स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग

दीप लावावयालागुनी । सोज्ज्वळ केला जो वन्ही ।
तो अवचटें पडला वनीं । तिडिकी उडोनी तृणांकुरीं ॥३१॥
तो अनिच्छितचि एकसरें । कोपटें आणि धवळारें ।
नगरें पुरें मंदिरें । गिरिकंदरें भस्म करी ॥३२॥
तैशी अल्पही माझी भक्ती । श्रद्धायुक्त प्रवेशल्या चित्तीं ।
संचित क्रियमाण पापपंक्ती । होय जाळिती निःशेष ॥३३॥
पूर्वपापाचे समूळ मळ । चित्तीं जडले होते प्रबळ ।
तें चित्त अतिचंचळ । विषयीं व्याकुळ सर्वदा ॥३४॥
त्यासी माझिया भक्तिलेशें । पूर्वपापाचा समूह नासे ।
जेवीं कां कर्पूर दीपस्पर्शें । निःशेष नासे तत्काळ ॥३५॥
ऐसें निर्मळ झालिया चित्त । ब्रह्म प्रकाशे सदोदित ।
मग तें नव्हे विषयासक्त । होय विरक्त अनिच्छितां ॥३६॥
_________
तेंचि माझें मूर्तीचें ध्यान । उद्धवा ऐक सावधान ।
आपुले मूर्तीचें आपण । ध्यान श्रीकृष्ण सांगत ॥४७०॥
अतिदीर्घ ना ठेंगणेपण । सम अवयव समान ठाण ।
सम सपोष अतिसंपूर्ण । मूर्ति सुलक्षण चिंतावी ॥७१॥
मूर्ति चिंतावी संमुख । प्रसन्नवदन अतिसुरेख ।
जिचें देखतांचि मुख । हृदयीं हरिख कोंदाटे ॥७२॥
जैशीं विशाळ कमळदळें । तैसे आकर्णान्त दोनी डोळे ।
भंवया रेखिल्या काजळें । तैशी रेखा उजळे धनुष्याकृती ॥७३॥
कपाळ मिरवत सांवळें । त्याहीवरी चंदन पिंवळें ।
माजीं कस्तूरीचीं दोनी अंगुळें । कुंकुममेळें अक्षता ॥७४॥
दीर्घ नासिक आणि कपाळें । लखलखित गंडस्थळें ।
मुख सुकुमार कोवळें । अधरप्रवाळें आरक्त ॥७५॥
श्यामचंद्राची सपोष कोर । तैशी चुबुका अतिसुंदर ।
मुख निमासुरें मनोहर । भक्तचकोरचंद्रमा ॥७६॥
जैसा हिरियाच्या ज्योती । कीं दाळिंबबीजांची दीप्ती ।
तैशी मुखामाजीं दंतपंक्ती । दशन झळकती बोलतां ॥७७॥
समानकर्ण दोनी सधर । स्फुरत कुंडलें मकराकार ।
ईषत् हास्य मनोहर । ग्रीवा सुंदर कंबु जैशी ॥७८॥
कंठींची त्रिवळी उभवणी । माजीं मिरवे कौस्तुभमणी ।
ते प्रकाशली दीप्ती कवण गुणीं । तेजें दिनमणी लोपला ॥७९॥
भुजंगाकार स्वभावो । चतुर्भुज आजानुबाहो ।
विशाळ वक्षःस्थळनिर्वाहो । श्रीवत्स पहा हो चिन्हित ॥४८०॥
श्रीवत्स श्रीनिकेतन । हृदयीं दोहीं भागीं जाण ।
त्रिवळीयुक्त उदर गहन । दामोदरचिन्ह त्या आलें ॥८१॥
विजू तळपे तैसा पिंवळा । लखलखित दिसे डोळां ।
तेवीं कसिला सोनसळा । तेणें घनसांवळा शोभत ॥८२॥
जैसें चांदिणें गगनामाझारीं । शुभ्रता बैसे श्यामतेवरी ।
तेवीं श्यामांगीं चंदनाची भुरी । तेणें श्रीहरी शोभत ॥८३॥

एकनाथी भागवत - श्लोक ४० व ४१ वा

शङ्खचक्रगदापद्म वनमालाविभूषितम् ।
नूपुरैर्विलसत्पादं कौस्तुभप्रभया युतम् ॥ ४० ॥

द्युमत्किरीटकटक कटिसूत्राङ्गदायुतम् ।
सर्वाङ्गसुन्दरं हृद्यं प्रसादसुमुखेक्षणम् । ॥ ४१ ॥

कौस्तुभासीं संलग्न गळा । आपाद रुळे वनमाळा ।
कटीं बाणली रत्नगमेखळा । किंकिणी जाळमाळासंयुक्त ॥८४॥
करकंकण बाहुअंगदें । शंखचक्रपद्मगदादि आयुधें ।
जडित मुद्रिका नाना छंदें । कराग्रीं विनोदें बाणल्या ॥८५॥
नाभि सखोल निर्मळ । जेथ ब्रह्मा झाला पोटींचें बाळ ।
जें लोकपद्माचें समूळ मूळ । तें नाभिकमळ हरीचें ॥८६॥
जैसे सचेतन मर्गजस्तंभ । तैसे घोंटींव साजिरे स्वयंभ ।
उभ्य चरणांची अभिनवशोभ । हरिअंगीं स्वयंभ शोभती ॥८७॥
ध्वज वज्र अंकुश देखा । यवांकित ऊर्ध्वरेखा ।
पद्मचक्रादि सामुद्रिका । चरण नेटका हरीचा ॥८८॥
त्रिकोण कांतीव इंद्रनीळीं । तैशीं साजिरीं घोटींव सांवळीं ।
पाउलें सुकुमारें कोंवळीं । आरक्त तळीं पदप्रभा ॥८९॥
पाउलावरी सांवळी प्रभा । तळवातळीं आरक्त शोभा ।
जेवीं संध्याराग मीनला नभा । तैशी शोभा हरिचरणीं ॥४९०॥
नभमंडळीं चंद्ररेखा । तैशी पादाग्रीं मांडणी नखा ।
पोटर्यां सुकुमार नेटका । जंघा सुरेखा जानुद्वय ॥९१॥
अतिशयें माजु साना । होता अभिमान पंचाननां ।
मध्य देखोनि जगज्जीवना । लाजोनि राना ते गेले ॥९२॥
अद्यापि ते झाले अरण्यवासी । लाजा मुख न दाविती कोणासी ।
पहावया हरिमध्यासी । लेप मेखलेसी ते झाले ॥९३॥
चरणीं नूपुरांचा गजर । वांकीअंदुवांचा झणत्कार ।
मस्तकीं कुटिलालकभार । सुमनीं कबर शोभती ॥९४॥
नानारत्नींट अतिगहन । मस्तकीं मुकुट देदीप्यमान ।
सर्वांगीं सुलक्षण । मूर्ति संपूर्ण हरीची ॥९५॥
जे मूर्तीची धरिल्या सोये । तहान भूक विसरोनि जाये ।
ध्यानीं आतुडल्या पाहें । सुखाचा होये सुदिन ॥९६॥
सर्वांगसुंदर श्यामवर्ण । ज्येष्ठ वरिष्ठ गंभीर गहन ।
सुमुख आणि सुप्रसन्न । मूर्तीचें ध्यान करावें ॥९७॥

शुचि, धन्यवाद. एकानाथी भागवतातील काही निवडकच ओव्या/भाग देण्यामागे काही हेतू आहे का? Happy

अश्विनी, श्रीविष्णु च्या रुपाचे वर्णन लोभस वाटले म्हणून दिले. तर कर्मांच्या कापराप्रमाणे जाळण्याचे वर्णन आवडले म्हणून दिलेले आहे. आवडतील ते श्लोक याच प्रतिक्रियेत संपादीत जाइन. तसे चालेल का? बाकी बराच क्लिष्ट पण मला स्वतःशी सुसंगत न वाटणारा खूपसा उहापोह आहे. तो मात्र देणार नाही.

हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला|
ब्रह्मचारी कपिनाथा विश्वंभरा जगत्पते||१||
कामांतका दानवारि शोकहारी दयाघना|
महारुद्रा मुख्यप्राणा मूळमुर्ती पुरातना||२||
वज्रदेही सौख्यकारी भीमरुपा प्रभंजना|
पंचभूता मूळमाया तुंचि कर्ता समस्तही||३||
स्थितीरुपे तूचि विष्णु संहारक पशुपति|
परात्परा स्वयंज्योति नामरुपा गुणातिता||४||
सांगता वर्णिता येनावेदशास्त्रा पडे ठका|
शेष तो शीणला भारी 'नेति नेति' परा श्रुति||५||
धन्यावतार कैसा हा भक्तालागी परोपरी|
रामकाजी उतावेळा भक्तारक्षक सारथी||६||
वारितो दुर्घटे मोठी संकटी धावतो त्वरे|
दयाळ हा पूर्ण दाता नाम घेताचि पावतो||७||
धीर वीर कपि मोठा मागे नव्हेचि सर्वथा|
उड्डाण अद्भुत ज्याचे लंघिले सागरा जळा||८||
देऊनि लिख्ता हाती नमस्कारी सीतावरा
वाचिता सौमित्र आंगे रामसूखे सुखावला||९||
गर्जति स्वानंदमेळी ब्रह्मानंदे सकळही|
अपार महीमा मोठी ब्रह्मादिकांसी नाकळे||१०||
अद्भुत पुच्छ ते कैसे भोवंडी नभपोकळी|
फांकले तेज ते भारी झांकीले सूर्यमंडळा||११||
देखता रुप पै ज्याचे उड्डाण अद्भुत शोभले|
ध्वजांत ऊर्ध्व तो बाहू वामहस्त कटीवरी||१२||
कसिली हेमकासोटी घंटा किणकिणी भोवत्या|
मेखळे जडीली मुक्ते दिव्य रत्ने परोपरी||१३||
माथां मुगुट तो कैसा कोटि चंद्रार्क लोपले|
कुंडले दिव्य ती कानी मुक्तमाळा विराजते||१४||
केशर रेखिले भाळी मुख सुहास्य चांगले|
मुद्रिका शोभती बोटे कंकणे करमंडीत||१५||
चरणी वाजती अंदु पदी तोडर गर्जती|
कैवारी नाथ दीनांचा स्वामी कैवल्यदायकु||१६||
स्मरता पाविजे मुक्ती जन्ममृत्युसि वारितो|
कापिती दैत्य तेजासि भुभु:क्काराचिया बळे||१७||
पाडीतो राक्षसु नेटे आपटी महीमंडळा|
सौमित्रप्राणदाताचि कपिकुळात मंडणु||१८||
दंडीली पाताळशक्ती अहीमही निर्दाळिले|
सोडविले रामचंद्रा कीर्ती हे भुवनत्रयी||१९||
विख्यात ब्रीद ते कैसे मोक्षदाता चिरंजीवी|
कल्याण त्याचेनि नामे भूतपिशच्च कापिती||२०||
सर्प-वृश्चिक पश्वादि विष-शीत-निवारण|
आवडी स्मरता भावे काळकृतांत धाकतो||२१||
संकटे-बंधने-बाधा-दु:ख-दारीद्र्य नाशका|
ब्रह्मग्रह-पीडा-व्याधी ब्रह्म्हत्यादि पातके||२२||
पुरवी सकळही आशा भक्तकामकल्पतरु|
त्रिकाळी पठता स्तोत्र इच्छिले पावती जनी||२३||
परंतु पाहीजे भक्ती संधी काही धरु नका|
रामदासा सहकारी सांभाळितो पदोपदी||२४||

दत्तात्रेय कवचम

दिगंबरम भस्म सुगंध लेपनम |
चक्रं त्रिशुलम डमरुंम गदायुधम |
पद्मासनम् योगीमुनिंद्र वंदितम |
दत्तेदी नामस्मरणेन नित्यं ||

अथ पंचोपचारे संपुज्ज ॐ द्राम, ईती १०८ वारं जपेत |

सार्थ महणजे ओळींचा सोप्या मराठीत अर्थ असलेली ज्ञानेश्वरी pdf मध्ये उपलब्ध आहे का कुठे ?
विक्रांत

अश्विनी, ती आणि अजुन काही साईट्स आहेत, त्या बघितल्या की आपण "हिंदू" म्हणून किती अडाणी आहोत आपल्याच धर्मसाहित्याबद्दल ते प्रकर्षाने जाणवते. इतकेच नाही तर या सर्वाचा अभ्यास करुन समजुन घ्यायला दहा जन्मही पुरणार नाहीत हे देखिल कळते.
त्याचबरोबर, आजवर या साहित्यापासुन दूर राहुन आपण किती अन काय काय गमावलय व आजवरचे आयुष्य व्यर्थ घालवले आहे याचीही जाणीव होते.

लिंबू, धर्मसाहित्याचा विषय निघालाच आहे म्हणून - दशग्रंथी मधले दहा ग्रंथ कुठले होते ? नेटवर वेदांगे आणि विविध पाठ असे मिळून दहा ग्रंथ असा उल्लेख वाचला होता. तो बरोबर आहे का?

म्हणजे आपल्याकडचे दशग्रंथी हे उत्तरेकडचे चतुर्वेदी झाले की Happy

॥ गर्भ रक्षणस्तोत्रम् ॥

॥ गर्भ रक्षणस्तोत्रम् ॥ एह्यहि भगवन् ब्रह्मन् प्रजाकर्ता प्रजापते । प्रगृह्णीश्व बलिं सैमां सापत्यं रक्ष गर्भिणीम् ॥ १॥ अश्विनौ देवदेवेसौ प्रगृह्णीधन् बलिं द्विमाम् । सापत्यं गर्भिणीं सैमां स रक्षतां पूजयानया ॥ २॥ रुद्रेश एकादश प्रोक्तः प्रगृह्णन्तु बलिं द्विमाम् । यक्षागमप्रीतये वृत्तं नित्यं रक्षन्तु गर्भिणीम् ॥ ३॥ आदित्य द्वादश प्रोक्तः प्रगृह्णीत्वं बलिं द्विमाम् । यस्माकं तेजसां वृद्ध्य नित्यं रक्षतु गर्भिणीम् ॥ ४॥ विनायक गणाध्यक्ष शिवपुत्र महाबल । प्रगृह्णीश्व बलिं सैमां सापत्यं रक्ष गर्भिणीम् ॥ ५ ॥ स्कन्द षण्मुख देवेश पुत्रप्रीति विवर्धन । प्रगृह्णीश्व बलिं सैमां सापत्यं रक्ष गर्भिणीम् ॥ ६॥ प्रभासः प्रभवश्यमः प्रत्यासौ मारुतोऽनलः । ध्रुवाधर धराशैव वसवेष्टौ प्रकीर्तितः । प्रगृह्णीत्वं बलिं सैमां नित्यं रक्षतु गर्भिणीम् ॥ ७॥ पितृदेवि पितृश्रेष्ठे बहुपुत्री महाबले । बुधश्रेष्ठे निशावासे निवृत्ते शौनकप्रिये । प्रगृह्णीत्वं बलिं सैमां सापत्यं रक्ष गर्भिणीम् ॥ ८॥ रक्ष रक्ष महादेव भक्तानुग्रहकारक । पक्षिवाहन गोविन्द सापत्यं रक्ष गर्भिणीम् ॥ ९॥

धन्यवाद या माहितीपूर्ण धाग्यासाठी. मी वेळोवेळी रेफर करत असते या धाग्याला. अनेकानेक आभार धागाकर्तीचे आणि प्रतिसादकर्त्यान्चे.

दत्तबावनी रंगावधुत महाराजांनी लिहीली, त्यांना माझी आई पर्सनली ओळखायची. आई बडोद्याची, त्यामुळे आईचं सर्व कुटुंब त्यांच्याकडे जायचं दर्शनाला. दत्तबावनी गुजराथमधे अनेक घरात वाचली जाते असं ऐकून आहे मी. त्याचा मराठी अनुवाद पण आहे. पण मी वाचला नाहीये. मी गुजराथीच वाचते (देवनागरी लिपीतून मिन्स लिपी गुजराथी नाही, मला गुजराथी लिपीपण वाचता येते) . मला आवडते ती. अनुभव सांगू नाही शकणार. मला मनाला बरं वाटतं एवढंच. कधीतरी वाचते, नेहेमी नाही.

@ Namrata Siddapur
मूळ दत्तबावनी गुजराती भाषेत आहे. श्री रंगावधूत महाराजांनी लिहिली आहे. त्यांचे स्थान गुजरातमध्ये नर्मदाकाठी नारेश्वर इथे आहे. ( गरूडेश्वर जवळ, बडोदा / अहमदाबाद इथून जाता येते)

दत्तबावनी हे श्रीदत्तात्रेयांचे ५२ ओळींचे स्तोत्र आहे, भजनासारखे गतिमान चालीवर म्हणता येते
सुरूवातीला श्रीदत्तात्रेयांचे वर्णन; मग दत्तमहात्म्य, गुरूचरित्र या ग्रंथांमध्ये भक्तांवर झालेल्या कृपेबद्दलचे वर्णन; मग फलश्रुती अशी रचना आहे.
गुरूवारी किंवा रोज, दिवेलागणीला, धूप घालून / आपण नीरांजन, उदबत्ती लावतो त्यावेळी म्हणतात.

खालील लिंकवर एक मराठी रूपांतर आहे. ते भाषांतर कोणाचे आहे माहीत नाही.
https://www.youtube.com/watch?v=2_dPv4VTr5Q

आम्ही घरी म्हणतो ते मराठी रूपांतर थोडे वेगळे आहे. पाठ असल्याने छापील पुस्तक आता शोधावे लागेल.
सापडले की इथे इमेज स्वरूपात देईन मग दोन्हीपैकी तुम्हाला जे आवडेल ते घ्या.

ह्याच धाग्याच्या अनुक्रमणिकेत पाहिलंत तर मराठी दत्तबावनीची link दिसेल. १२ व्या पानावर ही दत्तबावनी आहे. http://www.maayboli.com/node/13468?page=11#comment-1085681

खुप छान धागा व माहिती
मी रामरक्षा व नवनाथांचा चाळिसावा अध्याय वाचायचो. हा अध्याय माझा एक मुस्लिम मित्र हि वाचायचा.

@ Namrata Siddapur
वर अश्विनी के यांनी दिलेली दत्तबावनी लिंक बघा. आम्ही हीच म्हणतो घरी.
@ mr.pandit
दत्तबावनी आणि बावनश्लोकी गुरूचरित्र वेगळे ( बावनश्लोकी गुरूचरित्र म्हणत असाल तर )
बावनश्लोकी गुरूचरित्र हे गुरूचरित्राच्या ५२ अध्यायांचे सार / संक्षिप्त रूप म्हणता येईल. प्रत्येक अध्यायाचा सारांश १ श्लोक असे बहुतेक

कुठलंही म्हणा. पण श्रीसूक्त बेस्ट. ते आदिमाता महालक्ष्मी व तिची कन्या लक्ष्मी ह्या दोघींचं आहे. लोपामुद्रेने ते लक्ष्मीसाठी रचिले पण लक्ष्मीने आदिमातेच्या प्रेमात भावविभोर होवून नकळत ते आदिमातेसाठी म्हटले. ते आदिमातेने आनंदाने स्वीकारले. त्यामुळे ते दोघींचे आहे :-). साधारणपणे १६ वेळा म्हणतात नवरात्रात दररोज. पण अगदी एकदा जमले तरी उत्तमच. प्रयास व भाव महत्वाचा.

अनेक मंदिराच्या गाभार्यात ( उदा: कोल्हापुर येथिल अंबाबाई मंदिर परिसरातिल श्रीराम मंदिर) " श्रीराम जय राम जय जय राम " हा जप ऐकु येतो.. या जपाचा टोन मला खुपच भावला... नेट वर खुप मिळाले.. पण तो टोन नाहिये... अनेक chanting machine हि पहिले.. पन त्यत हि त्या टोन मधिल जप नाहिये... कोणाकडे त्या टोन मधिल वरिल जप आहे का?.. अनेक महिने झाले तरि पन मि 'तो' जप शोधतच आहे... कोनाकडे असल्यास डाऊन्लोड लिन्क दिल्यास खुप बरे होईल.... धन्यवाद...

Pages