मायबोली मास्टरशेफ - भरत. - मिर्चीवडा

Submitted by भरत. on 15 September, 2016 - 22:33

साहित्य : जाड्या मिरच्या (खरं तर जाड्या बुटक्या सुबकठेंगण्या मिरच्या, पण मला नेमक्या जाड्याच पण चांगल्या उंचनिंच मिरच्याच मिळाल्या)
टाटे, आलेलसूणमिरची वाटण, जिरे, कोथिंबीर, जिरे
बेसन, ओवा, फ्रुट सॉल्ट
मक्याच्या लाह्या
मीठ, तेल
मुख्य कलाकार :
mirchi1.jpg

कृती : एकेका मिरचीला उभी चीर देऊन आतल्या बिया काढून, त्या मीठ घातलेल्या गरम पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवल्या.
बटाटे उकडून सोलून कुस्करून त्यात आलेलसूणमिरचीचे वाटण, चिरलेली कोथिंबीर, जिरे, आमचूर, मीठ घालून नीट एकत्र करून घेतले.
मक्याच्या लाह्या मिक्सरमध्ये भरड वाटून घेतल्या. ही भरड एका ताटात पसरून ठेवली.
बेसनात मीठ, कडक तेलाचे मोहन, ओवा, फ्रूट सॉल्ट घालून भज्याच्या पिठासारखे भिजवून घेतले.
बटाट्याचे मिश्रण मिरच्यांमध्ये भरून त्या नीट बंद केल्या.
mirchi2.jpg

आता त्या बेसनाच्या पिठात बुडवून मग लाह्यांच्या भरडीत घोळवून घेतल्या.
त़ळून घेतल्या.
सोबत लसणाची चटणी आणि टमाटो केचप.
mirchi6_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाह्या फक्त आयटम साँग पुरत्याच आल्यात. >>>> पण त्यावरच पुर्ण सिनेमा बाजी मारुन गेला आहे. मस्त दिसताहेत मिरच्या.

बनवायला सोप्या, घरात सहज उपलब्ध असणार्या पदार्थांच्या आणि यम्मी ! १० पैकी १०.

लाह्या फक्त आयटम साँग पुरत्याच आल्यात. >>>> पण त्यावरच पुर्ण सिनेमा बाजी मारुन गेला आहे. मस्त दिसताहेत मिरच्या.

बनवायला सोप्या, घरात सहज उपलब्ध असणार्या पदार्थांच्या आणि यम्मी ! १० पैकी १०.

Pages