डि एस एल आर नाही?.... वरी नॉट , छोटू है ना!

Submitted by जाग्याव पलटी on 13 July, 2016 - 03:46

मित्रहो,

अनेकांना फोटो काढायची हौस असते मात्र महागडे कॅमेरे घेता येतातच असे नाही. मात्र तंत्रज्ञानाच्या उत्कर्षासोबत नवनवीन स्मार्ट्फोन बाजारात आले/येत आहेत ज्याकरवी आपण आपली ही हौस भागवून घेऊ शकतो.

तर सांगायचा(रादर विचारायचा Wink ) मुद्दा हा की, आयफोन्/अँड्राईड फोनवरून उत्कृष्ट फोटो काढणारे अनेकजण इथे असतील त्यांनी नवशिक्यांना स्वानुभवाच्या काही टिप्स दिल्या तर किती चांगले. आपल्यापैकी चांगले फोटो काढणारे जे असतील त्यांना त्यांचे ज्ञान इथे शेअर करायला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा.

नोट : आंतरजालावर उपलब्ध असलेल्या क्लृप्त्यांच्या लिंका न देता स्वतः केलेले प्रयोग, काढलेले सुंदर फोटो ह्यावर भाष्य करावे अशी विनंती. हरकत नसल्यास काही फोटो सुद्धा शेअर करावेत ही प्रार्थना.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे पण डी एस एल आर वगैरे नाही, त्यामुळे हाती असलेल्या मोबाईल कॅमेर्‍यानेच फक्त फोटो काढत असते. त्यातल्या त्यात घरी फुलं वगैरे फुलली तर त्याचे फोटो बहिण, किंवा फॅमिली ग्रुपवर शेअर करते.
मग हा धागा पाहून ते फोटो इथे शेअर करायचा पण मोह आवरला नाही.
फार ग्रेट नाही आहेत, पण तरी पण देते आहे.

आणि हो, मोबाईलने फोटो काढताना मी काही युक्त्या वगैरे वापरत नाही. त्यामुळे खरंतर मला फोटो कसे काढावे कळतच नाही असं म्हणालात तरीही चालेल. पण त्यातल्या त्यात बरे असे आहेत.
आणि त्यावर कोणतेही संस्कार केलेले नाहीत.

IMG-20160614-WA0003.jpegrsz_20150311_103135.jpgIMG-20160707-WA0009.jpgrsz_20150402_094021.jpgrsz_img-20160512-wa0005.jpgrsz_img-20160601-wa0012.jpg

वॉव दक्षिणा, फोटु एकदम तजेलदार आणी सही आलेत. जाग्याव एकदम सही धागा काढलात. आता जिप्सी, कापो यांची मते येऊ देत.

माझ्या मते चांगल्या मेगापिक्सेलचा कॅमेरा असणारा मोबाईल किंवा चांगले फोटो येण्यासाठी बर्‍यापैकी प्रसिद्ध असणार्‍या कंपनीचा मोबाईल घेणे हि एकच टीप ठरू शकेल. बाकी बरेचसे तो मोबाईलच करतो.

माझ्याकडे एमाय फोर आय आहे १३ मेगापिक्सेलवाला. माझ्या अपेक्षेपेक्षाही चांगले फोटो येतात त्यामुळे मी अगदी खुश असते.

त. टी. तुम्हाला चांगले फोटो काढायचे बेसिक टेक्निक्स (उदा. फोटो काढतांना हात स्थीर ठेवणे, अगेन्स्ट लाईट फोटो काढले तर काय होते, शॅडो कशी टाळावी, फोटोत आजुबाजुचा कचरा किंवा नकोश्या गोष्टी येत असतील तर त्या अँगल बदलून टाळणे इत्यादी) माहित असणे गरजेचे आहे. ते असेल तर तुम्ही मोबाईलवरही चांगले.. अगदी उत्तम फोटो काढू शकता.

तुम्हाला हव्या आहेत तश्या १-२ टिप्सः

१. मोबाईलवरून जास्त झूम करून काढलेले फोटो फारसे चांगले येत नाहीत.
२. मोबाईलवर (माझ्यातरी) अंधारातले फोटो फारसे चांगले येत नाहीत. फ्लॅश ऑन करूनही. त्यापेक्षा २ ट्युबलाईट लावणे (इनडोर असाल तर) परवडते.
३. मोबाईलवर फोटो काढतांना मोबाईल आपणहून एखाद्या ऑब्जेक्टवर फोकस करण्याचा प्रयत्न करतो (माझ्या मोबाईलमध्ये फोकस कुठे हवा हे स्क्रीनवर टच करून सिलेक्ट करता येते) तेव्हा फोकस होईपर्यंत तात्पुरती इमेज ब्लर होते. तर तेव्हा घाई न करता मोबाईल स्क्रीनवर क्लीअर इमेज दिसू लागली कि मगच फोटो क्लीक करावा. अन्यथा फोटोही ब्लर येतो.

दक्षिणा,

खूप मस्त फोटो आहेत विशेषतः पहिले पाच!

फोकस आणि एक्स्पोजरचा अनेकदा चांगला वापर करून घेता येतो असे वाटते.

थोड्या वेळाने साईज कमी करून दोन फोटो इथे देतो

नॉर्मल फोटो :

rsz_img_0534.jpg

फोकस आणि एक्स्पोजर अ‍ॅडजस्ट :

rsz_img_0533.jpg

प्रयत्न आणि प्रयोग सुरू केलेत, बघू कुठवर जाता येते.

फोटो आयत्यावेळी काढायचे ठरवले तर मोबाईल फोन वापरणे ठिक आहे, पण फोटो काढण्यासाठीच म्हणून कुठे जायचे असेल, तर मात्र कॅमेराच वापरणे योग्य.
बर्‍यापैकी मेगापिक्सेल असणारा कॅमेरा वापरून जे फोटो मिळतात त्याची तुलनाच होऊ शकत नाही.. आणि त्यासाठी फार कौशल्य लागत नाही, कॅमेराच बहुतेक सर्व काम करतो.

मी गेल्या रविवारी माझ्या एका मित्राचा फोटो काढला होता. ( इथे पिकासावरुन दिलाय म्हणून साईझ कमी करुन दिलाय, तरी पण मी काय सांगतोय ते लक्षात येईल ) मूळ फोटोत जर झूम इन केले, तर त्याच्या डोळ्यात चक्क माझी प्रतिमा दिसतेय.

म्हणून कॅज्यूअल फोटोसाठी मोबाईल ठिक पण साठवणीच्या फोटोसाठी कॅमेराच हवा. ( अर्थात आताचे महागडे फोन बर्‍यापैकि रिझल्ट्स देतात. )

वेळ : सायंकाळ, वातावरण: पावसाळी, प्रकाशयोजना : घरगुती, कॅमेरा : आयफोन ५ एस

rsz_img_0546.jpg

कसा आलाय ते सांगा आणि अधिक चांगला होण्यासाठी काय करता येईल ते सुचवा.

टाकलेल्या सगळ्याच फोटोंच्या साईज १/१० पटीने कमी केलेल्या आहेत - १.५ एम. बी. च्या १५० के.बी.

छान धागा आहे. अश्या सेटींग असतील तर जाणून घेण्यास उत्सुक. माझे याबाबतीतील तांत्रिक ज्ञान शून्य आहे.
मी फक्त एक काळजी घेतो ती म्हणजे नॅचरल लाईट कुठून येतेय हे बघतो आणि त्या अनुषंगाने फोटो ब्राईट एण्ड क्लीअर कसा येईल हे बघतो.
दुसरे म्हणजे माझे अँगलचे ज्ञान जरा बरे आहे. मुळात मी बारीक असल्याने फोटोत कसा ते न दिसता हट्टाकट्टा वाटेल यासाठी फोटो कुठल्या एंगलने आला पाहिजे हे बघायचो, असेच करता करता फोटो काढायच्या आधी विविध अ‍ॅंगल चेक करायची सवयच लागली आणि आणखी आयड्या डेवलप होत गेल्या.
असो, तरी रात्रीच्या वेळी कमी वा अंधुक प्रकाशात किंवा ट्यूबलाईटच्या सावल्या पडत असताना कश्या सेटींगने फोटो काढावा हे काही समजत नाही Sad

बरेच सांगता येईल.
१) आपला मोबाइल काय करू शकतो आणि काय नाही हे ओळखण्याच्या कसोट्या असतात त्या वापरायच्या. त्यामुळे ऐन कामाच्या वेळी आणि जिथे एकेक क्षणाने फोटोसंधी दूर पळते तिथे पटकन फोटो मिळवता येतो.
२) फोकस टेस्ट करा.
३) निसर्गदृश्यासाठी फोकस इन्फिनटिवर ठेवा
४) ढगांतून येणारे सूर्यकिरणांचे झरोके टिपण्याइतका कॅम्रा सक्षम असेलच असं नाही
५) मेमरी स्टोरिज चेक करा. भले कॅम्रा रेटिंग १३ मेपि आहे परंतू फोटो स्टोरिजला गेल्यावर फक्त १ एमबिचा असतो काही मोबाइलात।अशा कॅम्र्यातून फारशा अपेक्षा ठेवता येत नाहीत..

भले कॅम्रा रेटिंग १३ मेपि आहे परंतू फोटो स्टोरिजला गेल्यावर फक्त १ एमबिचा असतो >>> असे नाही तुम्हाला फोटो कुठल्या रेझोल्युशन मधे काढायचा आहे तो ऑप्शन कॅमेरा सेटींग मधे असतो २एम्बी, ५ एम्बी अथवा १९२०**१०८० ...२५९२*१९४४ वगैरे जसे तुम्ही सेलेक्ट करतात त्या रेझोल्युशनला फोटो निघतो

तुम्ही मोबाईल मधे कमी रेझोल्युशन चा ऑप्शन ठेवत असाल म्हणून फोटो १ एम्बी चा येतो
त्याचा आणि कॅमेराच्या रेझोल्युशनचा काहीही संबंध नाही. तुमचा कॅमेरा २५ मेगा पिक्सल चा जरी असला तरी तुम्ही फोटो काढताना जे रेझोल्युशन सिलेक्ट करतात त्याच रेझोल्युशन प्रमाणे फोटो येतो

मनःपूर्वक धन्यवाद, उदय८२ Happy

Photo information
Aug 4, 2016
2448×3264 pixels – 1614KB
Filename: IMG_0615.JPG
Camera: Apple
Model: iPhone 5s
ISO: 40
Exposure: 1/50 sec
Aperture: 2.2
Focal Length: 4.2mm
Flash Used: No

वरची माहिती पिकासा महाराजांनी दिलीय, ह्यात फोटो काढत असताना बदल कसे करायचे आणि किती करायचे म्हणजे अजून छान रीझल्ट येऊ शकतील?

http://www.maayboli.com/node/44997?page=6

हा धागा बघा यात बर्याच जनांनी फोटो काढल्यानंतर त्याच्या सेटींग्स काय असाव्या वगैरे टिप्स दिल्या आहेत

हा विषय छानच निवडला आहे आपण ... काही वर्षांपासून मी सुद्धा फोटोग्राफी करणे शिकतो आहे ... सुरवात मोबाइल कॅमेरा पासूनच केली ; माझ्या कडे दोन वर्ष आधी सोनी इरिकसन क्सपिरिया मिनी मोबाईल होता ; फक्त पाच मेगापिक्सल कॅमेरा पण त्याची क्वालिटी फारच सुंदर होती ...फक्त २x डिजिटल झूम असलेल्या कॅमेऱ्याने काढलेला हा फोटो इथे टाकतो आहे ...

Mobile pic.jpg

Pages