डोनट्स!

Submitted by पूनम on 29 February, 2016 - 02:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

डोनट्स हा प्रकार अत्यंत आवडता. Mad Over Donuts, Dunkin Donuts ची outlets इथे आहेत. पण एकेका डोनटला ७०-८० रूपये मोजावे लागतात. तेही मोजत होतो, पण तेव्हा अंत:करण अंमळ जड होत होतं. अशात वर्तमानपत्रामध्ये ’डोनट शिकवायची कार्यशाळा’ अशी जाहिरात आली आणि लगेच नाव नोंदवलं. आमच्या टीचरने तोंपासु डोनट्स हाहा म्हणता आमच्या डोळ्यासमोर तयार केले, सजवले आणि आम्हाला चवही दिली! साहजिकच घरी येऊन, सामान जुळवून करून पाहिले आणि जमले!!! डोनट-प्रेमींसाठी ही कृती शेअर करतेय. तुम्हीही करून बघा. खटपट आहे, वेळखाऊ आहे, पण worth it! Happy

१. मैदा- २५० ग्रॅम (इथे वाचकांना लगेचच एक प्रश्न पडला असेल. पण थांबा. आधी कृती पूर्ण लिहून होऊदे तरी! :फिदी:)
२. पिठीसाखर- ६ टीस्पून
३. मीठ- अर्धा टीस्पून
४. तेल- दीड टीस्पून
५. मिल्क पावडर- २ टेबलस्पून
६. कस्टर्ड पावडर- १ टेबलस्पून
७. व्हॅनिला पावडर- १ टीस्पून (या ऐवजी व्हॅनिला इसेन्स चालेल)
८. यीस्ट (फ्रेश अथवा ड्राय*- कोणतंही चालेल.)- १ टेबलस्पून
९. ब्रेड इम्प्रूव्हर**- अर्धा टीस्पून
१०. पाणी- १२० मिलि
११. डोनट्स तळण्यासाठी तेल
११. सजावटीसाठी डार्क चॉकलेट सॉस, व्हाईट चॉकलेट सॉस, स्प्रिंकलर्स- आपल्या आवडीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

१) * ड्राय यीस्ट असेल तर १२० मिलि पाण्यातलं काही पाणी काढून कोमट करा आणि त्यात यीस्ट घाला. झाकण ठेवून २० मिनिटं ठेवा. फ्रेश यीस्ट असेल तर कोमट पाण्यात घाला आणि लगेचच स्टेप २ कडे जा. थांबायची आवश्यकता नाही.

२) १ ते १० सर्व घटक एकत्र करायचे. प्रमाण अचूक घेतले असेल तर या साहित्याचा एक पर्फेक्ट कन्सिसटन्सी असलेला गोळा तयार होईल. फार मळायचं नाही. गोळा झाला की लगेचच एका पोळीसाठी घेतो इतके गोळे करून घ्यायचे. गोळ्यांच्या जाडसर पुर्‍या लाटायच्या. जाड हा शब्द इथे महत्त्वाचा आहे Happy डोनट कटरने पुरीला डोनटचा आकार द्यायचा. कटर नसला तरी हरकत नाही. रोजच्या वापरातल्या वाटीनेही गोल आकार देता येईल. सर्व डोनट लाटून/करून घ्यायचे. एका ताटात स्वच्छ कोरड्या फडक्याखाली किमान ४५ मिनिट झाकून ठेवायचे. हा वेळ यीस्ट फुलण्यासाठी आवश्यक आहे. (पण जास्तीतजास्त एक तास पुरेसा आहे. यीस्ट खूऽऽऽप फुलावं म्हणून चार-आठ तास ठेवायची गरज नाही Wink )

३) पुरेसा वेळ ठेवल्यानंतर तेल तापवून घ्यायचं. कोणतेही खाद्यतेल चालेल. पुर्‍या तळतो तसे डोनट्स तळून घ्यायचे. तळताना डोनट्स टमटमीत फुगतील. यीस्टचा परिणाम इथे दिसतो.

४) सर्व डोनट्स तळून घ्यायचे. गार होण्यासाठी ठेवून द्यायचे. हे बेसिक डोनट्स तयार झाले. हे डोनट्स चवीला खूप गोड नाहीत, पण एकदम खुसखुशीत होतात.

५) सजावट हा डोनट्सचा प्रमुख भाग. या सजावटीमुळेच तर लहान-थोर त्यांकडे आकर्षित होतात. डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट यांचे सॉस करून घ्यायचे. एकेक डोनट चक्क या सॉसमध्ये पूर्ण बुडवायचा. सॉस थोडा ओला असतानाच त्यावर स्प्रिंकलर्स वगैरे शिवरायचे.

अजून एक प्रकार म्हणजे पायपिंग बॅगमध्ये सॉस भरून सजावट करू शकतो. सजावटीला काहीच limit नाही. आपली सर्व कल्पनाशक्ती इथे वापरू शकतो. मी दोन सॉसेस केले आणि माझ्या कुवतीनुसार सजावट केली.

donuts.jpg

सजावट एमॅच्युअर आहे. पण टेस्ट एकदम भारी. शिवाय accomplishment चा आनंद निराळाच Happy

वाढणी/प्रमाण: 
१६
अधिक टिपा: 

१. ** ब्रेड इम्प्रूव्हर आवश्यक आहे. केकचे सामान जिथे मिळते त्या दुकानात मिळतो.

२. मैद्याऐवजी कणीक चालेल का? या लाडक्या प्रश्नाचे उत्तर माझ्या टीचरने तरी ’नाही’ असं दिलं. ’फ़ुगणे’ या क्रियेसाठी मैदाच आवश्यक आहे. पण आजकाल कणकेचे ब्रेड मिळतात, लोक घरी तयार करतात. त्यामुळे अर्थातच कोणाला मैदा रिप्लेस करायचा असेल तर तो पर्याय आहेच. मूळ डोनटची चव आणि रंगरूपाबाबत मात्र तडजोड करावी लागेल.

३. लोकल बेकर्‍यांमध्ये क्रीम भरलेला एक लांबुडका रोल 'डोनट' म्हणून मिळतो. तो अस्सल डोनट नाही. खरा डोनट हाच. मेदुवड्यासारखा जो दिसतो तो.

माहितीचा स्रोत: 
श्रुती जोशी (मी ज्यांच्याकडून शिकले त्यांचं नाव)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा हे डोनट्स करून पाहिल्यानंतर मला 'स्वतःचे काहीतरी' करायची हुक्की आली Proud मला ऑरेन्ज फ्लेव्हर भयंकर आवडतो. ऑरेन्ज डोनट्स करायचे, पण डिपिंग नक्की कसं, कशाचं करायचं समजत नव्हतं. पुपुकरांबरोबर एक प्रश्नोत्तरशंकाकुशंकांचा सामना झाल्यानंतर अश्विनीमामी (अमा) यांनी आयसिंगची आयडिया दिली आणि हे डोनट्स कालच केले. हेही एकदम मस्त झालेत.

यात डोनट डो मध्ये स्वादासाठी दालचिनी घातली आहे (ज्याचा स्वाद भारी लागतोय). आयसिंग शुगर, लोणी आणि ऑरेन्ज फूड कलर घालून आयसिंग केलंय आणि डोनट्सना लावलंय. सुरीने आयसिंग स्प्रेड केलंय, त्यामुळे प्रोफेशनल दिसत नाहीये, मला माहिताय. पण आमच्याकडे प्रोफेशनल नसतं तरी चालतं. डोक्यात होतं तशीच चव जमली आहे. याचं सर्व क्रेडिट अमांना! Happy

cinnamon orange donuts.jpg

सुपरडुपर!! फोटो क्लासिक आलेला आहे.
(* असे सतत यशस्वी प्रयोग करून बेंचमार्क उंचावत नेणे बरे नव्हे. Happy )

फार जबरदस्त दिसत आहेत डोनट्स!!
मी अजून खाल्ले नाहीत पण मी जितकी पाहिलेत त्या बच्चेकंपनीला प्रचंड आवडतात.
हे एकदम प्रोफेशनल दिसत आहेत..लवकर स्वतःचा ब्रँड चालू करुन टाक.

पुण्यात अस खूप काही शिकायला मिळत. कित्येक कार्यशाळा असतात. मी तर दरवेळी पुण्यात आलो की वर्तमानपत्रातल्या कार्यशाळा वाचून पुतणीच्या मागे भुंगा लावतो तू हे शिक ते शिक. हे कर ते कर. ती हैराण होते माझे ऐकून आणि मी हैराण होतो तिला सांगून सांगून Happy

पूनम कृती छान लिहिली पण एक सांगू अशा अवघड पाककृतींसाठी प्रत्येक स्टेप ही फोटोनी सांगायची असते. खरे तर एखादी कृती तुम्हाला कितीही सोपी वाटो पण इतरांना सांगताना ती सोप्यात सोपी करुन सांगायची असते.

पण आमच्याकडे प्रोफेशनल नसतं तरी चालतं. डोक्यात होतं तशीच चव जमली आहे.>>हे जमणंच फार महत्त्वाचं.

मला ब्रेड इम्प्रोवर मिळाला तर मी करणार.

http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

तळताना डोनट्स टमटमीत फुगतील. यीस्टचा परिणाम इथे दिसतो.>> फारच सही दृश्य असेल हे.
फुलतो म्हणून तळताना एकावेळी एकच डोनट तळायचा का?

I love donuts..
आवडत्या दहात ठेवतेय जपुन...
रेसिपीसाठी धन्यवाद..
मी थोपू वर ब्राऊनीज म्हणुन ग्रुप वर सुद्धा पाकृ बघीतली होती..छान दिलीय तीत पन..
अजुन एकदा धन्यवाद Happy

हो मंजू, एकावेळी एकच तळायचा. पाचपट होतात जवळपास ☺
टीना, करून बघ नक्की.
Thanks लोक्स. अपने हाथ से बना हुआ डोनट और चाय पीने का मजाही कुछ और है. Facebook status असतो ना 'feeling blessed' ... अगदी तसंच वाटतं Happy

वॉव!!

मस्तच आहे प्रकार.
इन्स्टंट यीस्ट वापरली तर कणीकही वापरता येईल, अर्थात चवीत फरक पडेल...बट यू नो, हेल्थ काँशियस वगैरे Happy

भर तेलात तळणार आहोत आपण त्यामुळे उगाच कणीक वापरुन हेल्दी वगैरे विसरायचं... हेल्थचा विचार बाकी ठिकाणी करायचा.... वडे, समोसे, भजी, डोनट्स हे खाताना जिभेचे चोचले सांभाळायचे Wink कुठे रोज करुन खाणारात??? तर दिली आहे तशीच्या तशी कृती करा न एंजाॅय Happy

व्वा! डोनट्स आणि पूनम हे वाचून आधी चक्रावले Proud पण मस्त पाककृती, नक्कीच करुन बघेन. आयसिंगमध्ये ऑरेंज झेस्ट घातली नाहीस का? ऑरेंज इसेन्सबरोबर झेस्टचे टेक्श्चर मस्त लागते.

मस्त जमलेत !
इथे सिझन प्रमाणे फ्लेवर आणी आय्सिन्ग करतात, व्हॅलेन्टाइनला हार्ट्शेप , फॉलला ऑरेन्ज कलर आयसिग, ४ जुलैला रेड-व्हाईट-ब्ल्यु... अमेरिका रन्स ऑन डीडि! इथे अर्थात ते मशिन ने बनवतात आणी मधला जो गोळा कट होवुन बॉल बनतो त्याला मन्चकिन म्हणतात...

निदान या डोनटाबाबतीत तरी मला मेदूवड्यासारखी 'पण आत फिलेटेड छिद्र कसं पाडतात' असा बेसिक प्रश्न येणार नाही Happy
मला आता माहितीय हो, मी गुगल केलं आणि सर्व ज्येष्ठ मंडळींना शंका विचारल्या, पण 'सोनपापडीचे लेयर्स कसे बनतात, बुढ्ढी के बाल कापूस कसा बनतो' असे काही प्रश्न अजून आ वासून आहेत. गुगल करण्याचे कष्ट घेतले नाहीत.

वा !! जबरी.
डोनट वर्कशॉपची जाहिरात मी पुण्याला आलो होतो तेव्हा वाचली होती. बहुतेक मटात होती. मी आईला म्हटलं पण की तू जाऊन ये म्हणून. बरं झालं पण तू गेलीस ते. रबडी पुरी बरोबर लिस्टीत अजून एक पदार्थ अ‍ॅड झाला. Wink

Pages