डि एस एल आर नाही?.... वरी नॉट , छोटू है ना!

Submitted by जाग्याव पलटी on 13 July, 2016 - 03:46

मित्रहो,

अनेकांना फोटो काढायची हौस असते मात्र महागडे कॅमेरे घेता येतातच असे नाही. मात्र तंत्रज्ञानाच्या उत्कर्षासोबत नवनवीन स्मार्ट्फोन बाजारात आले/येत आहेत ज्याकरवी आपण आपली ही हौस भागवून घेऊ शकतो.

तर सांगायचा(रादर विचारायचा Wink ) मुद्दा हा की, आयफोन्/अँड्राईड फोनवरून उत्कृष्ट फोटो काढणारे अनेकजण इथे असतील त्यांनी नवशिक्यांना स्वानुभवाच्या काही टिप्स दिल्या तर किती चांगले. आपल्यापैकी चांगले फोटो काढणारे जे असतील त्यांना त्यांचे ज्ञान इथे शेअर करायला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा.

नोट : आंतरजालावर उपलब्ध असलेल्या क्लृप्त्यांच्या लिंका न देता स्वतः केलेले प्रयोग, काढलेले सुंदर फोटो ह्यावर भाष्य करावे अशी विनंती. हरकत नसल्यास काही फोटो सुद्धा शेअर करावेत ही प्रार्थना.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान धागा. मी पण पूर्वी डिजीटल एस-एल-आर कॅमेरा वापरत होतो. आता फार क्वचीत वापरतो. मोबाईल झिंदाबाद. आजकालचे बहुतेक फोन फारच छान फोटो काढतात आणि एक वस्तू कमी कॅरी करायला Happy

Pages