आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
अण्णांचो प्रकटदिन निस्ता
अण्णांचो प्रकटदिन निस्ता फुसको बार ठरलाहां.:अओ: ते जिवंत नाय तर फक्त माई आणी पांडुक दिसतां.
<< ते जिवंत नाय तर फक्त माई
<< ते जिवंत नाय तर फक्त माई आणी पांडुक दिसतां.>> त्येंका दिसता तेंव्हां आपणाकय दिसताच ना ? मग झालां तर !!!

पण माई अण्णांक अजून कशी इचारणां नाय- " काय हो, तुमी खरांच त्या नेने वकीलाक रस्त्याकडची जमीन घेवंक सांगलेलास ? "
भाऊ हे भारीये! हो आपल्याला पण
भाऊ हे भारीये!:हाहा: हो आपल्याला पण दिसतात.
ए काल एका प्रोमो मधे माईंना
ए काल एका प्रोमो मधे माईंना सवाष्ण रुपात पाहिल. नक्की काय प्रकार होता तो? त्या एकट्या हसत होत्या आणि माधव, दत्ता टरकलेले होते..
परवा , माई खोलीत अण्णंशी बोलत
परवा , माई खोलीत अण्णंशी बोलत होत्या आणि अण्णं.नी एक पाय खाली ठेवला , पायावर क्लोज अप मारला .
मला वाटलं आता पाय उलटे दाखवतात की काय ??
मला वाटलं आता पाय उलटे
मला वाटलं आता पाय उलटे दाखवतात की काय ?? >>>>>>.

स्वस्ति.. काल 'राखणदार'
स्वस्ति..
काल 'राखणदार' म्हणून जे काय दाखवलानी ते हास्यास्पद होतं.
घरात निघालेलं एखादं फुरसं म्हणून चालून गेलं असतं ते.
घरात २५० तोळ्यांचे दागिने असून पण सुनेला लंकेची पार्वती करुन ठेवण्यामागचे अण्णा - अण्णीचे लाॅजिक काय असेल??
घरात २५० तोळ्यांचे दागिने
घरात २५० तोळ्यांचे दागिने >>>>> त्या २५० तोळ्यांचा डोळे दिपवणारा उजेड हा कपाटाच्या प्रत्येक कप्प्यात झीरोचे बल्ब शिताफिने लपवून लावल्याने पडला होता हे पण इकडच्या चाणाक्ष प्रेक्षकांनी नोटीस केलं असेलच !
रात्रीस खेळ चाले लवकरच बंद
रात्रीस खेळ चाले लवकरच बंद होणार
http://www.lokmat.com/storypage.php?catid=247&newsid=12610122
>>काल 'राखणदार' म्हणून जे काय
>>काल 'राखणदार' म्हणून जे काय दाखवलानी ते हास्यास्पद होतं.
तर काय खरो राखणदार कसो असता ह्या दिग्द्दर्शकाने बगल्यान नाय सा दिसता.
घरात निघालेलं एखादं फुरसं म्हणून चालून गेलं असतं ते.>>>
ह्या सगळ्या मागे माईच आसत असा वाटता.
त्या वरच्या 'लोकमत' च्या
त्या वरच्या 'लोकमत' च्या बातमीत शेवटी लिहिलंय की
"रात्रीस खेळ चाले मालिकेनं निरोप घेतल्यानंतर पुन्हा एकदा दिल दोस्ती दुनियादारी नवी ढंगात, नव्या रुपात रसिकांच्या भेटीला येणार असल्याचंही समजतंय"
है शाब्बास !!!!
अरे वा रा खे चा संपणार, गुड
अरे वा रा खे चा संपणार, गुड न्यूज. D 3 सुरु होणार, मस्तच.
आता राखेचा ला वेग येईल, शास्त्रज्ञ बैना काम असेल आता फुल टू स्पीडमध्ये.
मध्ये संजय जाधवची मुलाखत बघितली एका न्यूज channel वर, तो म्हणाला D3 वर काम चालू आहे, त्याची दुहेरी नावाची मालिका स्टार प्रवाहवर चालू झालीय त्यानिमित्ताने बाईट होता त्याचा.
<< रात्रीस खेळ चाले लवकरच बंद
<< रात्रीस खेळ चाले लवकरच बंद होणार >> तरीच अण्णांका शेवटच्या फॅमिली फोटोसाठी परत आणतहत !
ते कपाट जसं काही फक्त दागिने
ते कपाट जसं काही फक्त दागिने ठेवायला. सुट्सुटीतपणे दागिन्यांचे डबे ठेवलेले फडताळात असतात तसे. कुलुपही मजेशीर आहे ते.
३डी परत चालू होणार!!!!! मस्तच
३डी परत चालू होणार!!!!!
मस्तच बातमी.
मग गेल्यावेळेला शोधाशोध झाली
मग गेल्यावेळेला शोधाशोध झाली तेन्व्हा हे डबे कुठे होते ?
या घराला नक्की खोल्या किती आहेत ?
या घराला नक्की खोल्या किती
या घराला नक्की खोल्या किती आहेत ?>>>>>>> तो एक संशोधनाचा विषय आहे
मग जाउ दे , ते काम निलिमाच
मग जाउ दे , ते काम निलिमाच आहे .
आता या पुढे ही सिरीयल कशी
आता या पुढे ही सिरीयल कशी सरकणार याबद्दल अजून एक शक्यता. निलीमाचे वडील आणि अण्णा हे बालमित्र. निलीमाच्या वडिलांनी 'गायब होने का फारमुला' शोधून एक 'गैजेट' बनवलं असतं. ते वापरुन अण्णा गायब झाले . याच सायंटिस्ट वडिलांची सायंटिस्ट मुलगी निलीमा ह्या सगळ्याचा आता पर्दाफाश करुन 'मिसेस इंडिया' बनणार ! मोगँबो खुश हुवा !
(No subject)
कपाटातील दागिने यमुना व
कपाटातील दागिने यमुना व कौलांवरून पांडूपण बघतो.
<< घरात २५० तोळ्यांचे दागिने
<< घरात २५० तोळ्यांचे दागिने असून पण सुनेला लंकेची पार्वती करुन ठेवण्यामागचे अण्णा - अण्णीचे लाॅजिक काय असेल?? >> सिंपल लॉजिक ! बेरक्या अण्णानी जर गांवकर्यांच्ये लुबाडलेलेच असतीत ते दागिने आणि सून जर मिरंवूक लागली तेच अंगावर घालून, तर गांवात बोंब नाय उठाची !!!

<< कपाटातील दागिने यमुना व कौलांवरून पांडूपण बघतो. >> संशयाच्या जाळ्यात अधिकाधीक मासे अडाकलेलेच बरे. तितकोच सिरीयलच्या प्रेक्षकांच्या डोक्याक अधिक ताप !!
हो हो, काल फेसबुकवर पण पाहिल
हो हो, काल फेसबुकवर पण पाहिल ड३ परत येतय म्हणुन....
भगवती कुथे होतीस? तुझ्या
भगवती कुथे होतीस? तुझ्या भरोश्यावर मी सीरियल पाहणे सोड्ले ना!!! असो सीरियलचे अपडेस लिहीत जा ग.. बरेच जण वाट पाहातात ..
रश्मी कुठाय ??? भगवती प्रगटली
रश्मी कुठाय ???

भगवती प्रगटली . प्रकट दिन करायचा का ???????
मी आहे इथेच. अण्णांनी
मी आहे इथेच.:फिदी: अण्णांनी हुलकावणी दिली, ते बहुतेक आज प्रक॑ट होतील. कालच्या भागात आजची झलक दाखवली. तो दत्ता, झाडाच्या मोठ्या पानावर कुंकवाने माधवचे नाव का लिहीत होता? त्याला माधवची जमीन हडपायची आहे का? रघुकाकांशी तो जमिनीवरुनच काहीतरी बोलत होता. ती सुसल्या डोक्यात जायला लागली आहे आता. सारखे दागिने दागिने करते, पण ते दागिने तिच्या आईला अण्णांनीच दिले असतील की. जमीन पण बळकावुन विकलेली असते ना तिने ( शेवंताने) मग कशाला हवेत दागिने? की हपापाचा माल गपापा करायचाय?:अओ:
<< की हपापाचा माल गपापा
<< की हपापाचा माल गपापा करायचाय? >> शेवंताक झाडावर लटकांची पाळी इली ह्येचो अर्थ अण्णानीं तिकां नक्कीच फसवलां असतलां; काय आणि कसां तां आपणांक थोडांच कळलाहा ? माई सांगता , अण्णानी तिच्ये दागिने शेवंताक दिले. कदाचित, अण्णानी शेवंताच्येच दागिने धापून घरात नाय कशावरसून आणले ? अण्णांचो कायैक भंरवसो नाय. हपापाचा माल गपापा कोण करताहा , होच तर प्रश्न आसा !!!
]
[ माझो अण्णांवर आकस नाय किंवा माकां शेवंताबद्दल प्रेमय नाय; माकां वाटता तां सांगलंय, इतक्यांच !
माझो अण्णांवर आकस नाय किंवा
माझो अण्णांवर आकस नाय किंवा माकां शेवंताबद्दल प्रेमय नाय; माकां वाटता तां सांगलंय, इतक्यांच, भाऊकाका भारी स्पष्टीकरण
.
आतां आर्चिस आणि निलीमाकय
आतां आर्चिस आणि निलीमाकय नाईकांच्ये दागिने , जमिनी ह्येच्याबद्दल कुतूहलमिश्रित लालच निर्माण झालेली दिसता ! गुंतो वाढवूंक आतां ही एक भर !!
अण्णा हे प्रातिनिधिक आहेत.
अण्णा हे प्रातिनिधिक आहेत. महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनाही असेच पुन्हा परतून यावे लागेल, नाहीतर राज्याचा घोळ सुटायचा नाही.
Pages