तंबाखू व सिगरेटचा विळखा कसा सोडवावा??????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 23 June, 2016 - 11:20

मी अकरावीत असताना पहिल्यांदा सिगरेट ओढली,तेव्हा
काही कीक वगैरे बसली नाही,मित्रांच्या आग्र्हाखातर मी
पहील्यांदा सिगरेट ओढली होती,पुढे सिनिअर कॉलेजला
गेल्यावर आठवड्यातून एकदा दोनदा सिगरेट ओढायचो, मग त्या
सिगरेटची कीक बसायला लागली व ती हविहविशी वाटू
लागली.हे सगळे चालू असतान खिशात पैसे कमी असायचे
त्यामुळे आपोआपच व्यसनावर कंट्रोल होता.
पुढे कामाला लागल्यावर हे व्यसन पुन्हा चालू झाले ,घरच्यांना
कळु नये म्हणून हॉल्स चघळत घरी जाणे हा प्रकार मी
करायचो.घरी असताना तल्लफ आल्यावर माझी हालत पतली
व्हायची ,आई वडीलांसमोर सिगरेट ओढने म्हणजे महापाप
,आपला मुलगा वाया गेला याचे त्यांना वाईट वाटूनये म्हणून
मी माझी तल्लफ कंट्रोल करायचो.पुढे माझ्या मनाने सिगरेटचे
व्यसम सोडायचे ठरवले ,परंतू अनेकदा रिलॅप्स होऊन ते परत परत
चालूच राहिले.दरम्यानच्या काळात सरकारने सिगरेटच्या
उत्पादनावर टॅक्स वाढवला व सिगरेट महाग झाली, तशी
काही फुकाड्यांची पाचावर धारण बसली. माझा पगार बरा
असल्याने माझा रोजचा पाच सिगरेटचा कोटा चालूच
राहीला,निकोटीनची ठराविक मात्रा एकदा स्टेबल
झाल्यानंतर आधि बसणारी कीक बसेनाशी होते व शरिर जास्त
निकोटीनची मागणी करु लागते ,माझ्या बाबतीत हा प्रकार
सुरु झाला व अडचणीला सुरवात झाली,घरी तल्लफ आल्यावर
काय करायचे? ...अश्या वेळी फुकाडे मित्र मदतीला येतात
,त्यापैकीच एकाने मला तंबाखू चघळण्याचा सल्ला
दिला.तंबाखु मळणे व नंतर ती चघळणे मला जरी थर्डक्लास
लोकांचे व्यसम वाटत होते तरी एकदा ट्राय करुन बघु म्हणून मी
तंबाखू खायला सुरवात केली .तंबाखूचे पाकीट व चूना खिशात
बाळगता येतो, कधीही कुठेही खाता येते व फारसे कुणाला
समजतही नाही,परिणामतः मी घरात देखील राजरोस तंबाखू
खाउ लागलो.गेली तीन वर्षे मी तंबाखू खात आहे व कधीतरी
सिगारेटही ओढतो.
मागच्या वर्षापासून मला हे व्यसन सोडायचे आहे असे मनाने
घेतले आहे ,पण आता ते सुटता सुटत नाही आहे.तंबाखूची प्रत्येक
पुडी शेवटची असे मी ठरवतो व यांत्रिक पद्धतीने पुड्या घेत
राहतो,मला कँसर झाल्याची स्वप्न देखील पडतात.
मराठी आंतरजालावर अनेक अनुभवी मंडळी आहेत ,पैकी
काहींना सिगरेट तंबाखू व्यसन कधीतरी असेलच व त्यांनी ते
यशस्वीपणे सोडले असेल .माझे काही प्रश्न आहेत,
१ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे व्यसन कसे लागले ?
२.हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता
आहात?
३.पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?
४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते?
५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सिंथेटिक जिनियस आणि सोनू.

सिंथेटिक जिनियस, ही फक्त सुरवात आहे, फक्त संकल्पना मांडलीय.
खूप लिहावं लागेल (मोठा राक्षस नक्की कसा मारावा यासाठी), म्हणुन म्हणालो होतो वेगळा धागा काढेन.
पण वेळे अभावी करता आले नाही. मी सांगीतलेलं पुस्तक मिळवुन वाचा, कदाचित माझ्याऐवजी तुम्हीच वेगळा धागा काढाल. तुम्हाला शुभेच्छा.

मानव यांनी दिलेल्या आकडेवारीबद्दल माहिती नव्हते. मात्र स्वत:च्या उदाहरणावरून ते खरे असावे असे वाटते. सिगरेट ओढण्याची 'सवय' होते. अमूक एक गोष्ट केली की मग ओढायची, अमूक एक गोष्ट करायच्या आधी ओढायची, अमूक ठिकाणी ओढायची. उदाहरणार्थः सकाळी उठल्यावर संडासला जायच्या आधी. अथवा चहा पिताना. किंवा बसमधून प्रवास करताना बसने थांबा घेतला जेवणासाठी की तेव्हा ओढायची. समजा बसने त्याआधी अर्धाच तास थांबा घेतला असेल व तेव्हा एक ओढून झाली असेल तरी जेवणाच्या थांब्यानंतर ओढली नाही तर अतिशय चुकल्यासारखे वाटते.
जर निकोटीनचे व्यसन हा फॅक्टर जास्त असता तर मला विथड्रॉअल सिप्म्टम्स नक्की दिसले असते. मी ३० तरी ओढायचो दिवसाला. मला एकदाही सिगरेट सोडल्यावर शारिरीक त्रास झाला नाही, कधी घाम फुटला आहे, डोके प्रचंड दुखते आहे, मूड स्विन्ग्ज वगैरे काहीही झाले नाही. फक्त सिगरेट प्यायचो त्या सर्व ठिकाणांपासून, मित्रांपासून, आठवणींपासून दूर राहण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

सिगरेट सोडणे सोपे आहे, तुम्ही नक्की सोडू शकाल.

30 दिवस झाले सोडून>>>
@बन्या. तुम्ही इतरत्र ही पोस्ट केली त्यावरुन:

Congrants! Now you have become a non-smoker physically.

आता निकोटिन हा पदार्थ तुम्हाला कसलेही withdrawl symptoms देणार नाही.
पण त्याचं मानसिक व्यसन मात्र देऊ शकेल. तेव्हा तुम्ही आता मनाने नॉन स्मोकर झाले पाहिजे. जशी कुठलीही निकोटिन व्यसन नसलेली व्यक्ती आहे तसा मी आहे असे मनात ठसवा. आणि सिगरेटचा शून्य फायदा होता, सिगरेट ओढण्याने मिळणारे रिलीफ पूर्णतः फसवे होते हे लक्षात घ्या. समजा तुम्ही पायात खूप घट्ट बूट घातले. अर्ध्या तासात तुम्हाला त्याचा एवढा त्रास होईल रक्त प्रवाह कमी झाल्याने/ स्नायु, जॉईंट्स वरील दाबाने की तुम्ही मग एका ठिकाणी बसून पाय बुटातून काढाल आणि इतके मस्त वाटेल!
हे असे पाय बुटातून काढुन रिलीफ मिळणे म्हणजेच तल्लफ पुढे ताणता येत नाही म्हणुन सिगरेट ओढणे आहे.
ही तुम्हाला आता रिलीफ देतेय. पण ती ओढून झाली की परत तुम्ही ते घट्ट शूज पायात घातले आहेत. अर्ध्या / पाऊण / एक तासात परत तुम्हाला ते शूज सैल करून रिलीफ मिळवावा लागेल. हे घट्ट शूज घालत रहाणे म्हणजे निकोटिनचे लागलेले व्यसन. त्यातून मध्येच शूज काढुन बसणे म्हणजे रिलीफ मिळवणे पण त्याच बरोबर परत शूज घट्ट करण्याची प्रोसेस करणे दोन्ही आहे. त्यामुळे सिगरेट ओढण्याचा रिलीफ त्यावेळी वाटतो तो खरा असला तरी मुळात तो illusionary आहे. कारण जर टाईट शूज घालण्याची सवय लावून घेतली तरच शूज मध्येच सैल केल्याने रिलीफ मिळतो. ज्यांनी नेहमीचे कम्फर्ट नशूज घातलेत त्यांना नाही मिळत.

तेव्हा सिगरेट ओढण्याने कधीही खरा रिलीफ, शांत वाटणे, एकाग्रता वाढणे, ताण कमी होणे होत नव्हते. ते फक्त एक illusion होते. हे पक्के मनात बसले की तुम्हाला मानसिक तल्लफ येणार नाही.

तुम्ही आता नॉर्मल कम्फर्ट शूज घालणारे झाला आहात. तुम्ही पूर्णतः व्यसनमुक्त झाला आहात हे सिद्ध करून पहाण्याची तर काहीच आवश्यकता नाही. तुम्ही नॉन स्मोकर झाला आहात. कुठल्याही नॉन स्मोकरला असे काही सिद्ध करून पहाण्याची गरज पडते का की मी आता एक सिगरेट ओढून पहातो, मला मग परत तल्लफ आली नाही म्हणजे मी नॉन स्मोकर आहे? तुमच्या घरातील ओळखीत नॉन स्मोकर व्यक्ती करतात का असे सिद्ध? मग आता तुम्हीही ते अजिबात करायचे नाही.

सिगारेट सोबत भावना जोडून घेतल्या असतील, की बुवा मला माझ्या कठीण काळात तर सिगरेटने साथ दिली तर अत्यंत फालतु, बिनडोक, फसवा सायकॉलॉजिकल गेम आहे तो. एका क्षणात त्याला १००% फाट्यावर मारा.

माझ्या जुन्या जागा जिथे मी सिगरेट ओढायचो, आणि इतरही असायचे तिथे आता कसा जाऊ मी? असा प्रश्न पडत असेल तर आठवा. तुमच्या सोबत तिथे कुणी नॉन स्मोकर्स आले असतील. त्यांनी स्मोकिंग न करता त्या गप्पा तेवढ्याच एन्जॉय केल्या असतील. त्यासाठी त्यांनी सिगरेट ओढलीच पाहिजे असे त्यांना कधीच वाटले नाही.
आता तुम्ही नॉन स्मोकर झाला आहात तर तुम्हीही तेच करायचे. बिनधास्त तिथे जायचे त्यांच्या कंपनीत मिक्स व्हायचे. एखादाही झुरका मारण्याचे कुणाच्या आग्रहाला बळी पडण्याचे कारण नाही. कारण तुम्ही आता मनानेही पूर्ण नॉन स्मोकर झाला आहात आणि नॉन स्मोकर माणसं असच तर करतात. झालं.

फक्त एक होईल की अधुन मधून तुम्हाला स्वप्न पडेल दीर्घ मानसिक व्यसनामुळे की तुम्ही सिगरेट तर सोडली होती पण ओढताय आणि म्हणजे आपले व्यसन पूर्ण सुटलेच नाहीय वगैरे. किंवा अजून कसले तरी सिगरेटबद्दल स्वप्न. हे फक्त आपल्या सुप्त मनाचे खेळ आहेत. लगेच नॉस्टॅल्जिक होऊ नका. इतके दिवस मी काढले/सहन केले फक्त एक सिगरेट आता ओढायला काय हरकत आहे असे वाटू देऊ नका. लक्ष्यात घ्या तुम्ही आता मनानेही नॉन-स्मोकर झाला आहात आणि नॉन-स्मोकर्स सिगरेटचे स्वप्न पडले म्हणुन भावुक होत नाहीत की एखादी सिगरेट ओढत नाहीत. सिगरेट आणि भावना यांचा काडीचाही संबंध नाही. इतकी वर्षे बाळगलेल्या मानसिक व्यसनामुळे सुप्त मनात कुठेतरी सिगरेट म्हणजे खरंच रिलीफ हे illusion बसले आहे. त्याचे हे खेळ आहेत. हसून दुर्लक्ष करा आणि कामाला लागा.
मग असे स्वप्न कमी कमी होत बंद होतात आणि सुप्त मनातूनही ते illusion निघून जाते.

Pages