मला सदाशिव पेठ बघायचीय !

Submitted by हेमन्त् on 30 June, 2015 - 15:48

अनेकदा पुण्यात जावून सुद्धा या महान ऐ तिहासिक आणि सांन्स्कृतिक स्थळाचे दर्शन केले नाही … तरी ते करण्याचा इरादा आहे.
माझे काही मित्र ( जुने मुंबईकर आता पुणेकर ) हे ऐकताच थर थर कपू लागले .
" अरे X%^&(* झालास कि काय ? चाल घरी ये बिअर पिलावतो . असे हि म्हणाले ( ते चहाच नाही तर मद्य देतायत - म्हणजेच हे मुल पुणेकर नाहीत हे कळले आसेल्च.
तरी माझी विनंती खालील गोष्टी / सल्ला / सेवा मिळतील काय?

१) नकाशा - अचूक नकाशा मिळेल काय ? कारण इथे कोणीही पत्ता विचारले कि अपमान करतात !
२) गेंड्याच्या कातडीचा शर्ट - अपमान पचवायला !
३) मी ४-५ पाण्याच्या बाटल्या नेत आहे - पुरतील कां ? इथे कोणिही पाणी विचारात नाही .

अजून काही गोष्टी मला नेण्यास सांगितले

१) तंबू
२) चक मक
३) हत्यारे
४) सरपण
५) तलवारी
६) दोर
७) होकायंत्र
८) barometer

जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जो मनुष्य गरीबांचा अमिताभ उर्फ मिथुनचे आणि गरीबांच्या मिथुनचे उर्फ गोविंदाचे सिनेमे बघू शकतो त्याला असे धागे काहीच वाटणार नाहीत. इरीटेशन स्वाहा ही सिद्धी प्राप्त होते. टॉलरन्स लेव्हल वाढते. त्यामुळे असे धागे वाचण्याआधी आपण मिथुनचे सिनेमे पाहीलेत का हा प्रश्न मनाला विचारावा.

पुण्यात अनपेक्षित उत्तरे मिळतात कारण त्यांना प्रश्न समजत नाही किंवा ते त्यांच्या एकांगी पद्धतीने विचार करत असतात. ही उत्तरे ऐकायची सवय झाली की दुर्लक्ष करणे सोपे जाते. इरीटेशन स्वाहा ही सिद्धी प्राप्त होते. टॉलरन्स लेव्हल वाढते. - Submitted by पारंबीचा आत्मा .

ठराविक पेठांच्या रहिवाशांना लागू आहे पण त्याबाहेर मात्र तसा अनुभव कमी येतो. मागे एकदा पुणेरी पुणेकर मालिका दुदरदर्शनवर होती . परिस्थिती एवढी दाहक दाखवली होती की ती मालिका बंद करण्यात आली.

पुण्यात अनपेक्षित उत्तरे मिळतात >> पुण्यात उत्तरे मिळतात? (ह घ्या). मागे एकदा सवाई गंधर्व महोत्सवात गेलो होतो पुण्यात. तिथे अनपेक्षित अत्तरे मिळाली होती. प्रत्येक रागासाठी विशिष्ट अत्तरे होती. ते काही मला कळलं नाही, पण वास छान होता.

बाकी सध्या पुणेच काय, कुठल्याही शहराबद्दल असं सामान्यीकरण करता येणार नाही. सर्व प्रकारचे स्वभाव, भाषा तिथे पहायला मिळतात. जेव्हा जागतिकीकरण नव्हतं त्या काळापर्यंत कदाचित शहरांची स्वभाववैशिष्ट्यं टिकून असावीत. आता असं काही राहिलेलं नाही.

"अमुक लॉन्ड्री कुठंय?"
"तिकडे कशाला जाता? तमुकमध्ये जा. मी त्या़च्याकडेच कपडे टाकतो."
"मला जवळचा पत्ता हवाय म्हणून विचारलं."

"तुमच्याकडे अमुक होमिओपॅथिक औषध आहे का?"
"तुम्ही एमके'मधून आलात काय?"
"म्हणजे?"
मागच्या बाजूचे गिऱ्हाइकाने कानात सांगितले की "तुम्ही शेजारच्या एमके मेहेंदळेंकडून विचारुन आलात काय, हे त्यांच्या भावाचे दुकान आहे. हे बिके."
- औषध आहे का नाही या प्रश्नाचे उत्तर बाजूलाच.

मंडईतल्या एका विक्रेत्यास " दगडुशेट गणपती कुठल्या बाजूला?"
"तो कशाला आमचा पाहा."
"तो पाहूच, पण हा कुठे?"
- त्याने दुर्लक्ष केले.

पुण्यात अनपेक्षित उत्तरे मिळतात कारण त्यांना प्रश्न समजत नाही किंवा ते त्यांच्या एकांगी पद्धतीने विचार करत असतात. ही उत्तरे ऐकायची सवय झाली की दुर्लक्ष करणे सोपे जाते. इरीटेशन स्वाहा ही सिद्धी प्राप्त होते. टॉलरन्स लेव्हल वाढते. - Submitted by पारंबीचा आत्मा .
नवीन Submitted by Srd >>>> बोल्ड टायपामधील वाक्ये माझ्या नावाने का लिहीली आहेत ? माझ्या प्रतिसादात ही वाक्ये कुठे आहेत ?

फक्त 'इरीटेशन स्वाहा ही सिद्धी प्राप्त होते. टॉलरन्स लेव्हल वाढते.'हे तुमच्या प्रतिसादातले घेतले ते emphasis. आहे.बाकीचे बोल्ड कुठे आहे? जोडले गेल्यास चुकले.

Pages