गायो पिंतो (Gallo Pinto )

Submitted by वर्षू. on 21 March, 2016 - 13:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कोस्तारिका ला जाऊन,'गायो पिंतो' ची चव नाही पाहिली तर हे म्हंजे श्रीनगर ला जाऊन डल लेक ला भेट न दिल्यासारखंच.. जाऊ दे आयत्यावेळी दुसरी काही उपमा सुचत नाहीये.. मुद्दा समजल्याशी कारण.. Happy
तर कोस्तारिकात पाय ठेवल्या बरोबर रस्त्याच्या कडेने ओळीनी असलेले ,' सोडे' ( सोडा म्हंजे ढाबा) आणी त्यांच्यावरील पाट्या लक्ष वेधून घेतात. प्रत्येक सोडा ,कितीही विविध फराळाचे, जेवणाचे प्रकार विकू देत पण मेन्यू वर 'गायो पिंतो" चं नांव पहिलेच असायला हवे. येथील प्रत्येक घरात सकाळच्या न्याहारी ला हाच पदार्थ फक्त दिसून येतो.
. मूळतः हा पदार्थ,आफ्रिके हून आलेल्या गुलामांनी लॅटिन अमेरिकेत आणला. पण नंतर नंतर कोस्तारिका, निकारागुआ इ. देशांत तो इतका लोकप्रिय झाला कि त्यांच्या राष्ट्रीय अन्नात प्रथम क्रमांक पटकावून बसला.
गायो पिंतो चा लिटरल अर्थ आहे ठिपके असलेला कोंबडा. शुद्ध शाकाहारी असलेल्या या डिश शी कोंबड्याचं काही देणं घेणं नाही बरं!! ब्लॅक बीन्स घालून केलेल्या या फ्राईड राईस मधे असलेल्या काळ्या ,लाल बीन्स च्या ठिपक्यांमुळे या भाताला हे गमतीदार नांव पडले.
शेत मजूर किंवा अंगमेहनतीची कामे करणारे असोत कि ऑफिस गोअर्स असोत सर्व लोकं हा पोटभरीचा नाश्ता करून तृप्त मनाने कामावर जातात.
आमच्या कोस्तारिकन मैत्रीणी कडे या डिश चा आस्वाद घेतला.. खूप आवडला गायो पिंतो. .. म्हणून इथे शेअर करतेय.
लागणारे जिन्नस साधे सोपेच आहेत..

१) ५०० ग्राम- ब्लॅक बीन्स
२) मूठभर कोथिंबीर - चिरलेली
३) १ मध्यम आकाराचा कांदा- चिरलेला
४) अर्धी अर्धी पिवळी आणी लाल ढोबळी मिर्ची - बारीक चिरून ( ऐच्छिक)
५) ३ कप पाणी किंवा चिकन ब्रॉथ
६) २ कप तांदूळ ( बासमती सोडून कोणताही)
७) मीठ- चवीनुसार
८) ३ टेबलस्पून खाण्याचे तेल
९) रेडीमेड सालसा लाझिनो ( कोस्तारिकन सालसा)
१०) ३,४ पाती सकट चिरलेले कांदे

क्रमवार पाककृती: 

१) ब्लॅक बीन्स, रात्र भर पाण्यात भिजवून दुसर्‍या दिवशी कुकर मधे मीठ घालून शिजवून घ्या. शिजल्या पाहिजेत पण मोडायला नकोत. येथील लोकल्स,भांड्यात ३,४ तास शिजवतात, कुकर नाही वापरत. पण मी वापरलाय . Happy
२) पातेल्यात एक टेबल स्पून तेल गरम करून त्यावर धुतलेले तांदूळ टाकून दोन मिनिटे हाय फ्लेम वर परता.
आता बारीक चिरलेल्या भाज्या, कोथिंबीर ,कांदा टाकून परता. परतल्यावर पाणी घालून भात शिजवून घ्या.
गायो पिंतो करता एक दिवस आधी ही तयारी करून ठेवावी लागते.
एक दिवस आधी शिजवलेला भात दुसर्‍या दिवशी छान मोकळा होतो.
३) आता तिसरी आणी फायनल स्टेप.. म्हंजे दुसर्‍या दिवशी बीन्स आणी भात फ्रीज मधून बाहेर काढून ठेवा.
आता एका कढईत दोन टेबल स्पून तेल गरम करून पातीचा कांदा पातीसकट , एक मिनिट हाय फ्लेम वर फ्राय करा. त्यावर भात आणी ब्लॅक बीन्स घालून नीट मिक्स करत परता. आता एक टेबल स्पून salsa Lizano अ‍ॅड करा. एक मिनिट नीट परता. गायो पिंतो तयार आहे.
गायो पिंतो नेहमी फ्राईड एग किंवा रोस्टेड चिकन बरोबर सर्व केला जातो.

ब्लॅक बीन्स

पहिल्यांदाच ट्राय करत असल्यामुळे उत्साहाच्या भरात हलक्या हाताने न परतता, तलवारीचे हात चालवले Uhoh .. पण चवीला अप्रतिम झाला गायो.. Proud

अधिक टिपा: 

वेजी लोक्स.. फ्राईड एग वगळा.. असाच गरमागरम ही खूप छान लागतो.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टींग नाव .. ह्या रेस्पीत आणि मेक्सिकन राईस (मायनस बीन्स् अ‍ॅण्ड अ‍ॅड क्युमिन) आणि प्युर्तो रिकन बीन्स राईस (ह्याविषयी मी सोनिया सोटोमेयर च्या पुस्तकात वाचलं) खूप साम्य दिसत आहे ..

इकडे मेक्सिकन पिको डि गायो खूप पॉप्युलर आहे .. हे म्हणजे कांदा, टोमॅटो, हालापिन्यो आणि कोथींबीरीची कोशींबीर फक्त मीठ घालून केलेली .. तर गुगल ट्रान्स्लेट वर पिको डि गायो चं भाषांतर मिळालं नाही पण त्यातल्या शब्दांचे अर्थ बघितले तर "peak from rooster" असं भाषांतर होत आहे ..

मस्त. आमच्याकडे पण हे ब्लॅक बीन्स खुप वापरतात. टीनमधे शिजवलेले मिळतात.
त्या सालसाचे घटक सांग, तो घरी करावा लागेल.

आम्ही २००० साली गेलो होतो तेंव्हा या डिश चं नाव मोरोज इ क्रिस्तानोज असं ऐकलं होतं
( सावळ्या रंगाचे Moors (moros) आणि गोरे Spaniards (cristianos).) तो बहुतेक तिथल्या क्युबन लोकांचा प्रभाव असावा.

आमच्याकडे अतिशय आवडता प्रकार आहे सगळ्यांचा.

फोटो मस्त .

मस्त! आमच्याकडे लंचला बरेचदा केला जातो हा प्रकार. मी ब्राऊन राईस वापरते. याचेच वेरीएशन किन्वा वापरुनही करते. तेही मस्त लागते.

वर्षुच्या आन्तरराष्ट्रीय पाकृ खरच लाजवाब आणी हटके आहेत.:स्मित:

वर्षु मला खरच तुझे खूप कौतुक वाटते.:स्मित: दिनेशजीन्च्या नन्तर अशा डिश आता तुझ्याच बघते आहे. आणी तू खूप मनमोकळे पणाने सगळ्यान्शी त्या शेअर करतेस. लाजवाब! ब्लॅक बीन्स नाही पण राजमा घालुन नक्की करता येईल, कारण घरात आहेच.

सशल, संपूर्ण लॅटिन अमेरिकेत तुला गायो पिंतो ची वेगवेगळी नांवे आणी स्वरूपं पाहायला मिळतील .. पण कोस्तारिका आणी निकारागुआ चे मात्र नॅशनल फूड आयटम आहे गायो.
मेधा .. किती परफेक्ट नांव.. Happy

स्वाती२.. तुझ्या कडे सालसा लिझानो मिळत असल्यास शोध.. त्याने एकदम अप्रतिम चव वाढते..

रश्मी.. थांकु..थांकु.. :अगा क्या बी क्या... Happy
भाताला मस्त डीप जांभळा, लाल कलर आला पाहिजे.. राजमा.. नो आयडिया.. करून बघ आणी सांग मग!!!

लाजबाब नाव अन हटके पाकृ वर्षूटै Happy कडधान्ये घालून सरसरीत भात असावा असे वाटतेय. पौष्टिक + पोटभरीचा चविष्ट पदार्थ होईल . सालसा रेडिमेड मसाला चवीला कसा असतो? उग्र की सौम्य ?
करून बघण्यात येईल. Happy

आहारशास्त्र आणि पाककॄती असा विभाग न वाचता क्लिक केले मला वाटले आता एखादे चीन मधील शहर दाखविणार पण भाताचे प्रकार Proud
पण छान आहे.

परवा एका ऑथेंटिक मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये sopes with black beans खाल्ले. त्यात वापरलेले ब्लॅक बीन्स म्हणजे हेच का? कारण ते दिसायला आणि चवीला राजम्यासारखे नसतात असे तिथली ओनर म्हणाली. साऊथ अमेरिकेत हे ब्लॅक बीन्स फार वापरतात असे कळले.

भारी दिसतोय गायो पिंतो!! ब्लॅक बीन्स नाही पण राजमा घालुन नक्की करता येईल>> +१
एक क्षण मला ते गाओ पिओ असं वाटलं होतं.. म्हटलं नवीन कॉकटेल रेसिपी दिसतेय Wink

स्वाती२.. तुझ्या कडे सालसा लिझानो मिळत असल्यास शोध.>> सालसा लिझानो अ‍ॅमेझॉनवर मिळतो.

sopes with black beans खाल्ले. त्यात वापरलेले ब्लॅक बीन्स म्हणजे हेच का? >> हो संपदा.

सालसा लिझानो- शुद्ध शाकाहारी ..

इन्ग्रेडिएंट्स - पाणी, साखर, आयोडाइज्ड मीठ, कॉर्न स्टार्च, वेजीटेबल प्रोटीन्स,
molasses, spices , mustard, hot pepper ,वगैरे वगैरे.. प्लस प्रिझर्वेटिव्ह सोडोयम बेंझाईट