दुष्काळग्रस्त भाग अन स्वयंसेवी संघटना

Submitted by चंबू on 31 August, 2015 - 22:21

मागील महिन्यापासुन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील बातम्या वाचनात येत आहेत. उदा, मराठवाड्यातील काही भागात तर पावसाने अजुन तोंड दाखवलेले नाही. सप्टेंबर उगवला तरी अशी परिस्थिती असेल तर पुढे पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवणार हे निश्चित.
माझ्या गावातील (अर्थात सर्व अनिवासी भारतीय) मित्रमंडळी हे दुष्काळग्रस्त भागात काम करणारे स्वयंसेवक वा स्वयंसेवी संघटनेच्या शोधात आहेत. सरकारी यंत्रणेवर बहुतेकांचा विश्वास नसल्याने इतर कुठला खात्रीशीर मार्ग आम्ही शोधतोय जेणेकरून काहीतरी मदत योग्य मार्गाने योग्य ठिकाणी अन योग्य वेळेत पोहोचेल.
आपल्या पैकी कुणाला याबाबत काही माहीती/ सुचना/ सल्ला असल्यास कृपया कळवावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, चक्क शुन्य प्रतिसाद...! अर्थात इथे प्रतिसादांचा पाऊस अपेक्षित नव्हताच, पण हा दुष्काळ नक्किच अनपेक्षित होता.. Sad
असो काही मित्रांच्या मते त्वरीत घेता येण्याजोगे निर्णय
_ज्या खेड्यात टँकरने पिण्याचे पाणी पोहचवले जाते. घरटी जेमतेम दोन एक हंडे पाणी मिळते. अश्या ठिकाणी स्थानीक रहीवासी/ ग्रामपंचायतीशी संपर्क साधून पाण्याची टाकी बसवावी आणि त्यासाठी पुढील सहा-आठ महीने निदान 'किमान' पुरवठ्याची सोय करावी. अर्थात परदेशातून हे सांभाळने शक्य नसल्याने स्थानीक पातळीवर काम करणारा कुणीतरी हवा.
-पैशाअभावी रखडत असणार्‍या पाणी योजनेला चालना द्यावी (सत्यता पडताळून).

मला कोणतीही स्वयंसेवी संस्था माहिती नाही पण कदाचित तुम्हाला आर्थिक मदत करायची असेल तर तुम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला देणगी देऊ शकता. मध्यंतरी आशा भोसले यांनी अशी देणगी दिली होती.

जिज्ञासा, माझ्या मदतीची चिंधी कुठे पुरणार? पण पाच-पन्नास लोक एकत्र आले तर निदान एखाद्या खेड्याची तहान काही महीने भागू शकेल.
आता हा "मुख्यमंत्री सहाय्यता निधी"... इथेच गोची आहे, लोकांचा सरकारी राजकारणी यंत्रणेवर विश्वास नसल्याने पुरेसा निधी उभा करणे कठिण आहे. पण त्याच ठिकाणी विश्वासू व्यक्ती असेल तर सढळ हाताने मदत करतील..

स्तूत्य कल्पना आहे.

मुख्यमंत्री जलयुक्त शिवार योजनेला ऑनलाईन मदत / देणगी देण्याचीही सोय सरकारी संकेतस्थळावर आहे.
दुवा: https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/DonationOnlineForm.action
सिद्धिविनायक मंदिरानेही या कार्याला पैसे दिले आहेत. मध्ये काही आघाडीच्या अभिनेत्यांनीही जलयुक्त शिवार योजनेला देणगी दाखल पैसे दिल्याचे वाचले होते.
परंतु सरकारी देणगी म्हणजे ती एका मुख्य राशीत जमा होईल आणि कुठे ही वापरली जाउ शकेल.

अर्थात तुम्हाला बहुदा थेट मदत करायची बहुदा ती योग्य ठिकाणी गेली याची खात्री हवी आहे.

यासाठी खात्रीशीर संस्था म्हणजे वनवासी कल्याण आश्रम!
पत्ता:
Vanvasi Kalyan Ashram, Maharashtra
15 Krushi Nagar, Mahavidyalay Marg,
Nashik-422005.
Phone no. 91- 0253 - 2577491, 2582429
E-mail: vanvasi@vanvasi.org

खालील दुव्यावर सर्व संपर्कांची यादी पाहायला मिळेल.
http://www.vanvasi.org/contact/contactus.php
यात फलटण ते मुंबई सर्व संपर्क आहेत.

अजून संपर्क हवे असल्यास सचीव रमेश ओवळेकर यांना संपर्क करा, ते मराठवाड्यात नक्की कोठे व काय कार्य चालले आहे याची नेमकी माहिती देउ शकतील.

आशा आहे याची काही मदत होईल.

दुष्काळग्रस्त लोकांसाठी म्हणून मुद्दाम नाही... पण महाराष्ट्रातल्या शेतकर्‍याना मदत करण्यासाठी Save Indian Farmers काम करते. विश्वष्टकावर सापडेलच.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी 'नाम'
अभिनते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांची संस्था
दानशुरांना मदतीसाठी योग्य मार्ग मिळावा या जाणिवेतून त्यांनी 'नाम फाऊंडेशन'ची सुरुवात केली आहे. या माध्यमातून इच्छुक दानशूर व्यक्ती दुष्काळग्रस्तांना मदत करू शकतात.
नाम
एसबीआय करंट अकाऊंट नंबर- 35226127148
आयएफएससी कोड- SBIN00606319
स्विफ्ट कोड नंबर- SBININBB238
अशी माहिती मटा च्या संकेतस्थळावर आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/maharashtra-go...
कृपया खाते क्रमांकाची खात्री करून घेतल्या शिवाय पैसे जमा करू नयेत!

या शिवाय राहाणे (५ लाख) आणि अक्षयकुमार (९० लाख) मुख्यमंत्री निधीला देणगी देणार आहेत.

केवळ दुष्काळाकरता काम करणारी एखादी संस्था असेल की नाही अशी शंका आहे.

पण विलासराव साळुंखे यांची 'पाणी पंचायत', मोहन धारीया यांची 'वनराई' यांसारख्या संस्था गेली कित्येक वर्षे ग्रामिइण विभागात पाणी व्यवस्थापन क्षेत्रामधे काम करत आहेत.

http://panipanchayat.org/

http://www.vanarai.org/

तसेच मदत योग्य मार्गाने योग्य ठिकाणी पोहोचण्याबाबतीत वर उल्लेख केलेल्या वनवासी कल्याण आश्रमाबद्दलही चांगले ऐकले आहे.

रहाणेने चेक दिला आहे. इतर अनेक जण केवळ घोषणा करत आहेत. ज्या दिवशी ते पैसे देतील त्याच दिवशी ती घोषणा "ग्राह्य" धरायची.

प्रथम नाना / मक्या/ रहाणे आणि अक्षयकुमारादी सर्वांचे अभिनंदन.
.
महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही या वर्षीची नवीन गोष्ट नाही.. saveIndianfarmers.com सारख्या संस्थेबद्दल मी मागेही लिहीले होते.. ही मंडळी गेली काही वर्षे या कामात आहेत.
.
पण मरणार्‍या शेतकर्‍यांना वाचवायलाही आपल्याला Celebrity लागतात. जोपर्यंत Celebrity नाही तोपर्यंत केलेल्या कामाला 'भाव' येत नसतो. असो 'नाना' च्या नावाने का असेना, काही कुटुंबं बरबाद होण्यापासून वाचली तर चांगलेच आहे.

गोगा, saveIndianfarmers.com बद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद. त्या साईट विषयी माहिती नव्हती. तुम्ही आधी बोललात तेव्हा लक्षात नव्हते आले.
हर्पेन तुम्हालाही धन्यवाद..
निनाद अरे 'नाम' चेच आहे नाव सर्वांच्या मनात. गागो म्हणतात तसे Celebrity चा महिमा, पण असे का ना, दोन पैसे जास्त जमा होतील, अन चांगल्या ठिकाणी कामी येतील.
पुढच्या आठवड्यात आम्ही एक रक्कम पाठवत आहोत, खरं तर एव्हाना पाठवली पाहीजे होती, पण गणेशोत्सवात अजुन काही लोक हातभार लावतील अशी आशा करतोय.

काही दिवसांपूर्वी एका स्नेह्यांकडून इमेल मध्ये आलेली माहिती खाली डकवत आहे.

---------

नमस्कार.

माझ्या ओळखीचे आणि विश्वासू असे लातूर चे सुधाकर शिंदे हे लातूर जवळील गंगापूर तालुक्यातील गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गावातील अशी कुटुंबे जी फक्त शेतीवर अवलंबून आहेत आणि मागील ३-४ वर्षांपासून ज्यांना शेतीपासून उत्पन्न मिळालेले नाही अशी कुटुंबे ओळखून (जिथे कुटुंबातील मुख्य व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार येण्याची दाट शक्यता आहे ) त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमागे महिन्याला ५००/- अशी मदत करीत आहेत . ही मदत म्हणजे त्यांना फक्त आधार देण्यासाठी व आयुष्यात खचून जाऊ नये म्हणून आहे. अशी ४०-५० कुटुंबे त्यांनी निवडली असून त्या कुटुंबांचा महीन्याचा खर्च अंदाजे १ लाख आहे. अशी एक महिना त्यांनी मदत केलेली आहे. हि मदत हा दुष्काळ सरेपर्यंत म्हणजे निदान जून-जुलै पर्यंत तरी दिली जावी असा विचार आहे . तरी जे कोणी त्यांना या कामात मदत करू इच्छीतात त्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे व कुवतीप्रमाणे जरूर मदत करावी असे आवाहन आम्ही करत आहोत. सुधाकर शिंदे यांचे तपशील खाली देत आहे.

Name: Shinde sudhakar;
Mobile: 09423346481;
Mobile: 09552641403;
email : ssudhakar5770@gmail.com;

sbi ac.no.30017595983
ifsc:sbin0006303

आम्ही केलेली मदत त्यांनी कोणत्या कुटुंबांना पुरवली, किती पुरवली, त्या कुटुंबात किती लोक आहेत अशी माहिती त्यांनी आम्हाला पाठवली . मी या मेल बरोबर ती माहिती तुमच्या माहितीसाठी जोडत आहे.

काहीही शंका असल्यास तुम्ही वरील नंबर वर सुधाकर यांच्याशी बोलू शकता . जर तुमच्या ओळखीचे कोणी मदत करायला इच्छुक असतील तर हि मेल त्यांना जरूर पुढे पाठवा .

----------------

from_sudhakar.jpg

चांगला धागा ( अजून कुणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असेल तर माहीत नाही ).

मो, चांगली पोस्ट आहे.
एबीपी माझा वर उस्मानाबाद जिल्ह्यातील कोंद गावातील जाधव कुटुंबियांविषयी ची बातमी पाहिली. दुष्काळामुळे शेतीची कामं मिळत नाहीत. मुलीच्या शिक्षणासाठी १२०० रुपये हवे असल्याने मंगळसूत्र गहाण टाकलं. पण ते पैसे सहाच महीने पुरले. आता मुलगी घरीच बसून आहे. फीजला पैसे नाहीत. नव-याला इलेक्ट्रीशियन म्हणून खांबावर काम करत असताना विजेचा झटका बसून उंचावरून पडल्याने दोन्ही पाय निकामी झाले आहेत. एकाच जागी आहे. उपचाराला पैसे नाहीत. मुलीच्या शिक्षणाचं झाल्यानंतर उपचाराचं पाहू असं त्यांचं म्हणणं आहे.

शाळेत जाणारी दोन लहान मुलं आहेत. त्यांना शाळेत खिचडी मिळते. त्यावर एक वेळचं जेवण भागतं.
कामं मिळत नाहीत त्यामुळे कुणाच्या न कुणाच्या मागे जाऊन हातापाया पडून मिळेल ते काम घरच्या गृहीणीला करावं लागतंय. ज्या दिवशी काम मिळतं त्या दिवशीच्या जेवणाचा प्रश्न सुटतो. ग्रामपंचायतीने पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पण ती तुटपुंजी आहे.

एबीपी माझा शी संपर्क साधलेला आहे. त्यांच्याकडून गावचा पोस्टल अ‍ॅड्रेस मिळाला तर त्यावर मित्रमंडळींशी संपर्क साधून मनीऑर्डर्स पाठवता येतील. कुणाला या गावाबद्दल माहिती असेल तर हे काम लवकर होऊ शकेल. तसेच इथे कुणाला मदत करायची असल्यास त्यांनाही ते शक्य होईल.

( काही लोकांसाठी खुलासा- हा धागा माझा नाही )

चांगला धागा आहे. आता वर आल्यावर दिसला.बहुतेक वेळा पहिल्या पानावरचेच धागे वाचले जातात.

चांगले धागे मागे जातात अशी निव्वळ ओरड करण्यापेक्षा अशा धाग्यांवर एखाद प्रतिसाद देण्याने असे धागे नेहमी वर राहतील. अर्थात ओरड करणा-यांच्या दृष्टीने हा धागा चांगला आहे किंवा नाही याची कल्पना नाही.
अवांतराबद्दल क्षमस्व.

माहिती आवडली...

प्रत्येकालाच "छोटी" मदत करुन खारीचा वाटा उचलावा असे वाटते... पण गरजू लोकानपर्यन्त केलेली मदत पोहोचेलच याबद्दल विश्वासच वाटत नाही. Sad

प्रामाणिक पणाचे अनुभव येथे आपण शेअर करत राहिल्यास गरजू व्यक्तीन्ना मदत मिळण्यास हातभार लागेल.