दुर्लक्षित/उपेक्षित झालेली उत्तम मराठी पुस्तकं आणि लेखक

Submitted by हर्ट on 10 June, 2009 - 13:47

जुनी मासिकं, दिवाळी अंक, काही निवडक ब्लाँग्स वाचताना काही पुस्तकांची, लेखकांची नावं वाचायला मिळातात जी पुर्वी कधी वाचलेली नसतात. थोडा शोध घेतला की कळतं ते पुस्तकं खरचं खूप छान आहे पण ते इतके दुर्लक्षित का झाले!!!!

किमया हे माधव आचवलांचे पुस्तक सोयरे सकळ वाचताना कळले. जी लोक नियमित वाचतात त्यांना मी ते पुस्तक मागितले तर त्यांनाही त्या पुस्तकांचे नाव माहिती नव्हते. जेंव्हा विकत घेऊन मी किमया वाचले तेंव्हा मला ते पुस्तक खूपच आवडले आणि मग आचवलांची जमवता येईल तितकी पुस्तक मी मिळवायला लागलो.

संत बहिणाई (बहिणाबाई चौधरी नाही) यांचे अभंग वाचताना देखील मला सारखे वाटत राहिले की इतके दिवस आपण बहिणाईंबद्दल अज्ञानी का होतो!

इथे माझे मित्र दोस्त खूप वाचतात. त्याच त्याच पुस्तकांबद्दल वाचून आणि लेखकांबद्दल वाचून मला असे वाटते की अजून खूपसा शोधा बाकी आहे. तेच तेच किती दिवस आपण लिहिणार वाचणार! काहीतरी नाविन गावायला हवं.

आलाय ना माझा हेतू ध्यानात.. लिहा तर मग.. नाही सांगा तर मग अशा उपेक्षित पुस्तकांची नावं.

आभारी राहीन!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सती - प्रवीण पाटकर

अडमा, अक्षरधाराचा (म्हणजे चिनूक्स जी पुस्तकं टाकतो ते ना?) उद्देश वेगळा आहे. बी, हा बाफ सुरु केल्याबद्दल तुझे आभार.
तू उल्लेख केलेले पहिले पुस्तक - किमया. अतिशय तरल, अतिशय तरल. हे दुर्लक्षितपेक्षा उपेक्षित आहे.
मी इथे मला भावलेली पुस्तके टाकेन (पुस्तकावर १ शब्दाची टिप्पणी न करता)

जहाज - कथासंग्रह - बाळकृष्ण प्रभुदेसाई
गंधर्व - कथासंग्रह - बाळकृष्ण प्रभुदेसाई
पैलपाखरे - अनुवादीत दीर्घकथा - जी ए कुलकर्णी
अंताजीची बखर - नंदा खरे - उपहासात्मक कादंबरी
रास - सुमा करंदीकर - आत्मचरीत्र

१. आनंद विनायक जातेगावकरांची पुस्तकं.
२. 'बंध-अनुबंध' - कमल पाध्ये. (या पुस्तकाबद्दल अधिक चर्चा व्हायला हवी होती, असं मला वाटतं. 'आहे मनोहर तरी'ला मिळाली, तेवढी तरी प्रसिद्धी मिळायला हवी होती.)
३. तवा चुल्यावर - सुमित्रा भावे
४. आनंदीबाई शिर्के यांचं आत्मचरित्र. (हे पुस्तक खूप जुनं. पण आज विस्मृतीत गेलं आहे, म्हणून उल्लेख केला.)
५. या यादीत रा.चिं. ढेरे यांची पुस्तकं बसतील का?
६. एका नक्षल्याचा जन्म - विलास मनोहर

'अक्षरवार्ता' या सदरात उपेक्षित राहिलेल्या पुस्तकांची ओळख करून देणं, हा हेतू आहेच. मात्र अजून तरी अशा पुस्तकांची दखल घेतली गेलेली नाही.

टण्या,
'रास'ला महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक, जयवंत दळवी पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाचं पारितोषिक मिळालं होतं. मला वाटतं, ३-४ आवृत्त्याही निघाल्या आहेत. Happy

बी, धन्यवाद. Happy

तुम्हाला ठणठणपाळ म्हणायचय का? जयवंत दळवी ना ठणठणपाळ म्हणजे..
बाकी वरच्या नावांपैकी फक्त बंध-अनुबंध वाचलय, अन किमयाबद्दल ऐकलय्...बाकीची नावंपण माहीत नाहीत..

धन्यवाद बी हा विषय येथे सुरू केल्याबद्दल.
किमया, जास्वंद आणि पत्र, एवढी तीनच माधव आचवलांची पुस्तके मला माहीत आहेत. अजून काही आहेत का ?
एका नक्षल्याचा जन्म हे ही विलास मनोहरांचं नाही वाचलेलं.
आमोद सुनासि आले... हा दि बा मोकाशी यांचा कथासंग्रह..सुरेख आहेत त्यातल्या काही कथा.

उड्डाण
विश्वासाचे
५० VARSHE BHATKYAA yaa topan navaanevartamaan patraat stambh kon lihit hote? kaahi mahinyaanpurvee Saraswati vaasi zaale aahet(kailasvaasee saathee paryaayee shabd)

भटक्या = श्री. प्रमोद नवलकर

भटक्या मी वाचलंय! मला आवडलेलं.

नचिकेताचे उपाख्यान - संजय जोशी - कादंबरी (मॅजेस्टिक)
रेणुकेचे उपाख्यान - संजय जोशी - कादंबरी (मॅजेस्टिक)
[ही उपेक्षित आहेत का हे माहीत नाही. पण बहुतेकांना माहीत नसतात.]
रान - कॉन्राड रिक्टर - अनु. जी. ए. कुलकर्णी
शिवार - कॉन्राड रिक्टर - अनु. जी. ए. कुलकर्णी
गाव - कॉन्राड रिक्टर - अनु. जी. ए. कुलकर्णी (या तिन्ही एकापुढे एक आहेत. बहुतेक परचुरे प्रकाशन)
[ही उपेक्षित म्हणावीत की दुर्मीळ ते ठाऊक नाही!]

मेघना, कॉन्राड रिक्टरची ही पुस्तके आता दुर्मीळ नाहीत. ही पाच पुस्तके आहेत आणि ह्यांच्या नवीन आवृत्या गेल्या १-२ वर्षातच आल्या आहेत. आणि दुर्लक्षितच म्हणायचे झाले तर खुद्द रिक्टर इंग्रजी साहित्यात दुर्लक्षित राहिला तिथे मराठी भाषांतराचे काय!

दि बा मोकाशींच्या कादम्बर्‍या.

द. भा. धामणसकरांचे कवितासंग्रह (मौज प्रकाशन). विशेषतः 'बरेच काही उगवून आलेले...' केवळ अप्रतिम कविता आहेत.

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले...

ट्यू, 'बरेच काही..' मस्त. हे मिळवायला हवं.

'मेड इन इंडिया' - पुरुषोत्तम बोरकर.

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

'मेड इन इंडिया' - पुरुषोत्तम बोरकर.

स्वाती ह्या पुस्तकावर आम्ही गेली २० वर्षे खदखदा हसत आहोत Proud

न वाचताच? Proud

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

Happy - या पुस्तकाला मात्र जरा चिकाटी लागेल. कारण भाषा पटकन समजत नाही.

" संजारी " - श्री. दा. पानवलकर
भाषा वैभव म्हणजे काय ह्याचा उत्तम नमुना - पानवलकरांची एक अप्रतिम कथा येथे वाचायला मिळू शकेल.
"पद्म"

प्रविण पाटकरांचे अजून एक "फिल्डवर्क"

"जेव्हा मी जात चोरली होती" - सदा कर्‍हाडे

"रुधिराक्ष" - दिलिप चित्रे
शिर्षक कथा नीट्शी कळत नसली तरी वाचायला छान वाटते - पण त्यातलीच "फूल मून इन विंटर" मात्र झकास आहे.

रुधिराक्षः ती सफायर नावाची कथा पण ह्यातलीच काय?

हो - सफायर पण चांगलीच आहे...
(चित्र्यांचेच अजून एक पुस्तक आहे "तिरकस आणि चौकस" म्हणून पण एवढे खास वाटले नाही)

टण्या, तुझ्या प्रतिसादामुळे मी 'रान', 'शिवार' आणि 'गाव'बद्दल चौकशी केली आणि ती मला लगेच मिळालीपण. धन्यवाद!

'रामनगरी' - राम नगरकर.

राम नगरकरांच्या या विनोदी आत्मचरित्राला खुद्द पुलंची प्रस्तावना आहे.

'रामनगरी' वर चित्रपट निघाला आहे. एकपात्री प्रयोग व्हायचे. आता इंग्रजीत एकपात्री प्रयोग होतात. आणि हे पुस्तक आत्मचरित्रांतला एक मानदंड समजलं जातं.

मृणालिनी देसाईंचं 'निशिगंध' कुणी वाचलं आहे? माझं हे अतिशय आवडतं पुस्तक आहे - पण माझी प्रत गायब आहे आणि नवीन कुठेच मिळत नाहीये.

ध्रृव भट्ट यांचं अंजली नरवणे यांनी भाषांतरीत केलेली सागरतीरी आणि तत्वमसि ही पुस्तके कोणी वाचली आहेत? फारच सुंदर आहेत. प्रचंड आवडली आम्हा सर्व मैत्रिणींना.

पेंढारकरांचे रारंगढांग,पुशि रेग्यांची सावित्री,कुंडलकरचे कोबाल्ट ब्लु कदाचित इतर लोक वाचतही असतील पण माझ्या बघण्यात मात्र फार लोकांनी नाही वाचलियेत ही चांगली असुन.पुस्तकांचा आकार लहान असला म्हणजे प्रसिध्दीपण कमी मिळत असावी.