतीय पुरुषांनी धोतर, लुंगी सोडून पाश्चात्यांची बरोबरी करायला जीन्स, पँट्स व टी शर्ट घालू लागले.

बाकी
पुरुष सिगरेट पितात, फोरव्हिलर चालवणे हा खास पुरुषी प्रांत >> हे वरून विधात्याकडून लिहून आणले असते का पुरुषांनी?
सिंथेटिक जिनियस कसले अस्सल मूर्ख दिसताय तुम्ही...उगीच पॉपकॉर्न धागे काढता...कामं करा जरा विधायक!

Pages