कोकण .... पावसाळ्यातलं

Submitted by इंद्रधनुष्य on 4 August, 2016 - 03:18

कोकण .... पावसाळ्यातलं हा लेख वाचला नी यंदा जुलै मधे घडलेल्या दापोली दौर्‍याची आठवण झाली... पावसामुळे मनाजोगी फोटोग्राफी करता आली नसली, तरी जे काही नजारे टिपता आले ते इथे टाकण्याचा मोह हेमा ताईंच्या लेखामुळे आवरता आला नाही.

प्रचि १ चिंचाळी धरण

प्रचि २ दापोली बांधतिवरे रस्ता

प्रचि ३

प्रचि ४ पद्मावती मंदिर

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! सुरेख फ़ोटो. हिरवेगार, टवटवीत. २ रा आणि १० तर भारीच.
खंड्या तर फ़ारच छान दिसतोय. साबण लावून, पावसात बसला वाटतं. Proud

इंद्रा, काय भन्नाट फोटोज!! हाच रस्ता माझ्या घराकडेही जातो म्हणून जास्तच गोड वाटतोय Wink
पहिला आणि दुसरा फोटो एकदम खल्लास Happy

दिलखेचक! १० नंबरचा फोटो अगदी राखेचाच्या घराचाच वाटतोय. अस वाटतय की घरातुन आत्ता पांडु बाहेर येईल.

प्रचि नंबर ८ :- अर, आयुक्ष मंजी अळवावरचं पाणी, त्याचा भरोसा नाय ! कोण रं यो तिरपागड्या, ह्या वक्ताला पानी मागतुया?

१० नंबरचा फोटो अगदी राखेचाच्या घराचाच वाटतोय. >> मावस मामाच घर आहे ते.. लहानपणीच्या बऱ्याच आठवणी त्या घराशी निगडीत आहेत. पण येत्या दिवाळी नंतर ते पाडणार म्हणून वाईट वाटतय.

अरेरे! पण किती छान आहे, अगदी खेड्यामधले म्हणायचे त्या ऐवजी कोकणातील घर कौलारु. नुतनीकरण करणार म्हणून पाडणार असतील ना? पण बालपणाच्या आठवणी ज्याच्याशी निगडीत असतात ते कधीच विसरले जात नाही, त्यात मामा-मावशी म्हणल्यावर अजूनच हळवे व्हायला होतं.

अहाहा !
शेवटच्या प्रचिची फ्रेम तर अफलातून जमलीय!!
इंद्रधनुष्य हमखास दिसतं अशा वातावरणात पण बुजतं तें कॅमेराला [ कदाचित तुमच्या नांवालाही असेल Wink ]!!

Pages