राजाराम सीताराम एक .................. आस्थेचे बंध...................भाग १६

Submitted by रणजित चितळे on 2 April, 2016 - 01:19

ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश.
राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १.
राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट.
राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर.
राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा.
राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १.
राजाराम सीताराम....... भाग १०. एक गोली एक दुश्मन।.... भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ११. पिटी परेड.
राजाराम सीताराम....... भाग १२...कॅम्पलाइफ.
राजाराम सीताराम....... भाग १३. विस्थापित काश्मिरी हिंदू, सुनील खेर
राजाराम सीताराम....... भाग १४..मुठी शिबिर.
राजाराम सीताराम........भाग १५...सूट्टीसाठी आतूर.

ह्या आधीचे............सुट्टीसाठी आतूर
.................. पण हिंदोस्तान मुर्दाबाद. कसेसेच वाटले. त्या जिसीच्या आपल्या देशाबद्दलच्या घोषणेने आता पर्यंत कष्ट दे मिश्रावर आलेल्या रागाची जागा, आपल्या देशावर असलेली आस्था चिरडली गेल्या मुळे दुःखाने घेतली.

आस्थेचे बंध

लहान असताना झालेल्या परिस्थितीच्या व समाजाच्या संगामुळे मिळालेल्या संस्कारातून व मोठेपणी केलेल्या अभ्यासाने व अनुभवाने आपल्या आस्था दृढ होत जातात. आपल्या आईवडीलांबद्दल, देशासाठी लढलेल्या व प्राणत्यागलेल्या व्यक्तींबद्दल, राष्ट्र, धर्म, आपल्या परिवाराशी निगडित वस्तूंबद्दल, चिह्नांबद्दल आस्था निर्माण होतात. म्हणूनच मग काहींच्या आपल्या पूर्वीच्या ग्रंथांवर, हिंदूंच्या ॐ ह्या अक्षरावर, क्रिश्चनांच्या क्रॉसवर, सिखांच्या गुरुग्रंथसाहिब ग्रंथावर, मुसलमानांच्या चांदसिताऱ्यावर आस्था वसतात. कोणाला त्यांच्या परिवाराच्या चिजांवर आस्था असते, ही आस्था अगदी आजीच्या भिंग तुटलेल्या चश्म्या सारखी दुसऱ्याला क्षुल्लक वाटणारी सुद्धा असू शकते, कोणाला त्यांच्या शिक्षकांवर, कोणाला फिजिक्सच्या पुस्तकांवर कोणाला बायबलवर कोणाला गीतेवर तर कोणाला इतर धर्मग्रंथांवर. अशा वेगवेगळ्या आस्था जडलेल्या असतात. प्रत्येकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या आस्था काही ठिकाणी मात्र जुळून येतात व परमोच्च असतात. अशा परमोच्च आस्थांखातर वैयक्तिक आस्थांना तिलांजली द्यायची वेळ आली तरी ती दिली जाते. त्या म्हणजे राष्ट्र, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय संपदा व राष्ट्रगौरव चिन्हे. व्यक्तीच्या आवडीनिवडी निर्माण होण्यात आस्थेचा सहभाग मोठा असतो.

कालांतराने काही आस्था समाजमान्य होतात. वडिलधाऱ्या माणसांचा आदर करणे, देव, धर्म व देश ह्याच्याशी निगडित चिन्हांचा आदर करणे ह्या त्यातल्या काही आस्थांचा उल्लेख करता येईल. आस्थेचे बंध आपल्या आयुष्यात संयम राखण्यात मदत करतात. संसाराच्या भट्टीत व रोजच्या कामा मुळे, आपण आस्थांमध्ये गुंतून राहत नाही, पण हृदयाच्या एका कोपऱ्यात आस्थांना योग्य ती जागा दिली गेलेली असते व अशा जतन केलेल्या आस्थांना दुखापत होताना आपल्याला पाहवत नाही, वाईट वाटते. आस्था जपण्यासाठी व्यक्ती फार काही करत नाही पण त्याच्या मनाचा एक कोपरा त्या आस्थांमध्ये अडकलेला असतो. जर आपल्या आस्थांना धक्का लागला तर झालेली दुखापत न भरून निघणारी असते, एका प्रकारे त्या आस्थांशी निगडित तेवढे मन मारून जाते. वाईट वाटते.

आस्थेच्या बंधातून निर्माण झालेला संयम, आलेल्या रागावर मनाचा काबू राखायला मदत करतो. कधी कधी घरी, नोकरीमध्ये वा बाहेर आपल्यावर असे प्रसंग येतात की, आपण अगदी जेरीला येतो. असे वाटते की सगळ्यांविरुद्ध बंड करून उठावे. आपल्या भावना आपल्या हातात राहत नाहीत. अशा वेळेला आपण वाटेलते रागाच्या भरात करायला निघतो. पण नेमके अशाच वेळी आपल्या नकळत आपले आस्थेचे बंध आड येतात व आपण त्या धुमसत्या परिस्थितीत सुद्धा आपण आपल्या आस्थांशी प्रतारणा करत नाही. आपल्या भावनांचा कितीही उद्वेग झाला तरी ह्या आस्था ढाली सारख्या आपल्या समोर उभ्या ठाकतात व त्यांना सांभाळता सांभाळता आपण आपल्या भावनांवर सहजच नकळत संयम मिळवतो. एवढेच नव्हे कधीकधी अशा आस्था आपले चित्त अपवित्र होऊ न देण्याचे काम करतात, त्यांना आपण चक्क ‘कॉनसायनस् किपर’ असे म्हणू शकू. ह्यालाच आस्थेचे बंध म्हणतात. ह्या आस्थेच्या बंधांपायी आततायीपणा कमी होतो. सारासार विचार करायला वेळ मिळतो. आपल्या मनाचा संयम कायम राहतो.

ज्या कोणी हिंदोस्तान मुर्दाबाद अशी घोषणा केली त्याचा संयम त्या घटकेला तुटला होता. आस्थेचे बंध तुटले होते.

समोर कॅप्टन गिल उभा होता. म्हणाला,

"आय थिंक युअर फंडामेंटल्स आर ऑल स्क्युड. आय एम सॉरी, एट धिस फॅग एन्ड ऑफ युअर फर्स्ट टर्म, आय निड टू टीच यु फंडामेंटल्स्. स्टील टाइम इज देअर फॉर युअर टर्मएन्ड. जंटलमन युअर आफटरनून टाईमटेबल इज ससपेंडेड. यु विल फॉल इन फ्रंट ऑफ चेटवोड बिल्डिंग एट थ्री पिएम शार्प. यु विल बी इन युनिफॉर्म. ऍकॅडमी ऍडज्यूटंट वूड ऍड्रेस यु ऑल"

एव्हाना आम्ही कष्ट दे मिश्रावरच्या रागा पेक्षा आमच्यातल्या जिसीने ओरडून हिंदोस्तान मुर्दाबाद म्हटले होते त्या बद्दल शर्मिंदा झालो होतो.

दुपारी तीन वाजायला काही मिनिटे असताना, आम्ही सगळे फर्स्ट टर्मर्स, जवळ जवळ चारशे जिसीज, आमच्या युनिफॉर्म मध्ये चेटवोडच्या ड्रिलस्क्वेअर वर फॉल इन झालो. आज पटकन रिपोर्टची तयारी झाली. आमचा ऍकॅडमी अंडर ऑफिसर एयुओ अभिमन्यू सिंग ने रिपोर्ट घेतला व ऍडज्यूटंटच्या प्रतीक्षेत आम्ही व एयुओ सावधान होऊन उभे राहिलो. बरोबर तीन वाजता, सजलेल्या घोड्यावर बसून ऍकॅडमी ऍडज्यूटंट लेफ्टनंट कर्नल मारूफ रझा आमच्या समोर आला. तसे एयुओ ने आधीच सावधान मध्ये उभे असलेल्या आम्हाला जोरात ----

ऍकॅडमी SSSS स्टेडी असा कडक इशारा दिला व आम्ही सावधान मध्ये असताना अजून मुठी आवळून, मणका ओढून ताठ उभे राहिलो.

गुड आफटरनून सर. फोर हंड्रेड ऍड थर्टीथ्री जिसीज प्रेझेंट फॉर स्पेशल परेड सर.

एयुओचा सॅल्यूट घेऊन मानेनेच बाजूला उभे राहा म्हणून सांगितले. व आम्हाला त्याच्या शांत पण कडक आवाजात म्हणाला.

आय नॉट ईंटरेस्टेड इन हू मेड डॅट स्टूपीड स्लोगन. फॉर मी इट केम फ्रॉम फर्स्टटमर्स् डॅट इज इनफ. यु फर्स्ट टर्मर्स, टुडे यु हॅव फेल्ड इन एन इम्पॉर्टंट टेस्ट इन लाईफ. व्हॉटेव्हर द एडव्हरसीटीज एन्ड प्रोव्होकेशन्स, आवर कंट्री कम्स फर्स्ट. आय डोन्ट हॅव टू रिपीट आवर बायबल अगेन एन्ड अगेन. बट इट सिम्स यु हॅव फोरगॉटन द व्हेरी बेसीक्स. आय विल रिमाइंड यु.

यु विल इको बँक आफ्टर माय इच सेन्टेन्स्.

असे म्हणत त्याने आमच्या कडून फील्ड मार्शल चेटवोडचे वाक्य मोठ्यांदा म्हणवून घेतले.

"The safety, honour and welfare of our Nation comes first, always and every time.

The honour, welfare and comfort of the family you belong to come next.

Your own ease, comfort and safety comes last, always and every time."

यु शुड हॅव डाईड बिफोर इव्हन थिंकिंग टू अब्युज आवर कंट्री.

मग त्यांनी फर्मावलेन.
नेक्स्ट फोर डेज, ऑल एक्टीवीटीज फॉर फर्स्ट टर्मर्स वूड बी ससपेंडेड. फॉर नेक्स्ट फोर डेज एन्ड नाइट एव्हरी फोर आवर्स होल ऍकॅडमी फर्स्ट टर्मर्स विल फॉलइन इन बजरी ऑर्डर हिअर इन चेटवोड परेड ग्राउंड एन्ड गिव रिपोर्ट टू मी. टूडेज रिपोर्ट एट थ्री विल बी कनसीडरर्ड एज फर्स्ट. नेक्स्ट विल बी एट सेव्हन इन द ईव्हिनिंग, देअर आफ्टर एट, देन इलेव्हन इन द नाइट, देन थ्रि इन द नाइट एन्ड सो ऑन. नाऊ यु कॅन डिसबर्स.

संध्याकाळी आम्ही सर्व चारशे तेहतीस जिसीज बजरी ऑर्डर मध्ये परत माणेकशाँवर जमा झालो. ऍडज्यूटंटने पुन्हा एकदा आमच्या कडून फील्ड मार्शल चेडवोडची ती तीन वाक्य आमच्या कडून म्हणवून घेतलीन व आम्हाला परत पाठवलेन.

असे पुढचे चार दिवस दर चार तासाने होत गेले. प्रत्येक वेळेला मारूफ रझा हजर असायचा व प्रत्येक वेळेला आमच्या कडून ती तीन वाक्य मोठ्याने म्हणवून घ्यायचा. प्रत्येक परेडसाठी तयारी करायची व चारशे जिसिज जमून बजरी ऑर्डर मध्ये रिपोर्ट द्यायचा म्हणजे ह्या सगळ्या प्रकारात दोन तास जायचे. चवथ्या दिवशी पर्यंत कमी झोपेमुळे व रोज च्या बजरी ऑर्डरने बेजार झालो होतो. तरी सुद्धा आम्हा प्रत्येकाला वाटत होते आमच्या हातून जे घडले त्याला ह्या पेक्षा मोठी शिक्षा झाली पाहिजे होती. आम्हाला आमचीच लाज वाटत होती. चूक समजली होती. त्या मुळे चार दिवसाची सगळी फॉलईनस् कोठचाही आखून दिल्या प्रमाणे आम्ही करायचो. सगळ्यांमध्ये एक प्रकारचा शिक्षा भोगण्यात उत्साह होता. चवथ्या दिवशी दुपारी तीन वाजता शेवटच्या फॉलीनला त्याने जाहीर केले

जिसीज. डॅट्स द स्पिरिट. आय लाईक्ड इट. कंसीडर धिस एज युअर लास्ट फॉलइन फॉर द मिस्टेक यू कमीटेड. यु कॅन रीझ्यूम युअर नॉर्मल एक्टीवीटीज फ्रॉम नाऊ ऑन.

मग म्हणतो.

वि विल रिझ्युम आवर आयएमए टाइम टेबल फ्रॉम व्हेअर वि ससपेंडेड इट. वि लॉस्ट फोर डेज, सो इट इज लॉजीकल डॅट इन ऑर्डर टू फिनिश थिस टर्म एन्ड स्टार्ट युअर फायनल टर्म विदाऊट कॉम्प्रमायझींग ऑन ट्रेनिंग, यु मस्ट गिव अप युअर टर्म एन्ड लिव्ह ऑफ फोर डेज.

हे ऐकून आमच्या सगळ्यांच्या पोटात गोळा आला. पण करतो काय. आमच्या सगळ्यांची घरी जायच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले व आम्ही जड मनाने आमच्या बराकीकडे परतलो. रूमवर येऊन आईला भले मोठे पत्र लिहिले. फोन करण्याचा प्रश्नच नव्हता. कारण घरी फोनच नव्हता. आलीया भोगासी असावे सादर असे म्हणत दुसऱ्या दिवशीची तयारी सुरू केली. त्या दिवशी संध्याकाळी कॅप्टन गिल आला आमच्या प्लटून मध्ये. म्हणाला गाईज, आय नो यु मस्ट बी कर्सींग मी, बट समथिंग्स् जस्ट डोन्ट गेट एक्सेपटेड इन आयएमए एन्ड युअर बिहेविअर ऑन डॅट फेटफूल डे वॉज ऑबनॉक्शीअस. एनी वे --- मुव्ह ऑन. धिस संडे बिअर इज ऑन मी. गाईज चिअर अप.

आम्ही खोटेखोटे चेहऱ्यावर हसू आणायचा प्रयत्न केला. पण घरी न जाऊ देणे व त्या ऐवजी बिअर पाजणे हे माझ्या कोठल्याच कोष्टकात बसत नव्हते. सुनील खेर व बाकीच्या शिक्षा भोगणाऱ्या जिसीजना बरे वाटले आता त्यांच्या बरोबर पहिल्या सत्राचे कोणीच सुट्टीत घरी जाणार नव्हते.

(जेएनयूच्या पार्श्वभूमीवर हा भाग महत्वाचा आहे)
(क्रमशः)

आपण राष्ट्रव्रत घेतले का

त्या संबंधी येथे अजून वाचा
http://rashtravrat.blogspot.in/
आणि येथे
http://bolghevda.blogspot.in/
(मराठी ब्लॉग)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झालाय हा भाग पण.
ती तीन वाक्यं जशी इंग्रजीतून लिहिली आहेत, तसेच बाकीचे इंग्रजी संवादही इंग्रजीतच लिहिले तर वाचायला अजून सोपे होईल असं वाटतंय.

मित +१ इंग्रजीतून मराठी जसे वाचणे अवघड वाटते तसेच देवनागरीतून इंग्रजी वाचणे अवघड वाटते.
लेख नेहमीप्रमाणे उत्तम. हा सर्व प्रसंग हाताळणाऱ्या अधिकार्यांचे आणि तुम्हाला जी शिक्षा मिळाली ती ठरवणाऱ्या व्यक्तीच्या विचारांचे फार कौतुक वाटले. शिक्षा अशी हवी जिने पश्चातताप वाटला पाहिजे सुडाची किंवा अन्याय झाल्याची भावना उत्पन्न व्हायला नको.

रणजित चितळे - नमस्कार ! आज सगळे भाग वाचले.
खूप सुंदर लिहिताय. पुढच्या भागांची उत्सुकता आहे.

मित +१ इंग्रजीतून मराठी जसे वाचणे अवघड वाटते तसेच देवनागरीतून इंग्रजी वाचणे अवघड वाटते. +१

शिक्षा अशी हवी जिने पश्चातताप वाटला पाहिजे सुडाची किंवा अन्याय झाल्याची भावना उत्पन्न व्हायला नको. जियो जिज्ञासा काय वाक्य लिहून गेल्येस !

तुमच्या आस्थांविषयीच्या भावना समजून घेतल्या पण प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर नाही प़टलं.....

कदाचित मला नीट मांडता येत नाहीये पण मला असे वाटले ही काय फार ग्रेट पद्धत नव्हती. मला आधीच्या भागात असे वाटले होते की काहीतरी इनोव्हेटीव पद्धतीने कॅप्टन गील हा मुद्दा सोडवेल. पण नाहीच. बाकी प्रश्नांप्रमाणेच दडपशाही करून, शिक्षा करूनच दडपला गेला.

खरेच असे वाटते का की ज्या जीसीने हा आवाज टाकला त्याला इतके दिवस शपथ घ्यायला लाऊन, बजरी अॉर्डर घेऊन विचार बदलले असतील. कदाचित पुढच्या वेळी तो जाहीरपणे बोलणार नाही पण असे पश्चाताप करायला लावणारे त्याला किंवा कुणालाच काय केले. त्याला आतून वाटले असेल का आपण केले ते चूक केले. जाहीरपणे बोललो हे चूक केल्याचे उमगले असेल पण त्या पलिकडे काय.

आणि हे लिहावे वाटले याचे कारण जेएनयूच्या पार्श्वभूमीवर हा भाग महत्वाचा आहे अशी जाहीरात केली होतीत. मग मुलांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी यासाठी प्रत्येक विद्यापीठात मोठा तिरंगा फडकावणाच्या आदेश काढणारे भाजपा आणि दिवसातून चार वेळेस शपथ घ्यायला लावणारा कॅप्टन यात काय फरक उरला. भाबडेपणा फक्त की असे केल्याने विचार बदलतील आणि लगेच सगळे देशभक्त होतील.

असे, शपथा घेऊन, प्रतिमा पाहून लोकांचे विचार बदलले असते तर जागोजागी महात्मा गांधींचे पुतळे, तिरंगा, थोर व्यक्तींचे पुतळे असताना भष्ट्राचार झालाच नसता. लोक आदर्शवतच वागले असते.

आशूचँप - आपले विचार वाचले. आयएमए ही जागा व त्यातल्या शिक्षा हे मन बदलण्यासाठी नसतातच. घडलेली मनच येतात येथे - एसएसबी सिलेक्शन असेच असते. येथे फक्त शिस्त लावायचे काम होते घडलेल्या मनांना. आयएमएत व आर्मीत लोकशाही नाही. आर्मी एक्ट आहे. आर्मी एक्ट मध्ये फंडामेंटल रईट्स ससपेंडेड असतात.

राहिली गोष्ट तिरंगा ध्वज फडकवण्याची. काय प्रॉब्लेम आहे जर रोज तिरंगा फडकावला तर. जर असे आदेश दिले की रोज तिरंगा फडकवताना सा-या विद्यार्थ्यांनी हजर रहावे तर म्हणू शकतो की हे आर्मी साऱखे झाले तर. पण तिरंगा फडकवण्याचे फरमानात काहीही वावगे नाही असे माझे मत.