७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - रोहतांग पास आणि केलाँग

Submitted by मनोज. on 11 August, 2016 - 06:53

भाग १ - तयारी

भाग २ - पुणे ते रोहतक

भाग ३ - पानिपत

भाग ४ - चंदिगड आणि मनाली

************************

मनालीमध्ये सकाळी उठलो, आवरले. आजचे मुख्य काम होते ते म्हणजे रोहतांग आणि लेहचे परमिट मिळवणे.

परमिट मिळवण्यासाठी -

मनालीमध्ये माल रोडजवळ परमिटचे ऑफिस आहे. गाडीचे रजिस्ट्रेशन, चालकाचे लायसन्स आणि PUC या सर्वांच्या झेरॉक्स लागतात. ग्रीन टॅक्स आणि परमिट फी वगैरे मिळून प्रत्येकी साधारणपणे २५० रू भरावे लागतात.
आंम्ही सकाळी ८ वाजता गेलो तर आमचा रांगेत १२ / १५ वा नंबर होता. स्त्रीयांसाठी वेगळी रांग होती.

११ वाजण्याच्या दरम्यान परमिट मिळाले. आंम्ही लगेच हॉटेलवर परत आलो, भरपेट नाश्ता केला आणि लगेचच रोहतांगला निघायचे ठरवले.

रात्री गर्दीने फुललेला माल रोड सकाळी असा दिसत होता.

.

मनालीची पुणेरी पाटी. Wink

.

"मनालीमधून रोहतांगला जाताना मुख्य अडथळा म्हणजे ट्रॅफिक जाम" असे सगळ्यांनी सांगितल्यामुळे आंम्ही शक्य तितक्या लवकर आवरले आणि बाहेर पडलो.

मनालीमध्ये बाहेर पडल्यानंतर निसर्गाचा अप्रतिम नजारा दिसू लागला..

.

रोहतांग ५० किमी..

.....

आणि थोड्याच वेळात एक ट्रॅफिक जाम लागला. अत्यंत अरूंद रस्ता आणि त्यावर समोरासमोर आलेले दोन ट्रक यांमुळे येथे रस्ता जाम झाला होता.

.

येथे आमच्यात काहीतरी घोळ झाला आणि मी ट्रॅफिक मध्ये जागा मिळाल्या मिळाल्या सुसाट सुटलो आणि रोहित व विजय मागे राहिले. थोडेसे अंतर कापतो न कापतो तोच आणखी एका ठिकाणी थांबलेल्या गाड्या सामोर्‍या आल्या.

.

येथेही थोडा वेळ गेला. एव्हाना मी रस्ते अडवणार्‍या भल्यामोठ्या ट्रकच्या मागे पोहोचलो होतो मात्र त्याला मागे टाकण्याची संधी मिळत नव्हती.

एका ठिकाणी संधी मिळाली आणि त्या ट्रकला मागे टाकून सुसाट पुढे सटकलो..

थोडे अंतर झाडांमधून आणि डोंगराडोंगरातून एकट्याने पार पाडले आणि मागे वळून पाहिले तर...

.

येथे एका पुलाचे काम सुरू होते..

.

रस्त्यावर गाड्यांची गर्दी दिसू लागली की मी पुढे पुढे पळत होतो आणि थोडे अंतर कापून पुन्हा रोहित आणि विजयची वाट बघत होतो.

एका ठिकाणी नदी लागली आणि तेथे लोक्स पाण्यात खेळत होते.. गाड्या धुवत होते. इतक्या गारठ्यात त्या लोकांना गाडी धुण्याचाही उत्साह होता.

.

९ टनांपेक्षा मोठी गाडी असेल तर काय करावे ब्वा..?

.

असे अंतर हळूहळू कापत असताना अचानक रोहतांग पासचा चेकपॉईंट लागला.

.

मी परमिट दाखवून पुढे गेलो मात्र थोडे अंतर गेल्यावर लक्षात आले की रोहित आणि विजयचे परमिट माझ्याकडेच आहे. आता कितीही वेळ होवूदे पण त्यांच्यासाठी थांबूया म्हणून मी परत चेकपॉईंटपाशी आलो आणि निवांत क्लिकक्लिकाट करत थांबलो.

पुढच्या रस्त्यावर गाड्यांची रांग दिसत होतीच.

.

यथावकाश तो ट्रॅफिकमध्ये अडथळा करणारा ट्रक आला. ठरल्यासारखे पोलीसांनी त्या ट्रकला बाजुला घेतले आणि मागचे ट्रॅफिक वाहते केले.

आता पुढचा प्रवास फोटोंमधून बघा..

..

बर्फाचे पहिले दर्शन.

.

हिमशिखरे..

..

या डोंगरात एखादी देवाची मूर्ती एखादे शिल्प असे काहीसे दिसत आहे का..?

.

खराब रस्ते सुरू झाले होते.. (या रस्त्याच्या उजव्या बाजुला खाली एक बर्फाचे ग्लेशीयर दिसत आहे त्याच्या शेजारील रस्त्यावरून आंम्हाला पुढे जावे लागले.)

.

या फोटोच्या वेळी मी एक मजा केली.. मी थांबलो तेंव्हा हे तिघे हळूहळू पुढे चालले होते. मी पहिल्यांदा रिकाम्या रस्त्याचा (वरचा) फोटो काढला आणि हे तिघे फ्रेममध्ये आल्यानंतर त्यांना आवाज दिला आणि पटकन हा फोटो काढला. Lol

.

एखादा चांगल्या रस्त्याचाही तुकडा लागत होता..

.

गाडीचाही फोटो हवाच की...

.

झक्कास रस्ता...

..

हिमालयाच्या कुशीतली टुमदार गावे...

.

अभेद्य..

.

घर दिसते आहे का..?

.

विजय आणि रोहित..

..

असाच एक खराब रस्ता..

.

इथे "सोन्याबापू हायेत का..?" अशी हाक मारणार होतो.. Lol

.

हिमशिखरे अचानक अशी डोकावत होती..

..

यथावकाश टंडी आले.. या रस्त्यावरचा शेवटचा पेट्रोल पंप.

..

रोहित..

.

...!!!

.

केलाँग नामक गावाजवळ..

.

विश्रांती... विजय आणि रोहित.

.

आंम्ही जिस्पाला राहणार होतो.. मात्र संध्याकाळची वेळ बघून केलाँगला राहण्याचे ठरवले. वाटेत एकाला राहण्याची माहिती विचारली तर तोच एका हॉटेलाचा मालक होता. "यिद्रिक" नावाच्या हॉटेलात रूम बघितली आणि सामान टाकण्यास सुरूवात केली. नंतर आंम्ही त्या टुमदार गावात चक्कर मारली, किरकोळ खरेदी केली. कुलवी टोप्या घेतल्या. आणि त्या हॉटेलच्या कूकने केलेले अप्रतिम जेवण जेवलो.

चिली चिकन

.

चिकन स्टफ केलेले मोमो

.

अप्रतीम चवीचा "लेमन हनी पॅन केक" (हे लिहितानाही तोंडात पूर आला आहे)

.

अरे हो.. एक एपिसोड सांगायचा राहिला..

गाडीवरून सामान उतरवताना मला पेट्रोलचा वास आला होता. मातीत गाडी लावली असल्याने सहज निरखून पाहिले तर इंजिनखाली पेट्रोलचे थेंब पडले होते. गाडीखाली वाकून बघितले तर टँकमधून पेट्रोल आलेले दिसत होते. केलाँगमध्ये प्रवेश करताना एक बुलेटचे गॅरेज दिसले होते. त्याच्याकडे गडबडीने गाडी पळवली.

गॅरेजवाल्याने नीट निरीक्षण केले आणि बोलता झाला...

"आपकी तो टंकी फट गई है..!!"

मी : ऑ..???????

(क्रमशः)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो.. पण तो प्रसिद्ध राणी नाल्याचा इथला बर्फ काही दिसला नाही फोटोत...

ते सगळे लोक जिथे गाड्या धुताना दिसत आहेत तिथे पण एक पूल आहे ना? तो पूल १५ मे नंतर असतो बर्‍याचदा..तो पर्यंत तिथून पुढे डायरेक्ट जाता येत नाही.. मनालीतले टुरिस्ट तिथ पर्यंत जातात आणि परत फिरतात..

त्या रस्त्यावरचे ट्रॅफिक महान असते तिथून चार चाकी काढणे हे प्रचंड मुश्किल... स्थानिक लोक पुढे जाऊच देत नाहीत पटापट... तिथल्या लोकल गाड्या असतील तर पटकन जातात पण बाहेर गाडी अडकलीच म्हणून समजा.... तरी ह्या फोटोत घोडेवाले दिसत नाहीयेत फारसे नाहीतर ते पण असतात ट्रॅफिक जॅम करणार्‍यांमध्ये..

आणि जेवणाचे फोटो टाकताना आधीच डिस्क्लेमर द्यावा.. लेख वाचताना इनो घेऊन वाचावा म्हणून.. Happy

सुंदर फोटो, सुंदर वर्णन. आणि जेवणाचे फोटो तर एखाद्या मधाच्या पोळ्यातून रस टपटपावा तसे रसभरित. जसे काही चुलीवरून नुकतेच उतरून लगोलग प्लेटमध्ये आलेय जेवण.
सर्व भाग वाचले आहेत, अतिशय आवडले होते. दर वेळी प्रतिसाद दिलाच आहे असे नाही. तर ही घाऊक पोच.

सुंदर फोटो

रोहतांगलाच्या अलिकडचा म्हणजे मनाली कडचा हिरवा निसर्ग फार सुंदर आहे तर पलिकडचा म्हणजे ग्राम्फू कडचा हिमालयाच रौद्ररुप दाखवणारा निसर्ग भन्नाट आहे.