बायका पुरुषांची बरोबरी का करतात?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 20 November, 2016 - 07:46

बायका पुरुषांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे.जेव्हापासून मला समजायला लागले आहे तेव्हापासून मी आजुबाजुला बघतो की पुरुष ज्या गोष्टी करतात त्या केल्या की बायकांना आपले मेटल सिद्ध् केल्याचा फील येतो.
१. पुरुष सिगरेट पितात ,करा त्यांचे अनुकरण. मग बेफिकीरीत सिगरेट फुकणार्या बायका स्वतःला पुरुषांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा ' लूक ' देत असतात
२. पुरुष जिन्स ,टी शर्ट वापरतात .मग बायकाही त्यांचे अनुकरण करतात.शोभत नसेल तरीही जिन्स टीशर्ट घालून फिरणार्या बायका सर्रास दिसतात.पुरुषाला ऑल डेनिम माचो लुक देते,तसा क्वचीत बायकांना असा लुक कॅरी करता येतो.पण नाही, पुरुष करतात ,तर आम्हीही करणार,हा अट्टाहास कशासाठी?
३. पुरुष मोटारसायकल चालवतात ,ती त्यांना जमतेहि .पण बाजारत गिअरलेस गाड्यांची फौज उभी असताना या बायकांनाहि मोटार सायकल चालवायची असते.भले ही चालवताना फेफे उडाली तरी हरकत नाही. या पुढे जाऊन काही चवळीच्या शेंगा बुलेटही चालवतात ,आमच्यासारखे पामर त्यांच्यापासून जीव वाचवायला अंतर ठेऊनच गाडी चालवतात
४फोरव्हिलर चालवणे हा खास पुरुषी प्रांत.पण घुसघोरी करणार नाही त्या बायका कसल्या.वडील,भाऊ,आणि नवरा यांना बकरा बनवून कारमध्ये शेजारी बसवले जाते,इतर वेळी मल्टीटास्कींग असणार्य बायका मात्र इथे गडबडतात.ॲक्सलेटर दे असे सांगितले की ब्रेक देतात व ब्रेक दाबायला सांगितले की ॲक्सलेटर देतात.आणि वर यांना ऑटोमॅटीक कार नको असते,यांना हवी असते स्टीक शिफ्ट कार.मग चढावर गाडी थांबल्यावर यांना हाफ क्लच द्यायचे सुचत नाही.मग कार मागे जायला लागली की यांना इंजिनचा आवाज कमी व स्वतःच्या ह्रदयाचे ठोके ऐकायला येतात.अरे काय वेडेपणा आहे हा?
५.दारु ही खास पुरुषांसाठी बनवलेली गोष्ट आहे,पण आजकाल बायकांनी त्यात प्राविण्य मिळवले आहे ,इतके की बिअर मागवली की त्यात सोडा टाका ही त्यांची फर्माईश असते.
तर बायकांनो जरुर पुरुषांना कॉपी करा ,त्यात गैर काही नाही. पण ज्या गोष्टी मुदलातच आपल्यासाठी नाहीत त्याचा अट्टाहास धरु नका.कॉपी अशी करा की बघणारा बघत राहीला पाहीजे.पुरुषांचे एकच उदाहरण देतो,पाककला हा बायकांचा प्रांत ,पण पुरुषांनी तिथे असे प्राविण्य मिळवले आहे की बहुतांश जगप्रसिद्ध शेफ हे पुरुष आहेत.उदा.भारतात संजीव कपूर,जागतिक पातळीवर गॉर्डन रॅमसे.

तर बायकांनो ,पुरुषांना कॉपी करणे म्हणजे आपण मॉड् झालो हा कन्सेप्ट मनातून काढून टाका.तुमची स्वतःची अशी exclusive क्षेत्रे तयार करा.पुरुषांना बेंचमार्क ठरवून भलतेच काहीतरी करण्याचा प्रकार सोडून द्या,after all ,men are men .

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळात भारतीय पुरुष पाश्चात्य पुरूषांची बरोबरी करू पहातात यावर धागा काढा बघू आधी!!>>>>>

असा धागा अस्मादिकांनी १० तासांपूर्वीच काढला आहे.

लाभ घ्यावा Happy

http://www.maayboli.com/node/60885

मूळात भारतीय पुरुष पाश्चात्य पुरूषांची बरोबरी करू पहातात>>>>>>>पुरुषांनी एकमेकांना केलेली ती मदत आहे,चार बायका एकत्र आल्या की एकमेकींशीच स्पर्धा करतात,कुचाळक्या करतात .तसे पुरुषांचे नसते .

नेहेमीचे जातीभेद्/ब्राह्मणद्वेष्टेपणा/हिंदुत्वद्वेष्टेपणा हे विषय संपले का ?
की काय म्हणून स्त्रीपुरुष अशा भेदभावाला खतपाणी घालायला सुरुवात केलीये?
असो... चालुद्यात...

की काय म्हणून स्त्रीपुरुष अशा भेदभावाला खतपाणी
घालायला सुरुवात केलीये?>>>>>>अरे लिंबुजी लेख वाचला का ,स्त्रीयांनी पुरुषांना बेंचमार्क का ठरवले आहे ,त्यावर चर्चेसाठी हा धागा काढला आहे.इथे कुठेही भेदभाव अपेक्षीत नाही.

छान लिहिलंय.
सारखं पैसे, नोटा, बँका, एटीएम, मोदी, सरकार, २००-५००-१०० वाचुन ऐकुन कंटाळा आलेला. आता एन्टरटेन्मेन्ट आहे ह्या धाग्यावर थोडावेळतरी.

>>> स्त्रीयांनी पुरुषांना बेंचमार्क का ठरवले आहे ,त्यावर चर्चेसाठी हा धागा काढला आहे <<< Lol
हे गृहितक कशावरुन मांडले? स्त्रीया जीन्स्/प्यान्टी घालतात /घालू लागल्या म्हणून?
हाच आधार घ्यायचा तर, मुळात "लज्जा रक्षणाकरता" स्त्रीयांनीच "कपडे वापरायला सुरुवात केली" व पुरुषांनी त्याची नक्कल (तुमच्या शब्दात पुरुषांनी स्त्रीयांना बेंचमार्क ठरवले) सुरु केली असेही म्हणता येईल... Proud
कारण गेल्या शतकापर्यंत आमच्या कोकणातील पुरुष केवळ "लंगोटीवर" वावरायचे हो... Wink जेव्हा की गेली काही शतके स्त्रीया दोनचार हात लांब मोठ्ठे वस्त्र (मग त्याला नौवारी म्हणा वा अजुन काहि) वापरत आहेत...
मग आता तुम्हीच सांगा, वस्त्रप्रावरणे/लज्जारक्षण इत्यादी बाबतीत कोण कुणाचा बेंचमार्क घेतलाय ? Biggrin

या गोष्टींवर डोकेफोड करण्यापेक्षा आॅफिसात मन लावुन काम करा ४ पैसे जास्त कमवाल. तुमच्या घरातील बायकांची कीव येतेय. काय काय सहन करत असतील बिचार्या तुमच्या राज्यात. अर्थात घरात तितका भाव मिळत असेल तर

लेखकाचा मागचा धागा ही असाच होता...मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय????....एकंदर विचारसरणी बघुन मलाही कीव कराविशी वाट्ली

,'बायका पुरुषांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे.जेव्हापासून मला समजायला लागले आहे '

या पाहिल्या वाक्यापासूनच विनोद निर्माण झालाय ...आणी तुमच्या सो कॉल्ड समजे बद्दल प्रश्न ही पडलाय..

एनी वे... या इमॅजिनरी विषयावर परत कमेंट करण्या करता,किमती वेळ वाया घालवण्याची इच्छा नाहीये

तर हेमाशेपो!!!!

फोरव्हिलर चालवणे हा खास पुरुषी प्रांत.>> ? ???
सगळ्याचा मुद्द्यांना ???? नानबा +१११११
. मुद्दामून उचकवण्याकरता धागा . टाईम पास म्हणून
चिक्कार चर्चा झालेय या आधी . सोनू खरंच पाय दिसावेत त्यांचे Lol

जर बायका पुरूषांसारखे कपडे (शर्ट, टी शर्ट, पॅन्ट, हाफ पॅन्ट, बर्मुडा, इ. इ.) वापरतात,
तर पुरूषांनी बायकांसारखे कपडे सर्रास वापरणे तर जाऊद्यात, पण कल्पना पण "भयंकर" समजली जाते, असे का ? केवळ बालगंधर्व अपवाद होते असे दिसते.

{{{ फोरव्हिलर चालवणे हा खास पुरुषी प्रांत.पण घुसघोरी करणार नाही त्या बायका कसल्या. }}}

ह्याविषयी तुमचा काही खास संशोधनात्मक अभ्यास व त्या अनुषंगाने विदा पुरावे आहेत का? कारण मी एका दिवाळी अंकात वाचलेल्या लेखानुसार जगात पहिली फोरव्हिलर ऑटोमोबाईल बनविली एका पुरुषाने पण ती प्रथम चालविण्याची नोंद त्याच्या पत्नीच्याच नावावर आहे.

त्याचे झाले असे की, त्या पुरुषाने मेहनत घेऊन ती गाडी बनविली खरी पण तिची ट्रायल घेण्याआधीच त्याला अचानक बाहेरगावी जावे लागले. मग त्याच्या पत्नीने मुलांना सोबतीला घेत ती फोरव्हिलर रस्त्यावर आणली आणि काही अंतर प्रवास केला. मध्ये प्रवासात कशा अडचणी आल्या आणि लोक त्यांच्या गाडीला घाबरुन रस्त्यात कसे सैरावैरा पळत होते असा काहीसा तो वर्णनात्मक लेख होता. पु. ल. देशपांडे तर कधीच फोरव्हीलर चालवायचे नाहीत इतकी त्यांना भीती होती. सुनीताबाईच नेहमी सफाईदारपणे कार चालवित त्यांचे सारथ्य करायच्या. एकदा त्या नेहमीप्रमाणे कार चालवित होत्या आणि शेजारी पु.ल. निर्धास्तपणे बसले होते. रस्त्यात दोन मुले खेळत होते. एकजण दुसर्‍याला घाबरुन म्हणाला, "बायको कार चालवितीय." दुसरा त्याला धीर देत म्हणाला, "घाबरु नकोस, शेजारी बाप्या बसलाय तो तिच्यावर लक्ष ठेवील." ज्या भाईने कधी जन्मात स्टीअरिंग हातात धरले नाही तो माझ्या कार चालविण्यावर लक्ष ठेवील या आशेवर तो मुलगा निर्धास्त झाला या गोष्टीचा सुनीताबाईंना फारच राग आला हे त्यांनी आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे.

याशिवाय पहिला कॉम्प्युटर पुरुषाने बनविला असला तरी त्याची पहिली ऑपरेटींग सिस्टीम बनविली एका स्त्रीनेच असेही मी वाचले आहे.

स्वयंपाक / कपडे धूणे / केशकर्तन हे नेमके कुणाचे प्रांत? तसे पाहिले तर पूर्वीपासून घरातला स्वयंपाक स्त्रियाच करतात परंतु व्यावसायिक तत्त्वावर आचारी / कूक / शेफ हे प्रांत पुरुषांचेच का? अगदी भीम देखील बल्लव होताच की. तसेच घरी कपडे धुण्याचे काम स्त्रिया करतात पण बाहेर लॉंड्री पुरुष चालवतात. रामायणातही धोबी (परीट / रजक) आहेच. बांधकामावरही कित्येक महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. लोहारकाम तुलनेने अवजड उद्योग पण त्यातही साधी माणसं चित्रपटात जयश्री गडकर यांनी ऐरणीच्या देवा तुला या गाण्यात लोहाराचा भाता चालविलेला दिसतो. बस, टॅक्सी व ट्रक ड्रायव्हर म्हणून आणि बस कंडक्टर म्हणूनही अनेक महिला दिसत आहेत.

काही ठराविक कामे मात्र पुरुषच करतात असे दिसते. जसे की, सकाळचा पेपर टाकणे, वायरिंग फिटींग, वेल्डींग, स्टेशनवरील हमाली काम इत्यादी कष्टाची कामे. सोन्याचे दागिने घडविण्याची कौशल्याची कामे इत्यादी. अर्थात मोबाईल रिपेअरींग सारखे किचकट काम तेही अतिशय सहजतेने आणि कमी वेळात करतानाही मी एका महिलेला पाहिले आहे, कदाचित ती अपवाद असावी.

शिक्षकी पेशा हा कुणाचा प्रांत? शाळा / कॉलेजांत पूर्वी मास्तर / बाई असायचे आताही असतात. पण आता अगदी लहान मुलांना (नर्सरी वगैरे) मास्तर चालत नाहीत. मॅडमच हव्या असतात.

तेव्हा कुणी कुणाच्या प्रांतात घुसखोरी करत आहेत असे दिसत नाही.

कुणि कुणाच्या प्रांतात घुसखोरी करत नाहीत,

उग्गाच काहीतरी जुनाट कल्पना डोक्यात भरून घ्यायच्या नि बायकांनी हे करायचे, नि पुरुषांनी हे, असले खुळचट समज. ज्याला जे करावेसे वाटते, जमते ते तो/ती करतात.

अहो पूर्वी बायकांनी शाळेत जाऊन किंवा घरी शिक्षण घेणे हे सुद्धा गैर मानले जाई. पण स्त्रियांना पण ज्ञानाची गोडी असते, त्या शिकू शकतात, त्यांना जमते, त्या करतात, त्यात कुणि कुणाची बरोबरी करत नाहीत.

तर हे असले खुळचट विषय काढू नका.

तर बायकांनो ,पुरुषांना कॉपी करणे म्हणजे आपण मॉड् झालो हा कन्सेप्ट मनातून काढून टाका.तुमची स्वतःची अशी exclusive क्षेत्रे तयार करा.पुरुषांना बेंचमार्क ठरवून भलतेच काहीतरी करण्याचा प्रकार सोडून द्या,after all ,men are men .>>>>>>> खुपच शॉर्ट साईटेड विचार आहे. तुम्हीच नाही पण बरेच पुरुष हा समज डोक्यात बाळगून असतात.
तुम्ही जर थोडं आणखिन खोलवर विचार केला, तर तुमच्या लक्षत येइल का बायकांनी हेच का करावं किंवा तेच का करावं, ह्याचं मूळ हे पुरुषांशी बरोबरी नसून "त्यांना जे हवं ते करण्याचं स्वातंत्र्य" ह्यात आहे. काही स्त्रिया किंवा मुली मुद्दाम तसं करत असतील ( त्या तसं का करत असतील,तो वेगळा विषय आहे थोडा) पण सगळ्याच स्त्रिया आजिबात फक्त पुरुषांशी बरोबरी करायला म्हणून काही करत नाही. स्त्रिया जेव्हा जीन्स, ट्राऊजर्स घालतात किंवा गाड्या चालवतात तेव्हा त्या बरोबरी करायला बघतात हा बर्‍याच पुरुषांच्या इम्मचुअर विचारसरणीचं उदाहरण आहे.
सरवात आधी म्हणजे तुम्ही ज्या काही गोष्टी वर दिल्यात त्या काही पुरुषांची मक्तेदारी नाहीयेत. आपल्या समाजाची डेवलपमेंट जशी झाली त्या हिशोबानी मला वाटतं कन्विनियन्सच्या दृष्टिनी पुरुष पँटसदृश वस्त्र घालायला लागले. मला इतकी हिस्ट्री माहित नाही पण कॉमन सेन्स नी वाटतं की आउट्डोअर्स (घराबाहेर) जास्त असणार्‍या व्यक्ती करता, चालायला, धावायला सोयिस्कर पडेल असं वस्त्र म्हणून पँट तयार केली गेली.
आपल्याकडे तरे भारतात पुष्कळ उशिरा आली पँट आणि त्या आधी मला वाटतं नववारी साडी आणि धोतर ह्याचा फॉरमॅट अगदी सारखाच होता की? इथे युरोप मध्ये वगैरे सुद्धा पँट ही पुरुषांची मक्तेदारी नव्हती, आउटडोअर (शिकारीला वगैरे) जाणार्‍या बायकांच्या अंगात पँटच असायची.
हे ह्या करता लिहिलं कारण तुम्हाला पँट म्हणजे पुरुष आणि साडी म्हणजे बाई असं समिकरण नाहीये हे सांगण्याकरता.
आता तुम्ही पॅण्ट, जीन्स, गाड्या चालवणं अशी कुठलीही उदाहरणांबाबत परत जरा फेरविचार केला तर तुमच्या लक्षत येइल की इट्स ऑल अबाउट व्हॉट दे वाँट. ह्यात परत दोन मुद्दे आहेत. कन्विनियन्सच्या दृष्टीनी जर त्यांना जीन्स वगैरे सोयिस्कर वाट्त असेल तर त्या घालत असणार आणि दुसरं म्हणजे कनविनियन्स पेक्षाही जर त्यांना जीन्स घालायला आवडत असेल तर तो फक्त त्यांचा प्रश्न आहे. थोडक्यात, बरोबरी करायची ह्या एकमेव कारणाकरता नाही तर इतर काही कारणांकरता त्यांना जीन्स घालावाशी वाटू शकते हे पुरुषांनी लक्षात घ्यायला पाहिजे.
हे खरं खुपच बेसिक मध्ये गेल्या सारखं झालं पण अजूनही भारतात अशी विचारसरणी असलेले पुरुष लिलया भेटतात म्हणून खरं हा प्रपंच केला.

आणि वर तो काही स्त्रिया जीन्स घालून, गाड्या चालवून बरोबरी करायला का बघतात त्या मुद्द्याबद्दल थोडं. एखाद्या बाबतीत बरोबरी करावीशी का वाटते? बेसिकली त्या माणसाकडे जर एखादी गोष्टी असेल आणि आपल्याकडे ती नसेल तर माणूस बरोबरी करायला बघतो.
जीन्स घालणे, गाड्या चालवणे (फॉर डॅट मॅटर पेट्रोल भरणे Lol ) ह्या खरं अत्यंत साध्या गोष्टी आहेत पण जेणेकरुन ह्या साध्या गोष्टी करण्यात सुद्धा स्त्रियांना मज्जाव केला जातो, त्यांना जज केलं जातं ह्या कारणाकरता त्यांना जर बरोबरी करावीशी वाटली तर नवल नाहीच. ही खरं फार दुर्दैवी बाब आहे पण वस्तुस्थिती हीच आहे.

युरोपिअन बायकांचे पोषाख
http://glamourdaze.com/history-of-womens-fashion

भारतात ब्रिटीश होते. त्या बायका सर्रास पँट शर्ट असा पोषाख करत होत्या असं चित्रं नाहीये. ट्राऊझर हा बायकांचा पोषाख कधीच नव्हता. १९१९ साली एका महिलेने बंड म्हणून पब्लिक प्लेस मधे पहिल्यांदा पँट नेसली. स्त्रियांच्या पोषाखात दुस-या महायुद्धानंतर जी उलथापालथ झाली त्यामुळे बदल झाला.

१९९३ पर्यंत अमेरिकन सिनेटमधेही बायकांना ट्राऊझर वापरायची परवानगी नव्हती. अगदी २०१२ पर्यंत काही ठिकाणी परवानग्या नव्हत्या. निषेध आंदोलनानंतर त्या मिळाल्या. विकीवर आहे हे सारं

https://en.wikipedia.org/wiki/Women_and_trousers

बरोबर आहे. सर्रास नाही घालायच्या पण घालाय्च्या. आउट्डोअर्स हा अंदाज बरोबर होता आणि टु बि मोअर स्पेसिफिक घोड्यांवर नीट बसता यावं म्हणून पँट बनवली गेली.

https://www.google.com/amp/amp.livescience.com/34077-wearing-pants-horse...

http://www.stuffmomnevertoldyou.com/blogs/when-did-women-begin-wearing-p...

पुरुष बायकांच्या तुलनेत अर्थातच जास्त बाहेर पडायचे त्यामुळे पुरुषांचा मेजर पोशाख झाला तो. शेवटी मुद्दे कन्विनियन्स्/सोय आणि स्वातंत्र्य हे आहेत.

पाककला हा बायकांचा प्रांत ,पण पुरुषांनी तिथे असे प्राविण्य मिळवले आहे की बहुतांश जगप्रसिद्ध शेफ हे पुरुष आहेत.उदा.भारतात संजीव कपूर,जागतिक पातळीवर गॉर्डन रॅमसे. >>
उगाच कैतरी लिहू नका . जिथे स्वैपाक करण्यासाठी पैसे मिळतात तिथल्या स्वैपाकघरात पुरुष जास्त दिसतात.
बिनपगारी कामं मात्र बायकांच्या गळ्यात.

जागतिक पातळीबर अनेक प्रसिद्ध स्त्री शेफ आहेत. तुम्हाला फक्त गॉर्डन रॅ म्से आठवला ही तुमची लिमिट आहे.

मार्था स्टुअर्ट, जुलिया चअ‍ॅलिस, अ‍ॅलिस वॉटर्स, नाय्जेला वगैरे गूगल करुन पहा.

टू व्हीलर अ‍ॅक्सिडेंट बद्द्ल ही आकडेवारी पण पुरेशी बोलकी आहे . खरोखर बरोबरी करणे हाच उद्देश असता तर रेकलेस, रॅश ड्रायव्हिंग मधे सुद्धा बरोबरी केली असती ना.

Introduction

The alarming increase in mortality and morbidity owing to road traffic accidents has been a matter of great concern globally. This study was undertaken to find the trend of two wheeler accidents over the five years (2000–2004) with respect to age and sex of the victim, type of injury sustained, type of vehicle involved and time distribution of accidents.

Methods

Data was retrospectively collected from the records at the Regional Transport Authority’s office, office of superintendent of police and also from both the Traffic police stations of the Mangalore city. Results were tabulated and the analysis was done using SPSS version 10. Test of significance was applied and p value <0.05 was taken to be significant.

Results

A total of 1231 two wheeler accidents were recorded during 2000–2004. Majority (77%) of the victims were in the age group 18–44 years. Accident rate among males (83%) was higher than that among females (17%). Five percent of the victims (n = 75) succumbed to injuries, of whom 45 died on the spot. Geared vehicles (81%) were more commonly involved than those without gears. Highest number of accidents was seen during 6–10 pm.

Conclusion

There is considerable morbidity and mortality due to two wheeler road traffic accidents. Among the fatalities majority died at the spot. Hence first aid measures at the spot would be of great help. It is recommended to have a good support system and para medical training for the people manning the ambulance. Awareness should be created among general public. Besides, every road traffic injury case has medicolegal elements involved. In India, as per law, every road traffic injury case is registered as a medicolegal case and investigated for prosecution concerns and compensation needs.

http://www.sciencedirect.com/science/article/pii/S1752928X08001698

खरं तर स्त्री ने मुलं जन्माला घालणंच बंद करायला हवं म्हणजे असली थर्ड ग्रेड विचारसरणीचे लोक ( पुरुष ) जन्मालाच येणार नाहीत... कसॅ ??.......

मुद्दम भडकाऊ धागा. प्रतिक्रिया देणार्‍या लोकांना शुभेच्छा!!

Pages