मी अकरावीत असताना पहिल्यांदा सिगरेट ओढली,तेव्हा
काही कीक वगैरे बसली नाही,मित्रांच्या आग्र्हाखातर मी
पहील्यांदा सिगरेट ओढली होती,पुढे सिनिअर कॉलेजला
गेल्यावर आठवड्यातून एकदा दोनदा सिगरेट ओढायचो, मग त्या
सिगरेटची कीक बसायला लागली व ती हविहविशी वाटू
लागली.हे सगळे चालू असतान खिशात पैसे कमी असायचे
त्यामुळे आपोआपच व्यसनावर कंट्रोल होता.
पुढे कामाला लागल्यावर हे व्यसन पुन्हा चालू झाले ,घरच्यांना
कळु नये म्हणून हॉल्स चघळत घरी जाणे हा प्रकार मी
करायचो.घरी असताना तल्लफ आल्यावर माझी हालत पतली
व्हायची ,आई वडीलांसमोर सिगरेट ओढने म्हणजे महापाप
,आपला मुलगा वाया गेला याचे त्यांना वाईट वाटूनये म्हणून
मी माझी तल्लफ कंट्रोल करायचो.पुढे माझ्या मनाने सिगरेटचे
व्यसम सोडायचे ठरवले ,परंतू अनेकदा रिलॅप्स होऊन ते परत परत
चालूच राहिले.दरम्यानच्या काळात सरकारने सिगरेटच्या
उत्पादनावर टॅक्स वाढवला व सिगरेट महाग झाली, तशी
काही फुकाड्यांची पाचावर धारण बसली. माझा पगार बरा
असल्याने माझा रोजचा पाच सिगरेटचा कोटा चालूच
राहीला,निकोटीनची ठराविक मात्रा एकदा स्टेबल
झाल्यानंतर आधि बसणारी कीक बसेनाशी होते व शरिर जास्त
निकोटीनची मागणी करु लागते ,माझ्या बाबतीत हा प्रकार
सुरु झाला व अडचणीला सुरवात झाली,घरी तल्लफ आल्यावर
काय करायचे? ...अश्या वेळी फुकाडे मित्र मदतीला येतात
,त्यापैकीच एकाने मला तंबाखू चघळण्याचा सल्ला
दिला.तंबाखु मळणे व नंतर ती चघळणे मला जरी थर्डक्लास
लोकांचे व्यसम वाटत होते तरी एकदा ट्राय करुन बघु म्हणून मी
तंबाखू खायला सुरवात केली .तंबाखूचे पाकीट व चूना खिशात
बाळगता येतो, कधीही कुठेही खाता येते व फारसे कुणाला
समजतही नाही,परिणामतः मी घरात देखील राजरोस तंबाखू
खाउ लागलो.गेली तीन वर्षे मी तंबाखू खात आहे व कधीतरी
सिगारेटही ओढतो.
मागच्या वर्षापासून मला हे व्यसन सोडायचे आहे असे मनाने
घेतले आहे ,पण आता ते सुटता सुटत नाही आहे.तंबाखूची प्रत्येक
पुडी शेवटची असे मी ठरवतो व यांत्रिक पद्धतीने पुड्या घेत
राहतो,मला कँसर झाल्याची स्वप्न देखील पडतात.
मराठी आंतरजालावर अनेक अनुभवी मंडळी आहेत ,पैकी
काहींना सिगरेट तंबाखू व्यसन कधीतरी असेलच व त्यांनी ते
यशस्वीपणे सोडले असेल .माझे काही प्रश्न आहेत,
१ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे व्यसन कसे लागले ?
२.हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता
आहात?
३.पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?
४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते?
५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?
तंबाखू व सिगरेटचा विळखा कसा सोडवावा??????
Submitted by सिंथेटिक जिनियस on 23 June, 2016 - 11:20
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@संदीपसमीप,सिगरेट सोडण्यासाठी
@संदीपसमीप,सिगरेट सोडण्यासाठी तंबाखू चघळण्याचा वेडेपणा करु नका,मी असा वेडेपणा केला व पर्यायाने आता दोन्ही व्य्सनात गुंतलो आहे.सिगरेट सोडायची तर थेट सोडून द्या वा ज्यांनी सोडली आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या.मी हा धागा या साठीच काढला आहे की यशस्वीपणे कायमचे व्य्सन कसे सोडवावे यावर येथिल अनुभवी लोक ,डॉक्टर्स सल्ले देतील व त्याचा आपल्यासारख्या लोकांना फायदा होईल.
डॉ. आनंद नाडकर्णी (ठाणे) हे
डॉ. आनंद नाडकर्णी (ठाणे) हे मुक्तांगण (डॉ. अवचट, पुणे) या संस्थेशीही निगडित आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरुर त्यांना भेटावे. त्यांच्या अनुभवाचा, पुस्तकांचा जरुर फायदा घ्यावा. प्रॅक्टिकल सल्ले तेच देऊ शकतील.
व्यसनातून मुक्त होऊ इच्छिणार्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा..
हा धागा मस्त आहे. इथले वाचून
हा धागा मस्त आहे. इथले वाचून मलाही वाटू लागले आहे. अद्याप व्यसन नाही म्हणता येणार पण किमाम पान खायची तल्लफ येते मस्त जेवण झाल्यावर. सुरुवातीला आठवड्याला एखाद होणारे पण आता जवळपास रोजवर आले आहे.
हीच सुरुवात असतानाच माघारी फिरणे चांगले असे इथले अनुभ वाचून वाटत आहे.
@आशुचँप,हीच व्यसनाची सुरवात
@आशुचँप,हीच व्यसनाची सुरवात आहे किमामम्ध्ये निकोटीन असते ज्याची तुम्हाला आता सवय लागली आहे,त्वरीत ही सवय मोडने गरजेचे आहे ,नाहीतर माझ्यासारखा प्रचंड डिपेंडंन्स येईल.
मी या सर्व अनुभवांतून गेलेलो
मी या सर्व अनुभवांतून गेलेलो आहे. म्हणजे व्यसन लागण्याच्या व खूप प्रयत्नान्ती सुटण्याच्या....
तेव्हा तशी संगतही धरायचि नाही.


पण इकडे ये देशी तसे होणे नाही.
सिगारेटचे व्यसन कॉलेज जीवनात "शायनिंग" म्हणून, काहितरी "पराक्रम" करतोय असे वाटल्याने, सिनेमातील अनुकरण इत्यादीमुळे लागले.
ते १९८३ मध्ये दिवसाला २३/२४ सिगारेट्स पर्यंत गेल्यावर सोडुन दिले, पण ते सोडण्यासाठी व्यसन सोडावे हा उद्देश नसुन उघडपणे सिगारेट फुन्कता येत नाहि हेच कारण होते म्हणून त्याच्या ऐवजी तंबाखु चघळण्याचे व्यसन जोडुन घेतले ते आजतागायत आहे.
दरम्यानचे काळात, अतिताणतणाव/मानसिक/आर्थिक त्रास यांचेमुळे काही काळ दारुचे व्यसन लागले होते, पण अतिशय प्रयत्नपूर्वक सोडण्याचे स्वतःचे ४/५ वर्षांचे प्रयत्न वाया जाताहेत असे दिसल्यावर सरळ मुक्तांगणच्या ओपीडीचे सहाय्य घेऊन सहा महिन्यांच्या उतरत्या औषधोपचाराने त्यातुन मोकळा झालो. त्यासही बरीच वर्षे होऊन गेली आहे, पण अजुनही "स्लिप" व्हायची /घसरायची शक्यता मनात ठेऊनच, जिथे दारुचा महापुर वहातो अशी सर्व ठिकाणे भेटीसाठी वर्ज्य करतो. अपवाद कंपन्यातिल पार्ट्यांचा असतो, पण तिथे तर स्ट्रिक्टली पाण्याचा ग्लासही हातात घेत नाहि.
काये ना, दारुच्या गुत्त्याबाहेरिल हातगाडीवरुन शेंगदाणे घेऊन तिथेच चघळत उभारलो, तरी लोक "हा बेवडा आत्ताच आतुन गुत्त्यातुनच बाहेर पडलाय " असे समजणार हे नक्की,
माझ्या नशिबाने माझ्या फ्रेन्डसर्कल/मित्रपरिवारात एकही दारुबाज नाही/नव्हता, अशांशी मी मैत्री केली नव्हती. त्याव्यतिरिक्त मी कधीही "घराच्या बाहेर" घेतली नव्हती (मोजके अपवाद वगळता)/तशी सवय स्वत;ला लावली नव्हती. त्यामुळेही मला दारू सोडणे खूपच सोपे गेले. कारण कुणी त्याकरता बोलावणे/गळ घालणे/आग्रह करणे वगैरे शक्यच नव्हते. शिवाय जेव्हा घेतली तेव्हा स्वत;च्या पैक्याने घ्यायची सवय ठेवल्याने, जिथे कुठे फुकटचे वाटप चालू आहे, तिथे गोंडा घोळत लाळ गाळत्/ठिपकवत घसे ओले करण्याकरता व टाकी फुल्ल्ल करुन झिंगाटायला जाण्याची सवय नव्हतीच...
दारू पिण्यातही "सैराट" होणे अयोग्य याची जाणिव दारु पितानाही असायचीच असायची...
तर, हल्ली हल्लीच गेल्या काहि वर्षात मुक्तांगणला तंबाखु सेवनाकरताही औषधोपचार मिळतो, तो एकदा घेउन येणार आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे, कुंडलीवरुन "व्यसनाधिनता" समजु शकते (अर्थात एक्स्पर्ट ज्योतिषांनाच), व तशी ती मला माझ्या गुरुंनी पुढील दहा वर्षांनंतर लागु शकणार्या दारुच्या व्यसनाकरता सावध केले होते, व त्याच वेळेस प्रश्न विचारला म्हणुन उत्तरही दिले होते की, होय, तू यातुनही बाहेर पडशील, गुरुचे "अमुक स्थानचे" भ्रमण तुला यातुन बाहेर काढेल.
मला खरे तर मुक्तांगण मधे दर सव्वामहिन्याला येणार्या शंभराहुन जास्त अशा गेली दहाबारा वर्षे आलेल्या पेशंटच्या कुंडल्या अभ्यासाला मिळाल्या असत्या तर यावर अधिक प्रकाश पडला असता.
आशु, परत फिरा. किमाममुळे
आशु, परत फिरा. किमाममुळे मिळणारी हल्कीशी किक तुम्हाला हवीहवीशी वाटु लागलिये. हिच वेळ आहे थांबण्याची.
लिंबु, तुमचे प्रामाणिक कथन आवडले.सिगारेट्सचे प्रमाणे २३/२४ वरुन शून्यावर आणलेत याबद्दल तुमचे कौतुक. तंबाखू सेवन सोडण्याच्या बाबतीत तुमचा देव आणि कुन्डली तुम्हाला यश देवो,
स्तुत्य धागा
स्तुत्य धागा
व्यायाम सुरु करा. एकदा
व्यायाम सुरु करा. एकदा व्यायाम सुरु केलात की आपोआप सिगरेटचे दुष्परिणाम जाणवू लागतात >>> टण्या म्हणतोय तसं व्यायामाला सुरुवात करा , सिगारेट सोडण्यासाठी अजुन वेगळं काही करण्याची गरज पण पडणार नाही.
http://www.nytimes.com/2016/0
http://www.nytimes.com/2016/06/26/opinion/sunday/can-you-get-over-an-add...
हे वाचा.
सिगारेटशी जवळचा संबंध आला
सिगारेटशी जवळचा संबंध आला नाही म्हणुन अधिकाराने लिहु शकत नाही पण वरील व्यायामचा उपाय व दिवसातुन २० ओढण्यापेक्षा हळुहळु कमी करायचा उपाय सोपे वाटले.
निकोटीनच्या व्यसनाबद्दल भयानक
निकोटीनच्या व्यसनाबद्दल भयानक गैरसमज आहेत. सिगरेटचे नको ते फायदे सांगितले जातात किंवा नको ते समर्थन केले जाते. आपण स्वत:च स्वत:ला फसवत असतो आणि हे मान्य करण्यास आपण तयार नसतो.
पद्धतशीरपणे ब्रेन वॉश होऊन हे व्यसन लागते. हे व्यसन ९० ते ९५% मानसीक आहे. (हो मला माहित आहे मी काय बोलतोय ते. २७ वर्षे या व्यसनात अडकुन दिवसातून २० ते २५ सिगरेटी ओढणारा मी, अनेक वेळा सोडण्याचे असफल प्रयत्न करुन, नंतर शेवटी सहजपणे, कसलेही withdrawal symptoms सहन न करता यशस्वीपणे या व्यसनातून पूर्ण सुटका करुन घेतली आहे, आणि नंतर काहींना मदत केली आहे.)
एक एक भ्रम, ब्रेन वॉश पद्धतशीर पणे दूर केला की ह्या व्यसनापासून सहज सुटका होणे शक्य आहे.
कृपया सिगरेटी हळु हळु कमी करुन सोडुन देईन या भ्रमापासून दूर रहा. कमी केल्या की व्यसन सुटण्याची शक्यता झपाट्याने कमी होते.
वेळ मिळाला की मी यावर सविस्तर लिही्न, वेगळा धागा काढून.
तोवर ज्यांना या व्यसन सोडण्याची प्रामाणिक इच्छा आहे त्यांनी Allen Carr यांचे Easy way to stop smoking या पुस्तकाची हार्ड कॉपी मिळवून वाचा. PDF ची लिंक खाली देत आहे, पण व्यसन सोडायला हार्ड कॉपी खूप फायद्याची ठरेल. गुगल सर्च वर अनेक उलट सुलट विचार, हे खरे नाही, इत्यादी वाचायला मिळेल त्याकडे दुर्लक्ष करा.
http://new.vk.com/doc-55395457_226957034
ऑल द बेस्ट.
मानव पृथ्विकर, जरुर तुमच्या
मानव पृथ्विकर, जरुर तुमच्या व्यसन सोडण्याच्या अनुभवाचा लेख लिहा.जमल्यास इथे लिंक द्या.
मला तर वाटतंय मेडिटेशन जास्त
मला तर वाटतंय मेडिटेशन जास्त इफेक्ट देईल. माझ्या मित्राने सिगारेट सोडली तो सांगत होता की त्याला तल्लफ आली की तो असं इमेजिनेशन करायचा की त्याने सिगारेट सोडली....आणि त्याला फायदा झालाq
त्याला तल्लफ आली की तो असं
त्याला तल्लफ आली की तो असं इमेजिनेशन करायचा की त्याने सिगारेट सोडली <<< तल्लफ आल्यावर हे सुचण्याइतका प्रबळ विवेक त्याक्षणी जागा होऊन टिकायला हवा.
बापरे, पुजारी लोक पण दारु,
बापरे, पुजारी लोक पण दारु, सिगारेट पितात? तंबाखु खातात?
:घेरी येऊन पडलेला बाहुला:
निकोटीन / दारुची किमया अत्यंत
निकोटीन / दारुची किमया अत्यंत गरीब - भिकारी ते सर्वात बलाढ्य देशाचा राष्ट्रपती, अशिक्षीत खेडुत असो की सुशिक्षीत जगतमान्य शास्त्रज्ञ/ डॉक्टर, कडवा नास्तिक असो की प्रचंड धार्मिक मनुष्य - सगळ्यांवर सारखीच चालते, सगळ्यांनाच गुलाम बनवते. लोक फक्त "बघा एवढा मोठा शास्त्रज्ञ/डॉक्टर सिगरेट ओढतो / एवढा मोठा राष्ट्रपती शीण घालवायला एक दोन ड्रिंक्स घेतो काही कारण असेलच ना!" असा सोयीस्कर अर्थ काढून आपल्या व्यसनाचं आपल्याच विवेकबुद्धीपुढे समर्थन करतात.
मस्तं धागा. सोडली का मग??
मस्तं धागा.
सोडली का मग??
तंबाखू सोडणे लय अवघड .....
तंबाखू सोडणे लय अवघड .....
अनेक चित्रपटात त्याचे
अनेक चित्रपटात त्याचे ग्लोरिफिकेशन झालेले दाखवतात. अलिकडचे ठळक उदाहरण म्हणजे एन एच १० मधली, अनुष्का.. काय गरज होती त्यात तिला सिगारेट ओढताना दाखवायची ? भले ती पाटी कोपर्यात कुठेतरी का दाखवेनात ( मला वाटतं या सिडी वर ती पण नाही ) कोण वाचतेय ती ?
सिगारेटचे तब्येतीवर काय दुष्परिणाम होतात, घरातील इतर, खास करून लहान मुले यांच्यावर काय परिणाम होतो, ते आणखी ठळकपणे आणि सतत दाखवले गेले पाहिजे. परळच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधे पुर्वी काही भयानक पोस्टर्स होती. ती बघून कुणालाही तिटकारा आला असता.
सिगरेट ओढताना दाखवून सोबत
सिगरेट ओढताना दाखवून सोबत धोक्याची सूचना देण्यात खरच अर्थ नाही. धूम्रपान न दाखवणे हेच उत्तम आहे.
सिगरेटचे तब्येतीवर होणारे परिणाम ठळकपणे (एक वेगळी टेलिफिल्म) जरुर दाखवावेत. त्यामुळे व्यसन सुरु करण्यापासुन काही मुले, मुली परावृत्त होतील.
पण दुर्देवाने व्यसन लागल्यावर याचा परिणाम होत नाही. सिगरेट किती अपायकारक हे दाखवून व्यसन सुटत नाही.
तंबाखू सोडली आहे ,फक्त सिगरेट
तंबाखू सोडली आहे ,फक्त सिगरेट चालू आहे,हेवि विड्रॉवल सिम्प्टम्स येऊ नये म्हणून सिगरेट चालू आहे ,ती ही सकाळी एक आणि रात्री एक,कधीतरी दुपारी एखादी जास्त होते .सिगरेट ही कमी करुन सोड्यची आहे .इथे अपडेट देईनच.
Good going सिंजि. लवकरच
Good going सिंजि. लवकरच सिगरेट योडण्यात पण यश येवो. सदिच्छा!
{{{ तंबाखू व सिगरेटचा विळखा
{{{ तंबाखू व सिगरेटचा विळखा कसा सोडवावा?????? }}}
विळखा कोणी कोणाला घातलाय हे एकदा समजलं की तो सोडवायचा कोणी आणि कसा हेदेखील समजेल.
विळखा कोणी कोणाला घातलाय हे
विळखा कोणी कोणाला घातलाय हे एकदा समजलं की तो सोडवायचा कोणी आणि कसा हेदेखील समजेल. <<< हेही पटले.
अहो तो कुठलासा प्रसिद्ध
अहो तो कुठलासा प्रसिद्ध डायलॉग आहे ना, ' पहले आदमी शराब पिता है , बादमे शराब आदमी को पिती है'
तसं विळख्याचं आणि सिगरेटसचही असावं!
>>विळखा कोणी कोणाला घातलाय हे
>>विळखा कोणी कोणाला घातलाय हे एकदा समजलं की तो सोडवायचा कोणी आणि कसा हेदेखील समजेल.
हे वाचून पुर्वीचे बच्चन प्रभृतींचे दिवार बिवार सारखे चित्रपट आठवले, एका हातात सिगारेट, चषक आणि दुसर्या हाताने विळखा
एका हातात सिगारेट, चषक आणि
एका हातात सिगारेट, चषक आणि दुसर्या हाताने विळखा डोळा मारा
<<
टोटल तीन हात असायचे का?
सिगरेटच्या व्यसनात तीन गोष्टी
सिगरेटच्या व्यसनात तीन गोष्टी असतात. (टक्केवारी ढोबळमानाने कशाचा जास्त परिणाम असतो हे दाखवण्यास लिहिलीय.)
१. निकोटीनचे अॅडिक्शन - ५ ते १०%
२. ब्रेन वॉशिंग: भावनिक गुंतणुक आणि अनेक भ्रम - ८५ ते ९०%
३. सवयी ( जसे की तल्लफ असो नसो, अमुक एक झाल्यानंतर आपोआप सिगरेट पेटवणे, फिरायला गेलो असताना अमु़क ठिकाणी बसून सिगरेट ओढणे इत्यादि) जवळपास ५%
२ आणि ३ एकमेकांशी संबंधीत होऊन जातात. जसे की जेवल्यावर तल्लफ असो वा नसो, आधीची सिगरेट केव्हा का ओढली असो, ठराविक ठि़काणी जाउन सिगरेट ओढणे. तिकडे पावले नकळत वळतात. सिगरेट सोडलेला माणुस जेव्हा असा नकळत तिकडे वळतो आणि मग थबकतो हे लक्षात येऊन की 'अरे, आपण तर सिगरेट सोडली आहे'. तेव्हा त्याने हसून परत वळायला हवं, नाही?. पण नाही २ मधील ब्रेन वॉशिंगमुळे तो भावुक होतो. 'श्या!! आता काय करु? मी आता ओढु शकत नाही!' हा विचार त्याच्या मनात येतो. एका अत्यंत प्रिय व्यक्तीला आपण सोडुन चाललो आहोत तशा भावना मनात उत्पन्न होतात. इतर सिगरेट ओढणारे सुखी आणि आपण मात्र त्या उपभोगापासून वंचित होतोय ही भावना तल्लफ उत्पन्न करते जी असह्य वाटु लागते.
समजा ऑफिसमध्ये तुमची केबिन दमट आहे, प्रकाश कमी येतो, तुम्हाला नविन हवेशीर जास्त प्रकाश येणारी केबिन हवीय. तुम्हाला आता तशी नविन केबिन मिळाळीय.
काही दिवस ऑफिसात आलात की तुम्ही सवयीने नकळत जुन्या केबिनकडे जाऊ लागता आणि मग मध्येच लक्षात येते, अरे आता तर आपली नविन केबिन आहे तिकडे. तुम्ही काय करता? 'श्या! आता मी काय करु? कशी सोडु ही केबिन! म्हणुन भावुक होता, उदास होता? त्यागाची भावना उत्पन्न होते? त्या केबिनमध्ये आलेला नवा एम्प्लॉयी किती सुख उपभोगतोय मी मात्र वंचित रहातोय असे वाटते? नाही. तुम्ही हसता चिअरफुली नविन केबिनकडे वळता. आणि आपण जुन्याकेबिन कडे वळलो होतो का वळलो वगैरेचा तुम्ही विचारही करत बसत नाहीत.
मूळात निकोटीनच्या कमतरतेमुळे उत्पन्न होणारी तल्लफ (याला खरं तर तल्लफ न म्हणु नये) एवढी हलकी असते की ती इतर कुठे थोडे जरी लक्ष लागले असेल तर जाणवणारही नाही. आणि जाणवली तर भावुक न होता आता काहीच दिवसात आपल्या शरिरातून निकोटीनचा मागमूसही निघुन जाणार आहे असा चिअरफुल विचार केला तर हसून तिच्याकडे सहज दुर्लक्ष करता येते. पण प्रत्यक्षात आपण त्यात अनेक भावना ओततो. आपल्या नकळत. ही त्यागाची, वंचित होण्याची भावना मन पोखरुन जाते आणि मग जी मानसिक तल्लफ निर्माण होते तिला आपण मात्र केवळ निकोटिनच्या व्यसनची तल्लफ समजून बसतो.
वरिलपैकी १. म्हणजे छोटा राक्षस आणि २ + ३ म्हणजे मोठा राक्षस.
छोट्या राक्षसाचे खाद्य निकोटीन. त्यापसून त्याला दूर ठेवले की ३ ते ४ आठवड्यात तो संपतो.
मोठा राक्षस जर आपण आधी संपवला तर छोटा राक्षस हा किस झाड की पत्ती? सहज सोडता येते व्यसन. प्रचंड इच्छाशक्तीची अजिबात गरज भासत नाही.
पण प्रत्यक्षात आपण करतो उलटे. आपण छोटा राक्षस मारण्याच्या मागे लागतो, मोठा राक्षस तसाच रहातो. त्यामुळे छोटा राक्षस मरता मरत नाही. निकोटिन पॅच, निकोटेक्स गोळ्या किंवा आज एकच सिगरेट, एकच झुरका इत्यादि आपण करत रहातो ते केवळ आणि केवळ मोठा राक्षस तसाच आहे म्हणुन. छोटा राक्षस मेला तरी आपल्याला कळत नाही. आपण आता एकच सिगरेट ओढुन अथवा एक निकोटेक्स गोळी घेउन त्याला परत जिवंत करत रहातो.
पण सिगरेट अशा मार्गानेच सोडावी लागते असेच जग समजते. याला इच्छाशक्ती मार्ग म्हणतात. यात काही यशस्वी होतातही ( याला साधाराण दोन वर्षे तरी लागतात.) बरेच अपयशी होतात. अनेकदा. आणि नाद सोडून देतात.
या उलट जर केले, आधी हे व्यसन नक्की काय आहे, आपले त्याबद्दल भ्रम काय आहेत, आपण त्यात भावुक कसे होतो हे जाणुन घेउन, एक एक भ्रम पद्धतशीरपणे ओपन माइंडेडली दूर केले की मोठा राक्षस मरतो. यासाठी सिगरेट आधी बंद अथवा कमी करावी लागत नाही.
हा मोठा राक्षस आपण मारला, की छोटा राक्षस आपण सहज चित करु शकतो, तेही एकदासुद्धा तीव्र तल्लफ न येता. मोठा राक्षस मेला की त्या क्षणी आपण व्यसनमुक्त होतो. तुम्ही दिवसातून १० सिगरेट्स ओढत असाल की ५०. तुम्ही एका क्षणात शुन्यावर येता. आता उरते फक्त रक्तातील निकोटिन नैसर्गिकरित्या नाहीसे होऊ देणे जे आपोआप होत रहाते आणि ते तुम्ही अॅक्चुअली एन्जॉयही करु शकता.
त्याला फार तर ३ ते ४ आठवडे लागतात.
मानव पृथ्वीकर ,विस्तृत आणि
मानव पृथ्वीकर ,विस्तृत आणि छान प्रतिसाद.
छान समजावलत मानव.
छान समजावलत मानव.
Pages