खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या अभिज्ञाला नेहेमीच निगेटिव्ह दाखवतात, फक्त लगोरीमध्ये positive होता रोल. चार मैत्रिणींची स्टोरी होती त्यात हि एक होती.

मोनिकाला शॉपिंग करायची खुमखुमी आली ह्याबद्दल मला आश्चर्य नाही वाटलं पण कोणी तिला थांबवलं का नाही ह्याच मात्र नवल वाटलं.

दक्षे, हो तो निर्मला चा नवरा ए.
काहीही............ आणि गुलाबजाम सारखी यांच्या कडेच का पडीक असते ..? 'तै' ची काळजी घ्यायला?
आणि मॉनिका ला तेच ते २ ड्रेसेस आहेत का? निळा व लाल...? आणि पँट सारख्या फिटींग च्या भिकार लूज प्रिंटेड सलवारी !!!
आणि क्रेडीट कार्ड निमूट्पणे काढून द्यायला विक्रांत ची अशी कोणती मजबूरी आहे? आमचा नवरा तर काही अपराध नसतानाही असं कार्ड विना तक्रार देत नाही!!!

आणि क्रेडीट कार्ड निमूट्पणे काढून द्यायला विक्रांत ची अशी कोणती मजबूरी आहे? आमचा नवरा तर काही अपराध नसतानाही असं कार्ड विना तक्रार देत नाही!!!
>> अगदी अगदी. मेषपात्र आहे निव्वळ. खरा नवरा निदान अग्ं जरा संभाळून खर्च कर. वगैरे काही टिप्पणी करेल. आणि प्रेगनन्सी एंजॉय करणार म्हणून शॉपिन्ग? कसलं ते दाखवले नाही. घरातले तर ती काही आणत नाही. म्हणजे ग्रोसरी भाजी, स्वतः ला काही घेत नाही तेच ते दोन ड्रेस. बाळा साठी काही घ्यायचे तर तिला ती काही उत्सुकताच नाही. नक्की शॉपिन्गचे कारण सांगून जुन्या बॉफ्रेला भेटली असेल.
तोच बाळाचा ख् रा बाबा?! एकदा आजीने सर्व प्रॉपर्टी ह्या बाळाच्या नावे केली की हा खरा बाप येइल.

कय त्या सिगापोरच्या गिफ्ट्स? विमानात कोणीतरी विसरून गेलेले उचलून आणल्या वाणी. आणि जावयाकडून बरे घेतात हे लोक? त्यांच्या घरी खरेच खूप फ्रेम्स आहेत. मी १७ तरी मोजल्यात आताप्रेन्त.

आमचा नवरा तर काही अपराध नसतानाही असं कार्ड विना तक्रार देत नाही!!!>> +१. Biggrin

मेषपात्र म्हणजे काय???

काल तो नानूमामा काळा गॉगल घालून मिरवत होता, मला वाटल आता Background ला 'काला चश्मा' वाजवतायत की काय?

आणि क्रेडीट कार्ड निमूट्पणे काढून द्यायला विक्रांत ची अशी कोणती मजबूरी आहे? आमचा नवरा तर काही अपराध नसतानाही असं कार्ड विना तक्रार देत नाही!!!>>> अगदी अगदी. एरवी विक्रांत मोनिकाला बायको मानायला तयार नसतो. तिच्यावर विश्वास नसल्याचा दावा करतो. मग तिला क्रेडीट कार्ड कुठल्या नात्याने आणि का देतो? Uhoh

नक्की शॉपिन्गचे कारण सांगून जुन्या बॉफ्रेला भेटली असेल.>>> नवीन प्रोमो बघितला. मोनीका शॉपिन्गला जाते, ती घरी अजुन आलीच नाही. सगळे काळजीत असतात. Maybe, ती पुन्हा पळून गेली असेल किव्वा नक्कीच जुन्या बॉफ्रेला भेटायला गेली असेल.

मोनिका आणि विक्रांतची प्रेमकहाणी दाखवली असती तर >>> +१ खर तर टायटल song आणि त्या गाण्यामध्ये दाखवलेल्या चित्रावरुन सिरियल ची कथा विक्रांत-मोनिकाचीच आहे अस वाट्तय. अशी बोल्ड पण वेगळी प्रेमकथा दाखवली असती तर काही हरकत नव्हती. बहिणीच character उगाचच ओढून आणल्या सारख वाटत सिरियलीत.

अरे पण असं दुसर्‍याचं क्रेडीट कार्ड वापरलेलं चालतं का??
सिरीटवर सही करावी लागते ना? इथेतर बर्‍याचदा क्रेडीट कार्डबरोबर आयडीपण विचारतात. मी भारतात कधी क्रेडीटा कार्ड वापरलं नाहीये. तिथे नाही का लागत ?

पराग, भारतात १ सप्टेंबर २०१५ पासून RBI ने pin बेस्ड क्रेडिट कार्ड अनिवार्य केली आहेत पण जी कार्ड्स त्या आधी इश्यू झालेली आहेत त्यांना pin लागत नाही आणि कोणीही वापरू शकतात. (त्यामुळेच कार्ड चोरीचे प्रमाण वाढले होते)

फ्रॉक स्टाईल घेरदार कुडते....... बाकी काही मटिरीयलच नाही! >>> असं कसं? कुडत्यांचं इतकं सारं ड्रेस मटेरिअल आहे की! Proud

सो मोनिकाचे खरे खरे रुप कळले. तिला marriage material मुलगा हवा होता जो तिचे सगळे ऐकेल. तिचे काही प्रेम-वेम नाही विक्रान्तवर. तिला श्रीमन्त सासर हवे होते. तिला प्रेगनन्सी बद्दल लग्नाआधी पासूनच माहीत असेल, म्हणूनच तिने Gynec मुलाला होकार दिला असावा लग्नासाठी. पण तिचा डाव फसला. असच जर आहे तर मग तिने "मला विक्रान्तच प्रेम हवय, त्याने मला वेळ दयावा ' अशी नाटके कशाला करायला हवी? तिला एवढ श्रीमन्त सासर मिळतय ते तिने enjoy कराव, विक्रान्तच्या वागण्याकडे दुर्लक्ष कराव. आधी मला तिला आपली चूक कळली अस वाटत होत, पण नाही तो माझा गैरसमज होता.

खरंच भेसूर पार्श्वसंगीत.......! एका बाईच्या आवाजातलं विव्हळणं....!
Happy
आणि मला वाटतं की गीता काकी मुद्दाम तिच्या मनातलं काढून घेत्येय. आणि ही बावळट !

विक्रांतच्या चेहर्‍यावर कायम कॉन्स्टीपेशन झाल्यासारखे भाव का असतात?
खुलता कळी खुलेना आहे की 'खुलता नळी खुलेना' आहे.:खोखो:

एक अतिशय असुरी विनोद सुचलाय
आत्या आणि विक्रांतमधले संवाद
आत्या: " विक्रांत, मला...तुझ्याशी थोडं...महत्वाचं बोलायचंय " (चेहर्‍यावर खुप सारं टेन्शन)
विक्रांतः आता नको, आता वेळ नाहीए
आत्या: मला.... आताच बोलायचंय
विक्रांतः हं,.. बोल
आत्या: आज पण...नाही झाली ना"....
विक्रांतः एक मोठा पॉझ घेऊन, "ह्म्म्म, चार चमचे एरंडेल घेऊनही.....नाहीच झाली"

बॅग्राउंड ला तेच विव्हळल्यासारखं भेसूर म्युझीक
Proud

आणि मला वाटतं की गीता काकी मुद्दाम तिच्या मनातलं काढून घेत्येय. आणि ही बावळट ! >>>> जनरली नायिका बावळटपणा करतात. इथे तर खलनायिकाच बावळट निघाली. कोणी सान्गितल हिला स्वतःच्या पायावर धोन्डा पाडून घ्यायला? इतक श्रीमन्त सासर मिळालय तिला, गप्प बसाव ना माणसाने. पण नाही!

विक्रांतच्या चेहर्‍यावर कायम कॉन्स्टीपेशन झाल्यासारखे भाव का असतात?
खुलता कळी खुलेना आहे की 'खुलता नळी खुलेना' आहे.खो खो

एक अतिशय असुरी विनोद सुचलाय
आत्या आणि विक्रांतमधले संवाद
आत्या: " विक्रांत मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय "
विक्रांतः आता नको, आता वेळ नाहीए
आत्या: मला आताच बोलायचंय
विक्रांतः हं, बोल
आत्या: आज पण नाही झाली ना"....
विक्रांतः एक मोठा पॉझ घेऊन, "ह्म्म्म, चार चमचे एरंडेल घेऊनही नाहीच झाली">>> पिकू पार्ट २ Lol

खरंच भेसूर पार्श्वसंगीत.......! एका बाईच्या आवाजातलं विव्हळणं....!>>> सहमत

>>>विक्रांतच्या चेहर्‍यावर कायम कॉन्स्टीपेशन झाल्यासारखे भाव का असतात?
सहन ही होत नाही आणि सांगताही येत नाही ... Proud

ती मोनिकाच काम करणारी तीला दिलेल काम चोख करतेय, तिचा अभिनय आवडला मला, "विक्रात "ला बदला , सतत सुतकी भाव घेवुन असतो , बळच हसतो, डॉक्टर म्हणजे गन्भिर चेहरा ठेवुन वावरा अस कूणि सान्गितल्य?

गीताने बातमी अलका पर्यन्त पोचवली वाटत अस आजच्या प्रोमोवरुन दिसतेय. आता हळूहळू ही बातमी अख्खया दळवी घराण्याला कळेल.

ती मॅथेमेटिकली चॅलेंज्ड आहे. सप्टेंबर ते जानेवारी किती महिने ते मोजायला कॅलेंडरची पानं उलटत होती. Wink

यादी केली नसती, तर पुढचा सस्पेन्स कसा निर्माण होणार होती. मुलं भांडायला लागली की काहीतरी क्रायसिस होतोच होतो, हा हिंदीमराठी मालिकांसाठी अलिखित नियम आहे.

Pages