Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छे छे विकीचे कसं असेल तो आणि
छे छे विकीचे कसं असेल तो आणि मानसी सर्वगुणसंपन्न, सद्गुणांचे पुतळे दाखवणार, मोनिका जबरदस्त व्हिलन. ग्रे शेड वगैरे असं नसतंच बहुतेकदा.
टोकाची व्हिलन असलेली व्यक्तीरेखा सिरीयल संपत आली की उपरती होऊन सद्गुणाची पुतळी होते.
आतापर्यंत हिरवीण सोशिक
आतापर्यंत हिरवीण सोशिक दाखवायचे. नवर्याने/सासर्च्यानी कितीही बोलले, काहीही केले तरी सहन करायची. या सिरेलीत हिरो सोसहन, अन्याय सहन करणारा आणि कोणाला न दुखावणारा आहे.
आत्याचे घर हे "होणार सून "
आत्याचे घर हे "होणार सून " मधले गोकुळ घर/बंगला वाटत आहे.
नाही, जिना वेगळा आहे...
नाही, जिना वेगळा आहे...
इक्रांत डोक्यावर पडलेला आहे
इक्रांत डोक्यावर पडलेला आहे काय? काय बळजबरी चालवलीये त्या मॉनिकावर बाळासाठी. तिला नकोय मुल तर नकोय. जसं काय ह्याचंच बाळ आहे. उगाच तिसर्याच कुणाच्या बाळासाठी ह्याचा जीव अर्धा. तु तिला बायको म्हणुन स्विकारलं नाहीयेस तर तिला सोडुन दे ना. ती बघुन घेइल बाळाची काळजी घ्यायची का नाही, जन्म द्यायचा का नाही ते. उगाच चर्हाट लावलंय. येडे कुठले.
अक्षरश: या सिरियल मध्ये काय
अक्षरश: या सिरियल मध्ये काय सुरू आहे ते कळतंच नाहीये
विक्रांत अंधारात किंवा धुक्यात गाडी चालवताना अंदाज घेत घेत पुढे जातात तसा वागतोय. नक्की करायचंय काय याला? तेच कळत नाहिये :रागः
विक्रांत डोक्यावर पडला आहे
विक्रांत डोक्यावर पडला आहे नक्कीच !
सदा आपला दुर्मुखलेला चेहेरा घेऊन, एकाच पद्धतीचे पँट शर्ट घालून (जराही डॉक्टर सारखं न वाटता) वावरणं!...... आणि ती म्हणते ," विक्रांत, मी इतकी वाईट आहे का?".... कमॉन!!! म्हणजे जी चूक तू केली आहेस त्याबद्दल जराही गिल्ट नाही आणि काहीच वाटत नाही वरुन म्हणत्ये...मी इतकी वाईटे का?
आणि ती खूपच इरिटेटींग्ली "प्लीज, प्ल्लीज , प्ली SS ज " म्हणत्ये..... शंभरदा तेच ते........कोण लिहीतं असे रिपीटेटिव्ह डायलॉग्ज...आणि डायरेक्टर वगैरे कुणाच्या लक्षातही येत नाही...काही एडिटींग, रिव्ह्यू वगैरे करतात की नाही ही लोकं टेलिकास्टच्या आधी?
'प्ली sss ज' आत्या...मला सोडवा न यातून..प्लीज........................प्लीज मला विक्रांत पासून दूर नका करु, प्लीज.
प्ली sss ज छळु नका प्लीज
प्ली sss ज छळु नका प्लीज
आत्याचे घर हे "होणार सून "
आत्याचे घर हे "होणार सून " मधले गोकुळ घर/बंगला वाटत आहे.>>> शेवटी जान्हवीच्या आईची "गोकुळात" राह ण्याची ईच्छा या जन्मात पुर्ण झालीच.
इक्रांत डोक्यावर पडलेला आहे काय? काय बळजबरी चालवलीये त्या मॉनिकावर बाळासाठी. तिला नकोय मुल तर नकोय. जसं काय ह्याचंच बाळ आहे. उगाच तिसर्याच कुणाच्या बाळासाठी ह्याचा जीव अर्धा. तु तिला बायको म्हणुन स्विकारलं नाहीयेस तर तिला सोडुन दे ना. ती बघुन घेइल बाळाची काळजी घ्यायची का नाही, जन्म द्यायचा का नाही ते. >>>> सहमत
कमॉन!!! म्हणजे जी चूक तू केली
कमॉन!!! म्हणजे जी चूक तू केली आहेस त्याबद्दल जराही गिल्ट नाही आणि काहीच वाटत नाही वरुन म्हणत्ये...मी इतकी वाईटे का?>>> मान्य आहे तिने चुक केलीय ,पण विक्रान्त जरा मोनिकावर जरा जास्तच अन्याय करतो असे वाटतेय. निदान या़क्षणी मला मोनिका बिच्चारी वाटतेय.
काय बळजबरी चालवलीये त्या
काय बळजबरी चालवलीये त्या मॉनिकावर बाळासाठी. तिला नकोय मुल तर नकोय. जसं काय ह्याचंच बाळ आहे. >>> मग तुम्हाला मुलीचा गर्भ असताना गर्भपात केलेला मान्य आहे का? म्हणजे गर्भ दुसर्या कोणाचा आहे, त्यांना तो नकोय मग कायद्याने सक्ती का करावी ?
कायद्याचं राहू द्या पण काही माणूस म्हणून तरी बघा. आपण मजा करायची आणि त्याची जबाबदारी मात्र उचलायची नाही. आणि जो कोणी ती जबाबदारी घ्यायला बघतोय त्यालाच वेड्यात काढायचं ?
मोनिकाने आत्याला, म्हणजे
मोनिकाने आत्याला, म्हणजे साक्षात जान्हवीच्या आईला
, तुम्ही उठसूट माहेरी येता असं सुनावल्यावर ती गप्प बसेल का?
शिवाय विक्रान्तलाही त्याच्या घरच्यांसमोर embarass करायची एकही संधी सोडत नाही.
मी इतकी का गयीगुजरी आहे?
मी इतकी का गयीगुजरी आहे?
हॉस्पिटलमध्ये पेशंट/स्टाफ कोणी नाही अशीही वेळ असते? पेशंटना अॅडमिट करून घेत नाहीत का?
तिला नकोय मुल तर नकोय. जसं
तिला नकोय मुल तर नकोय. जसं काय ह्याचंच बाळ आहे. उगाच तिसर्याच कुणाच्या बाळासाठी ह्याचा जीव अर्धा.>> किती साधं सरळ सोपं आहे ना
नख वाढलंय, नकोय? कापून टाक! हा का ना का!!
This scenario is different.
This scenario is different. And one should not have kids when one is not ready for it. Someone so immature will just spoil the life of that kid - its better not to have kid in this scenario.
Was she engaged already when she got pregnant? If not, shehas not wronged her husband too. It is a mistake to not take precaution - but it's not offense to have physical act with anyone u wish too when u r single.
नानबा, तुमच्या पूर्ण पोस्टला
नानबा, तुमच्या पूर्ण पोस्टला अनुमोदन.
नानबा, शारीरिक संबंध कोणाशी
नानबा, शारीरिक संबंध कोणाशी कधी आला हेही तिला 'नेमकं' आठवत नाहीये.... एवढाच प्रॉब्लेम आहे फक्त
Manjudi, past is past. She
Manjudi, past is past. She was single and she did what she wanted to that time.
They should concentrate on now and forward aspects, expectations from each other and their relations etc. Its really stupid to be discussing about having kids when they do not know how their relationship will shape based on the pregnancy fact.
Stupid - for serial folks and not for us,maaybolikars
इंग्लिश मधे लिहीलं तरी मूळ
इंग्लिश मधे लिहीलं तरी मूळ मुद्दे कसे दुर्लक्षित करणार?

आपल्या मनात पिढ्यानपिढ्या जपलेल्या शुचितेच्या , नीतीच्या कल्पनाच तर इथे डळमळीत होताहेत. तरीही "आधी जे झालं ते झालं.." असं म्हणून सोडून द्या म्हणणं हा शुद्ध वेडगळपणा *(किंवा जाणूनबुजून ओढलेले झापड) आहे!
अर्थात, मला वाटतं की नव्या पिढी मधे ही कंसेप्ट जरा डायल्यूटेडच आहे!
Its really stupid to be
Its really stupid to be discussing about having kids when they do not know how their relationship will shape based on the pregnancy fact.>> गेले ७-८ भाग पाहिलेले नाहीत त्यामुळे याबद्दल मी काही लिहू शकत नाही.
पण पास्ट इज पास्ट म्हणत मोनिकाच्या बेजबाबदारपणाला व्यक्तीस्वातंत्र्याचं लेबल लावणं योग्य आहे का खरंच? 'तिला हवं ते तिने केलं' असं नाहीये ते, तिने काय केलं हे तिलाच आठवत नाहीये असं आहे.
विक्रांतने ठोस निर्णय घ्यायला हवाय हे मात्र खरं. बोअर होईल नाहीतर खूपच.
typing in English is due to
typing in English is due to browser issue..
अर्थात, मला वाटतं की नव्या पिढी मधे ही कंसेप्ट जरा डायल्यूटेडच आहे!
>> Please! I am not in 20s..
She is adult, assuming her marriage was not fixed and assuming she had a consent - I find it perfectly fine.
If she was already married/engaged/known she was pregnant when she got married - my opinions would have deferred.
I feel, stealing, killing, abusing, rape, violence in any form, not letting person be free and such things are things one should worry about and we should leave ones sexuality to himself/herself.
manjudi, I am not watching
manjudi, I am not watching serial.. I do not support casual relationships. I am just expressing my thoughts on having baby and having premarital physical relation part of it.
And even though I had a love marriage and scope - I behaved by so called traditional Indian middle class culture that time- because I didn't have so much clarity of thoughts and was influenced by thoughts given by my parents.
It is a mistake to not take
It is a mistake to not take precaution >>> नानबा, जर का ती चूक एखाद्याच्या जीवावर ऊठत असेल तर तिला शिक्षा नको का? तसे असेल तर न्यायव्यवस्था तरी कशाला हवी?
मी ही मालिका बघत नाही पण इथे वाचून जेवढे कळले आहे त्यावरून नायक त्या अजून जन्माला न आलेल्या जीवाला वाचवायचा प्रयत्न करतोय, जे माझ्या दृष्टीने खूप चांगले काम आहे. अशा चांगल्या कामालाच नावे ठेवली तेंव्हा मला गम्मत वाटली.
Someone so immature will just spoil the life of that kid >>> जगात स्त्रीयांवर अत्याचार होतात म्हणून या समाजात मुलीने जन्मच घेऊ नये असे कोणी म्हटले तर स्त्रीभ्रूणहत्या समर्थनीय ठरते का?
नानबा, लग्नाआधीचे शारीरिक
नानबा, लग्नाआधीचे शारीरिक संबंध चुकीचे आहेत असं माझंही मत नाही, फक्त ते स्वातंत्र्य उपभोगताना परीणामांची कल्पना सर्वसाधारणपणे त्या प्रत्येकाला असते असं गृहितक आहे.
नानबा, लग्नाआधीचे शारीरिक
नानबा, लग्नाआधीचे शारीरिक संबंध चुकीचे आहेत असं माझंही मत नाही, फक्त ते स्वातंत्र्य उपभोगताना परीणामांची कल्पना सर्वसाधारणपणे त्या प्रत्येकाला असते असं गृहितक आहे................
यावर काय बोलणार?
असे विचार करणारे लोक जर असतील तर पुढचा संवाद व्यर्थ आहे. मी फारच बॅकवर्ड व काळाच्या मागे आहे असे मला वाटू लागले आहे!
बाबारे! मुलीचा गर्भ काय, नखं
बाबारे!
मुलीचा गर्भ काय, नखं कापणं काय, लग्नाआधीचे संबंध काय, काय च्या काय
मला फक्त एवढं म्हणायचय की मोनिकाला बायकोचा दर्जा न देता तिला बाळाला जन्म देण्याची सक्ती हा का करत आहे? तिने तुला फसवलंय ना तर तिला सोडुन द्यायचं ना. तर सोडतही नाही. ती बघेल की तिचं काय ते शेण खायचं का माती ते.
जाउदे. उगीच डोक्याला ताप.
बर्याच शीरेल नाही बघत पण
बर्याच शीरेल नाही बघत पण त्यावरची ईकडची चर्चा मात्र वाचते मजा येते खुप
बाकी चालु द्या तुमचे....
मला फक्त एवढं म्हणायचय की
मला फक्त एवढं म्हणायचय की मोनिकाला बायकोचा दर्जा न देता तिला बाळाला जन्म देण्याची सक्ती हा का करत आहे? तिने तुला फसवलंय ना तर तिला सोडुन द्यायचं ना. तर सोडतही नाही. ती बघेल की तिचं काय ते शेण खायचं का माती ते.
जाउदे. उगीच डोक्याला ताप.
>>>>>>>>>>>>
हो ना..
तिला तर डिवोर्स द्यायला पण विशेष प्रॉब्लेम नाहिये..
मग हा उगाच तिला बायको आई बनायला भाग का पाडतोय..
काल दाखवलं अबॉर्शन केलं तर मॉनिकाच्या जीवाला धोका आहे
विक्रांत ने त्याचा प्लॅन सांगावा एकदाचा मग आपण सुखी
माझा बेसिक प्रश्न ...
अशी प्रेग्नंट लग्न झालेली मुलगी .. रडका हिरो .. सुरुवातिलाच येवढे प्रॉब्लेम ...
अशी स्टोरी घ्यावी असं का वाटल असेल कुणाला?
रहावलं नाही आणि वेळ आहे
रहावलं नाही आणि वेळ आहे म्हणून-
माधव, तुम्हाला इथे स्त्रीभ्रुण हत्या वैगेरे कुठे दिसलं?
मंजुडी, मी तिने बाळ अबोर्ट करावच असा काही अर्थ निघेल असं लिहिलेलं नाहीये नक्कीच. मग
<<<<<<<<<किती साधं सरळ सोपं आहे ना स्मित
नख वाढलंय, नकोय? कापून टाक! हा का ना का!!>>>>>>>>>> ह्या प्रतिसादाचं प्रयोजनच कळलं नाही.
इक्रांत नको इतका रीअॅक्ट होतोय. तिने तिच्या चुकीने क्रीयेट केलेला प्रॉब्लेम आहे. हा का तिला सांभाळुन घेतोय नेहमीच. घरातल्यांसमोर वैगेरे. तिची चुकी, बेजबाबदारपणा. लेट हर फेस.
पण नाही. नको तितकं चांगलं असायलाच हवं नै का. (अति गोडाने ओकारी आलेली बाहुली)
म्हणुनच मला आत्याचं कॅरेक्टर पटतंय. अशी गोष्ट कळल्यानंतर एखादी आत्या/ मावशी त्या मुलीला सरळ जायलाच सांगणार. तिचे डोहाळे पुरवत बसणार नाही.
<<<<<<<<< पास्ट इज पास्ट म्हणत मोनिकाच्या बेजबाबदारपणाला व्यक्तीस्वातंत्र्याचं लेबल लावणं योग्य आहे का खरंच?>>>>>>> आजिबातच नाही. मी व्यक्तीस्वातंत्र्य बद्दल म्हणतच नाहीये. ती बेजबाब्दार आहे आणि तिने एकप्रकारे त्याची फसवण्युक केलेली आहे. मग तिला मोठेपणा करुन लग्न विधि पुर्ण करुन, घरी आणुन, घरी ठेवुन घेउन, बायकोचा दर्जा न देता, तिची इच्छा नसतानाही तिसर्याच कुणाचं (कूणाचं ते तिला माहीतही नाहीये बहुतेक) मुल तु जन्माला घातलंच पाहिजेस अशी जबरदस्ती करणं, त्यासाठी तिच्यावर वॉच ठेवणं, तिला घराबाहेर पडु न देणं इजन्ट इट टु मच? जस्ट लीव हर अॅन्ड लेट हर फेस हर प्रॉब्लेम.
बाकी, नखासारखं मुलं अबोर्ट करणं, स्त्रीभ्रुण्हत्या, कायदा काय म्हणतो वैगेरे मला म्हणायचंच नाही. बीहेव लाइक नॉर्मल माणसं. असं त्या इक्रांतला सांगा.
हुश्श्! उगाच सेंटी होतंय पब्लिक.
अत्यंत फालतू सिरियल. अग्गबाई
अत्यंत फालतू सिरियल.
अग्गबाई अग्गबाई करत सविता प्रभुणे नुसती इकडे तिकड्दे कर्ते
नानुमामा फक्त आतापर्यंत एकच सेन्सिबल वाक्य बोल्लय की हिचं(मानसीचं) लग्न व्हायला हवं होतं विक्रांत शी.
मॉनिकाने नक्की काय खेळ खेळलाय की आत्या इतकी तिच्या बाजूने वागु लागलिये?

प्रेग्नन्सितच कसे कळते बाईच्या जिवाला धोकाय ते
Pages