दिवस तुझे गं फुलायचे भोपळ्या सारखे डुलायचे.. -विडंबन

Submitted by सत्यजित on 1 August, 2016 - 03:04

दिवस तुझे गं फुलायचे
भोपळ्या सारखे डुलायचे

अर्बट चर्बट खाणे
सरियल पहात रहाणे
काडीचे काम न करायचे

पुरी नी पुरणपोळी
वडा समोसा दाबेली
मोकाट बकाणे भरायचे

मोडली सोफ्याची तार
सोसेना पलंगा भार
खुर्च्याना जखमी करायचे

माझ्या ह्या जिमच्या पाशी
थांबशील जाडे जराशी
ह्या प्रलोभना मी भुलायचे

भोपळ्या सारखे डुलायचे...

-सत्यजित माळवदे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Lol Lol Lol

Happy Happy

हाहा...

Biggrin मस्त जमलंय ( आय लाइक इट :फिदी:)
पाडगावकर यांच्या कवितेचे तथाकथित विडंबन (का विटंबना?) कितपत योग्य? अयोग्य? असा धागा निघेल आता ;)... >>> हलकेच घ्या Lol

सत्या भोपळा डुलतो हा कल्पनाविलास पचला नाही. त्यामुळे तुझा एक मार्क कट Proud
बाकी विडंबन मनात ल्या मनात म्ह णून पाहिलं
मीटरमध्ये बसतंय, त्यामुळे बाकि मार्क फुल्ल Lol