मायबोली मास्टरशेफ - भरत. - मिर्चीवडा

Submitted by भरत. on 15 September, 2016 - 22:33

साहित्य : जाड्या मिरच्या (खरं तर जाड्या बुटक्या सुबकठेंगण्या मिरच्या, पण मला नेमक्या जाड्याच पण चांगल्या उंचनिंच मिरच्याच मिळाल्या)
टाटे, आलेलसूणमिरची वाटण, जिरे, कोथिंबीर, जिरे
बेसन, ओवा, फ्रुट सॉल्ट
मक्याच्या लाह्या
मीठ, तेल
मुख्य कलाकार :
mirchi1.jpg

कृती : एकेका मिरचीला उभी चीर देऊन आतल्या बिया काढून, त्या मीठ घातलेल्या गरम पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवल्या.
बटाटे उकडून सोलून कुस्करून त्यात आलेलसूणमिरचीचे वाटण, चिरलेली कोथिंबीर, जिरे, आमचूर, मीठ घालून नीट एकत्र करून घेतले.
मक्याच्या लाह्या मिक्सरमध्ये भरड वाटून घेतल्या. ही भरड एका ताटात पसरून ठेवली.
बेसनात मीठ, कडक तेलाचे मोहन, ओवा, फ्रूट सॉल्ट घालून भज्याच्या पिठासारखे भिजवून घेतले.
बटाट्याचे मिश्रण मिरच्यांमध्ये भरून त्या नीट बंद केल्या.
mirchi2.jpg

आता त्या बेसनाच्या पिठात बुडवून मग लाह्यांच्या भरडीत घोळवून घेतल्या.
त़ळून घेतल्या.
सोबत लसणाची चटणी आणि टमाटो केचप.
mirchi6_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे पाकृ. बेसनात बुडवुन लाह्याचे कोटिंग केल्याने मिश्रण ( बेसन) चांगलेच दिसते आहे की. नाहीतर आमच्या कडे या मिर्च्या तळायला घेतल्या की बेसन वरुन निथळुनच जाते. स्पर्धेसाठी शुभेच्छा.

मयेकर, भारी आहे पाककृती.

स्पर्धेसाठी शुभेच्छा!!!

हा मिरची बोडा बिकानेर ला खायचा प्रयत्न केला होता . पहिला घास लहान घेतला होता म्हणून वाचले , अफाट तिखट होता.

तुमची रेसिपी मस्त दिसतेय . मिरच्या तिखट नसतील तर लागेल ही मस्तच .

सगळ्यांचे आभार Happy
सनव, या मिरच्या जराही तिखट नव्हत्या. सगळ्या बिया काढून घेतलेल्या.
रश्मी, बेसनाचे मिश्रण जाड ठेवलेय तसंच कढईत सोडताना आच मोठी ठेवलीय, मग कमी केलीय. आतला मसाला तर शिजलेलाच आहे.
तरीही तळून झाल्यावर जरा हँडल विथ केअर करायला लागतं. एक मिर्ची आडवी कापून फोटो काढायचा प्रयत्न केला, तर बेसनाचं कव्हर वेगळं होऊ लागलं. पण खायला या मस्त लागल्या.
छोट्या मिरच्या असतील तर तो प्रॉब्लेम येत नाही. त्या मिरच्या अनेकदा चीझ भरून केल्यात.
लाह्या फक्त आयटम साँग पुरत्याच आल्यात. पण त्यांनी रेसिपीचा लुक बदलून गेला.

Pages