ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४३ वा श्रीशिवराज्याभिषेक सोहळा २०१६ (१८ जून २०१६)

Submitted by गणेश पावले on 20 June, 2016 - 03:36

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४३ वा श्रीशिवराज्याभिषेक सोहळा २०१६ – श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड
3.jpg
दरवर्षीप्रमाणे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतो तो क्षण म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा श्रीशिवराज्याभिषेक सोहळा. हा दिवस म्हणजे हिंदवी स्वातंत्र्याचा, रयतेच्या राज्याचा, गुलामगीरीच्या विळख्यात खितपत पडलेल्या हिंदुस्थानात एक मराठा राजा टिच्चून उभा होता आपल साम्राज्य प्रस्थापित करून हा लढवय्या योद्धा आजच्या दिवशी सिंहासनाधिश्वर झाला होता. अर्थात "श्रीशिवराज्याभिषेक सोहळा."
1_1.jpg
यादिवशी राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. भव्य सिंहासन (सभासदबखर म्हणते त्या प्रमाणे) ३२ मण सोन्याचे सिंहासन सोन्याने मढवले होते. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्ण्यांनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. राजाला आशीर्वाद दिला. राजेंनी त्यांना भेटवस्तू दिल्या. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. प्रत्येग गडावर ठरल्याप्रमाणे तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभटांनी पुढे येऊन त्यांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून आशीर्वाद दिला. इतर ब्राह्मण मंडळी पुढे झाली आणि त्यांनीही त्यांना आशीर्वाद दिले. राजे शिवाजी महाराजांनी ब्राह्मण आणि इतर सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. सोळा प्रकारचे महादान त्यांनी केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन त्यांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पद, नियुक्तीपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्न, वस्त्र, शस्त्र प्रदान केले. हे सर्व सकाळी आठ पर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे शिवाजी महाराज गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तीवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेनेचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिराचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.

2.jpg

"क्षत्रिय" माझं रक्त आहे. (क्षत्रियकुलावतंस) शिवछत्रपती शिवराय हे माझे दैवत आहेत.
होय..!! मी "मराठा" आहे.....मराठा..!! !!.जयोस्तु मराठा.!!
3_0.jpg4.jpg

पहाटे ५ वाजता गड चढायला सुरवात केली. धुके आणि पावसाचा सिड्काव गड चढण्यास प्रोत्साहन देत होते. मी आणि माझे सहकारी, माझी पत्नी छोटा मुलगा रात्रीच्या अंधारात गड चढू लागलो. रायगड चढताना हट्टाकट्टा पहिलवान सुद्धा थकतो तर आमची काय मिजास आम्हीही थकून गेलो. इतक्या गार हवेत सुद्धा घामाच्या धारा वाहत होत्या.
पण माझा छोटा रुद्र काही थकला न्हवता हातातला भगवा ध्वज त्याने एकदाही खाली ठेवला नाही.
5_0.jpg8.jpg

भगवा करात धरिला कधीही ना सोडू।
हिंदुत्व शञु सगळे हुडकुनी गाडू।।
शिवसुर्य ध्येय आमुच्या नित काळजात।
रणकंदनी फडकवू भगवा जगात।।
तो आमच्याप्रमाणे गड चढत होता. बेधुंद होवून… मध्येच आम्ही त्याला उचलून घेत होतो. पट्ठा पुन्हा खाली उतरून गड चढत होता. त्याला बघून आमचाही जोश वाढत होता. आणि ६ वाजता आम्ही गड चढून होळीच्या माळावर आलो.
होळीच्या माळावरचा शिवभक्तांचा जोश आणि ढोलपथकांचा आवेश, हर हर महादेवच्या गर्जना अंगातला क्षीण झटकून टाकतात. मग आम्हीही या जल्लोषात सामील झालो.
13435482_971153322983686_3716638968633349903_n.jpg18.jpg
हे सार पाहताना डोळ्याचं पारण फिटत होत. मध्येच पडणारा पाऊस आणि अंगातला उत्साह या सर्वांचा मिलाफ एक सुंदर अनुभव होता.
जो चिरकाल काळजाच्या कप्यात साठवला जाइल.
11.jpg
"कशासाठी आणि जगावे कसे मी
विचारा स्वताला असा प्रश्न नेहमी
जगू पांग फेडावया माय भू चे
जगू पांग फेडावया धर्म भू चे
आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे….
13417682_971152942983724_2594496332551086647_n.jpg

-----------------------------------
काही क्षण या देदिप्यमान सोहळ्याचे-
10.jpg12_0.jpg14.jpg15.jpg17_0.jpg19.jpg21.jpg25.jpg26.jpg29.jpg32.jpg33.jpg34.jpg35.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वाटलं वाचुन आणी फोटो पाहुन. तुमच्या मुलाचे कौतुक वाटले. त्याला शाबासकी!:स्मित:

त्या काळात हे कडे-कपार्‍यांचे हे आव्हान कसं पेललं असेल महाराजांनी आणी इतर मावळ्यांनी.

सुंदर ! फोटोही उत्तम आलेत ! लहान मुलाचे कौतुक वाटते. त्यांच्यातही हिंदुत्वाचे बिज अशाप्रकारे रोवने जरुरी आहे.

सर्वांचे मनापासून धन्यवाद...!!

"भगवा करात धरिला कधीही ना सोडू।
हिंदुत्व शञु सगळे हुडकुनी गाडू।।
शिवसुर्य ध्येय आमुच्या नित काळजात।
रणकंदनी फडकवू भगवा जगात।।"

छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!!!

फोटो आणि वृत्तांत छान आहेत. तुमच्या छोट्या मावळ्याचे खरंच खुप कौतुक वाटते आहे.