मला सदाशिव पेठ बघायचीय !

Submitted by हेमन्त् on 30 June, 2015 - 15:48

अनेकदा पुण्यात जावून सुद्धा या महान ऐ तिहासिक आणि सांन्स्कृतिक स्थळाचे दर्शन केले नाही … तरी ते करण्याचा इरादा आहे.
माझे काही मित्र ( जुने मुंबईकर आता पुणेकर ) हे ऐकताच थर थर कपू लागले .
" अरे X%^&(* झालास कि काय ? चाल घरी ये बिअर पिलावतो . असे हि म्हणाले ( ते चहाच नाही तर मद्य देतायत - म्हणजेच हे मुल पुणेकर नाहीत हे कळले आसेल्च.
तरी माझी विनंती खालील गोष्टी / सल्ला / सेवा मिळतील काय?

१) नकाशा - अचूक नकाशा मिळेल काय ? कारण इथे कोणीही पत्ता विचारले कि अपमान करतात !
२) गेंड्याच्या कातडीचा शर्ट - अपमान पचवायला !
३) मी ४-५ पाण्याच्या बाटल्या नेत आहे - पुरतील कां ? इथे कोणिही पाणी विचारात नाही .

अजून काही गोष्टी मला नेण्यास सांगितले

१) तंबू
२) चक मक
३) हत्यारे
४) सरपण
५) तलवारी
६) दोर
७) होकायंत्र
८) barometer

जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे चाललेल्या चर्चेवरून मायबोलीवर "धुंद रवी" ह्यांनी लिहिलेला लेख आठवला. त्याचा दुवा खाली देतो आहे.

हेमन्त - सदाशिव पेठेत गेल्यास काय होईल ह्याची रंगीत तालिम म्हणुन बघाच हा संवाद.

ttp://www.maayboli.com/node/35004

ता.क. - मायबोली वर प्रकाशित केलेला असल्या मुळे प्रस्तुत लेख 'सार्वजानिक' आहे असे गृहित धरून दुवा दिला आहे. कॉपीराईट नियमाच्या चौकटीत ते बसत नसल्यास वाचकांनी कृपया सांगा.

नकाशा - अचूक नकाशा मिळेल काय ?
>> दोन एक हजार असतील तर एखादा जीपीएसवाला फोन घेऊन टाका ओएलएक्सहून ... त्यात गुगल माप्स टाकून वापरा. तिथे गेल्यावर नकाशे बिकाशे काढून बसाल तर अर्धी हजामत रस्त्यातच होईल!

(उरलेली पत्ता विचारल्यावर होईलच!)

एक बालपणापासून सतावणारा प्रश्न -
पुण्याचा उल्लेख होताच त्याची तुलना नेहमी मुंबईशीच करणे गरजेचे आहे का?
याच गोष्टीचे भांडवल करून मराठी चित्रपट सृष्टीचा सुपर्रस्टार स्वप्निल जोशी "मुंबई-पुणे-मुंबई" सारखा सुपरहिट चित्रपट देऊन गेला.

खरे तर मी स्वजोचाच धागा आज वर काढणार होतो, खबरच तशी होती,
त्याच्या नवीन चित्रपटाबद्दल लिहिताना मुंबई टाईम्समध्ये त्याला "मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार" असा उल्लेख करून गौरवले आहे.
नक्की वाचा आणि एक मायबोलीकर म्हणून अभिमान बाळगा. हे आपले सर्वांचे यश आहे.

शाहरुख खाननामाक पॉमेरीयन, गर्लफ्रेंड, एमएनसी आणि आई हे एकदाचं आलं, की आणखीन एका धाग्याचं श्राद्धं घालण्यास मोकळे!

(तो शाहरुख खान आहे ना. का कोणास ठाऊक त्याला पाहिल्यावर मला पॉमेरीयन कुत्र्याचीच आठवण येते. पॉमेरीयन कसं, मागून-पुढून कुठूनही पहा. तोंड कुठे आहे कळत नाही - इति कणेकर (माझी फिल्लमबाजी)

>>>> तेंव्हा सदाशिव पेठे ऐवजी न्यू जर्सीच्या मराठी विश्वात या. तिथे जुने पुणेकर खूप भेटतील <<<
ज्ज्येऽऽ बात है झक्की... परफेक्ट... !

सदाशिव पेठेत कुमठेकर मार्गावर आवारे खानावळ आहे. तिथे सपेकर सामिष भोजन करण्यासाठी आडनावे बदलून काही काळ मवाळ होतात असे तिथे काम करणाऱ्या मुलाकडून समजले.

कारण तिथे येणारे त्यांचे उलट उत्तर ऐकून घेणार्यांपैकी नसतात Proud

च्यायला एवढि नाव ठेउन पण पुण्यात यायचि काय एवढि खाज असते लोकन्ना काय कळत नाहि. ईथल वागणे झेपत नाहि मग अपमान झाला म्हणुन नेट वर रडत फिरतात.

खाज?????

मटनाच्या सर्वात जास्त खानावळी / हॉटेल्स याच सपे मध्ये आहे त्यामुळे येथील लोक्स शाकाहारी आहेत असा गै.स. करुन घेवू नये.......... हुकूमावरुन Happy

मटनाच्या सर्वात जास्त खानावळी / हॉटेल्स याच सपे मध्ये आहे त्यामुळे येथील लोक्स शाकाहारी आहेत असा गै.स. करुन घेवू नये.......... हुकूमावरुन >> किकु +१

मी पुण्यात आल्या आल्या तब्बल दिड वर्ष सदाशिव पेठेत पिजी म्हणुन राहिलीय..चला माझ शाल श्रीफळ देऊन सत्कार करा Happy

बापरे! मी कधीच पुण्यात गेले नाहीये. हे वाचुन वेगळच चित्र उभं रहतय हा पुण्याबद्दल. जोक्स वैगेरे म्हणुन वाचलय पुणेकरांबद्दल पण हे ही खरंच का?

हेमन्त् >> 'बार' या जागेवर आयुष्यात अजुनतरी कधीच पाय ठेवायची वेळ आलेली नाहिए Wink .. त्यामुळे याबद्दल पुर्णपने अनभिज्ञ ..

सस्मित , एवढही वाईट नै आहे गं .. बस माझ्यासारखीचे खाण्याचे येले झाले.. मेस वगैरे प्रकाराच्या फंद्यात पडायच नाही निदान पुण्यात तरी असा प्रण केल्याय मी Happy

बार .. म्हणजे काय ? उगाच पुणेरी लोक्स सगळीकडे बार चार्ट पटकन काढून दाखवितात का ?

का म्हणजे काय.. त्या भाज्यांमधे तिखट सोडून सगळ काही असायचं .. मी लिटरली परत भाजीला फोडणी देऊन खायचे :रागः

आता बार वर एक धागा येवू द्या.. कुठला बार कुठे आहे ..
कुठे प्यासा, कुठे सरोवर, पेठेतच चांगले ३ -४ बार आहेत. वाईस शोधा जरा घावतील

>>>> मी लिटरली परत भाजीला फोडणी देऊन खायचे :रागः <<<<
अहो सपेकर काय? पाण्याचीही फोडणी देत अस्तील भाजीला.... Proud
शेवटी काय? मिशीला तुप्प लावुन फिरणारे सपेकर्स..... भाजीला फोडणी द्यायला तेल तरी असायला हवे? १९४८ नंतर यापेक्षा वेगळे काय व्हायचे होते? असो.

कदाचित दारु पण पळीने प्राशन करायची स़क्ती असायची तिथे Rofl

मलाही माहित नव्हते , एका पेठेतल्या मित्रानेच नेले होते पेठेतल्या बारवर .पण भ्रमनिरास झाला होता फार ..
कारण तिथे दम बिर्यानी नव्हती तिथली बिर्यानी म्हणजे.....कसल्याशा रंगीत भातात मटणाचे तुकडे पेरुन अनावश्यक असलेल्या तुपाच्या वाटीबरोबर , जणू काही हैद्राबादी बिर्यानी आणल्याच्या अविर्भावात वागणारा वेटर पाहिला आणि कल्टी मारली सिंहगड रोडवर दुर्गा नामक बारवर.

अरे हो, या सामिष खाण्यावरून आठवले - या पहिल्या बाजीरावाच्या पुण्यात, सदाशिवरावांचे नाव असलेल्या पेठेत एक मशीदहि आहे म्हणे! दररोज पहाटे बांग देतात.
आजकाल ब्राह्मणांनी स्नान संध्या तर सोडलीच आहे, निदान नमाज पढायला तरी जा!
तसेहि काय, अल्ला काय, येशू काय, कुणावर तरी देव म्हणून विश्वास असला की झाले, ३३ कोटी देवात आणखी एक दोघांची भर, काय फरक पडतो? वाईट वागायची भीति बसली की आपोआप चांगले वागाल.

Pages