ऊंधीयु / ऊंधीयो

Submitted by दिनेश. on 17 July, 2016 - 13:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
आठ दहा जणांना पुरेल
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
पारंपरीक पदार्थ आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो

आंबट गोड- ती चव!
तो उंधीयो.

उंधीयो तो असला तरी त्याची चव तीच असते.
Wink

मी उंधियो करताना हिरवी चटणी (खोबरे+लसूणपा+हि.मि.+कोथिंबीर्+आले+मीठ) वांग्यात भरते.प्रेशरपॅनमध्ये जरा जास्त तेलावर जास्त ओव्याची फोडणी दिली की वांगी जराशी तळसते आणि बाजूला काढते.नंतर त्यात राहिलेला सर्व हिरवा मसाला परतते.त्यावर सर्व भाज्या घालते.गूळ,लाल तिखट घालते.एका शिटीत सर्व उन्धियो तयार होतो.नंतर त्यात मुठिये ,लिंबू घालते.जवळ जवळ १-१.५ किलो भाज्यांचा उंधियो तयार होतो.ही आयडिया माझ्या मैत्रिणीची.(ती ८-९ किलोचा उंधियो करते.)
उंदियो करताना सर्व एकाच दिवशी केले तर थकावटीचे असल्याने २ दिवस आधी सुरती पापडी,हरभरे, वाटाणे सोलणे करते.आदल्या दिवशी मुठिये उकडून ठेवते.मग करताना एवढा त्रास होत नाही.

उंधियो ! बरेच दिवस याबद्दल नुसतेच वाचत होतो . गुजराती लोक यासाठी वेडे होतात. म्हणून एकदा कर्वे रोडावरून एकदा आयता विकत आणला. त्यातले ते प्रचंड मसाले आणि अंगाबरोबरचे तेल व त्या तेलाची चव पाहून याबद्दल खूप वाईट मत झाले. घरातल्या कोणालाच आवडले नाही ते. त्यामुळे एक प्रकारचा दडा/शिसारी बसली आहे. यावरून त्या बनविण्याच्या पद्धतीनुसार त्याचे चव बदलत असावी. पुण्यात ऑथेंटिक उंधियो कुठे मिळतो?

मस्त रेसिपी!
पुण्यात ऑथेंटिक उंधियो कुठे मिळतो?> +१ . कर्वे रोड वर मिळणारा अगदी आवडला नाही मलाही. अहमदाबाद मधे सप्टेंबर महिन्यात जाणार आहे. तिथे कुठे मिळेल का तेव्हा?

मस्त दिसतोय. खरंतर कोनफळ आणि मुठिये घातल्याशिवाय उंधियू केलाय असं वाटत नाही पण तरी चवीसाठी मी मिनि उंधियू बरेऽचदा करते.

साबा छोटे कांदे आख्खे ( किंवा मोठे कांदे अर्धे करुन ) घालतात उंधियूत त्यामुळे नवर्‍याला ते कांदे असल्याशिवाय उंधियू खाल्ल्यासारखं वाटत नाही Wink
मिनि उंधियूसाठी साधी पापडी मोडून + बटाटे मोठ्या आकारात कापून + छोटी वांगी आवडीनुसार + फ्रोझन मटार ( तुरीदाणे / पापडीचे दाणे ह्याला रिप्लेसमेंट म्हणून ) + कांदे आख्खे सोलून किंवा अर्धे इतक्या भाज्या हव्यातच. मुठिये बाजारात विकत मिळणारे वापरता येतात म्हणजे खटाटोप अजून कमी.
पाहिजे असेल आणि उपलब्ध असेल तर मग रताळे, सुरण घालू शकता पण क्वांटिटी वाढत जाते मग त्यामुळे एवढ्याच घेते.

कोथिंबीर + मिरची + भरपूर लसूण पाकळ्या ह्यांची चटणी करुन घेते. नारळ नाही घालत. पार्टीसाठी केला तर घालेन मात्र.

तेलात ओवा घालून मग बटाटे सोनेरी परतून घेते. बटाटे परतले की त्यावर हळद, धने पावडर, गरम मसाला घालून ढवळून, मग उरलेल्या भाज्या, तयार मुठिये घालून एकदा परतते. सर्वात शेवटी वाटण आणि मीठ घालून ढवळून झाकण ठेवून शिजवते.

पुढच्यावेळी केला की फोटो टाकेन. कारण कोनफळ क्वचितच मिळते आमच्याइथे

अहमदाबाद मधे सप्टेंबर महिन्यात जाणार आहे. तिथे कुठे मिळेल का तेव्हा?>>>> अनघा सांगेल की.:स्मित:

आपल्याकडे जसे हुरडा तसे गुजराथेत हा पदार्थ. शेतातील ताज्या भाज्या वापरून जो मडक्यात करतात, त्याची चव अप्रतिम असते. आणि तसेही सुरतेच्या भाज्या असतील तर प्रश्नच नाही.

त्यात तेल वगैरे नंतर आले असावे... मुंबईत ही तयार भाजी वजनावर विकतात आणि त्यातले अर्धे वजन तेलाचेच असते. बाबुलनाथ जवळ बिन तेलाची मिळते हि भाजी.

कोनफळ, तसे कुंडीतही लावता येते. याचा वेल असतो. जांभळ्या देठाची लाल पाने फार शोभिवंत दिसतात. कुंडीचा
आकार जेवढा असेल, त्या मानाने त्याचा आकार होतो. अर्थात जमिनीत लावला तर जास्त मोठा होतो.

आणि हे खरेय, प्रत्येकाच्या हातची चव वेगळीच असते. कांदे वापरता येतात, हे इथेच कळले.

मंगला बर्वे यांनी, फ्लॉवर, बोरे आणि बिनबियांचे पेरु ( ते मी कधी बघितले नाहीत ) पण सुचवले होते.

आपल्याकडील भोगीची भाजी किंवा डहाणूसाइडची पोपटी हे देखील उंधियोचे लोकल प्रकार आहेत.
उंधियोमधे मेथी चिरून /खूडून टाकली की छान laagate.

दिनेशदा, गुजराथमध्ये केल्या जाणार्‍या उंधियूच्या रेसिपीत कांदा असेल असे वाटत नाही. माझ्या माहेरी पणजोबा- आजोबा वर्षानुवर्षं अहमदाबादमध्ये स्थायिक होते पण त्यांनी कधीच कांदा घालून उंधियू केला नाही.

फक्त माझ्या साबाच ह्या पद्धतीने करताना पाहिलाय मी. त्याही गुजराथमध्ये राहिल्या आहेत. त्यांनी हा बदल मनाने केला असण्याची शक्यता आहे. फ्लॉवरही घालतात त्या. सुरुवातीला उंधियोत कांदे हे फारच विचित्र वाटले होते पण चव आवडली त्यामुळे मीही घालायला सुरुवात केली Happy

गुजराथमध्ये केल्या जाणार्‍या उंधियूच्या रेसिपीत कांदा असेल असे वाटत नाही >>> बरोबर आहे. नसतोच. पण लसणीची पात जर्रुर असत. फ्लॉवरही नसतो. बाहेर ब-याच ठिकाणी चांगला मिळतो. पण बहुतेक ठिकाणी तिखट व अत्यंत तेलकट असल्याने घरीच करावा असे माझे मत आहे. देवकीप्रमाणे मीही आठवडाभर हळूहळू तयारी करते. उंधियो बिना उत्तरायण (संक्रात आपली) सुनीसुनी वाटते. विकतचाच घ्यायचा असेल तर हॉनेस्ट रेस्टॉरंट, लक्ष्मी गाठिया रथ - आंबावाडी, मेहता-विजय चाररस्ता. अन एकंदर सगळीकडेच १४-१५ जानेवारी मिळतोच.

मस्त झाला उंधियु. थँक्स दिनेशदा!
मुठियांमध्ये तीळ घातले होते मात्र. आणि मेथीची पानं वरून पण मिसळली.
उसगावात फ्रोझन भाज्यांचं पाकीट आणून मायक्रो.त करायचे. पण हे असं सुरुवातीपासून करायला मज्जा आली. Happy

जाम टेम्पिंग दिसतोय , दिनेशदा.

बाहेरचा कधीच आणला नाही.माझी गुजराथी कलिग आहे . तिच्याकडे आम्ही स्पेशल फर्माईश करतो . ती ही एकदा सासरहून , एकदा माहेरून असं सिजन मध्ये ३-४ वेळा आणते.एक मराठी मैत्रिणही भन्नाट बनवते उंधियो.

घरी सगळ्याना फार आवडतो , पण साबा बनवतात त्याला टिपिकल चव नसते ( अर्थात हे सांगायची माझी हिम्मत नाही ) .हे फार मेहनतीच काम असल्यामुळे मी कधी प्रयत्न नाही केला आणि जे बनवतात त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट .

खूप तेल घालून केलेला कुठलाही पदार्थ मला आवडत नाही. कमीत कमी तेलातही उत्तम चवदार पदार्थ होतात असे काही लोकांना वाटतच नाही.

Pages