ढेकूण होस्टेल अन पुणे.

Submitted by दीड मायबोलीकर on 3 August, 2015 - 15:01

सोमन | 3 August, 2015 - 20:34

hostel chya room madhe dhekhna jhali ahet
barch upay karun thaklo
kahi jhalim upay ahe ka

<<

हे या लेखाचे स्फूर्तीस्थान. (इथला प्रतिसाद)

तिथे प्रतिसाद लिहायला सुरुवात केली :
>>
अगगं!

सोमन, पुण्यात आहात काय?
<<

मग प्रोफाइल चेक केलं, अन येस्स! पुणेच.

अन मग ढेकूणपुराण साक्षात समोर उभे ठाकले!

पुणे अन ढेकूण हे फाऽर जुने नाते आहे.

"विस्मृतीत गेलेल्या वस्तू" असं एक सदर सकाळ किंवा लोकसत्तेत वाचल्याचं आठवतंय. त्यात पाटा-वरवंटा, उखळ-मुसळ इ. सोबत, एक "ढेकण्या" नावाची पेशवाईकालीन वस्तू होती.

ढेकणी म्हणजे अनेक छोटी, आरपार नसलेली भोके पाडलेली लाकडी पट्टी. या ढेकण्या रात्री अंथरुणाच्या आजूबाजूला ठेवत असत. व सकाळी उन्हं वर आल्यावर, तापल्या जमीनीवर ढेकण्या आपटून त्यात लपलेले ढेकूण बाहेर काढून मारत असत.

समहाऊ, ढेकूण चिरडून मारायचा नाही अशी (अंध)श्रद्धा होती. मारला, तर एकतर घाण वास येतो. अन दुसरं, त्याच्या रक्तातून अनेक ढेकूण येतात अशी ती अंश्र. म्हणून मग ढेकूण दिसला, की चिमटीत पकडून जवळच्या अमृतांजनाच्या बाटलीत भरलेल्या रॉकेलमधे टाकून द्यायचा. अश्या बाटल्या पूर्वी घरोघरी असत. अन दुसरा तो 'फ्लिट'चा पंप. त्यात भरायच्या बेगॉनपेक्षा अनेकदा रॉकेलच भरले जाई.

ताई पुण्याला युनिवर्सिटीत शिकायला होती. ती घरी आली की आधी तिचे सगळे कपडे गरम पाण्यात टाकले जात, अन बॅगेचे डीटेल इन्स्पेक्शन होई. ढेकणांसाठी. पुढे मी पुण्यात शिकायला गेलो, तेव्हा तोच प्रोटोकॉल फॉलॉ झाला.

तात्पर्यः टाईम्स चेंज, पुणे डझण्ट Wink

तर पुणे अन ढेकूण, एकूणात जुनं नातं.

आमच्या ससूनच्या होस्टेलला, अन 'सासनात' प्र च ण्ड ढेकूण. तेव्हा ऑबव्हिय्सली ढेकूण काँबॅट टेक्नॉलॉजी फारच अ‍ॅडव्हान्स्ड स्टेजेसला पोहोचली होती.

ढेकूण आमच्या दिनचर्येस एकाद्या सिनेमाच्या बॅकग्राउंड म्युझिकप्रमाणे व्यापून असत.

कॉलेजात खुर्चीत/बाकावर बसलो, की मधल्या फटीतून येऊन चावत. बुडाला खाज येणे, म्हणजे ढेकूण चावणे हे सिंपल इक्वेशन होते. त्या बाकांच्या फटींत कागद, चिकटपट्ट्या भरणे हा एक इलाज.

पीजी करताना ओपीडीत जाताच आपल्या खुर्चीच्या भेगांवर स्पिरिट ओतणे, हा इलाज आम्ही करत असू. स्पिरिट = अल्कोहोल Wink यामुळे, तिथले ढेकूण चिंग होऊन बाहेर येत अन लाश होऊन पडत. मग त्यांना गोळा करून कागदात बांधून 'मामा'जवळ देणे. (वॉर्डबॉय = मामा) हे पहिले आन्हिक असे.

पेशंट बसणार त्या स्टुलावर मात्र अजिब्बात स्पिर्ट ओतायचे नाही असा शोध लवकरच लागत असे, ज्यामुळे शिकाऊ डॉक्टरचे अनुभवी डॉक्टरात रूपांतर होत असे. कारण पेशंट कंफर्टेबली बसला, की २ आड एक अजोबा निवांत ३ पिढ्यांचा इतिहास सांगत डोके खाणार हे नक्की असे. तेव्हा ढेकूण हा प्राणी रॅपिड पेशंट टर्नोव्हरसाठी महत्वाचा मदतनीस होत असे.

त्या काळी ढेकणांचा दिनचर्येवरचा प्रभाव इतका जास्त होता, की आजकाल वर-खाली डुबक्या मारणार्‍या अवल यांच्या मसूरीच्या उसळीच्या धाग्यावर ज्याची रेस्पी मी दिलिये, त्याप्रमाणे डब्यातही 'आज ढेकणाची उसळ आहे' अशी बातमी आम्ही एकमेकांना देत असू.

तर, होस्टेलचे ढेकूण.

यांचा शोध होस्टेलवासी झाल्यानंतर ४-५ महिन्यांनी लागतो. घरी यांची अजिबात सवय नसते. सकाळी उठून कडेकडेने अंग खाजणे. थोडे पुरळ आल्यासारखे वाटणे इ. बाबी होतात. डास चावला असे वाटून आपण गप बसतो.

अचानक एक दिवस एकादा मुरमुर्‍याएवढा रक्तभरला टम्म फुगलेला ढेकूण दिसतो अन मग कळतं की आजकाल असं विक विक का वाटतंय? आमचा एक मित्र चक्क अ‍ॅनिमिक झाला होता ढेकून चावल्याने. मग हळूहळू ढेकणांबद्दलचा अभ्यास वाढत जातो.

खोलीत ढेकूण असल्याचे पहिले चिन्ह म्हणजे, भिंतींतल्या भेगांच्या बाजूला दिसणारे बारीक काळे ठिपके. ही ढेकणांची शी असते, अन ढेकूण असल्याचे पहिले लक्षण. तेव्हा या भेगा बुजवणे, हा पहिला इलाज. आम्ही प्लास्टरॉफ पॅरिस ऑर्थो वॉर्डातून आणत असु. तुम्हाला रंगवाल्याच्या दुकानात मिळेल. थोडे थोडे पाण्यात कालवा, अन आधी त्या भेगा बुजवा. भिंत कशी दिसते त्याची काळजी नंतर करा. आम्ही भिंतभरून रेखाच्या फोटोंचं कोलाज केलं होतं त्यावर Wink (त्या कागदांखालीही यथावकाश ढेकूण झाले अन मग त्या भिंतीलाच एक दिवस काडी लावली ती वेगळी स्टोरी)

लोखंडी पट्ट्यांचे पलंग हे यांचे माहेरघर.

कॉर्नर्सना काळ्या ठिपक्यांसोबत छोटुकली पांढरी अंडी अन ढेकणांची पारदर्शक छोटी पिल्लं अन काही मोठे पिकलेले तपकिरी-काळे ढेकूणही तिथे दिसतील. आजकाल एमसील आहे, त्या गॅप्स बुजवता येतील. आम्ही मेणबत्तीचे मेण त्यावर टपकवत असू. नॉट सो स्ट्राँग इलाज.

आमच्या काळी, आम्ही त्यावर उकळते पाणी टाकणे, पलंग गच्चीवर उन्हात घालणे असे इलाज करीत असू.

मालधक्क्याजवळ चोरबाजार भरतो, तिथून एक 'स्टो रिपेर'वाल्यांचा ब्लोटॉर्च सारखा स्टो आणला होता काही मित्रांनी. त्याच्याने लोखंड लाल होईपर्यंत तापवणे असा एक इलाज होता. एका रुममधल्या बहाद्दरांनी पलंगाच्या दोन पायांना दोन वायर्स लावून त्या सॉकेटमधे घालून पलंगला शॉक देण्याचा इलाजही केला होता. ढम्म! सा आवाज होऊन ब्लॉकचे लाईट गेलेले, पण ढेकूण टपटप खाली पडले होते म्हणे.

नव्या रुम मधे शिफ्ट होण्याआधी ती रुम धुवून, बेगॉन स्प्रे करून, भेगा बुजवून वगैरे कितीही केले, तरी नवे ढेकूण एप्रनच्या खिशात बसून येतच असत. अन मग दिसला ढेकूण की त्याला टाचणीवर सुळी दे. पाठीला फेविकॉलचा थेंब लावून भिंतीला चिकटव. सिगारेट लायटरची ज्योत मॅक्सिममवर करून त्याला भाजून त्याचा मुरमुरा कर, अक्षरश: मुरमुर्‍याएवढे मोठे होतात अन फट्कन फुटतात Wink किंवा हीलेक्स सीलण्ट स्प्रे मारून आहे त्या जागी चिकटवून टाकणे, फार संताप असेल तर भिंगाखाली घेऊन ब्लेडने फक्त माऊथपार्ट कापून टाकणे असेही अनेकानेक इलाज केले जात.

शेवटचा अल्टिमेट नाईटमेअरिश इलाज सांगून मी थांबणारे. बाकी लोकांनाही इलाज सुचवू देत Wink

तर आमच्या एका मित्राने पीजी होस्टेलला नवी सिंगलसीटर रूम मिळवली. तिथले ढेकूण मारण्यासाठी ओटीतून एक ईथरची बाटली, अन मामांना सोबत घेऊन रुमात पोहोचले. पलंगाचे कोपरे, टेबल खुर्चीच्या फटी, भिंतीतल्या भेगा इथे इथर ओतून ढेकूण बाहेर आले. बाटली अशी बाजूला ठेवलेली. अन मामासाहेबांनी खिशातून आगपेटी काढून बिन्धास्त पलंगाला काडि लावली!

इथर कसे पेटते, हे इथे कुणी पाहिले आहे ते ठाऊक नाही, पण एक भक्क्क! आवाज. प्रचण्ड मोठा फ्लॅश ऑफ लाईट, पलिकडच्या खिडकीत चढून ओरडणारा मामा. दाराबाहेर ओरडणारा मित्र. धावून येणारं पब्लिक.

तेवढ्यात तिकडून आलेल्या अ‍ॅनास्थेशिआच्या चीफ रजिस्ट्रारने इथरच्या बाटलीचा स्फोट होईल म्हणून मच्छरदाणीचा गज वापरून ती बाटली फोडली!

पुढचे पुराण बरेच झाले. कुणालाच शारिरीक इजा झाली नाही या बेसिसवर त्या प्रकरणावर पडदा पडला. टेबल खुर्ची अन भिंतींवर त्या अग्नीकांडाच्या खुणा मात्र वर्षानुवर्षे होत्या....

सो लोक्स,
ढेकणांचे तुमचे अनुभव कोणते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ढेकणाने १२० कोटीचा व्यवसाय केल्याबद्दल धागाकर्त्याला शहाणे ही पदवी देण्यात येत आहे.
आयडी मधे योग्य त्या ठिकाणी लावावी.

Happy नवर्याकडुन COEP Hostel च्या कथा ऐकल्या आहेत. बरेच साधर्म्य आहे यात आनि त्यात. मुलिन्साठी कुणितरी होस्टेल आणि ऊवा हा लेख लिहिणे आवश्यक आहे. शेवटच्या वर्शाननतरच त्यातून सुटका झाली. त्याचे नाईट्मेअर्स अजून येतात. Sad

विद्या.

माझ्या मित्राच्या रूम वरुन मि हा प्रसाद घेउन आलो होतो. Partner व मला १ महिना फार त्रास झाला. शेवटी आताच १ हजार घालुन पेस्ट Control केले तेव्हा हा त्रास गेला.
Partner ना आजही कळत नाही. हे रक्तपिपासु आले कसे.

दीड मायबोलीकर - फारच सुंदर लेख!!! मनापासून आवडला. वैद्यकीय पार्श्वभूमीवरील ढेकणांवर लिहिलेला लेख प्रथमच वाचनात आला आणि हसून हसून डोळ्यात पाणी आले. हेच नाही, हा लेख माझ्या दोन मित्रांनाही वाचून दाखवला. वाचनाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद.

Mastach...dhekun lahanpani bhintiylya bhokat vaigere pahila hota..amhi tyala bindhast nakhavar thechun chirdun marat asu.

एक ऐकीव अक्सीर ईलाज....वाड्यातल्या आजींकडून ऐकलेला...मी तरी आजमावलेला नाही.. जिज्ञासूंनी खात्री करून घ्यावी. म्हणे ढेकूण मासेवालीच्या मासे असलेल्या टोपलीत सोडावा..अर्थात जिवंत..

काहीही हं निळाई..
घरातून ढेकूण पकडून नेऊन मासेवालीच्या टोपलीत सोडून घरातले (उरलेले) ढेकूण कसे जातील? Uhoh

वा:!!! परत आला वर, हा माझा आवडता धागा!!! पुन्हा पहिल्यापासून वाचतो. Biggrin

आणि तो दुसरा तर लई भारी!! उंदिरवाला धागा!!! Rofl

>> मासेवालीच्या मासे असलेल्या टोपलीत सोडावा..अर्थात जिवंत..

जिवंत मासे टोपलीत घेउन फिरणारी मासेवाली कुठे शोधायची आता? Proud

मी पूर्वी डिस्कव्हरी चॅनेलवर पाहिले होते. पौर्वात्यदेशात ढेकूण मारण्याकरिता प्रोफेशनल लोकं असतात. आपल्याकडे फायर एस्टिंग्विशर असते, तसे त्यांच्याकडे नायट्रोजन (?) गॅस भरलेला सिलेंडर असतो. सर्व फर्निचरच्या फटीत ते नायट्रोजन (?) गॅस फवारतात. सगळे ढेकूण एका क्षणात बर्फ होऊन थिजून मरतात. आणि मागे वास नाही, डाग नाही, तेल नाही, घाण नाही, अगदी काहीच शिल्लक रहात नाही. वापरायलाही अगदी सोप्पं. Happy

मुम्बैच्या VJTI होस्टेल ला चार वर्षे लई तरास सहन केला.
नंतर रेक्टर नि लाकडी खाटं बदलवुन लोखंडी आणले.
काही फरक नाही पडला. पैशानचा चुराडा .
आम्ही वरील सर्व उपाय केले होते.
सगळ्यात बेस्ट म्हणजे अहिंसा.
आम्ही रात्रभर लाइट चालू ठेवून प्लास्टिक च्या खुर्चीत बसून झोपायचो.
That was the terror these bugs brought to our lives...

Pages