आईचा आशीर्वाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 October, 2016 - 10:21

गेले काही दिवस आपण धोनी, कोहली आणि रहाणे या तीन क्रिकेटपटूंची जाहीरात पाहिली असेल ज्यात त्यांनी आपल्या आईचे नाव टीशर्टवर लिहिलेले दाखवले आहे.

आज याच उपक्रमा अंतर्गत नरकचतुर्दशीच्या मुहुर्तावर सर्वच भारतीय खेळाडूंनी आपल्या आईचे नाव टीशर्टवर लिहित मैदानावर उतरायचे ठरवले.

आणि काय तो चमत्कार, 2-2 अश्या बरोबरीत चाललेल्या मालिकेत आज अखेरच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला फक्त 79 धावांत गुंडाळत तब्बल 190 धावांनी एक विक्रमी विजय मिळवला आणि सर्वच आयांची पोरे चमकली.

आता याला श्रद्धा म्हणा किंवा एक सकारात्मक उर्जा, किंवा निव्वळ योगायोग...
पण भारतीय संघाचे या विजयाबद्दल आणि त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन !

एक फील गूड बातमी म्हणून शेअर करावेसे वाटले. छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी पावले, मानसिकता हळूहळू बदलायला मदत करू शकतात हा विश्वास असल्याने Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवकी करतो, पण नक्की आशिर्वाद असे नसून आशीर्वाद असा शब्द आहे का? आपल्यावर अविश्वास दाखवायचा हेतू नाही, पण अजून एकाने कन्फर्म केले की बदल करतो.

बादवे, ईंग्लिश स्पेलिंग नेटवर कुठेही कशीही सहज कन्फर्म करता येते पण मराठी र्हस्व दिर्ध शुद्धलेखन तपासायला कोणती साईट आहे का?

देवकी करतो, पण नक्की आशिर्वाद असे नसून आशीर्वाद असा शब्द आहे का? आपल्यावर अविश्वास दाखवायचा हेतू नाही, पण अजून एकाने कन्फर्म केले की बदल करतो. >>>>> हो. Happy

बादवे, ईंग्लिश स्पेलिंग नेटवर कुठेही कशीही सहज कन्फर्म करता येते पण मराठी र्हस्व दिर्ध शुद्धलेखन तपासायला कोणती साईट आहे का? >>>>.मायबोली Wink

बादवे, ईंग्लिश स्पेलिंग नेटवर कुठेही कशीही सहज कन्फर्म करता येते पण मराठी र्हस्व दिर्ध शुद्धलेखन तपासायला कोणती साईट आहे का? >>>> र्‍हस्व दीर्घ लिहा 10 वेळा Proud

आपल्यावर अविश्वास दाखवायचा हेतू नाही, >>>>>>>> माझ्यावर अविश्वास् दाखवलास, नाही दाखवलास तरी चालेल.शब्दाचे शुध्द रुप, आशीर्वाद हेच आहे.
रच्याकने, मराठी भाषेचे व्याकरणअशाच नावाचे दामल्यांचे एक जाडजूड पुस्तक आहे ते वाच.ते कष्ट घ्यायचे नसतील तर ,प्राचीने सांगितल्याप्रमाणे करच.

प्राची, >> मायबोली >> हो ते तर आहेच. जरा कान पिरगाळतात पण सुधरवतात Happy
-हस्व दीर्घ मला लिहितानाच शंका आलेली की ईथेही पचका होणार.

देवकी जाडजूड पुस्तकांचे कौतुक तुम्ही एका ईंजिनीअरला सांगू नका. अशी कैक पुस्तके उशी म्हणून घेऊन झोपलोय Happy
त्यापेक्षा आपल्या आशीर्वादानेच सुधारेल हळूहळू मराठी

ऑनलाईन आलो तसे बदलले.

मला आशिका या आयडी नावासारखे आशिर्वाद बरोबर वाटत होते म्हणून जरा कन्फ्यूज होतो. आणि मला रिवर्क करायचे नसल्याने कन्फर्म होईपर्यंत थांबलो ईतकेच Happy

श्री, ती प्राचीन टेक्नोलॉजी आहे. यज्ञात दिलेली आहुती देवतांपर्यंत पोहोचते तशी. बिरबलाने आपल्या खिचडीतही वापरलेली. उशाशी पुस्तक घेऊन झोपल्याने त्यातील ज्ञान थेट डोक्यात शिरते. माझी ईंजिनीअरींग अशीच निघाली Happy

आणि भारतीय वृत्तीला टोमणे मारायला चीनचा धागा काढलाय ना. ईथेही परत तेच का Happy

दामल्यांच्या पुस्तकाचा मी धसका घेतला होता रे,म्हणून तुला भिती घातली.जाऊ दे,सुधारणा केलीस हे महत्वाचे.

<< छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी पावले, मानसिकता हळूहळू बदलायला मदत करू शकतात हा विश्वास असल्याने >> सहमत.

गमभन वापरा, शुद्धी चिकित्सेला, किंवा मनोगत.कॉम
मनोगत या साईट चा शुद्धी चिकित्सक बेस्ट आहे.

अनू, धन्यवाद. शोधतो पुढच्या विकांताला. हा आठवडा तांत्रिक कारणाने टूजी मोबाईलवर काम चालवावे लागणार आहे.

अनिल, आपल्यासारख्याच एका प्रतिसादाची हा धागा वाट बघत होता. जरा ईलॅबोरेट कराल तर मजा येईल Happy

उशाशी पुस्तक घेऊन झोपल्याने त्यातील ज्ञान थेट डोक्यात शिरते. माझी ईंजिनीअरींग अशीच निघाली >>> अरेरे हे ज्ञान आधी कुठे मिळालं असतंच तर मीपण झाले असते की इंजिनियर. छया Wink .

उशाशी ठेवलेल्या पुस्तकाचा आणि डोक्यातील विचारांचा थेट संबंध असतोच. लहानपणी मला भूतांची स्वप्ने पडायची. आताही पडतात. पण ती भूतांची नसतात. तर ते एक असो. पण तेव्हा माझ्या आज्जीने एक पुस्तक उशाशी ठेवायला दिले होते. आणि खरेच मला तशी स्वप्ने पडायची बंद झाली होती. याला आज्जीचा आशीर्वादही म्हणू शकता Happy

ऋ ते अनिलचेंबुर असं लिही रे.
>>>>
ऊप्स सॉरी
सॉरी अनिलजी
माझ्याकडून वाचताना ते चेंबूरचे चेंबर असेच वाचले जात होते बहुधा. आधी कुठे मी तुमचे नाव लिहिलेले का आणि कसे बघायला हवे. ईंग्लिश फॉन्ट किंवा जोडून लिहिल्याने झाले असावे. बदलतो लगेच

जरा ईलॅबोरेट कराल तर मजा येईल >> तुझा कोणी ह्या वाक्याने पचका केलाय का रे सध्या ? दोन तीन बाफांवर हे वापरलेले दिसले Wink

अरेरे हे ज्ञान आधी कुठे मिळालं असतंच तर मीपण झाले असते की इंजिनियर >> त्याने कुठेही तो इंजिनियर झाल्याचे नमूद केलेले नाहिये. Lol

असामी,
@ ईलॅबोरेट, माझी गर्लफ्रेंडही हेच म्हणते की मला एखादा नवीन ईंग्लिश शब्द मिळाला की बघावा तेव्हा तोच जिथे तिथे वापरत असतो. सध्या याची चलती आहे असे समजा Happy

@ ईंजिनीअर, अहो मी जॉबपाण्याला लागलोय की आता. म्हणजे झालोच असणार. तसेही कुठे ईतर धाग्यांवर नमूद केले असेलच हे.
तरी जर हे सर्वांना माहीत नसेल तर एक धागा तो बनता है बॉस.. "मी ईंजिनीअर कसा झालो Happy

सिंडरेला, प्रत्येक ईंजिनीअरची एक वेगळीच कहाणी असते. निदान प्रत्येकाला ती तशी वाटते तरी. चार दिन की जिंदगी है असे म्हणायची पद्धत ईंजिनीअरींगच्या चार वर्षांवरूनच पडलीय. आईचा आशीर्वाद आणि बाबांची पुण्याई असल्याशिवाय ही पुर्ण होत नाही. बघू आता कधी योग येतोय लिहायचा.

पण तुमची आई तुम्हाला आशीर्वाद देते हे सगळ्याना सांगत कशाला फिरायचं ?

>>> ट्रक, टेंपोच्या मागे पण लिहीलेले असते की, "आई, तुझा आशीर्वाद".