कुर्ग सहल - भाग ४

Submitted by दिनेश. on 25 October, 2016 - 21:35

कुर्ग - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/60600

कुर्ग सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/60628

कुर्ग सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/60630

कुर्ग सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/60635

कॉफीची झाडे ही छाटणी करून मुद्दाम कमी उंचीची राखलेली असतात. त्यामूळे बिया वेचणे सोपे जाते.
प्रत्यक्षत हे झाड अनेक वर्षांचे असू शकते. नव्हे असतेच.

१)

DSCN2602

२) कॉफीचे उत्पादन वर्षातून एकदाच येते. आधी त्याला जाईच्या फुलांसारखा भरगच्च फुलोरा येतो. त्यांना थोडाफार
सुगंधही असतो. मग त्यांना अशी फळे लागतात. ती फळे पिकून लाल होतात. तशी झाली कि त्याची हाताने
तोडणी करावी लागते. मग वरचे साल काढतात आणि आतल्या बिया वाळवतात. त्या भाजून त्याची पूड केली, की
ती कॉफी. अनेक तामिळ आणि कुर्गी घरात या बिया रोज ताज्या भाजल्या जातात आणि त्याची पूड केली जाते.
ते स्वतः मात्र खुपच स्ट्राँग कॉफी पितात, माझ्यासाठी जरा सौम्य आणि जास्त दूध घातलेली कॉफी येत असे.

ही कॉफीची तोडणी जानेवारी , फेब्रुवारी मधे होते.

DSCN2604

३)

कॉफीच्या झाडांना सावलीची गरज असते. त्यासाठी काही झाडे मळ्यातच लावलेली असतात. ही झाडे सिल्वर ओक, पांगारा वगैरेची असतात आणि मग त्यावर मिरीचे वेल चढवलेले असतात.

DSCN2605

४)

DSCN2606

५) रस्त्यावरुन माझा परीवार होम स्टे, एवढाच दिसतो. सभोवताली बाग आहे ती त्यांचीच !

DSCN2608

६) हा मिरीचा वेल. याची तोडणी, कॉफीनंतर होते

DSCN2613

७) हे पण एक शोभेचेच झाड

DSCN2614

८)

हा तेरड्याचा आणखी एक प्रकार

DSCN2616

९)

साडेनऊला मी आणि राजेन्द्र घराबाहेर पडलो. काही पर्यटक स्पेशल जागा बघायच्या होत्या. पण त्यापुर्वी तो मला
एका टेकडीवर घेऊन गेला. ही जागा पर्यटकांसाठी नाही तर स्थानिक लोकांसाठी आहे. सगळीकडे कॉफीच्या मळ्यांखाली असणार्‍या टेकड्या असताना हि एकच टेकडी अशी गवताळ राहिली होती. तिथे ना कसला स्टॉल ना
इतर आकर्षणे. मी तर या जागेच्या प्रेमातच पडलो. राजेंद्रला म्हणालो, काल संध्याकाळी इथे आलो असतो, तर मी
रात्र इथेच काढली असती...

DSCN2619

१०) हे सर्व माझ्याभोवती गिरकी घेत काढलेले फोटो.

DSCN2620

११)

DSCN2621

१२)

DSCN2624

१३)

DSCN2625

१४)

DSCN2626

१५) परत मार्गी लागलो आम्ही

DSCN2627

१६)

मला तिथला मध घ्यायचा होता. राजेन्द्र मला एका मधमाशी पालन केंद्रात घेऊन गेला. तिथे मध कसा गोळा करतात,
त्याची प्रतवारी कशी केली जाते ते बघितले. कुर्गी लोकांच्या आहारात मध असतोच. त्या केंद्रात फोटो नाही
काढले, पण तिथे असे कळले कि मध निर्मिती वर पण काही नियंत्रण आहे. मधातील घटक वगैरे दाखवणारा
हा फलक.

DSCN2628

१७) ओंकारेश्वराचे देऊळ हे तिथले एक देवालय. याची बांधणी थोडी वेगळ्या धाटणीची आहे.

DSCN2629

१८) मुख्य देवळात फोटोग्राफीची परवानगी नाही

DSCN2630

१९) हे तिथे दिसलेले फूल

DSCN2631

२०) तिथेच शेजारी शेजारी दोन वेगवेगळ्या प्रकारची स्पॅथोडीया ( आफ्रिकन ट्यूलिप ) ची झाडे दिसली.

DSCN2632

२१) एकाचे फूल असे

DSCN2634

२२) तर दुसर्‍याचे असे

DSCN2635

२३) नंतर पुढचे आकर्षण अब्बी फॉल्स बघायला गेलो

DSCN2639

२४) तिथे जायला बरेच खाली उतरून जावे लागते

DSCN2640

२५)

DSCN2641

२६)

DSCN2642

२७)

या धबधब्याचा वरचा टप्पा फक्त काही अंतरावरूनच दिसतो.

DSCN2643

२८) समोरून मात्र एवढाच दिसतो

DSCN2646

क्रमश :

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर. देवळातल्या तळ्यातलं पाणी कसलं नितळ आहे!
दिनेश, त्या स्पॅथोडियाच्या दोन फुलांत मला काहीच फरक वाटत नाहीये.

सही.
ओंकारेश्वर च देऊळ पाहुन गोव्याच मंगेशी च देऊळ आठवले.
अ‍ॅबी फॉल्स मधे उतरायला काही स्कोप दिसत नाही पण.

देवळातल्या तळ्यातलं पाणी कसलं नितळ आहे! >>> ते आकाशाचे प्रतिबिंब आहे बहुतेक.

त्या स्पॅथोडियाच्या दोन फुलांत मला काहीच फरक वाटत नाहीये. >>> + १. पण त्यांचा रंग, आकार अणि पोत तिन्ही सुंदर आहे. आणि ते फोटोतही मस्त उतरलय.

ही जागा पर्यटकांसाठी नाही तर स्थानिक लोकांसाठी आहे. >>> त्याला स्थानिक लोकांच्या दृष्टीने काही विशेष महत्व आहे का?

आभार...

सई, त्या दोन झाडांच्या ठेवणीत फरक आहे आणि फुलांच्या रंगातही.

माधव : ही जागा पर्यटकांच्या लिस्ट मधे नसते. तशी काहीही सोय नाही तिथे. स्थानिक लोकांचे संध्याकाळी फिरायला जायचे ठिकाण आहे ते. गर्द झाडीत वावरायचा कंटाळा आला तर ( !!! ) खुप विस्तिर्ण आणि मोकळी जागा आहे ती आणि अश्या जागेचे त्यांना नक्कीच अप्रूप असणार, कारण एरवी गर्द झाडीमूळे घरातून, लांबचे काही दिसत नाही.

अंकु : तिथे पाण्यात उतरणे खुप धोक्याचे आहे. इव्हन समोर जो आडवा पूल दिसतोय ( ज्यावर पांढर्‍या ड्रेस मधला माणूस ऊभा आहे तो ) तोही तारा लावून बंद केलाय. पण लोक तारा वाकवून तिथे जातात. धबधब्यावरून थेट पाण्याचा मारा होतो तिथे. पावसाळ्यात तर जास्तच. पण तरीही पब्लिक तिथे जातच असतं. सुरक्षेची काही सोय दिसली नाही तिथे.

सायु,
कॉफीचे मूळ आमच्या आफ्रिकेतल्या इथिओपिया मधल्या काफ्का गावातले. तिथे एका झाडाची फळे खाऊन, मेंढ्या जरा जास्तच टणाटण उड्या मारताना गुराख्याना दिसल्या म्हणून या झाडाचा शोध लागला. अजूनही तिथली कॉफी उत्तम प्रतीची मानतात.

श्री,

हे मिरीचे दाणे मोठे होऊन पिकून लाल होतात. मग ती सुकवून लाल मिरी म्हणून विकतात. पण ते साल लगेच निघते, आत असते ती काळी मिरी ( आपण वापरतो ती ) तिच्यावरचे काळे साल काढून टाकले कि आत असते ती पांढरी मिरी. ती आपण पापडात वगैरे वापरतो.