Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण आता काही महीन्यातच तिचं
पण आता काही महीन्यातच तिचं पोट दिसू लागेल, घरात इतक्या अनुभवी बायकांना शंका नाही का येणार ?>>>
अहो झी टीव्हीची प्रेग्नन्सी आहे एवढ्या लवकर कसे पोट दिसेल?
आणि १२ व्या महिण्यात जान्हवी बाळंत झाली ते वाढलेले ३ महिने इकडे अॅडजस्ट करायचे ठरविलयं झी ने! तुम्हाला फारच प्रश्न पडतात बुवा!
त्यांचं गणित कच्च आहे. काल
त्यांचं गणित कच्च आहे. काल गीताकाकूने विचारलं नाही का? कितवा महिना ते? काय उत्तर दिलं मोनिकाने? ती सांगेल मी मोजायला विसरले. दोघे गायनॅक सांगतील कॉम्प्लिकेशन्स आहेत.
ते जान्हवीचे महिने अॅडजस्ट करायची कल्पना मस्त आहे.
प्रिमॅच्युअर डिलिव्हरी पण
प्रिमॅच्युअर डिलिव्हरी पण लग्नानंतर साडेपाच महिन्यांनी होणार आणि तरी बाळाची पूर्ण वाढ आणि ते गुटगुटीत असणार का??
पण आता काही महीन्यातच तिचं पोट दिसू लागेल, घरात इतक्या अनुभवी बायकांना शंका नाही का येणार ?>>> पाच महिने झाले तिला तरी पोट सप्पाटच आहे. नवव्या महिन्यापर्यंत असं कितीस वाढणारेय??
जानू एक नाही तर, दिड वर्ष
जानू एक नाही तर, दिड वर्ष प्रेग्नंट होती.
एक प्रामाणिक शंका! दोघांचे लग्न होऊन नक्की किती महिने / वर्ष झाली?
एक प्रामाणिक शंका! दोघांचे
एक प्रामाणिक शंका! दोघांचे लग्न होऊन नक्की किती महिने / वर्ष झाली? >>> १ महिना झालाय.. काल्च्या भागातच कुणीतरि सान्गितल...
तरिहि गीताने १ की २ अस का विचारल.. तिला पण सन्शय आला कि काय?
जानू एक नाही तर, दिड वर्ष
जानू एक नाही तर, दिड वर्ष प्रेग्नंट होती.>>>
अच्छा मग उरलेले सहा महिने नंतर अॅडजस्ट होतील सर्वांना कळलयावर बाळंत होईपर्यन्त कारण मग डोहाळे जेवण कोड कौतुकसोहळे
नाही, कदाचित तीन महिने हिला
नाही, कदाचित तीन महिने हिला व तीन महिने, स्वानंदी ला असेही विभागू शकतात हं......!!
परवाच्या भागात मोनिका जे काही
परवाच्या भागात मोनिका जे काही कळवळुन बोलली त्याचे शब्द आठवत नाहीत, पण तिची बाजु मला पटली. ती काम पण चांगलं करते आणि तिचं कॅरेक्टर पण व्यवस्थित लिहिलं आहे.
ज्याची बायको लग्नाआधीच प्रेग्नंट आहे , हे त्याला घरच्या मंडळींना कळू द्यायचं नाहीए, या वरताण म्हणून ती बायको शक्य त्या सगळ्या प्रकारचे गोंधळ घालतेय, अशा नवर्याने प्रसन्न हसतमुख राहावे ही अपेक्षा जरा जास्त नाही का?>>>> भरत, पर्फेक्ट. एकदम लॉजिकल. माझंही हेच मत आहे.
कदाचित तीन महिने हिला व तीन
कदाचित तीन महिने हिला व तीन महिने, स्वानंदी ला असेही विभागू शकतात हं......!!>>>
अगदी अगदी !!!
ज्याची बायको लग्नाआधीच
ज्याची बायको लग्नाआधीच प्रेग्नंट आहे , हे त्याला घरच्या मंडळींना कळू द्यायचं नाहीए, या वरताण म्हणून ती बायको शक्य त्या सगळ्या प्रकारचे गोंधळ घालतेय, अशा नवर्याने प्रसन्न हसतमुख राहावे ही अपेक्षा जरा जास्त नाही का?>>>>>>>>>>>>> +१
परवाच्या भागात मोनिका जे काही
परवाच्या भागात मोनिका जे काही कळवळुन बोलली त्याचे शब्द आठवत नाहीत, पण तिची बाजु मला पटली. ती काम पण चांगलं करते आणि तिचं कॅरेक्टर पण व्यवस्थित लिहिलं आहे.>>> +१ मोनिकाला आता पश्चाताप होतोय असे वाटते. विक्रान्तने तिला एक सन्धी दयायला हवी. पर्त्येक वेळी तिला आरोपीच्या पिन्जर्यात उभ करण बरोबर नाही. प्रेगन्ट बाईच्या मनाचीही काळजी घ्यायची असते हे त्याला कस कळत नाही. तो बायकोच्या नाही, पण तिच्या बहीणीच्या प्रेमात मात्र पडेल. सिरीयलची थीमच तशी आहे ना.
गेल्याच आठवड्यातल्या एका
गेल्याच आठवड्यातल्या एका एपिसोडमध्ये मोनिका मानसीला म्हणालेली ना, की मी मुलाचं काहीही करणार नाही अशी तिची आणि विक्रांतची डील झालीय. तेव्हाच आजी तिथे येते आणि तिला म्हणते, "तुझ्या तोंडी हीच भाषा शोभते."
मंगळागौरीसाठी नवे दागिने मिळताच, हे घर सोडून आता मी कुठ्ठे जाणार नाही असं म्हणालेली ती.
बाकी काही असलं तरी कालच्या
बाकी काही असलं तरी कालच्या भागातला मोनिकाचा राग मला १००% पटला.
आणि नात प्रेग्नंट आहे त्याचे दिसायले हवे तितके काहीच कौतुक दिसले नाही आज्जी आजोबांच्या वागण्यात मलातरी.
म्हणजे त्यांनी काही अगदी नाचायले हवे असे नाही.. पण त्यांचे जे स्वभाव दाखवलेत सिरियलमध्ये.. त्यावरून त्यांना आता मोनिकाला कुठे ठेवु कुठे नको असे वाटणे अपेक्षित होते.
शिवाय ती जेवणाच्या ताटावरून उठून गेली तेव्हा कोणीच तिला समजवायला गेलेले दाखवले नाही.
गरोदर बाईला असं उपाशी ठेवतात का?
आणि सगळं जावईबापुंच्या आवडीनुसार बनवणार असतील तर हिचे डोहाळे कोण पुरवणार?
(No subject)
हम्म्म, खरं आहे. वाचलं म टा
हम्म्म, खरं आहे. वाचलं म टा ला काल.
मोनिका माहेरीही स्वत:च्या
मोनिका माहेरीही स्वत:च्या वागण्यामुळे आधीपासून दोडकी दिसतेय.
खास लोकाग्रहास्तव विक्रांतला चेहरा हसरा ठेवता येईल असे सीन्स दिलेत. पण त्याला काय ते जमंना. त्याच्या चेहर्याचे स्नायू त्या एरंडेल तेल प्याल्याच्या मुद्रेत आखडलेत बहुतेक.
विक्रांतच्या मित्राचे नाव
विक्रांतच्या मित्राचे नाव प्लायवूड. !!!! मग हा कोण? सागवान?
परवा शर्वरी लोहोकरे ग्रेट अभिनय. दार बंद करोन मग रडणे. चेवाने राग अपमान व्यक्त करणे. धुमसत राहणे. परफेक्ट. अश्या किती बायका असतात नाहीका?
आजीच्या थयथयाटाला मोनिका
आजीच्या थयथयाटाला मोनिका घाबरते . ( तिचा अभिनय मस्त होता)
ती विक्रान्तला म्हणते , आजीला आपलं गुपित कळल तर???
विक्रान्त म्हणतो , आपलं नाही , तुझं .
काय हे ??
एक्तर स्वतः तिला या सिच्युएशन मध्ये टाकलयं . ( म्हणजे चूक तिची आहे हे कबूल , पण तरीही )
स्वस्ति + १११
स्वस्ति + १११
एक्तर स्वतः तिला या सिच्युएशन
एक्तर स्वतः तिला या सिच्युएशन मध्ये टाकलयं >> अहो तसे नाही ती जर स्वतःला जबाबदार समजत नाही. व चुकीची जबाबदारी घेत नाही. खरे बोलत नाही. तर तो मदत का करेल? हेच त्याचे दुखणे आहे. शी शुड कम क्लीन . देन ऑल हेल्प इज राइट अॅट हँड. जसे मानसी म्हणते ना आता आपण काय करायचे? हे मोनिका कडून अभिप्रेत आहे. पण ते होत नाही आहे. ती खूप सेल्फ सेंटर्ड विचार करत आहे.
सुटकेचा. प्रांजल पणा नाही तिच्यात.
मोनिकाने काकीला सिक्रेट
मोनिकाने काकीला सिक्रेट सांगितलं का ?
अहो तसे नाही ती जर स्वतःला
अहो तसे नाही ती जर स्वतःला जबाबदार समजत नाही. व चुकीची जबाबदारी घेत नाही. खरे बोलत नाही. तर तो मदत का करेल? हेच त्याचे दुखणे आहे. >>>>
नाही बरं का अमा. तिने सगळ्यात पहिल्यंदा कन्फेस केलं तेव्हाच चुक झाली हे मान्य केलं होतं. नंतरही लेटेस्ट एका एपिसोडमधे ती म्हणाली चुकलं माझं. I was drunk. This happened unknowingly. Let us correct. pl forgive and accept me. अशा अर्थाचं काही. पण हिरोच्या बेसिकमधेच लोचा आहे. त्याला काय करायचं आहे ते त्याला समजतच नाहीए. ( किंवा लेखकाच्या म्हणु हवं तर
)
आणि खरं बोलण्याची अपेक्षा हिरोने कशी बरं करावी? तो सुद्धा त्याच्या फॅमिलीशी खोटंच तर बोलला. ती एकदा आवेशात खरं सांगायला निघाली तेव्हा त्याने का थांबवलं? त्यानेच नकळत स्वतःचा सॉफ्ट पॉइंट तिला दाखवुन दिला. आता ती गैरफायदा घेते आहे.
राहता राहिलं चुकीची जबाबदारी घेणं,.... तिनं बाळाची जबाबदारी घ्यावीच हे तो का ठरवणार ? आईला काही कारणाने बाळ नको असेल तर दुसर्याच माणसाने तो अट्टाहास करणं चुकच. ( आईला धोका असेल तर समजु शकतो, पण लग्नावेळेस ती किति महिन्यांची प्रेग होती हे कळत नाहीए मला).
त्यानी मदत करावी अशी तिची अपेक्षा नाहीच, फक्त त्याने मधे टांग घालु नये. ती प्रेग्नन्सी टर्मिनेट करायला गेल्यावर खो घालु नये एवढीच तर तिची अपेक्षा होती.
I am not defending Monica, but it is not right to project her as a villain/vamp. कथा आणि कथालेखकाचं लॉजिकच इतकं फुसकं आहे.
आई आहे तो पर्यंत रोज पहाणार आणि टिका करत रहाणार. बाकी स्टारकास्ट आणि सगळ्यांचं अॅक्टिंग तरी छान आहे.
थोडे अवांतर आमच्या भाडोत्रीचे
थोडे अवांतर
आमच्या भाडोत्रीचे लग्न मे महीन्यात झाले आणी परवा बाळ.
ते सर्वांना सांगायचे कि चौथा संपुन पाचवा लागलाय
कदाचीत त्याना प्रिमॅच्युर डिलीवरी दाखवायची होती पण खरेच झाली.
( आईला धोका असेल तर समजु
( आईला धोका असेल तर समजु शकतो, पण लग्नावेळेस ती किति महिन्यांची प्रेग होती हे कळत नाहीए मला).>> लग्नाच्या वेळी ती साडे तीन महिन्यांची प्रेग्नंट होती.
आत्येकडे ती प्रेग्नन्सी टर्मिनेट करायला गळ घालते, तेव्हाच्या रिपोर्टनुसार तिच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे तेव्हा कॅन्सल करतात दोघीही.
मानिनी, चौथ्या महिन्यात डिलिव्हरी आणि बाळ सुखरुप आहे?? पण इतक्या कमी महिन्यांमध्ये बाळाची वाढ पूर्ण कशी होईल??
या शिरेलीत पण असंच काहीतरी दाखवणारेत असं वाटतंय.
< ती एकदा आवेशात खरं सांगायला
< ती एकदा आवेशात खरं सांगायला निघाली तेव्हा त्याने का थांबवलं?>
माझ्या आठवणीनुसार, विक्रांत आणि मानसी मोनिकाच्या सिक्रेटबद्दल बोलत असताना मोनिका ऐकते. मग जोशात मीच सगळ्यांना सांगते असं म्हणते. तिने आधीच थोडा ड्रामा केलेला असल्याने हॉलमध्ये सगळा ऑडियन्स जमलेलाच असतो. पण त्यांच्यासमोर आल्यावर तिचा स्टॅच्यु होतो.
मोनिकाला या एकाच कारणामुळे निगेटिव्ह दाखवलेलं नाही. तिच्यात अन्य अनेक सद्गुण दाखवलेत.
खटकलेली गोष्ट : घरात दोन दोन गायनॅक असताना मोनिकाची प्रेग्नन्सी चक्कर येणं, मळमळणं, पायांना सूज येणं या लक्षणांवरच कन्फर्म केली गेली.
अर्थात तिच्या टेस्ट्स करा असं नंतर आजींनी सांगितलं.
<त्यानी मदत करावी अशी तिची अपेक्षा नाहीच, फक्त त्याने मधे टांग घालु नये. ती प्रेग्नन्सी टर्मिनेट करायला गेल्यावर खो घालु नये एवढीच तर तिची अपेक्षा होती. >
हेही बरोबर नाही असं वाटतं. नवराच गायनॅक तर त्यानेच बिनबोभाट करावं अशीच अपेक्षा होती. मग तो नाही म्हणतो हे कळल्यावर ती स्वतः मार्ग काढणार होती. पण त्यातल्या रिस्कची तिला किती कल्पना होती याबद्दल शंका आहे.
विक्रान्त मोनिकाला तिच्या
विक्रान्त मोनिकाला तिच्या मैत्रीणीन्ना भेटु देत नाही, पण स्वतः मात्र मित्राबरोबर enjoy करतोय. ति प्रेग्नन्ट असली म्हणून काय झाले ति तिच्या मैत्रीणीबरोबर बाहेर नाही का जाऊ शकत? का विक्रान्तला असा सन्शय येतोय की ती मैत्रीणीबरोबर डिस्कोथेक ला जाईल आणि रात्री उशिरा परत येईल म्हणून?
खर तर तिला विक्रान्त बरोबर फिरायला जायच होत, पण विक्रान्तने रुड वागून तिचा सगळा मू़ड spoil केला. काय problem आहे त्याला मोनिकाबरोबर फिरायला जायला?
मोनिका आता विक्रान्तच्या प्रेमात पडली आहे असे वाटते. सो विक्रान्तने तिला बायको म्हणून एक सन्धी द्यायला हवी.
I am not defending Monica,
I am not defending Monica, but it is not right to project her as a villain/vamp. >>> सहमत
मोनिकाला या एकाच कारणामुळे निगेटिव्ह दाखवलेलं नाही. तिच्यात अन्य अनेक सद्गुण दाखवलेत.>>>> काही वेळेला ती चान्गली वाटते. एकीकडे ती म्हणते मला घरची कामे आवडत नाही. पण ती तिच कामे मनापासून करतानाही दाखवतात. आता हे चान्गल वागणे नाटक आहे कि नाही ते पुढे कळेलच.
परवा शर्वरी लोहोकरे ग्रेट
परवा शर्वरी लोहोकरे ग्रेट अभिनय. दार बंद करोन मग रडणे. चेवाने राग अपमान व्यक्त करणे. धुमसत राहणे. परफेक्ट. अश्या किती बायका असतात नाहीका?>>> मला सुद्दा आवडला तिचा परवाचा अभिनय. अगदी realistic होता.
तुमच्या टीव्हीत एडिट करून
तुमच्या टीव्हीत एडिट करून दाखवतात वाटतं?
काल परवाच मानसीने गीताकाकीला मोदक करायला बोलवून कोपगृहातून बाहेर काढलं, तेव्हा मोनिकाने मानसीला दम दिला की आमच्या घरच्या भानगडीत नाक खुपसायचं नाही. मग आजींना जाऊन सांगितलं की मीच मानसीला पाठवलेलं गीताकाकीकडे.
परवा शर्वरी लोहोकरे ग्रेट
परवा शर्वरी लोहोकरे ग्रेट अभिनय. दार बंद करोन मग रडणे. चेवाने राग अपमान व्यक्त करणे. धुमसत राहणे. परफेक्ट. अश्या किती बायका असतात नाहीका >>>> + १००००
तिचं नंतर अलिप्त रहाणं पण पटलं .
वाईट असली तरी मोनिका जास्त रिअल वाटते .
मानसी सारखी गुलाबजाम नाही आहे . ग्रे शेड्स असाव्यात .
काल गीताकडे प्रांजलपणे कबूल करते की माझे एरवीही मूड स्विन्ग होतच असतात .
Pages