शेवग्याच्या शेंगांच्या गराचे बेसन्/पिठले

Submitted by हर्ट on 7 June, 2016 - 08:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) फार कोवळ्या नाहीत की फार राठ नाहीत अशा दोन ते तीन मध्यम लांबीच्या शेवग्याच्या शेंगा
२) फोडणीसाठी - चिरलेला कांदा, मिरची सुकी/ताजी, सोललेल्या लसूण पाकळ्या, मोहरी, जिरे, हळद, तेल, मिठ
३) चण्याच्या डाळीचे पिठ

चिमुटभर प्रेम..

क्रमवार पाककृती: 

१) शेंगा धुवुन त्याचे बोटभर तुकडे करा पण हे करताना शेंगांवरची हिरवी साल काढा. मी काढतो. त्यासाठी शेंग कापल्यानंतर ती पुर्ण न कापता १ टक्का कापायची नाही. ती हातानी ओढायची. साल आपोआप निघते.

सुटलेली साल:

२) कुकरच्या पातेल्यात किंवा डब्यात ह्या शेंगांमधे पाणी घाला.

३) मंद आचेवर ह्या शेंगा वाफेवर मऊसर होऊ द्या .. त्यासाठी कुकरची शिटी लगेच होणार नाही म्हणून गॅसची वात कमीत कमी ठेवा. २० मिनिटात शेंगा मऊ होतात. मग एकदम वात वाढवून शिटी काढा.

४) कुकरमधली वाफ ओसरली की एका मोठ्या ताटामधे किंवा परातीमधे शेंगा हळुच पसरवा आणि त्यावर अर्धगोलाकार अशी एखादे वाडते किंवा फुलपात्र ठेवा.

५) ह्या शेंगा इतक्या मऊ असतात की फुलपात्राच्या दाबाने लगेच त्यातून वाफवलेला गर बाहेर पडतो.

६) आता, हा गर थोडा थंड झाला की आपण जसे रव्याबेसनाचे लाडू बांढतो तसा हा गर हाताना उपसून्/दाबून घ्या. सगळा चोथा हातात येतो. हे करताना मला माझ्याच हातांचा फोटो घेणे शक्यच नव्हते. म्हणून फक्त निघालेला चोथा दाखवत आहे.

७) तुम्हाला हवी तशी फोडणी तयार करा आणि कांदा शिजला की त्यावर हा गर ओता.

८) आता, ह्याला एक उकळी आली खदखदणार्‍या पाण्यात पळीभर बेसन घाला. हे पिठले सरबरीतच छान लागते. हे पिठले उकळताना पिठल्याचे शिंतोडे सगळीकडे उडायला लागता. तेंव्हा थोडे दुरचं उभे रहा. एखादा शिंतोडा डोळ्यात गेला की उगाच इजा पोहचू नये.

माहितीचा स्रोत: 
सई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रकार.

शेवग्याच्या शेंगाचा गर काढायचा असेल तर एक सोप्पी पद्धत आहे.
तिचे मोठे तूकडे करायचे. साल काढायची नाही तसेच वाफवायचे. मग हाताने उभे तीन तूकडे करायचे ( ते सहज होतात ) मग चमच्याने खरवडून गर काढायचा. मऊ गर मिळतो. चोथा रहात नाही.

मस्त फोटो. Happy

पण ९९% (उरलेली) सालं कशी सोलायची? Happy
ऑल्टरनेटिव्हली सालांसकट शिजवून मग गर सोडवता येईल ना निपटून / स्क्रेप करून?

आजी शेंगांच पिठलं म्हणजे पिठल्यात शेग्नाचे तुकडे घालून त्या शिजवायची. तो वास पिठल्याला लागायचा आणि मधेच पिठल्याने माखलेल्या शेंगा चुफुन खायच्या. पिठलं म्हणण्यापेक्षा झुणका म्हणू. बऱ्यापैकी कोरडं करायची.
शेंगांची भाजीच.

शेंगाचे तुकडे घालून केलेलं पिठले खाल्लं आहे मात्र असे गर काढून केलेलं पिठलं पहिलेच बघितले. करून बघतो नक्की

फोटो मस्तच, छान केलंय.

गराचं पिठलं पहिल्यांदा बघतेय. आम्ही शेंगाचं पिठलं किंवा झुणका करतो सालासकट. तो वास उतरतोना सालासकट शेंगाचा तो आवडतो आम्हाला.

गराचं पिठलं पहिल्यांदा बघतेय.>>+१
शेंगाचे तुकडे घालून केलेलं पिठले आवडतं. छान आहे पाकृ, हे नक्की करणार.

गराचं पिठलं माहित नव्हतं. आता नक्की करणार. माझ्या शेवग्याच्या झाडाला असंख्य शेंगा लागल्या आहेत. एखाद-दोन महिन्यात काढता येतील. बी धन्यवाद रेसिपीसाठी.

शेवग्याच्या गराचं पिठलं पहिल्यांदाच बघतेय दाण्याचे कुट घालुन रस्सा भाजी माहित आहे
ही पण करुन बघणार

सशल, पहिले चित्र बघ. शेंगांचे तुकडे करताना शेंग मधे ९९ टक्के कापायची. ती जिथे अगदी अधर चिकटलेली आहे तेथून खेचली की दोन्ही तुकड्यांची साल निघून जाते. बघ कळते का Happy

सर्वांचे आभार.

तुमच्याही कृती येऊ द्या.. आमची आजी आई मावशी सासू अशी आशी करते इतपत माहिती नको Happy

फारच मस्त पाकृ.
फारच निगुतीने केली आहेस आणि इथे टाकताना ही प्रत्येक स्टेपचा फोटो येईल याची खबरदारी घेतली आहेस. खूपच छान. बाय द वे तव्यात केली आहेस का ही पाकृ?

माहितीचा स्रोत - सई
अय्या म्हणजे माझी बहिण का? Happy

दक्षिणा हो जुन्या माबोवर सईनेच ही कृती लिहिली होती. तिची जरा वेगळी होती मी त्यात बदल केले.

तव्यावर मी फक्त फोडणी केली आणि मग बेसन शिजायला चहाचे भांडे वापरले. माझ्याकडे इथे जेमतेमचं भांडी आहेत. पुर्वी खूप आणली होती पण दरवर्षी घर बदला वगैरेच्या नादात जी आणली ती परत भारतात पाठवली. आई इथे दोन वर्ष होती तेंव्हा तर केवढीतरी भांडी होती.

यशवंत, पिठलं एकदम चवीष्ट दिसतंय Happy भारीच हौशीचा आहेस.
तुझे बदल मस्त आहेत, ह्या पद्धतीने केल्यावर खाताना मधे मधे त्या शेंगा खाऊन बाजूला काढायचेही कष्ट वाचतील.

मी आठवत बसलेले की मी अशा पद्धतीनं कधी केलं आणि ते तुला कधी सांगितलं!
कारण मी नेहमीच्या पद्धतीनंच करते. शेंगांचे तुकडे अख्खे ठेवून आणि शेंगा शिजवलेल्या पाण्यात.

सई, त्या शेंगा खाताना कष्ट पडू नये म्हणूनंच मी त्याचा आधी गर काढला. शिवाय, शेंगा काय एक दोन तुकडे आपण चाखू शकतो. हा तीन शेंगांचा गर आहे. सी - विटॅमिन भरपुर प्रमाणात असतं ह्या शेंगांमधे.

धन्यवाद सर्वांना परत एकदा Happy

पुढली रेसेपी काटुरल्याची आहे Happy

असा गर काढून पिठले / आमटी करुन पाहिली पाहिजे.
मी पण शेंगाचे तुकडे ठेवूनच केलेलेच खाल्ले आहे आत्तापर्यंत.

आई कैरी वांग्याच्या भरतासारख्या भाजून घेते आणि त्यातला गर काढून कोयीसहीत त्याचे पिठले करते. फार वेगळीच चव असते अशा पिठल्याची. मीही आता कैरीचे पिठले करणार आहे तर भाजूनच करेन.

आई हिवाळ्यात तिळाची भाजून वाटून आमटी करते.

>> आई कैरी वांग्याच्या भरतासारख्या भाजून घेते आणि त्यातला गर काढून कोयीसहीत त्याचे पिठले करते. फार वेगळीच चव असते अशा पिठल्याची. मीही आता कैरीचे पिठले करणार आहे तर भाजूनच करेन.

खूपच इंटरेस्टींग वाटत आहे हे ही. करून बघायला हवं.

तिळाची आमटी बर्‍यापैकी दाण्याच्या आमटीसारखी लागत असेल का (टेक्स्चर वगैरे?)