युद्धपट

Submitted by आशुचँप on 30 May, 2016 - 18:12

युद्धपटांबद्दल आत्ता लिहावेसे वाटले आणि माबोवर याआधी काय काय लिखाण झाले आहे ते पाहले असता बरेच काही वाचनिय मिळाले. पण ते एकसलग नव्हते. या धाग्याचा उद्देश युद्धपटांची चर्चा, नविन काही आले असतील तर किंवा काही जुने क्लासिक्स, युद्धाचे डावपेच यावरही बोलता येईल.

मी गेल्या काहीवर्षात बरेच काही युद्धपट जमवले आहेत. त्यात डॉक्युमेंट्रीज आहेत, टीव्ही सिरीयल्स आहेत, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धावरचे अनेक चित्रपट, मध्ययुगीन कालातले काही, आणि अमेरिका-इराक. आयर्लंडमधली यादवी असे अनेक.

त्यानिमित्ताने युद्धपटांची आवड असलेले आपण एकत्र येऊ एखादा विकेंड सत्कारणी लाऊ शकतो.

बाकीच्यांनीही आपापले खजिने खुले करावेत.

पहिल्यांदा माहीतीपट

World at War - १९७३ मध्ये प्रसारित झालेल्या या माहीतीपटाचे तब्बल २६ भाग आहेत. यात हिटलर सत्तेवर येण्यापासून जपानवर अणूबॉब टाकून युद्धाची समाप्ती होईपर्यंत सर्व व्यापक घटनांचा समावेश आहे. यात त्या काळात झालेले ओरीजनल शूटींग आहेच, शिवाय तज्ञांची मते, त्यांचे विश्लेषणही सुंदर रित्या केले आहे. तेव्हाचा युरोप कसा होता याचे बरेच अधिकृत फुटेज बघायला मिळते यात. मस्ट वॉच.

Apocalypse Hitler - २०११ मध्ये प्रसारित झालेली फिल्म. हिटलरच्या जन्मापासून, त्याची लढाई, माइन काम्फ, सत्तेवर येणे आणि शेवटी त्याचा उदयास्त. यातही अनेक ओरीजनल फुटेज, हिटलरची भाषणे बघायला मिळतात. एक एक तासाचे असे दोन भाग आहेत.

WW1 apocalypse - पहिल्या महायुद्धावर हिस्टरी चॅनेलने बनवलेली अतिशय माहीतीपर सिरीज. टँक पासून, विमाने, विषारी धूर, खंदकातली लढाई याचे प्रभावी चित्रण. चार भागांची मालिका.

WW2 apocalypse - सहा भागांची मालिका, बऱ्यापैकी जमलीये पण पहिल्या महायुद्धाच्या मानाने तितकी माहीतीपर नाही.

Vietnam War - अमेरिका-विएतनाम युद्धावरची हिस्टरी चॅनेलची मालिका. दोन भागात. बरीच नविन माहीती कळाली या सिरीज मधून.

Battlefield - १९९४ मध्ये या माहीतीपटाची पहिली मालिका आली. त्यानंतर ठराविक कालानी २००२ पर्यंत असे सहा भाग रिलीज करण्यात आले. या मालिकेतही अनेक ओरीजनल क्लिपिंग्ज आहेत. पण क्वालीटी इतकी चांगली नाहीये. पण अनेक युद्धप्रसंग पाहता येतात.

हे झाले ओरीजनल माहीतीपट. आता काही नाट्यरुपांतर केलले माहीतपट वजा टीव्ही सिरीज.

band of brothers - युद्धपटांवरची सिरीज आणि त्यात बँड ऑफ ब्रदर्स नाही हे सर्वथा अशक्य. माझी सर्वात आवडती मालिका. कित्येक वेळा बघून झाली असेल.
सेव्हींग प्रायव्हेट रियान च्या उत्तुंग यशानंतर स्टीव्हन स्पीलबर्ग आणि टॉम हँक्स यांनी एचबीओ साठी केलेली ही निर्मिती कुठल्याही बिग बजेट चित्रपटाला मागे टाकेल. कलाकारांची निवड, फोटोग्राफी, व्हिजुअल इफेक्ट्स हे सगळेच इतके उच्च दर्जाचे आहे की कुठेही ती मालिका न वाटता १० भागांचा चित्रपट बघतो आहोत असेच वाटते. त्यात ज्यांच्यावर ती मालिका बेतलीये ते वृद्ध सैनिक त्यांच्या आठवणी सांगतात तो पार्टपण जमलाय.

इझी कंपनीच्या शूरवीरांनी दुसऱ्या महायुद्धात गाजवलेली कामगिरी, मेजर विंटर्स, सोबर्सच्या भुमिकेत फ्रेंड्समधला डेव्हीड श्विमर, त्यांचे ट्रेनिंग, पहिली लढाई, ते गोळ्यांचे सू...सू करत जाणारे आवाज, तोफांचा धडाका, अतिशय जीवंत चित्रण झाले आहे.

The Pacific - बँड ऑफ ब्रदर्स २००१ मध्ये रिलीज झाली, त्यानंतर तब्बल ९ वर्षांनी अमेरिकेच्या पॅसिफिक युद्धावर आधारीत ही मालिका स्पीलबर्ग-हँक्स जोडीने आणली. मूळ स्वरूप जरी तसेच ठेवले असले तरी यात मुख्य भर मरीन्सचे आयुष्य दाखवणे होते. यातलेही यु्द्धाचे प्रसंग कमलीचे खरे वाटतात आणि ते जास्तीत जास्त अचूक असावेत यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले हे दाखवणारा एक भाग आहे. वादळी पावसात, अनोळखी जंगलात, दिवस दिवस चिखलात रुतून मार्गक्रमण करणाऱ्या मरीन्सनी किती सोसले असेल याची किमान कल्पना येण्यासाठी कलाकारांनाही तशा प्रकारचे वातावरण निर्माण करून त्यात ठेवण्यात आले. त्यामुळे या मालिकेला जो काही जिंवतपणा आलाय त्याला तोड नाही.

युजीन स्लेज, मेडल अॉफ अॉनर मिळालेला जॉन बॅसिलोन, रॉबर्ट लेकी या प्रमुख पात्रांभोवती ही मालिका फिरते. त्यात मग ग्वाडलकॅनाल, पेलेलू, ओकीनावा, आयवो जिमा युद्धे अनुषंगाने येतात.
त्यातला सर्वात जमलेला पार्ट म्हणजे शेवटचा. युद्ध संपल्यावर ही तरूण पिढी अक्षरश उध्वस्त होऊन गेलेली असते. वयाच्या २०-२२ मध्ये ज्या प्रकारचा नरसंहार, रक्तपात, पाहून निबर होऊन गेलेली मने आणि शिक्षण सोडून युद्धावर गेल्यामुळे कसलेही भविष्य नाही, पुढे काय करायचे याबाबत काहीही विचार नाही. असे एक दोन नव्हे तर हजारोंनी हे बेरोजागार तरूण म्हणजे युद्धाचे एक बळीच.
नंतर युजीनने लिहीलेले विथ द ओल्ड ब्रीड, आणि मूळचा वार्ताहर असलेल्या लेकीने हेल्मेट फॉर माय पिलो हे दोन्ही पुस्तकेही मिळवली. अजून ती वाचण्याचा योग आला नाहीये.

Generation War - जर्मन बँड ऑफ ब्रदर्स असे म्हणून ओळखली जाणारी ही मालिका २०१३ मध्ये प्रसारित झाली. असेही दुसऱ्या महायुद्धावरचे अनेक चित्रपट हे अमेरिकन हिरोंज भोवतीच घुटमळत राहतात. युरोपीय चित्रपटांमध्ये नाझींचे अत्याचार हा प्रमुख विषय असतो. पण याही पलिकडे इतिहासकारांनी लिहीले आहे की सगळेच जर्मन नाझी तत्वज्ञानाने भारले गेले नव्हते. जर्मन सैनिक हा अतिशय शूर, निर्भय, कणखर असा होता आणि आघाडीवर त्याने निधड्या छातीने शौर्य गाजवले आहे. नाझी पापकृत्यांबद्दल कित्येक सैनिकांना माहीतीही नव्हते. त्यामुळे जर्मन म्हणला की तो वांशिक अभिमानाने पछाडला गेला असणारा या गृहीतकाला ही मालिका छेद देते.
पाच मित्रांची ही कथा. त्यात दोन भाऊ आहेत, सैनिक, एक नर्स आहे, एक मॉडेल आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा घट्ट मित्र हा एक ज्यु आहे. हिटलरच्या वंशवादाशी त्यांना काहीच घेणेदेणे नाही. पण युद्धाचे पडघम वाजू लागले आहेत आणि त्यांना असे वाटते आहे की युद्ध थोडक्या काळातच संपेल आणि आपण पुन्हा एकदा एकत्र येऊन धमाल करू.

पण युद्ध लांबतच जाते, आणि त्यात प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी मिळून जाते ते पाहून काटा येतो अंगावर.

========================================================================

ही मी माझ्याकडे असलेल्या चित्रपटांची यादी दिली आहे. सर्व चित्रपटांची प्रिंट चांगल्या दर्जाची आहे. काही तर परकीय भाषेतले आहेत, त्यांच्या सबटायटल्ससकट.

अजूनही बरीच वाढवता येणार आहे. आणि जसा वेळ मिळत जाईल तसा तसा इथेच त्या चित्रपटांची थोडक्यात ओळख देत जाईन. किंवा बाकी कुणाला त्याबद्दल लिहावेसे वाटत असेल तर यु आर वेलकम.

पहिल्या महायुद्धावरील चित्रपट

1. Forbidden Ground (2013)
2. Glory (1989)
3. Joyex Noel (2005)-

हा खऱ्या घटनेवर आधारीत चित्रपट डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. पहिल्या महायुद्धात खंदकाची लढाई लढली गेली. महीनोन महिने दोन्ही सैन्ये समोरा समोर युद्धसज्ज अवस्थेत. मध्येच गोळीबार, मध्येच शेलींग, कधी मागे सरकायचे कधी पुढे पण युद्ध स्टेलमेट अवस्थेतच.
अशातच १९१४ सालचा नाताळ येतो आणि एका आघाडीवरचे प्रमुख तात्पुरता तह करायचे ठरवतात. त्याप्रमाणे दोन्ही बाजू एकत्र येतात, नाताळ साजरा करतात, खेळतात, गळ्यात गळे घालून नाचतात. आणि रात्री हमसाहमशी रडतात. उद्या याच लोकांना आपण गोळ्या घालून मारणार आहोत याची भावना झाल्यामुळे.
जोपर्यंत शत्रु अज्ञात आहे तोपर्यंत आपल्या प्रमुखांनी दिलेली आज्ञा पाळताना हात थरथरत नाही, पण मित्रत्वाची भावना निर्माण झाल्यावर वैर संपते म्हणतात, तसेच झाले.
पण जर सैनिकांमध्ये अशी भावना निर्माण झालेली सत्ताधीशांना थोडीच चालणार. या सैनिकांच्या रक्तातूनच त्यांची भव्य दिव्य साम्राज्ये उभी राहीली आहेत. असा एखादा मैत्रीचा प्रसंगही ते साम्राज्य ढासळून पडायला कारणीभूत ठरेल या भितीने ख्रिसमस तह करणाऱ्या सैनिकांवर कडक कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर कधाही कुठेही अशा प्रकारचा तह झाला नाही. पुढे विषारी वायू वापरण्यात आल्यानंतर उरले सुरले मित्रत्वही संपले आणि उरला फक्त सगळे काही करपवून टाकणारा विखार.

या अद्भुत घ़टनेवर Joyex Noel अर्थात मेरी ख्रिसमस हा फ्रेंच चित्रपट आहे. त्याचा शेवट तर अगदी टचिंग आहे.

4. The Trench (1999)
5. War Horse (2011)
6. All Quite on the Western Front

दुसऱ्या महायुद्धावरील चित्रपट

1. A Bridge too Far (1977)
2. Apocalypse Now (1979)
3. Back to 1942 (2012)
4. Das Boot (1985)
5. Defiance (2008)
6. Emperor (2012)
7. Flags of our fathers (2006)
8. Full Metal Jacket (1987)
9. Into The white (2012)
10. Inglorious Basterds (2009)
11. Katyn (2007)
12. Letter from Iwo Jima (2006)
13. Life is beautiful (1997)
14. Pearl Harbour (2001)
15. Platoon (1986)
16. Saints and Soldiers Airborne Creed (2012)
17. Stalingrad (1993 German)
18. Stalingrad (2013)
19. The Bridge on the river Kwai (1957)

या चित्रपटाबद्दल काय बोलावे. तब्बल सात अॅकडमी अॅवार्ड मिळालेला हा चित्रपट युद्धपटांमधले एक मानाचे पान आहे. जपानी कर्नल सायटो व ब्रिटिश कर्नल निकोल्सन यांच्यातील संघर्षाची ही कथा! बर्माच्या घनदाट जंगलात युद्धकैदी म्हणून आलेली ब्रिटीश तुकडी आणि त्यांना राबवून घेणारा खलनायक सायटो. ज्या पुलासाठी परफेक्शन आणण्यासाठी जीवाचे रान केले तोच पूल जेव्हा निकोल्सन उडवण्याचा निर्णय घेतो, तेव्हा काय वाटते हे सांगता येत नाही.

20. The Great Escape (1963)
21. The Pianist (2002)
22. The Monuments men (2014)
23. The guns of navaron
24. Valkyrie (2008)
25. Where Eagles dare
26. Windtalkers (2002)
27. Enemy at the gates (2001)
28. Saving Private Ryan (1998)
29. Scihndler’s List (1993)
30. The Downfall (2004 German)
31. The thin red line (1998)
32. White Tiger (2012)
33. Fury (2014)
34. Saints and Soldiers, Void (2013)
35. The Boy in Stripped Pajamas
36. We Were Soldiers (2002)
37. Tae Guk Gi - Brotherhood of War (2005)
38. Warsaw 44 (2014)
39. 71 (2014)
40. Kajaki (2014)

इतर युद्धांवरील चित्रपट

1. Black Hawk Down
2. Green Zone
3. Lone Survivor
4. The Dirty Dozen
5. The Front line
6. The Hurt Locker
7. Behind Enemy Lines
8. Hotel Rwanda

मध्ययुगीन कालातील युद्धावरील चित्रपट

1. 300 (2006)
2. 300 Rise of an empire (2014)
3. Gladiator
4. Troy (2004)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ख्रिस्त पूर्व 480 मध्ये थर्मापिलीस चे युद्ध झाले होते त्यावर 300 हा बेस्ड आहे. खरे तर पौराणिक कथा आहे त्यामुळे ऐतिहासिक पेक्षा पौराणिक म्हणायला हरकत नाही.

पण त्यांचे वॉर सीन्स जबरा आहेत

'प्रोमेथिअस' सारखा साय-फाय, एग्झोडस सारखा ग्राफिक्स बेस्ड फिक्शन, आधुनिक काळातला 'ब्लॅक हॉक डाऊन' सारखा युद्धंपट असो वा मध्ययुगीन काळातले 'ग्लॅडिएटर' किंवा 'रॉबिन हूड' रिडले स्कॉट ने झाडून सगळ्या काळातले कॉम्बॅट सीन्स डिरेक्ट केले आहेत, नुसते डिरेक्ट्च केले नाहीत तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा लावून भव्य दिव्य हाणामार्‍या त्याने हॉलिवुड ला दिल्या.

पण स्कॉटचे सिनेमे कायमच खूप फिल्मी वाटतात Proud , जिथे तो आपला फिल्मीपणा ला आवर घालून थोडं कंटेन्ट वाढवतो, तिथे मग ग्लॅडिएटर सारखा ऑस्सम सिनेमा पैदा होतो.
पण रिअ‍ॅलिझमचा हाच डोस जरा जास्तं होतो तेव्हा प्रेक्षक सिनेमा नाकारतात आणि त्याचं मस्तं ऊदाहरण म्हणजे मध्ययुगीन युद्धांचा रिअ‍ॅलिस्टिक रोमांच दाखवणारा 'किंगडम ऑफ हेवन' .

ह्यातली युद्धे त्यातल्या धुळीसकट खरी वाटतात (ट्रॉय पेक्षा १०० पटींनी Happy ). लेपर किंग बाल्डविन आणि सलादिन (थोडक्यात कॅथलिक्स आणि मुस्लिम्स) ह्यांच्यात घडलेल्या ईतिहासात सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या एरा पैकी एक अश्या जेरूसलेम काबीज करण्याच्या वेळचा हा समरप्रसंग आहे.
ग्लॅडिएटर आणि अमेरिकन गँगस्टर च्या बरोबरीने मला आवडलेला स्कॉट चा हा तिसरा सिनेमा.
सिनेमात त्याचा खरा चेहरा एकदाही न दिसता एड नॉर्टन छोट्याश्या रोलमध्ये सॉलिड लक्षात राह्तो.

Bitva za Sevastopol (2015)
दुसर्‍या महायुद्धात रशिअन स्त्रियांनी पण भरपूर योगदान दिलय! ल्यूडॅमिला पावलेचिंको ही अतिशय निष्णात स्नायपर होती व प्रत्यक्ष आघाडीवर चोख कामगिरी बजावली. नंतर अमेरिकेत जाऊन दोस्तांच्या आघाडीत रशियासाठी पाठिंबा मिळवण्यासाठी दौरे पण करते.

चित्रपटातील युद्धाचे प्रसंग मस्त आहेत. एका प्रसंगात जर्मन सैनिकाला थेट न मारता, हाल हाल करुन मारते त्यावेळी तिच्यत दिसणारी वेडसर पणाची हलकीशी झलक पण छान दाखवली आहे.

ट्रेलर --> Bitva za Sevastopol (2015)

Dam Busters - पहिले महायुद्ध. अत्यंत कडक सुरक्षा असलेलीं धरणं विमानातून बाँब टाकून उडवण्याचं तंत्र शोधणं व त्यानंतरचा हाहा:कार .!
The longest Day - दुसर्‍या महायुद्धांतलं दोस्त राष्ट्रांच्या अंतिम चढाईचं वास्तव व भव्य चित्रण.
Sink the Bismark ! जर्मनीच्या 'बिस्मार्क ' या भेदक युद्धनौकेने आरमारी व व्यापारी बोटींचा संहारच चालवला होता. चर्चिल मग 'बिस्मार्क'लाच नष्ट करण्याची योजना आंखतो. समुद्रावरील युद्धातील डांवपेंच व एक आगळाच अनुभव देणारा हा चित्रपट.
Patton = 'पॅटन' रणगाड्याना ज्याचं नांव दिलंय तो हा अमेरिकन जनरल . रॉबर्ट जी स्कॉट [ पॅटन] व कार्ल माल्डन यांच्या कसलेल्या अभिनयाने भारावून जावं असा हा युद्धपट !
From here to Eternity - बर्ट लँकेस्टर, माँटगोमरी क्लिफ्ट व फ्रँक सिनात्रा या कसलेल्या अभिनेत्यानी अजरामर केलेला व अनेक अ‍ॅकेडमी अ‍ॅवार्डस विजेता युद्धपट.

To Hell and Back - ऑडी मर्फी या अभिनेत्याच्या आयुष्यावर बेतलेला व त्यानेच प्रमुख भूमिका केलेला दुसर्‍या महायुद्धाची पार्श्वभूमि असलेला हा सिनेमा खूपच गाजला होता.
Tora Tora Tora - पर्ल हार्बरवरच्या जपानी हवाई हल्ल्याची योजना कशी आंखली गेली, त्याची प्रत्यक्ष अंमलब़जावणी व दुसया महायुद्धावर झालेले त्याचे निर्णायक परिणाम याचं सुरेख चित्रण असलेला हा चित्रपट युद्धपटांच्या यादीत मानाचं स्थान मिळवूं शकतो.

Nuremberg (2000) हा चित्रपट पण मस्तच आहे. ज्यू छळ छावण्यांमधली काही दृश्य तर खरंच बघून मला झोप आली नाही. उत्तम चित्रपट आहे न्यूरेंबर्ग खटल्यावर.

ओरीजनल फुटेज, हिटलरची भाषणे >>>
मँचेस्टर वॉर म्युझिअम मध्ये हिटलरच्या ओरिजिनल भाषणांचे काही व्हिडीओ पाहिले होते, मशाल घेऊन परेड करणारे सैनिक नी हिटलरचा आवाज, जर्मन समजत नव्हते पण तरीही ते अंगावर येत होते.

युद्ध नाही पण रशियन राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आधारित 'डॉक्टर झीवागो'. त्यात झारचे विरोधक आणि समर्थक यांच्यातील लढाया आहेत.

अरब रिव्होल्यूशनचा लॉरेन्स ऑफ अरेबिया

Eye of the Needle - based on novel by Ken Follet . दुसरे महायुध्य background. एकदम मस्त.
यातला एक scene 'फना' (आमीर/काजोल ) मध्ये copy केला आहे.

Pages