ईकेबाना(जापनीज पद्धतीने पुष्परचना) शिबीर, एक सुंदर अनुभव

Submitted by सायु on 17 March, 2016 - 08:51

पुष्परचना, एक अत्यंत आवडीचा विषय. रोज ,कधी घरी उमललेली, तर कधी लेकाला शाळेत सोडुन घरी येताना, आसपसच्या परिसरात उमलेली फुलं, पाने झालेच तर वाळलेल्या काड्या, दगड गोळा करुन आणायचे आणि घरातला एखादा कोपरा सुशोभीत करायचा.हा माझा रोजचा नेम. त्यामुळे घरात प्रसन्न वाटतं , सजिवत्व जाणवते, ताण हलका होतो असे माझे मत. असो..

फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान एक ईकेबानाचे शिबीर अटेंड करण्याचा योग आला. तर त्या शिबीराचा अनुभव ईथे सांगते आहे ....

ईकेबाना, ही एक कला आहे, जापनीज पद्धतीने पुष्परचना करण्याची. ईकेबाना, इज अबाऊट टु मीनिमायझेशन.. म्हणजे कमीत कमी फुलं , पानं / साहित्य वापरुन सुबक रचना कशी करायची..म्हणजे अगदी एकच फुल आणि एकच पान देखिल वापरुन सुद्धा तुम्ही एक्झोटीक रचना करु शकता..:)

तर सुनिता नेवाटीया, (मुंबई ) यांचे शिबीर होते. मी अर्धा दिवस ऑफीस करुन घरी जाऊन मुलांची दुपारची खाण्याची सोयकरुन साधारण ४ वाजता चिटणवीस सेंटर (नागपूर) च्या हॉल मधे पोचले, तेव्हा शिबीराला सुरवात झली होती. त्यामुळे दबकतच प्रवेश केला.. सुनिता नेवाटीया, साधारण ४० ते ४५ वर्षाच्या असाव्यात, गोर्‍यापान, उंच पुर्‍या, मृदु भाषीय आणि हसमुख व्यक्तीमत्व.. त्यांची देह भाषा, प्रेक्षकांशी संवाद आणि एकुणच मंत्रमुग्ध झालेले शिबीरर्थी असे सगळे बघता मला तिथे समरस व्हायला काही फार वेळ लागला नाही.

सुनिता जी इज द फर्स्ट मास्टर ऑफ ओहारा स्कुल. त्यांनी सांगीतले की मी.ओहारा, हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी 'मोरीबाना' आर्ट आणले (म्हणजे एनी अरेंजमेन्ट डन इन प्लॉट कंटेनर, त्या विषयी पुढे सांगणारच आहे.)

ईकेबाना, हे तीन गोष्टींवर आधारित आहे, मास्क, स्कल आणि लाईन्स..
ईट फॉलोझ लाईन्स ऑन्ड कर्व्हझ.त्यातही एखादी फान्दी/पान कसे ट्विस्ट करायचे, कसे कापायचे, कसे बेन्ड करायचे आणि बरेच काही शिकायला मिळाले. त्यांनी मुंबई हुन खुप सुंदर वेस, कंटेनरर्स, एक्झोटीक फुले / पाने खास या शिबीरा साठी आणले होते. छोट्या तोंडाच्या कंटेनरर्स मधे पिन होल्डर्स जात नसेल तर
आधी वाळु भरायची मग पीन होल्डरर्स ठेवुन पुष्परचना करायची.. पसरट कंटेनरर्स मधे आधी पाणी आणि मग पीन होल्डरस ठेवुन रचना करायची असे सगळे नविन नविन शिकायला मिळाले.. रचना दिर्घ काळ टीकण्यासठी पाण्यात डीस्प्रीन टाकायची. तसेच वन थर्ड ऑफ ए हाफ इझ द बेस्ट प्रपोरशन अशा महत्वाच्या टीप्स पण मिळाल्यात. Happy

त्या दिवशी त्यांनी आम्हाला एकुण १२ रचना शिकवल्यात. त्यातल्या काही ईथे सांगते-

१.हेनामाय - ही रचना डान्सींग फ्लावर्स नी केली होती.. अतिशय मोहक रचना होती.

२. हेका - म्हणजे अशी रचना जी उंच कंटेनरर्स मधे करतात.

३.मोरीबाना - म्हणजे अशी रचना जी पसरट कंटेनरर्स मधे करतात.

४.ओहारा हेवनली स्टाईल - टॉल स्टाईल अरेन्जमेंट, गोईंग टुवर्डस हेवन, यात त्यांनी उंच उंच अम्रेला पाम चा
खुप छान उपयोग केला होता.

५, ल्यान्डस्केप - अंडाकृती/ गोल पसरट भांड्यात, बाम्बु आणि आयसच वापरुन खुप छान रचना केली होती.

६.ह्युज ल्यान्डस्केप - ही रचना त्यानी एका मोठ्या पितळीच्या परातीत केलेली.
जपान मधे रुतवर आधारित ल्यान्डस्केप बनवतात. जसे की विन्टर ल्यान्डस्केप, समर ल्यान्डस्केप, ऑटम ल्यान्डस्केप्स ईत्यादी. त्यातही खुप टेकनिक्स असतात, समर ल्यान्डस्केप मधे समोरच्या भागात जास्त डेकोरेशन करतात तर विंटर ल्यान्डस्केप मधे मागच्या भागाला जास्त डेकोरेशन करतात. अशा प्रकारच्या रचना जास्तकरुन डेमोंस्ट्रेशन साठी वापरल्या जातात.

त्या म्हणाल्यात ईकेबाना ही नुसतीच एक कला नसुन ते 'शिल्प' आहे -

त्यांचा शब्द न शब्द मनात कोरल्या जात होता. त्यानी एखादी साधी वाळलेली काडी जरी धरली तरी ती त्याक्षणापासुन सुंदर वाटु लागायची.. ते म्हणतात ना एखाद्याला तशी वेचक नजर लाभलेली असते के तो असे
सौन्दर्य पाहु शकतो जे आपण सर्व सामान्य लोक नाही.. गॉड गिफ्टच, नाही का!

शिबीराचा कालावधी दोन तासाचा होता, पण सगळ्यांचा उत्साह पाहुन दोन तासाचे शिबीर ३ १/२ तास चालले.
शिबीराच्या दरम्यानच माझ्या सकट प्रत्येकानी मनोमन आपआपला कोपरा सजवायला सुरवात केली होती.
सगळ्यांचे चेहरे फुलासारखे खुललेले , टवटवीत... बरच काही शिकल्याचे समाधान होते आनंद होता..एवढे सगळ असुनही पाय तीथुन निघवत नव्हता.. अजुन शिकण्याची लालसा होतीच.. पण वे़ळे अभावी शिबीर संपवावे लागले..

जपान मधे प्रत्येक घरी रोज एकतरी ईकेबाना करतात, तीथेले लोक त्याला पवित्र/ धार्मिक (स्पीरीचुअल ) समजतात. जसे आपल्या ईथे प्रत्येका कडे देवघर असते, तसे त्यांच्या कडे ईकेबाना साठी एक खास जागा असते, त्याला "टोकोनामा" म्हणतात. तीथेचे ईकेबाना ठेवले जाते.आपल्याकडे आपण मुलीला जसे भरतकाम , विणकाम शिकवतो तसे तिथे ईकेबाना शिकवले जाते..

जपान सारख्या आधुनिक तंत्रध्न्यानात प्रगत देशानी, निसर्गाचा देवा सारखा आदर करावा, प्रेम करावं, ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. अनुकरणिय आहे.-

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख सुंदर .. पण विद्यार्थ्यांनी केलेल्या रचनांशिवाय अपूर्ण !!!!

सायली, मस्त माहिती. तु केलेल्या रचनांचे फोटो टाक ना असतील तर. पहायला आवडेल.

खुपच छान!! बरीच नविन माहीती मिळाली. असे शिबिर अटेंड करायला आवडेल. तुमच्याही पुष्परचना येऊ देत..

मस्त ! शाळेत असताना मी हे केलेय . भारी वाटत करताना
.आता रिफ्रेशर कोर्स करावासा वाटतोय हे वाचुन

वॉव ....सायु सुंदर लेख आणिं फोटोही.
पुष्प रचना फार आवडीचा विषय. जे काही बागेत सापडेल त्याची कशात तरी मनाजोगती रचना करण्यात फार समाधान असते.

<<<< लेख सुंदर .. पण विद्यार्थ्यांनी केलेल्या रचनांशिवाय अपूर्ण !!!! >>>> +111.. Happy Happy
छानच लेख...

जपान मधे प्रत्येक घरी रोज एकतरी ईकेबाना करतात>> हा गैरसमज आहे.

माहिती चांगली आहे पण तुम्ही केलेल्या रचना पण दाखवल्या असत्या तर आणखी मजा आली असती.

इकेबानाचे फोटो काढताना पण काळजी घ्यावी. त्या पहिल्या फोटोत मागे तो Hotun चा डबा किती वाईट दिसतो आहे. Sad

मस्त !

कांपो,
तिने शिबिर अटेंड केल तिथले प्रचि टाकलेत..प इकेबाना बघायच, hotun चा डबा कशाला..
आणि अपवाद असतातच सगळीकडे..

The spiritual aspect of ikebana is considered very important to its practitioners. Silence is a must during practices of ikebana. It is a time to appreciate things in nature that people often overlook because of their busy lives. One becomes more patient and tolerant of differences, not only in nature, but also in general.

It is a disciplined art form in which the arrangement is a living thing where nature and humanity are brought together.

Ikebana can inspire one to identify with beauty in all art forms. This is also the time when one feels closeness to nature which provides relaxation for the mind, body, and soul>>
टीना असे असताना तो Hotun चा डबा मला फारच डिस्टर्बींग वाटला. निदान इकेबनासारख्या नीट विषयाला धरुन तो नीटपणे प्रेझेंट करता यावा असे मला वाटले. इकेबाना शिकणार असतील तर याही गोष्टी लक्षात घ्यावा म्हणुन मी एक फुस दिला. कुणाला दुखवायचा वगैरे हेतु नव्हता. http://www.ikebanahq.org/whatis.php

माहिती नक्कीच चांगली लिहीली आहे वे मी वरही म्हणलय. असो.

सायु खुप छान लिहील आहेस ग.
अग तू रोज आता करतेस ना ते फोटो पण टाक ना.

आणि एक रिक्वेस्ट आम्हालाही शिकव ग स्टेप बाय स्टेप फोटो टाकून. म्हणजे ती पाम ची पान कापलेली दिसतात. ती कापायची, बेंड करायची, खाली ताजे राहण्यासाठी काय उपाययोजना केली, कश्याप्रकारे ते सगळे डिटेल मध्ये देता आले तर दे.

छान माहिती कांपो..
दुखवण वगैरे नाही हो पण नव्या गोष्टी शिकताना आपली पाटी कोरी असते. त्यावरचा डिटेल अभ्यास नंतर सुरु होतो.
निव्वळ शिकवण्याचा हेतु असल्यावर शिकवणारीने लक्ष नाहीं दिल तिकड आणि फोटो काढताना विद्यार्थ्यांना हे लक्षात आल पाहिजे अस म्हणन चुकिच होईल नै का?
तुमच्या पोस्टमधुन आता इकेबानाबद्दल अधिक माहिती काढायची इच्छा होतेय. धन्यवाद _/\_

वेलकम टीना. Happy जपानी कुठलीही कला मग ती इकेबाना असो, ओरीगामी असो वा साधे चहा बनवणे असो. पहिला धडा असतो नीटनेटकपणाचा. Happy

वा सुंदर लिहिलंस सायली, क्युट फोटो. ग्रेट कला.

अजून लिही, प्रतीक्षेत. तुझे प्रयोग बघायचेच आहेत. +++ १ Happy

अजुन प्रचि येऊदेत

दिनेश दा, हेमा ताई, माणिक संशोधक, जाई, मंजुताई,मानुषि ताई, श्री, नीरु, टीना,वर्षु दी, अन्जु ताई, ऋन्मेऽऽष ,देवकी, मुक्तेश्वर, ईंद्रा, जागु, नितीन सगळ्यांचे प्रतिसाद कीती छान..:) खुप खुप आभार...../\......

दिनेश दा ,हेमा ताई मझ्या रचना खुप साध्या साध्या आहेत हो... आणि सगळ्याच काही ईकेबाना नाहीये. त्यामुळे ईथे टाकायच्या नाही तो प्रश्ण आहे?

माणिक, नक्की अग सोबतच अटेंड करुया..:)
जाई, नक्की कोर्स करच, तीथे बर्‍याच लोकांनी कोर्स करता नावे नोंदवलीत..
मानुषि ताई, हो ग मला आठवतय तु खुप सुंदर बाटल्यांमधे गुलाब सजवले होते ना !:)
टीना, तुझे विशेष आभार, अगदी माझ्या मनातल बोललीस बघ! Happy
वर्षु दी, खरच अविस्मरणीय आनुभव होता माझ्या साठी..
जागु, नक्की तसा प्रयत्न करणार..

कांदे पोहे, +++++ जपान मधे प्रत्येक घरी रोज एकतरी ईकेबाना करतात>> हा गैरसमज आहे.

मी फक्त ३ १/२ तासाचे शिबीर अटेंड केलेत, सुनिता जींनी जी माहिती दिली तीच मी सांगीतली, त्या या
क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासुन आहेत, त्यांनी बरेच दा जपान वारी ही केलीआहे, त्यांना तीथे बरेच पुरस्कारही मिळालेत.. तरी देखिल अपवाद असु शकतात. मी कोर्स केला असता तर जास्त खोलात माहिती देऊ शकले असते..

इकेबानाचे फोटो काढताना पण काळजी घ्यावी. त्या पहिल्या फोटोत मागे तो Hotun चा डबा किती वाईट दिसतो आहे. ++++ मी फक्त शिबीरार्थी होते, त्यामुळे फोटो काढायला संकोच पण झाला. मुळात या लेखात फोटो टाकु की नाही हा ही एक मुदा होता, पण फोटो मु़ळे रचना नेमक्या कशा होत्या ते स्पष्ट होतील हा निव्वळ हेतु. आणि तो डबा आणि अवती भोबतीचा पसारा सगळे रॉ मटेरीयल होते, त्यांनी ईतक्या सगळ्या वस्तु एखाद्या बाळा सारख्या जपुन मुंबई हुन खास या शिबीरा साठी आणल्या होत्या. त्यामुळे फोटोतल्या ईतर गोष्टींकडे दुर्लक्ष करावी ही नम्र विनंती. बाकी तुमच्या प्रतिसादातुन खुप छान महिती मिळाली.. लेख आवडल्या बद्द्ल आभारी. --------/\----------

जल्ला असलं हे इना मीना डिका मला माहीतच नव्हतं.. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद..

केपी तू तर काय जेपी रिटर्न.. हे सगळं इंटरेस्टिंग करून टाकलस राव.. आता पुढं पण येउद्या..

ही एक साधीशी रचना, काशीद ची फुलं आणि पानं वापरुन केलेली, चीबी मातीचा पॉट आहे, त्यात फक्त पाणी आहे, छान दोन दिवस ताजी टवटवीत रहाते....:)

Pages