या छोट्या मोठ्या अपमानांचे काय करावे?

Submitted by साती on 21 October, 2016 - 11:15

या छोट्या मोठ्या अपमानांचे काय करावे?
हे कधिसुद्धा ना सरणारे सल काय करावे?

का पुन्हा पुन्हा डसताती नांग्या एका जागी
हे भणभणती डोक्यातच विंचू काय करावे?

जे त्यांच्यासाठी सोपे होते विसरून जाणे
ते मला बोचते क्षणक्षण स्मरूनी काय करावे?

रे 'क्षमा करा वा विसरा' म्हणणे सोपे आहे
मी अशक्त म्हणूनी क्षमा परवडे काय करावे?

निर्भत्सा अथवा सहमत व्हा मुद्द्यांवर माझ्या
शेवटी सोसणे मलाच आहे काय करावे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे मान, हे अपमान ...माझे, तुमचे अन त्यान्चेही...
सगळ्यावर जरुर मात करता येइल

मनाच्या खेळास न द्यावि आपलि सन्मति,
दिवसोदिवसाचा आनन्द सान्डुन जाइल....

पहावा करुन विवेकाचा पहारा
मनात खुशि अन ओठावर शीळ येइल!

एकदा लावुयाच वळण स्वत:ला
अन्धाराचे जाळे फ़िटुन जाइल

घेउ थोडी मेहनत , अन बजावूच स्वत:ला
लहान मुलासारखे खळखळून हसता येइल!!

दिनेश., तोच प्रयत्न चाललाय. पुणे नाही, पण आसपास स्थागिक व्हायचा.
Wink

दीपा जोशी, छान लिहिलंत.

मंजूताई, त्या संस्कृत सुभाषिताचा पूर्ण अर्थ
'क्षमा हे दुर्बळांचं बळ तर सबळांचं भूषण आहे. क्षमेने वश केलेल्या या जगात क्षमाशीलतेने काय बरे साध्य होत नाही?'

असा आहे.

सगळ्या प्रतिसादकांना धन्यवाद!

पुण्याच्या आसपास, वाजवी भावात घर फ्लॅट मिळत असेल तर सांगा हो.
आम्ही पण शिफ्ट व्हावं म्हणतोय निवृत्ती नंतर, आता घेअुन ठेवु घर, कर्ज बिर्ज काढुन.

Pages