नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेधा बटाट्यांची रेसिपी यापूर्वीच माबोबर टाकलेली आहे.. कुणी ते करत नाही (नसावेत) म्हणून मुद्दाम आणले होते.. Proud
...
माझ्या विपूमधे लिंकही आहे.. (http://www.maayboli.com/node/45519)
...
मेधा कडे खूप खूप मजा आली. एकतर भरपूर गप्पा झाल्या, त्यात फिरायला मिळून थोडा व्यायामही झाला. आणि हे सगळे करताना सतत खाणे असल्यामुळे नुसती धम्माल.. रावण पिठले, गरमागरम बटाटवडे, बिर्यानी, बकलावा, पान, मलाई सँडविच आणि अजून काय काय... मला आत्ताच कळले की मी बोली न लावल्याने मला पुरणपोळी मिळालीच नाही.. Sad शिंडेचा णिशेध... Proud
.. मेधा इस्टेटची प्रकाशचित्रे खाजगी असल्याने इथे देता येणार नाहीत... हुकूमावरून..

बेगमेची बिर्याणी खाल्लीच नाही मी.

सोबत चैगौडाळ आणि पुलिहोरा राईस बांधून आणला होता तो मात्र कालपर्यंत खाल्ला Happy

देसाई, काय हे एवढा गाजावाजा करून आणलेल्या पुपो खाल्ल्या नाहीत म्हणता? उभ्या उभ्या चतकोर तरी खायचीत की Wink

आम्हाला चतकोरच मिळाली पुपो. पण चांगली झाली होती हो! Happy

माझा फिक्शन बोळा निघाला. मेधाकडून मोप पुस्तके घेतली. विमानात 'सर्व प्रश्न अनिवार्य' हे रमेश इंगळेंचे पुस्तक वाचून संपले. आहा! (

कुणीतरी पुरणपोळ्यांचे नाव काढले पण त्याच बरोबर तुझं नावं घेतल्यामुळे मला नेहमीचे 'उकडीचे मोदक' वाटले म्हणून मी लक्ष दिले नाही.. Proud

सगळ्यांना पहिल्यांदाच भेटून मलाही खूप आनंद झाला. धोतरगंगा पुढच्या भेटीत वाहती होईल नक्की. Proud मेधाचं घर खरंच खूप सुंदर आहे. झाडी वगैरे एकदम झकास. Lol

टण्याच्या संसाराच्या करंज्या फारच मस्त झाल्या होत्या. बेगम बिर्याणी, मिसळीचा कट, रावणपिठले, पुलिओगरै, पुरणपोळ्या, बटाटेवडे, वर्ल्ड फेमस दीपचे सामोसे, बकलावा, मसाला पान ... अहाहा काय काय ते रुचकर पदार्थ! आणि काय त्या चवीने झालेल्या चर्चा! Lol उखाणे, गाणी, गप्पा ... मस्त मजा आली. सगळ्यांची मुलंपण एकदम मस्त आहेत. निघताना मी विकुंना 'सोनिया झिंदाबाद' म्हणालो आणि परिवर्तन झाले असूनही त्यांनी मला काय तोंडभरून आशीर्वाद दिला म्हणून सांगू! Lol

आदल्या दिवशी बुवांकडे पण धमाल आली. केदारच्या स्टोर्‍या लय भारी होत्या, आणि बुवांशी झडलेली चर्चा सहीच होती. 'प्रेमा तुझा रंग कसा' असे त्या सेगमेंटचे नाव ठेवायला हरकत नाही. एकंदरीतच माबोभ्यास बराच वाढला. येताना फचिनच्या गाडीतून आलो, तेव्हाही गप्पाटप्पा करायला मजा आली. त्या दोघांनी एकदम स्टेशनपर्यंत ड्रॉप केले म्हणून त्यांचे विशेष धन्यवाद. Happy

अरूण, तुम्ही बाणेदारपणे 'यायचं तर उद्या या नायतर आर्डर क्यान्सल' असं म्हणायचंय की त्या ह्यांना. पण खरंच ही अशी मोठी गटग नॉट वर्थ मिसिंग. पुढल्यावेळी या नक्की.

मेधाच्या इष्टेटीवर मायबोलीकरांनी आपापल्या मुलांचे लग्न ( त्यांनी करू दिले तर) करावे असे मी नम्रपणे सुचवले. तितकेच शोनूलाही कळेल की, अरे आपल्या इष्टेटीमध्ये हे पण आहे, अन ते पण आहे. जबरी घर आहे तिचे. एकदम ड्रीम होम.

एकदा खास येऊन दोन दिवस तळ्याकाठी बाज टाकून पुस्तक वाचणार आहे. बाजेची सोय तेवढी कर. Happy

जबरी मजा आली. सगळ्यांना परत भेटून आनंद झाला. असेच गटग होत राहावेत.

तुम्ही बाणेदारपणे 'यायचं तर उद्या या नायतर आर्डर क्यान्सल' असं म्हणायचंय की त्या ह्यांना >>>>> अहो, कसं म्हणणार????? ऑलरेडी पैसे देऊन बसलो होतो. तरी बरं ऑर्डर देतेवेळी ४ - ४ वेळा विचारलं होतं की रविवारी नक्की ना? तेंव्हा हो म्हणाले आणि आयत्या वेळी घोल घातला. Sad

उंधियोचं नाव राहीलं का? तो तर सही होता. दुसर्‍या हेल्पिंगला जायच्या आधीच संपला. Sad Proud

केदार, अमेरिकन हिस्टरी शिकव त्या गीजना. फिलीमध्ये काय काय झाले त्याचा अभ्यास त्यांनी करायलाच हवा.

काल चर्चेत आलेले सर्व स्टिरिओटाइप बाफं उघडण्यात आलेले आहेत. पाकृ ते सांस्कृ सर्व आहेत

सॉलिड मजा आली! डाउन्टन अ‍ॅबी गटग Happy एकदम झोकात पार पडलं!
खुप काळानंतर इतकी लोकं जमली परत. मला वाटतं भारतातले मायबोलीकर जरी आले सगळे तरी खुरच्या टाकून सगळे एकत्र बसू शकतील पुढच्या अंगणात (की मागच्या अंगणात?).
असो, शोनू आणि श्रीच्या आदरातिथ्याबद्दल खर सगळ्यांनाच माहित आहे पण तरी निस्ता घरीच बडा नैए उन्का असं म्हणतो फक्त! ही दोघं तर आहेच पण दोन्ही पोरं आणि शोनूचे बंधू देखील एकदम आदरातिथ्यमे नंबर १!
वर्षातून एक गटग तरी डाउन्टन अ‍ॅबीत ठेवायला पाहिजे अशी मी ला पि लावत आहे. Proud
टण्या आणि टणीला भेटून आनंद झाला. मंजिरी एकदम मायबोली रेडी आहे. मागच्या वेळेसच्या शोनू गटग मधला टण्या म्हणजे मिडलाईफ क्रायसिस झालेल्या गटण्या सारखा भासला तर ह्यावेळचा टण्या एकदम रिलॅक्स अन खुप दिवसांनी भेटलेल्या मित्रासारखा भासला. ऐसीईच रेहनेका मेरे दोस्त! Happy
गप्पा, चर्चांना अक्षरशः उधाण आलं होतं. गागुपौर्णिमा तर फारच छान साजरी झाली! टण्यानी काही दिवसांपुर्वी केलेल्या काही कौतूकास्पद कामगिरीमुळे त्याला चंद्रकोरीवर बसवून पाच काक्वांनी त्याचे गागु घेतले... ओन्ली किडिंग. चंद्रकोरीबद्दल किडिंग, बाकी खरय सगळं. Proud
फचिनमामा पण बर्‍याच दिवसांनी भेटला आणि मुख्य म्हणजे मामीला बरोबर घेऊन आला! होपफूली आता त्याची भिती गेली असेल की आम्ही काही मामीला फितवणार वगैरे नाही स्त्रीमुक्तीचे फंडे देऊन. ह्या उपर मामा कसला प्राईज्ड कॅच आहे ह्याची प्रचिती झाली असेलच मामीला कारण विकुंनी ऋतिक रोशनसारख्या दिसणार्‍या फचिनमामावर त्यांच्या बायकोच्या माहेरच्या एका मुलीकरता स्थळ म्हणून त्यांचा डोळा होता अन इतकं उत्तम स्थळ ऑफ मार्केट जाऊस्तोवर त्यांनी काहीच केलं नाही ह्यावर त्यांनी त्यांच्या बायकोच्या शिव्या खालल्या हा गौप्यस्फोट केला. Lol
विकुंनी बाकी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी गांधी क्लॅनशी त्यांचा असलेला एलेजियन्स त्यागून मोदी क्लॅनची मेंबरशिप स्वीकारली तेव्हा आख्खी डाउन्टन अ‍ॅबी ढसाढसा रडली! पाकिटातला सोनियाचा फोटो काढून त्यांनी दात सळसळत असलेल्या वेंकीला चावण्याकरता दिला आणि त्या फोटो एवेजी मोदींचा फोटो पाकिटात लावला तेव्हा तर आपले केदारतात्यांनी आवेगानी त्यांना भोकाड पसरत मिठीच मारली!
Proud
खाण्याचे तर काही विचारु नका! सकाळ पासून ग्टग संपेपर्यंत एक दीडशे प्रकारचे पदार्थ खालले असतील!
मस्त झाले होते सगळेच!

माझं गटग खरं आदल्या दिवशी पासूनच सुरु झालं. तात्या, भाचा आणि मी रात्री २ पर्यंत गप्पा कुटल्या! तात्यांच्या भावाच्या स्टोरीनी आम्हाला सगळ्यांना अजूनही हसू येतय. पुढच्या वेळेस गटग मध्ये त्यांनी ही स्टोरी सादर करावी अशी मी नम्र विनंती करतो. Happy

ह्याला काय वृत्तांत म्हणतात होय.. एकदम फर्मास पूर्ण वृत्तांत पाहिजे..

ववि झाल्यावर कसे सगळे लापि वाजवतात वृत्तांत पाहिजे म्हणून तशीच लापि वाजविण्यात येत आहे हो.... ढूम ढूम ढुमाक्क ढूम ढूम ढुमाक्क...

धोतरगंगा पुढच्या भेटीत वाहती होईल नक्की.
ही गंगा धोतराच्या आतून उगम पावलेली तर नसेल ना? काही सांगता येत नाही ढोस ढोस बीअर ढोसल्यावर होते असे ऐकले आहे पूर्वी!
टेक इट लाईट्ली. Happy

तात्यांच्या दोन्ही भावांच्या स्टोर्‍या इतक्या डेंजर आहेत, की खुद्द तात्यांची काय स्टोरी आहे ह्याची पण एक उत्सुकता आहेच. Proud

आमच्या बायकोस वाटले होते की गटगला आलेले सगळे पार्ले(सा) असतात. संपादकीय संस्करण, अभिधाशक्ति, साहित्यिक मूल्यमापन, लेखनाची परिभाषा असले शब्द कानावर पडतील असे तिला वाटले होते. त्याला सुखद छेद दिल्याबद्दल धन्यवाद! तिला भरपूर मजा आली.

शोनूतैंचे मॅन्शन भव्य! एव्हड्या जागेवर दोन वेगवेगळ्या कारखान्यांना ऊस पाठवता येईल Happy आदरातिथ्य बद्दल तर बोलायलाच नको.

लालूचेही दर्शन झाले. आता इथेही कधीकधी प्रकटत जा.

देसाई आणि भाई एकदम "अन करून दाढी भारी परफ्युम मारून आलोया" मोड मध्ये होते. देसाई एकदम नौजवान दिसतात - तात्यांपेक्षापण यंग म्हणायला हरकत नाही. लो कार्ब की कमाल का हो देसाई?

सर्वांना भेटून धन्यवाद. इष्ट कोष्टावरच जावे असे एकदम वाटून गेले इथे परत आल्यावर (मक्याची शेतं पाहून)

गटगला आलेले सगळे पार्ले(सा) असतात. >> च्च असलं काही कोणीही टीपापा कर कधीही बोलत नाही. उगाच भलतं प्याकेज आमच्या नावावर लावू नकोस .

तिला जर हा बा फ वाचून दाखवला असतास तर तिला कळलं असतं की गटगला फक्त पार्लेकर खा आणि वा ( ह्यात ) येतात. सा झगा असेल तर तो घरीच Happy

क्या नंद्या, आप आए नहीं.
न हम तुम्हे जाने, न तुम हमे जानो,
फिर
कैसे जाउ जमुना के तीर सारखे झाले.

धोतर नेसण्याचे बरेच फायदे इथे दिले आहेत ते वाचा, मग उद्यापासून कामावर जाताना धोतर नि बिन्बाह्याचे बनियन घालून जात जा.
http://www.maayboli.com/node/58765

Pages