या छोट्या मोठ्या अपमानांचे काय करावे?

Submitted by साती on 21 October, 2016 - 11:15

या छोट्या मोठ्या अपमानांचे काय करावे?
हे कधिसुद्धा ना सरणारे सल काय करावे?

का पुन्हा पुन्हा डसताती नांग्या एका जागी
हे भणभणती डोक्यातच विंचू काय करावे?

जे त्यांच्यासाठी सोपे होते विसरून जाणे
ते मला बोचते क्षणक्षण स्मरूनी काय करावे?

रे 'क्षमा करा वा विसरा' म्हणणे सोपे आहे
मी अशक्त म्हणूनी क्षमा परवडे काय करावे?

निर्भत्सा अथवा सहमत व्हा मुद्द्यांवर माझ्या
शेवटी सोसणे मलाच आहे काय करावे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही करू नका. येणाऱ्या प्रतिसादातून जीवनमुल्य समृद्ध करा. Wink

रचना चांगली आहे.

मस्त.

मायबोली धुंद, मस्तोंका झुंड
धागोंकी बरसात, सब साथ साथ
कोई मारे टाँट, करे अपमान
बोलो क्या करेंगे.....
कवन करेंगे, कवन करेंगे, कवन करेंगे...

मानव, भारीच!
फक्त मात्रा जुळवत बसायच्या नव्हत्या, सुचेल तसे लिहायचे होते म्हणून ही गझल नाही, कविता आहे.

तुमच्या प्रतिसादात 'कवन करेंगे, कवन करेंगे, कवन करेंगे' असा बदल करा.

Happy

जमलंय Proud

आणि मानव तुमचेही Proud
दोन उखाणे बूक करतो तुमची ही शैली बघून

हिच मजा आहे मायबोलीची Wink

बघा, हवन ला कवन कस्लं भारी मॅच झालंय.

मी पण दोन उखाणे बुक करते. (पुन्हा लग्न करत नाहीये, आमच्यात इतरांच्या लग्नात्/संक्रांती/हळदीकुंकू यांत उखाणे घ्यावे लागतात.)

Happy

कविता मस्त जमलीय साती तै.

उखाण्यावरुन उखाणा सुचला.

मनासारखा पती मिळावा म्हणून १६ सोमवार करावे|
आबुरावांसाठी उपास केले,
पण बाबुराव नशिबी आले, आता काय करावे???

Mast

mast

साती.. प्रतिसाद विनोदी अंगाने जाणारे असले तरी कविता गंभीर आहे (असावी).
मला खूप आवडली.. रीलेट होऊ शकले.

फक्त..
रे 'क्षमा करा वा विसरा' म्हणणे सोपे आहे
मी अशक्त म्हणूनी क्षमा परवडे काय करावे?

याचा अर्थ समजावशील का प्लीज?
'मनाने अशक्त असल्याने विसरण्यापेक्षा क्षमा करणे मला परवडते' असे काही आहे का?
मग उलट क्षमा करायला जास्त शक्ती लागते (हेमावैम). त्याऊलट तिथे

'सूड घ्या / प्रतिवार करा वा विसरा' म्हणणे सोपे आहे
मी अशक्त म्हणूनी विसर परवडे काय करावे?

असं असतं तर 'प्रतिवार करण्यापेक्षा, मी अशक्त असल्याने (झालेला अपमान) विसरणे मला जास्त परवडेल' असं येऊ शकलं असतं ना? अर्थात तुझा त्या ओळींमागे काय विचार आहे तो ऐकायला आवडेल.

मग उलट क्षमा करायला जास्त शक्ती लागते (हेमावैम).
>>>>>

पियु,
क्षमाशीलता हा एक दागिना आहे,
पण दुर्बलांना तो शोभत नाही.
हेमावैम Happy

पियू,
एक प्रसिद्ध संस्कृत सुभाषित आहे.

'क्षमा बलम् अशक्तानां, शक्तानां भूषणं क्षमा
क्षमा वशीकृते लोके, क्षमये किं न सिद्धति'

म्हणजे अशक्त लोकांचे क्षमा हेच बळ आहे (मानसिक म्हणूया) आणि शक्ती असूनही क्षमा करता येणे हे सशक्त लोकांचे भूषण आहे.
अशक्त लोकांना दुसरे काहीच करता येण्यासारखे नसते त्यामुळे 'जाने दो , माफ किया' असा फसवा अ‍ॅटीट्यूड ठेवावा लागतो.
पण मला समजतंय की क्षमा करण्याचा फक्त बहाणाच आहे, मी अशक्त आहे म्हणून मला दुखविणार्‍यांना मी क्षमेशिवाय दुसरे काही करणे परवडणारे नाही. याची रुखरुख शेवटी मला आहेच!

ऋ, यू सेड इट!
म्हणूनच तू मला फार ग्रेट वाटतोस.
आमचे विचार हे इथे तिथे काही बाही वाचून आलेले.
तू एकदम स्पाँटॅनियस आहेस!

मस्त, साती!
क्षमा बलम् अशक्तानां, शक्तानां भूषणं क्षमा
क्षमा वशीकृते लोके, क्षमये किं न सिद्धति'

म्हणजे अशक्त लोकांचे क्षमा हेच बळ आहे (मानसिक म्हणूया) आणि शक्ती असूनही क्षमा करता येणे हे सशक्त लोकांचे भूषण आहे.
अशक्त लोकांना दुसरे काहीच करता येण्यासारखे नसते त्यामुळे 'जाने दो , माफ किया' असा फसवा अ‍ॅटीट्यूड ठेवावा लागतो.
पण मला समजतंय की क्षमा करण्याचा फक्त बहाणाच आहे, मी अशक्त आहे म्हणून मला दुखविणार्‍यांना मी क्षमेशिवाय दुसरे काही करणे परवडणारे नाही. याची रुखरुख शेवटी मला आहेच<<<< सुविचाराच्या वहीत लिहून ठेवते.
मानव, कवन आवडले..

सुभाषितातला गर्भित अर्थ क्वचितच लक्षात ठेवून वागणे होते. सामान्य माणसाला बंधनं फार असतात, त्यामुळे त्याची क्षमता प्रकाशित व्हायला फार वेळ लागतो, किंबहुना ती बर्‍याच वेळेस होतच नाही.
असो पण सुभाषितात ल्या सारखे कधी कधी वागायला हरकत नाही. कविता छान आहे आणि उद्बोधकही.

साती
मी ही कविता गंभीर मोड ऑन मधेच वाचली.मस्त जमलीये. Happy
मानव तुझी रचना ही भारी. :थम्प अप:
आम्हांला काही सुचल तरी लिहायला जमत नाही.

Pages