दिवस तुझे गं फुलायचे भोपळ्या सारखे डुलायचे.. -विडंबन

दिवस तुझे गं फुलायचे भोपळ्या सारखे डुलायचे.. -विडंबन

Submitted by सत्यजित on 1 August, 2016 - 03:04

दिवस तुझे गं फुलायचे
भोपळ्या सारखे डुलायचे

अर्बट चर्बट खाणे
सरियल पहात रहाणे
काडीचे काम न करायचे

पुरी नी पुरणपोळी
वडा समोसा दाबेली
मोकाट बकाणे भरायचे

मोडली सोफ्याची तार
सोसेना पलंगा भार
खुर्च्याना जखमी करायचे

माझ्या ह्या जिमच्या पाशी
थांबशील जाडे जराशी
ह्या प्रलोभना मी भुलायचे

भोपळ्या सारखे डुलायचे...

-सत्यजित माळवदे.

Subscribe to RSS - दिवस तुझे गं फुलायचे भोपळ्या सारखे डुलायचे.. -विडंबन