Submitted by पुरंदरे शशांक on 5 April, 2016 - 02:12
संतकृपादीपक
नित्य समाधान | संतांची संपत्ती | स्वस्थ चित्त वृत्ती | सर्व काळ ||
अहर्निश वृत्ती | वसे भगवंती | कसलीच खंती | उरेचिना ||
वैराग्य विवेक | बाणतो नेमक | सहजचि एक | योग घडे ||
असोनी संसारी | विरक्त अंतरी | नित्य सदाचारी | धन्य जगी ||
संत सहवास | घडता सहज | जीवनाचे काज | कळो येई ||
शांति लाभतसे | भाविका अपूर्व | वासना त्या सर्व | नष्ट होती ||
प्रेम जडतसे | सहज साधनी | अलिप्त राहूनी | करी कर्मे ||
उद्धरुन ऐसे | जाताच साधक | विशेष हरिख | संता वाटे ||
संतकृपा ऐशी | भाग्याने लाभता | येतसे पूर्तता | जीवनाते ||
----------------------------------------------------------------------------
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शशांकजी _/\_ ही रचना कोणाची
शशांकजी _/\_
ही रचना कोणाची आहे, की आपण स्वतःच केलेली आहे ?
सुरेख, सुरेख!! शशान्कजी, फारच
सुरेख, सुरेख!! शशान्कजी, फारच सुन्दर रचना आहे.
संतकृपेच्या नंदादीपासारख्या
संतकृपेच्या नंदादीपासारख्या प्रकाशात या ओव्यांतले शब्द न शब्द आत्मप्रचिती आल्याप्रमाणे झळाळून गेलेत ...सहजसुंदर प्रासादिक शब्दकळा...
छान ओघवती रचना आहे. "संत
छान ओघवती रचना आहे. "संत सहवास | घडता सहज | जीवनाचे काज | कळो येई ||" हे खूप आवडले. <सहजसुंदर प्रासादिक शब्दकळा> +१
छान! आपोआपच चालीत म्हणल जातय.
छान!
आपोआपच चालीत म्हणल जातय.
शब्दांमधे गेयता छान आहे.
सहज सुंदर !!
सहज सुंदर !!
सुंदर रचना !
सुंदर रचना !
सर्वांचे मनःपूर्वक आभार ....
सर्वांचे मनःपूर्वक आभार ....
महेशजी - मा बो वर स्वतःचेच लिखाण द्यायचे असते ना ?
मी आर्या - संत साहित्यावरचे तुझे प्रेमच यातून लक्षात येते (मी आपले र ला ट जोडून करीत असलो तरी तुम्ही सारे गोड मानून घेता यात तुमचे मोठेपणच दिसून येते.)
भुईकमळ - तुमच्या सुंदर कवितांसारखेच तुमचे प्रतिसाद मन सुखावणारे असतात. माऊलींच्या शब्दांचा मागोवा घेता घेता काही बाही सुचलेले लिहित असतो झालं....
भास्कराचार्य - मनापासून धन्यवाद...
निरुदा, दिनेशदा - काय बोलू ??
मुक्तेश्वर कुलकर्णी - तुम्हालाही संतसाहित्याबद्दल असलेले प्रेमच या प्रतिसादातून जाणवतेय...
असेच प्रेम असू देत...
शशांकजी, अहो तुमची ही रचना
शशांकजी, अहो तुमची ही रचना एवढी जबरदस्त आहे की ती पुर्वीच्या कोणी संतांची आहे की काय असेच वाटले, म्हणुन विचारले. _/\_
शांताराम आठवले नावाचे गीतकार होते त्यांच्या दर्शनाला यायचे लोक,
कारण त्यांनी लिहिलेले गीत हे लोकांना तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या तोडीचे वाटायचे.
आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले.
सुरेख, ___/\___ .
सुरेख, ___/\___ .
खूप सुंदर!
खूप सुंदर!
महेशजी ---- ------- मी
महेशजी ----
------- मी तो हमाल भारवाही....
अन्जू --- माझ्या वेड्यावाकुड्या शब्दांचे कायमच कौतुक करता त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद ...
विलासराव - मनापासून धन्स....
संतसंगतीचं अगदी नेमकं वर्णन
संतसंगतीचं अगदी नेमकं वर्णन उतरलंय या ओवीबद्ध रचनेतून.
सहज, सुंदर आणि उत्स्फूर्त.