युद्धपट

Submitted by आशुचँप on 30 May, 2016 - 18:12

युद्धपटांबद्दल आत्ता लिहावेसे वाटले आणि माबोवर याआधी काय काय लिखाण झाले आहे ते पाहले असता बरेच काही वाचनिय मिळाले. पण ते एकसलग नव्हते. या धाग्याचा उद्देश युद्धपटांची चर्चा, नविन काही आले असतील तर किंवा काही जुने क्लासिक्स, युद्धाचे डावपेच यावरही बोलता येईल.

मी गेल्या काहीवर्षात बरेच काही युद्धपट जमवले आहेत. त्यात डॉक्युमेंट्रीज आहेत, टीव्ही सिरीयल्स आहेत, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धावरचे अनेक चित्रपट, मध्ययुगीन कालातले काही, आणि अमेरिका-इराक. आयर्लंडमधली यादवी असे अनेक.

त्यानिमित्ताने युद्धपटांची आवड असलेले आपण एकत्र येऊ एखादा विकेंड सत्कारणी लाऊ शकतो.

बाकीच्यांनीही आपापले खजिने खुले करावेत.

पहिल्यांदा माहीतीपट

World at War - १९७३ मध्ये प्रसारित झालेल्या या माहीतीपटाचे तब्बल २६ भाग आहेत. यात हिटलर सत्तेवर येण्यापासून जपानवर अणूबॉब टाकून युद्धाची समाप्ती होईपर्यंत सर्व व्यापक घटनांचा समावेश आहे. यात त्या काळात झालेले ओरीजनल शूटींग आहेच, शिवाय तज्ञांची मते, त्यांचे विश्लेषणही सुंदर रित्या केले आहे. तेव्हाचा युरोप कसा होता याचे बरेच अधिकृत फुटेज बघायला मिळते यात. मस्ट वॉच.

Apocalypse Hitler - २०११ मध्ये प्रसारित झालेली फिल्म. हिटलरच्या जन्मापासून, त्याची लढाई, माइन काम्फ, सत्तेवर येणे आणि शेवटी त्याचा उदयास्त. यातही अनेक ओरीजनल फुटेज, हिटलरची भाषणे बघायला मिळतात. एक एक तासाचे असे दोन भाग आहेत.

WW1 apocalypse - पहिल्या महायुद्धावर हिस्टरी चॅनेलने बनवलेली अतिशय माहीतीपर सिरीज. टँक पासून, विमाने, विषारी धूर, खंदकातली लढाई याचे प्रभावी चित्रण. चार भागांची मालिका.

WW2 apocalypse - सहा भागांची मालिका, बऱ्यापैकी जमलीये पण पहिल्या महायुद्धाच्या मानाने तितकी माहीतीपर नाही.

Vietnam War - अमेरिका-विएतनाम युद्धावरची हिस्टरी चॅनेलची मालिका. दोन भागात. बरीच नविन माहीती कळाली या सिरीज मधून.

Battlefield - १९९४ मध्ये या माहीतीपटाची पहिली मालिका आली. त्यानंतर ठराविक कालानी २००२ पर्यंत असे सहा भाग रिलीज करण्यात आले. या मालिकेतही अनेक ओरीजनल क्लिपिंग्ज आहेत. पण क्वालीटी इतकी चांगली नाहीये. पण अनेक युद्धप्रसंग पाहता येतात.

हे झाले ओरीजनल माहीतीपट. आता काही नाट्यरुपांतर केलले माहीतपट वजा टीव्ही सिरीज.

band of brothers - युद्धपटांवरची सिरीज आणि त्यात बँड ऑफ ब्रदर्स नाही हे सर्वथा अशक्य. माझी सर्वात आवडती मालिका. कित्येक वेळा बघून झाली असेल.
सेव्हींग प्रायव्हेट रियान च्या उत्तुंग यशानंतर स्टीव्हन स्पीलबर्ग आणि टॉम हँक्स यांनी एचबीओ साठी केलेली ही निर्मिती कुठल्याही बिग बजेट चित्रपटाला मागे टाकेल. कलाकारांची निवड, फोटोग्राफी, व्हिजुअल इफेक्ट्स हे सगळेच इतके उच्च दर्जाचे आहे की कुठेही ती मालिका न वाटता १० भागांचा चित्रपट बघतो आहोत असेच वाटते. त्यात ज्यांच्यावर ती मालिका बेतलीये ते वृद्ध सैनिक त्यांच्या आठवणी सांगतात तो पार्टपण जमलाय.

इझी कंपनीच्या शूरवीरांनी दुसऱ्या महायुद्धात गाजवलेली कामगिरी, मेजर विंटर्स, सोबर्सच्या भुमिकेत फ्रेंड्समधला डेव्हीड श्विमर, त्यांचे ट्रेनिंग, पहिली लढाई, ते गोळ्यांचे सू...सू करत जाणारे आवाज, तोफांचा धडाका, अतिशय जीवंत चित्रण झाले आहे.

The Pacific - बँड ऑफ ब्रदर्स २००१ मध्ये रिलीज झाली, त्यानंतर तब्बल ९ वर्षांनी अमेरिकेच्या पॅसिफिक युद्धावर आधारीत ही मालिका स्पीलबर्ग-हँक्स जोडीने आणली. मूळ स्वरूप जरी तसेच ठेवले असले तरी यात मुख्य भर मरीन्सचे आयुष्य दाखवणे होते. यातलेही यु्द्धाचे प्रसंग कमलीचे खरे वाटतात आणि ते जास्तीत जास्त अचूक असावेत यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले हे दाखवणारा एक भाग आहे. वादळी पावसात, अनोळखी जंगलात, दिवस दिवस चिखलात रुतून मार्गक्रमण करणाऱ्या मरीन्सनी किती सोसले असेल याची किमान कल्पना येण्यासाठी कलाकारांनाही तशा प्रकारचे वातावरण निर्माण करून त्यात ठेवण्यात आले. त्यामुळे या मालिकेला जो काही जिंवतपणा आलाय त्याला तोड नाही.

युजीन स्लेज, मेडल अॉफ अॉनर मिळालेला जॉन बॅसिलोन, रॉबर्ट लेकी या प्रमुख पात्रांभोवती ही मालिका फिरते. त्यात मग ग्वाडलकॅनाल, पेलेलू, ओकीनावा, आयवो जिमा युद्धे अनुषंगाने येतात.
त्यातला सर्वात जमलेला पार्ट म्हणजे शेवटचा. युद्ध संपल्यावर ही तरूण पिढी अक्षरश उध्वस्त होऊन गेलेली असते. वयाच्या २०-२२ मध्ये ज्या प्रकारचा नरसंहार, रक्तपात, पाहून निबर होऊन गेलेली मने आणि शिक्षण सोडून युद्धावर गेल्यामुळे कसलेही भविष्य नाही, पुढे काय करायचे याबाबत काहीही विचार नाही. असे एक दोन नव्हे तर हजारोंनी हे बेरोजागार तरूण म्हणजे युद्धाचे एक बळीच.
नंतर युजीनने लिहीलेले विथ द ओल्ड ब्रीड, आणि मूळचा वार्ताहर असलेल्या लेकीने हेल्मेट फॉर माय पिलो हे दोन्ही पुस्तकेही मिळवली. अजून ती वाचण्याचा योग आला नाहीये.

Generation War - जर्मन बँड ऑफ ब्रदर्स असे म्हणून ओळखली जाणारी ही मालिका २०१३ मध्ये प्रसारित झाली. असेही दुसऱ्या महायुद्धावरचे अनेक चित्रपट हे अमेरिकन हिरोंज भोवतीच घुटमळत राहतात. युरोपीय चित्रपटांमध्ये नाझींचे अत्याचार हा प्रमुख विषय असतो. पण याही पलिकडे इतिहासकारांनी लिहीले आहे की सगळेच जर्मन नाझी तत्वज्ञानाने भारले गेले नव्हते. जर्मन सैनिक हा अतिशय शूर, निर्भय, कणखर असा होता आणि आघाडीवर त्याने निधड्या छातीने शौर्य गाजवले आहे. नाझी पापकृत्यांबद्दल कित्येक सैनिकांना माहीतीही नव्हते. त्यामुळे जर्मन म्हणला की तो वांशिक अभिमानाने पछाडला गेला असणारा या गृहीतकाला ही मालिका छेद देते.
पाच मित्रांची ही कथा. त्यात दोन भाऊ आहेत, सैनिक, एक नर्स आहे, एक मॉडेल आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा घट्ट मित्र हा एक ज्यु आहे. हिटलरच्या वंशवादाशी त्यांना काहीच घेणेदेणे नाही. पण युद्धाचे पडघम वाजू लागले आहेत आणि त्यांना असे वाटते आहे की युद्ध थोडक्या काळातच संपेल आणि आपण पुन्हा एकदा एकत्र येऊन धमाल करू.

पण युद्ध लांबतच जाते, आणि त्यात प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी मिळून जाते ते पाहून काटा येतो अंगावर.

========================================================================

ही मी माझ्याकडे असलेल्या चित्रपटांची यादी दिली आहे. सर्व चित्रपटांची प्रिंट चांगल्या दर्जाची आहे. काही तर परकीय भाषेतले आहेत, त्यांच्या सबटायटल्ससकट.

अजूनही बरीच वाढवता येणार आहे. आणि जसा वेळ मिळत जाईल तसा तसा इथेच त्या चित्रपटांची थोडक्यात ओळख देत जाईन. किंवा बाकी कुणाला त्याबद्दल लिहावेसे वाटत असेल तर यु आर वेलकम.

पहिल्या महायुद्धावरील चित्रपट

1. Forbidden Ground (2013)
2. Glory (1989)
3. Joyex Noel (2005)-

हा खऱ्या घटनेवर आधारीत चित्रपट डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. पहिल्या महायुद्धात खंदकाची लढाई लढली गेली. महीनोन महिने दोन्ही सैन्ये समोरा समोर युद्धसज्ज अवस्थेत. मध्येच गोळीबार, मध्येच शेलींग, कधी मागे सरकायचे कधी पुढे पण युद्ध स्टेलमेट अवस्थेतच.
अशातच १९१४ सालचा नाताळ येतो आणि एका आघाडीवरचे प्रमुख तात्पुरता तह करायचे ठरवतात. त्याप्रमाणे दोन्ही बाजू एकत्र येतात, नाताळ साजरा करतात, खेळतात, गळ्यात गळे घालून नाचतात. आणि रात्री हमसाहमशी रडतात. उद्या याच लोकांना आपण गोळ्या घालून मारणार आहोत याची भावना झाल्यामुळे.
जोपर्यंत शत्रु अज्ञात आहे तोपर्यंत आपल्या प्रमुखांनी दिलेली आज्ञा पाळताना हात थरथरत नाही, पण मित्रत्वाची भावना निर्माण झाल्यावर वैर संपते म्हणतात, तसेच झाले.
पण जर सैनिकांमध्ये अशी भावना निर्माण झालेली सत्ताधीशांना थोडीच चालणार. या सैनिकांच्या रक्तातूनच त्यांची भव्य दिव्य साम्राज्ये उभी राहीली आहेत. असा एखादा मैत्रीचा प्रसंगही ते साम्राज्य ढासळून पडायला कारणीभूत ठरेल या भितीने ख्रिसमस तह करणाऱ्या सैनिकांवर कडक कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर कधाही कुठेही अशा प्रकारचा तह झाला नाही. पुढे विषारी वायू वापरण्यात आल्यानंतर उरले सुरले मित्रत्वही संपले आणि उरला फक्त सगळे काही करपवून टाकणारा विखार.

या अद्भुत घ़टनेवर Joyex Noel अर्थात मेरी ख्रिसमस हा फ्रेंच चित्रपट आहे. त्याचा शेवट तर अगदी टचिंग आहे.

4. The Trench (1999)
5. War Horse (2011)
6. All Quite on the Western Front

दुसऱ्या महायुद्धावरील चित्रपट

1. A Bridge too Far (1977)
2. Apocalypse Now (1979)
3. Back to 1942 (2012)
4. Das Boot (1985)
5. Defiance (2008)
6. Emperor (2012)
7. Flags of our fathers (2006)
8. Full Metal Jacket (1987)
9. Into The white (2012)
10. Inglorious Basterds (2009)
11. Katyn (2007)
12. Letter from Iwo Jima (2006)
13. Life is beautiful (1997)
14. Pearl Harbour (2001)
15. Platoon (1986)
16. Saints and Soldiers Airborne Creed (2012)
17. Stalingrad (1993 German)
18. Stalingrad (2013)
19. The Bridge on the river Kwai (1957)

या चित्रपटाबद्दल काय बोलावे. तब्बल सात अॅकडमी अॅवार्ड मिळालेला हा चित्रपट युद्धपटांमधले एक मानाचे पान आहे. जपानी कर्नल सायटो व ब्रिटिश कर्नल निकोल्सन यांच्यातील संघर्षाची ही कथा! बर्माच्या घनदाट जंगलात युद्धकैदी म्हणून आलेली ब्रिटीश तुकडी आणि त्यांना राबवून घेणारा खलनायक सायटो. ज्या पुलासाठी परफेक्शन आणण्यासाठी जीवाचे रान केले तोच पूल जेव्हा निकोल्सन उडवण्याचा निर्णय घेतो, तेव्हा काय वाटते हे सांगता येत नाही.

20. The Great Escape (1963)
21. The Pianist (2002)
22. The Monuments men (2014)
23. The guns of navaron
24. Valkyrie (2008)
25. Where Eagles dare
26. Windtalkers (2002)
27. Enemy at the gates (2001)
28. Saving Private Ryan (1998)
29. Scihndler’s List (1993)
30. The Downfall (2004 German)
31. The thin red line (1998)
32. White Tiger (2012)
33. Fury (2014)
34. Saints and Soldiers, Void (2013)
35. The Boy in Stripped Pajamas
36. We Were Soldiers (2002)
37. Tae Guk Gi - Brotherhood of War (2005)
38. Warsaw 44 (2014)
39. 71 (2014)
40. Kajaki (2014)

इतर युद्धांवरील चित्रपट

1. Black Hawk Down
2. Green Zone
3. Lone Survivor
4. The Dirty Dozen
5. The Front line
6. The Hurt Locker
7. Behind Enemy Lines
8. Hotel Rwanda

मध्ययुगीन कालातील युद्धावरील चित्रपट

1. 300 (2006)
2. 300 Rise of an empire (2014)
3. Gladiator
4. Troy (2004)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.

युद्धपट शीर्षक वाचून टिपिकल बॉलिवूड सिनेमे डोळ्यासमोर आले.

या सर्व चित्रपटांचा आणि महितीपटांचा परिचय करून दिला आहे. एक दोन पहिले आहेत. बाकीचे शोधून बघावे लागतील आता.

आईशप्पथ, हा तर आवडीचा अन अभ्यासाचा विषय रे....... Happy
>>>> मी गेल्या काहीवर्षात बरेच काही युद्धपट जमवले आहेत. <<<
जमवले म्हणजे? सॉफ्ट फाईल्स? कॉपी करुन देऊ शकतोस? लग्गेच पत्ता सांग तुझा..... तुझ्या घरावर धाडच घालतो... Proud
आता तुझी पाठ सोडत नाही बघ..... Happy

लिंबू दा - काही डीव्हीडी आहेत, काही डाउनलोड केले आहेत. कधीही या बिनधास्त. जवळपास 100 जीबी चा डेटा आहे.

रश्मी - होय. आता माझ्याकडच्या चित्रपटांचीही यादी देणार आहे.

डाऊनफॉल - हिटलरचे शेवटचे दहा दिवस - या थीमवर घेतलेला सुरेख चित्रपट

valkyrie (मूळ उच्चारण वाल्क्यूअर असे काहीसे आहे) - जर्मन कर्नल स्टाफेनबर्गने केलेला हिटलरच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न

एनिमी अ‍ॅट दि गेट्स - वासिली जात्सेव या रशियन स्निपरवर बेतलेला चित्रपट (बॅटल ऑफ स्टालिनग्राडच्या पार्श्वभूमीवर) - दुसरे महायुद्ध

मॅसॅकर इन रोम - दुसरे महायुद्ध, जर्मन सैनिकांच्या हत्येचा घेतलेला बदला.

दि पियानिस्ट - दुसरे महायुद्ध, पोलिश-ज्यू पियानिस्टवर आधारित अफलातून चित्रपट

http://www.imdb.com/title/tt0052151/ Run Silent, Run Deep

आशु, हा क्लर्क गेबलचा सिनेमा पाहिलात का? नसेल तर जरुर बघा. जबरी आहे. माझ्या नवर्‍याला युद्धपट आणी वेस्टर्न् सिनेमांचे फार वेड. त्यामुळे मी पण हे पाहिलेत.

http://www.imdb.com/title/tt0120815/ Saving Private Ryan (1998)

तसाच हा सिनेमा पाहिला, पण फार भयानक वाटला.:अरेरे:
अख्ख्या सिनेमाभर मी ( घरीच डिव्हीडीवर पाहीला) आरडाओरडा व कमेंट्स केल्याने नवरा जाम वैतागला होता.:फिदी:

मी जास्त युद्धपट पाहिलेले नाहीत तरीही एक वीट ह्या ताजमहालाला आमची सुद्धा

१ ब्रिज ऑन रिवर क्वाय

२ वॉन रायन्स एक्सप्रेस

३ टीयर्स ऑफ़ द सन

४ ब्लॅक हॉक डाउन

५ सेविंग प्राइवेट रायन

६ ग्रीन झोन

७ द हर्ट लॉकर

८ इनग्लोरीउस बास्टर्ड

९ एनिमी एट द गेट्स

१० बिहाइंड एनिमी लाइन्स

अगदी अलीकडे पाहिलेला युद्धपट, 'फ्युरी' - रणगाड्यांचे युद्ध अत्यंत तपशीलवार दाखवणारा सिनेमा. यात खरे रणगाडे वापरल्याने अजूनच प्रभावी वाटतो.
माझा अत्यंत आवडता पण एकदम वेगळा युद्धपट 'क्रिमसन टाईड'. हा रुढार्थाने कदाचित युद्धपट म्हणून गणला जाणार नाही पण आण्विक अस्त्रांच्या पार्श्वभूमीवर युद्ध ह्या संकल्पनेचाच विचार करायला लावणारा, 'इन द न्युक्लिअर वर्ल्ड, वॉर इट्सेल्फ इज द एनिमी'

ब्लॅक हॉक डाऊन - उत्तम युध्दपट, मिशन चुटकीसरशी सोडवू, ही सोमालियन लोक आपल्यासमोर काय चीज आहे ही अमेरिकन्स सैनिकांची मग्रुरी अवघ्या ३ तासात कशी नेस्तनाबूत होते हे जबरदस्त दाखवले आहे. वरिष्ठांनी रुम मधे बसून घेतलेले निर्णय आणि प्रत्यक्ष युध्दभुमीवर असणारी विचित्र परिस्थिती यांच्यात किती विरोधाभास आहे हे स्पष्ट दाखवले आहे. खासकरून इतक्या प्रचंड गोळीबार चालू असताना कशीबशी वाहने त्या रस्त्यावरून काढण्यात यशस्वी झालेल्या कॅप्टनला दिशादर्शवणारा ऑफिसर पुन्हा त्याच रस्त्यावरून गाडी घेऊन दुसर्‍या बाजूने बाहेर पड म्हणतो . ते दृष्य कमालीचे व्यथा आणणारे आहे.

पुरंदरे शशांक - मॅसॅकर इन रोम बद्दल नव्हते माहीती. बाकी सगळे झालेत.

रश्मी - Run Silent, Run Deep नाही पाहीला. आता शोधून पाहतो.

बाप्पू - रायन्स एक्सप्रेस, टीयर्स ऑफ़ द सन - मस्त सजेशन. हे दोन्ही पाहिलेले नाहीत.

'क्रिमसन टाईड'. - वाहवा, एकसे एक बढीया चित्रपट समोर येत आहेत.

ब्लॅक हॉक डाऊन - समहाऊ मला कंटाळवाणा वाटला. तो आणि हर्ट लॉकरही. पण अमेरिकन स्नायपर लईच भारी निघाला. खिळवून ठेवणारा आहे.

गजानन - होय नक्कीच. हाही एक दर्जेदार चित्रपट.

अगदी अलीकडे पाहिलेला युद्धपट, 'फ्युरी' - रणगाड्यांचे युद्ध अत्यंत तपशीलवार दाखवणारा सिनेमा. यात खरे रणगाडे वापरल्याने अजूनच प्रभावी वाटतो.>>>+१

आशुचँप.. छानच धागा. बरीच रत्ने सापडत आहेत- सापडतील.

क्लिंट ईस्टवूड चे हे दोन- Letters from Iwo Jima आणि Flags of Our Fathers. एकाच लढाईवर आधारित पण एक अमेरिकन नजरेतून आणि एक जपानी.

मस्त बाफ. द पियानिस्ट आणि इग्लोरियस बास्टर्ड हे मी पाहिलेत.

रच्याकने, आशुचॅम्प मलाही देणार का खजिना. Wink Proud

लिस्ट जबरी. .
Joyex Noel एक नंबर.

युद्धपट नाही पण युद्धाचे प्रहसन असलेले हे दोन मला फार आवडतात.
१) चार्ली चॅप्लिनचा 'द ग्रेट डिक्टेटर'
२) पीटर सेलर्सचा Dr. Strangelove or: How I Learned to Stop Worrying and Love the Bomb

@उदयजी,

क्लियरली आपले अन माझे ब्लॅक हॉक डाउनचे इंटरप्रिटेशन वेगळे आहे, आपण मिशन फॉलीज वर कंसन्ट्रेट करताय अन मी कुठल्याही यूनिफार्म्ड फ़ोर्सचं सुवर्ण तत्व म्हणले जाणारे एक तत्व असते 'लीव नो मॅन बिहाइंड' त्यावर कंसन्ट्रेट करतोय , त्या पुर्ण पिक्चर मधे काहीकाही डायलॉग अतिशय उत्तम आहेत ह्याला अधोरेखित करणारे, एरिक बाना जॉश हार्टनेट ला जेव्हा समजवतो (हार्टनेट चा मित्र अन टीममेट शहीद झालेला असतो ओवर ब्लीडिंग ने तेव्हा) की तू तुझ्या माणसांना इथवर आणले आहेस तू उत्तम काम केले आहेस चल आता इथून बाहेर पडूया . तो किंवा मिशन अगोदर एरिक बाना जी आपल्या कामाची परिभाषा करतो तो डायलॉग (व्हेन द फर्स्ट बुलेट गेट्स पास योर हेड)

सगळ्यात शेवटी जेव्हा आपल्या शहीद मित्राच्या कलेवराच्या छातीवर हात ठेऊन त्याच्या कास्केट शेजारी उभा जॉश हार्टनेट म्हणतो की

'When we were coming here right at the time when we were shipped a buddy of mine asked me,

'Why are you going to someone else's war, do u think of urself as a hero?'

I never knew what to answer him, but now I shall tell him , no one asks to be a hero, it just turns out that way sometime, I will talk to your Maa and Paa when I return home'

ह्याच सोबत काळी होत जाणारी स्क्रीन ! असंख्यवेळा पाहिला आहे हा सीन पण दरवेळी डोळे ओलावतात

पीटर सेलर्सचा Dr. Strangelove or: How I Learned to Stop Worrying and Love the Bomb>>>
नाय हो, निव्वळ क्युब्रिक भौ म्हणा हवेतर.

बॉर्डर - जे पी दत्ता
लहानपणी थिएटरमध्ये क्वचितच कधीतरी वर्षातून जाणे व्हायचे त्या काळात पाहिलेला चित्रपट.
ते रणगाडे, फायटर विमाने, सनीची डायलॉगबाजी, जॅकीची पर्सनॅलिटी, खास करून त्याचे शेवटच्या शॉटला घेतले उड्डाण, सुनिल शेटीचा रावडेपणा, आणि याही सर्वांपेक्षा तेव्हा सर्वात भारी वाटलेला अक्षय खन्ना.. पुढे तो तितका केव्हाच वाटला नाही. पण बॉर्डर बघताना जे फिलींग आले ते देखील पुढे ईतर कोणत्याही युद्धपटाच्या वेळी आले नाही. त्या एलोसी कारगीलची स्टारकास्टच बघून एलोएल झाले. पण बॉर्डर मात्र पुढेही कित्येकदा बघितला. पूजा भट्ट मला एखाद्या चित्रपटात आवडूही शकते हे पहिल्यांदा आणि शेवटचे समजले. गाण्यांमध्ये तसे ते ए जाते हुए लम्हो आणि ईतरही बरी होती. पण संदेशे आते है ला तोड नाही. आजवरच्या युद्धपटांतच नाही तर ओवरऑल बॉलीवूडी चित्रपटांत एवढे जमलेले गाणे दुसरे कुठले नसेल. प्रत्येक कडवे खरेखुरे एका सैनिकाचे मनोगत वाटते. या गाण्यावर मी स्वतंत्र लेख लिहू शकतो ईतके आवडीचे आहे.

दि पॅसेज (१९७९) - अँथनी क्विन, दुसरे महायुद्ध

लायन ऑफ दि डेझर्ट - लिबियन ट्रायबल नेता ओमार मुख्तारच्या जीवनावर आधारित, अँथनी क्विन.

दि डेव्हिल्स ब्रिगेड (१९६८) -

Valkyrie - जर्मन भाषेतही हा चित्रपट आहे (अर्थातच जर्मन नटसंच) - हा देखील परिणामकारक आहे.

लास्ट डेज ऑफ मुसोलिनी (१९७५)

टोरा टोरा टोरा - पर्ल हार्बर वर जपान्यांनी केलेला हवाई हल्ला, जॅपनीज चित्रपट

मेल गिब्सनचा - दि पॅट्रिऑट

अरे इन्ग्लिश नावे स्पेलसहित दिलिस ते बरे केलेस, आता सर्च करुन शोधता येतिल ते .. त्यातिल काहि बघितलेत टीव्हीवर.... तर काहि डीव्हीडी विकत आणुन. Happy
हे सिनेमे बघणे हा कायमच दिव्य अनुभव असतो. कॅमेरा, अँगल, फोकस, लाईट, पोषाख, अ‍ॅक्टिंग, हावभाव, हातवारे, इतर सेट सगळे सगळे बारकाईने बघत अनुभवण्यासारखेच असते.... Happy कितीही वेळा बघितले तरी वीट येत नाही. Happy

Stealth (2005) एक मानवरहीत अत्यंत अत्याधुनिक बाँबर विमान जे काही बिघाडामुळे स्वतच निर्णय घेऊ लागत व त्यामुळे जो हाहाकार होतो ..हा पण एक थरारक चित्रपट आहे

Pages