आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
मला एक कळ्ळ नाही की छायाची
मला एक कळ्ळ नाही की छायाची खोली तर खाली असते ना? मग तो गणेश माधवला हॉलमधे बघुन जिन्यावरुन वरती जातो तो अचानक छायच्या खोलित दाखवलाय तिच्याशी बोलताना.
बाकी ते बोट बुडवलेलं पाणी पाजलेलं मलाही पटलं नाही
मला एक कळ्ळ नाही की छायाची
मला एक कळ्ळ नाही की छायाची खोली तर खाली असते ना? मग तो गणेश माधवला हॉलमधे बघुन जिन्यावरुन वरती जातो तो अचानक छायच्या खोलित दाखवलाय तिच्याशी बोलताना.>>>> सुषमा, छाया नन्तर आता दोन दोन गणेश.
अर्चिस पाणी आणतो व निलीमा
अर्चिस पाणी आणतो व निलीमा त्यांच्या डोळ्यांना पाणी लावते. >> नंतर तेच बोटे बुडविलेले पाणी निलीमा माधवला प्यायला देते. काल सेम हेच माझ्या मनात आलं.
गणेश आत्याकडे जातो पण काकाला काय झालं बघायला जात नाही, तिथे जायला हवं होतंना त्याने.
छायाची खोली वरंच आसा. तो
छायाची खोली वरंच आसा. तो दत्ता त्यास मारायसं जात असता तेव्हा जिन्यातना वर जाता नाय काय.
आत्ताच किल्ला सिनेमाची
आत्ताच किल्ला सिनेमाची जाहिरात पाहिली तेव्हा आठवलं कि दत्ता त्यात गणिताच्या शिक्षकाच्या रोल मध्ये आहे..
निलिमाने माधवाला एक औषधचि
निलिमाने माधवाला एक औषधचि गोळी दिली हां !
<< निलिमाने माधवाला एक औषधचि
<< निलिमाने माधवाला एक औषधचि गोळी दिली हां ! >> "आणि आपण प्रत्येकाने सुषमापासून सावध रहायला हवं " व माधवकडे पहात पुन्हा "प्रत्येकाने" वर जोर देत तिने माधवला आणखी एक स्ट्राँग डोसही पाजलाच !!!
छायाची खोली वरंच आसा. तो
छायाची खोली वरंच आसा. तो दत्ता त्यास मारायसं जात असता तेव्हा जिन्यातना वर जाता नाय काय.>>
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार, नायकांच्या घरात नक्की किती खोल्या आहेत यावर ४-५ स्वतंत्र एपिसोडस लिहायचं श्री.पांडू यांनी ठरवलेले आहे. त्यात, एकच जीना वर जात असताना, तिथून पुढे कुठलाही पॅसेज वगैरे न दिसता, छाया, माधव-निलीमा, सुसल्या यांच्या प्रत्येकी स्वतंत्र खोल्या कुठे व कश्या आहेत यावर भर असेल. तसेच खालच्या मजल्यावर किचनचे आणि घराचे प्रवेशद्वार सोडले, तर बाकीच्या दरवाज्यांतून आत गेल्यावर किती खोल्या आहेत यावर देखील भाष्य असणार आहे. कारण या दोन दरवाज्यांमधून आत गेल्यावर माई, दत्ता-सरिता, परत एकदा छाया, अभिराम.. झालंच तर पांडू या सगळ्यांच्याच खोल्या असाव्यात असं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं !
काल अर्चिसने पण विचारलं
काल अर्चिसने पण विचारलं मम्माला , तुला या सगळ्याचा शोध कधी लागणार ?
कालचा भाग वेस्ट होता . सुशमा कशी तिच्या आईसारखीच आहे , माधवला कसलही व्यसन नसल्यामुळे तिने पान खाउ घातलं म्हणून त्याना कशी गुन्गी चढली , कायद्याने सुशमाला घराबाहेर काढता येनार नाही , गावात सुशमामुळे कशी बदनामी होईल ... प्रत्येक जण हीच वाक्ये वेगवेगळ्या पद्धातीने बोल्तं होते.
भगवती, कालच्या भागाचे अपडेटस
भगवती, कालच्या भागाचे अपडेटस कुठे?:अओ:
काल काय झाले?
माझ्या नवर्याला एक प्रश्न
माझ्या नवर्याला एक प्रश्न पडलाय तो म्हणजे माधव आणि फॅमिली इतके दिवस गावाला राहीलीच कशी? त्यांना काम नाहीत का नोकरीच्या ठिकाणी? स्पेशली निलीमा कशी काय इतके दिवस गावाला राहीली
भगवती, कालच्या भागाचे अपडेटस
भगवती, कालच्या भागाचे अपडेटस कुठे? +१
काल रात्री एकापाठोपाठ एक सगळे आठवड्याभराचे एपिसोड्स रिपीट लागले होते . शनिवारच्या भागापर्यंत येई पर्यंत माझाच पेशन्स संपला. एक गोष्ट जाणवली की, आठवड्याचे सहा भाग एकत्र केले आणि फक्त रविवारी एक तासाचा महा-एपिसोड केला तरी चालण्यासारखं आहे, एवढी 'फास्ट' चालली आहे ही मालिका !
<< स्पेशली निलीमा कशी काय
<< स्पेशली निलीमा कशी काय इतके दिवस गावाला राहीली >> तें मात्र स्पष्ट केलंय निलीमाने; तिने आतां चॅलेंज घेतलाय या सगळ्या मागचीं कारणं शोधून काढायचा व तोपर्यंत इथून न जाण्याचा !
चॅलेंज घेतलं खर पण "हे
चॅलेंज घेतलं खर पण "हे कुणीतरी मुद्दाम करतय" हे बोलण्या पलीकडे ती काआहि करत नाही
तिने आतां चॅलेंज घेतलाय या
तिने आतां चॅलेंज घेतलाय या सगळ्या मागचीं कारणं शोधून काढायचा व तोपर्यंत इथून न जाण्याचा ! >>>> पण भाउकाका ती शास्त्रज्ञ आहे ना? मग तिला येवढा वेळ मिळतोय?
चॅलेंज घेतलं खर पण "हे
चॅलेंज घेतलं खर पण "हे कुणीतरी मुद्दाम करतय" हे बोलण्या पलीकडे ती काआहि करत नाही अरेरे
>>>>+१११११११११
लेखकाने येवढा गुंता करुन ठेवलाय..नाना प्रकारची भुते दाखवुन
क्धी विहीर कधी झाड , कधी छाया, माधव,गणेश तर कधी गूरव सुस्ल्या चिन्ग चॉन्ग कोण नक्की काय काय करतं आणि कशासाठी...ताकास तूर लागेना
तरी छायाचो गुंतो सोडवल्यान
तरी छायाचो गुंतो सोडवल्यान आसा..
समजा हि सिरीयल अजून ६ महिने
समजा हि सिरीयल अजून ६ महिने चालणार असेल तर उत्तरं इतक्या लवकर मिळणार नाहीत, मी सध्या बघत होते, फार बोअर झाले मी पण आता वाटतं जेव्हा संपेल त्या आठवड्यात बघावी तोपर्यंत फक्त घोळ घालणार हे लोक्स.
भगवती आपली आहेच अपडेट्स द्यायला, त्यामुळे तेच वाचेन असा विचार करतेय.
कोकणात १७ प्रकाराची भूते
कोकणात १७ प्रकाराची भूते पहावयास मिळतात.
१वेताळ २ब्रम्हग्रह ३ समंध ४देवचार ५ मुंजा ६
खवीस
७ गि-हा ८ चेटकीन ९ झोटिंग १० वीर ११ वायंग्या
१२ म्हसोबा १३ जखिन १४ लावसट १५ हडळ १६
भानामति १७ चकवा.
सौजन्य : www.misalpav.com/node/31225
तो परब एक नमुनाच आणला होता
तो परब एक नमुनाच आणला होता नेने वकिलांनी. छाया त्यालाच भेटत असते बहुतेक.
तो परब एक नमुनाच आणला होता
तो परब एक नमुनाच आणला होता नेने वकिलांनी. छाया त्यालाच भेटत असते बहुतेक.>>>> नेने वकिलांनी सुषमासाठी त्याला आणले असेल लग्नासाठी. म्हणजे आता सिरीयल मध्ये केकता कपूर स्टाईल ड्रामा होणार आहे. एक फूल दो माली, एक हिरो दोन हिरोइन्स (बहीणी)
नेनेंचा डाव आहे का नाईक
नेनेंचा डाव आहे का नाईक कुटूंबाला एक एक करून लुबाडून सगळं घशात घालायचा? परब छायाला चोरून भेटत असतो, तोच सुषमाला लग्नासाठी "स्थळ" म्हणून आणलाय नेने ने.
तो परब एक नमुनाच आणला होता
तो परब एक नमुनाच आणला होता नेने वकिलांनी. >>> :g छायालाच सुट होतो तो सुसल्यापेक्शा
भगवतीचे अपडेस मिसतेय!!! तो
भगवतीचे अपडेस मिसतेय!!! तो अभीराम देविकाशि इतका तुट्क का वागतो? माझे काही भाग मिसले.
आहे कुठे भगवती, मी तिच्यावर
आहे कुठे भगवती, मी तिच्यावर भार टाकून कालपासून हि शिरेल बघायचं बंद केलं
.
मी पण ! मिसिन्ग भगवती
मी पण ! मिसिन्ग भगवती .
तिच्यामुळे मला ऑन्लाईन बघावी लागतेय मालिका
<< मिसिन्ग भगवती . >> बापरे
<< मिसिन्ग भगवती . >> बापरे ! आतां हो एक सस्पेन्स वाढलो !!
भगवती आपण आणि आपले अपडेटस
भगवती आपण आणि आपले अपडेटस नसल्यामुळे आधी तेवढी सस्पेन्स नसलेल्या शिरेलीबद्दल फारच सस्पेन्स वाटतो आहे . या धाग्यावरून मालिकेचे अपडेट मिळवणा-या पामरांवर कृपा करावी .
माझा पण कालचा भाग मिसला...
माझा पण कालचा भाग मिसला...
भगवती, बरी आहेस ना गं.
परब उर्फ अजय देवगणच्या
परब उर्फ अजय देवगणच्या कॉमेडीमुळी मालिका फारच ईंटरेस्टींग झालेली आहे.
Pages