नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुवा १ ( आयटेम, मस्तानी यांना जेवण काउंट मधे धरलेले नाही ) >> आयटेम, मस्तानी टण्याचे होते ना ? बुवांनी तराफ्यावर बसवले का नेऊन आधीच ? Lol

>>> आयटेम, मस्तानी टण्याचे होते ना ? बुवांनी तराफ्यावर बसवले का नेऊन आधीच ? >> Lol टण्या आणि बुवांची बोटीत आधी चढायची धक्काबुक्की डोळ्यासमोर आली.

मग आता आणलेल्या स्वीट्सचे प्रत्येकी दोन तुकडे करणार का?
>>>
Proud
आता दुसर्‍या स्वीटची तयारी चालू आहे (म्हणजे मी इकडे आरामात आहे, मंजिरी काय ते करत आहे)

मी वाटचं पाहत होतो की इतका फुलटॉस टण्यानं दिला आहे. कोण त्याची घेणार आता? पण तू देखील शोनूच्या खांद्यावरून बंदुक मारते आहेस.

--

बरं दिलेला गागु परत कसा घेतात? म्हणजे त्याला स्वतःचा गागु घ्यायला लावायचा का? Lol Proud

>> बरं दिलेला गागु परत कसा घेतात? म्हणजे त्याला स्वतःचा गागु घ्यायला लावायचा का?

Lol

आता नुसते चू चू आवाज यायला लागले आहेत मला!

सशलने उत्खनन केलेला बीबी भारीच Happy

डच लोकं तीनदा किस करतात. म्हणजे आधी उजवा गाल, मग डावा आणि मग परत उजवा. बाकी बर्‍याच ठिकाणी दोनच म्हणजे पहिले उजवा आणि मग डावा. तेव्हा डच लोकं इतर ठिकाणी गेली की मजा येते. तो डच पुरुष असेल आणि समोर समजा हंगेरिअन बाई असेल तर ती बाई दोन किस करून थांबते आणि डच तिसरा किस करायला जातो तो नेमका बरेचदा फ्लश ऑन द फ्रन्ट होतो Proud
अजूनही माझ्या ऑफिसमधले लोक माझी आठवण काढून ढसाढसा रडतात!

>> अजूनही माझ्या ऑफिसमधले लोक माझी आठवण काढून ढसाढसा रडतात!

हे काही कळलं नाही. भारतीय संस्कार म्हणून तू डच /युरोपिअन संस्कारांनां टशन म्हणून गालगुच्चे घ्याय्चा/द्यायचास का?!

मला आश्चर्य वाटलं की इकडच्या लोकांनां "चू चू" चा अर्थ उमगला नाही. चीट शीट ची गरज भासली Happy

चू चू करत गालगुच्चा घ्यायला त्या ह्यांच्य कादंबरीतल्या एक कॉर्पोरेट वर्ल्ड मधल्या मॅडम पण गेल्या होत्या ना.

चर्चा पुन्हा गटगवर आणतो.

मी वाटली डाळ आणेन. सध्या कैर्‍या मिळताहेत. कोणाला काही हरकत असल्यास सांगू नये.

हे चु चु मला तेंव्हांच कळाले होते. ( जेंव्हा सशलने चु चु लिहिले. )

वा वा. वाटली डाळ. मजा आगया ! भरपूर आणरे भाऊ. टण्यासारखे एक एक डाळ अन एकच कैरीची फोड असे नको म्हणू.

चु चु न कळायला काय झालंय पण गागुची व्याख्या चुकीची घेऊन चुचु करायला लागलात तुम्ही लोकं म्हणून कॉन्सेप्ट क्लियर केला फक्त.

गागुची व्याख्या कशी चुकीची असणार. गाल गुच्चाच की! म्हणून तर लिहिले की गागु परत करायचा तर आपण त्या व्यक्तीचा गागु घ्यायचा का?

Pages