महादजी शिंदे छत्री - उत्कृष्ट स्मारक

Submitted by भागवत on 18 February, 2016 - 07:29

मी हडपसर येथे राहतो. हडपसर पासून शिंदे छत्री 7 किमी वर वानवडी पुणे येथे आहे. बऱ्याच दिवसा पासून शिंदे छत्री भेट देण्याची इच्छा होती. एवढ्या जवळ असून सुद्धा मुहूर्त काही लागत नव्हता. एका रविवारी पत्नीची तुळशीबाग येथील खरेदी लवकर आटोपली मग आम्ही आमचा मोर्चा शिंदे छत्री इकडे वळवला. आपल्यावर आपल्या भावंडांचा खूप प्रभाव असतो. माझी मोठी भगिनी (सौ. गीता) तिला ऐतिहासिक वास्तूला भेट दिल्यानंतर पूर्ण माहीती मिळवण्याची धडपड असते. माझा सुद्धा हाच प्रयत्न असतो.

महादजी शिंदे छत्रीला जाडजुड दगडी भिंती आहेत जणूकाही तटबंदीच. बाहेरून पाहिल्यास एक लहान किल्लाच वाटतो. समोर हनुमानाचे मंदिर आहे. Rs. 5 तिकीट काढून मध्ये प्रवेश केला. महादेव मंदिराच्या बाजूला महादजी शिंदे यांची समाधी मंदिर आहे. महादजी शिंदे यांची समाधी मंदिर माधवराव शिंदे यांनी आठवण म्हणून 1965 साली उभारण्यात आले. समाधी त्याच जागेवर बांधण्यात आली आहे जिथे महादजी शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. महादजी शिंदे एक महान योद्धा होते. त्यांनी अँग्लो- मराठा लढाईत इंग्रजावर मात केली होती. 1779 वडगावची लढाई जिंकलीे होती. त्यांनी पराक्रम करून युद्ध गाजवली. त्यांनी ग्वालियर राज्याची स्थापना केली. महादजी शिंदे पेशवाईचे प्रमुख स्तंभ होते.

परिसराच्या मधोमध महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर स्वतः महादजी शिंदे यांनीे 1794 साली बांधले होते. दुपारची वेळ असल्यामुळे निरव शांतता होती. मंदिरात सुखद गारवा, थंडावा जाणवतो. मंदिरात शिंदे घराण्याच्या पूर्वजांचे आणि सध्याच्या पिढीचे फोटो लावले आहेत. मंदिराचे दगडामध्ये उत्कृष्टपणे राजस्थान पद्धतीने कोरीव काम केलेले आहे. मंदिर 2 मजली उंच आहे. आतील बाजूने सज्जा आहे. वरील बाजूला जाण्यास परमिशन नाही. मंदिराच्या मागील भिंतीवर देवाची मूर्ती कोरलेली आहे. भिंतीवर फुल सुद्धा कोरलेली आहेत. मंदिराचा कळस भाग खूप सुंदर आहे. मुख्य कळसच्या चारी बाजूला लहान-लहान कळस आहेत. मंदिराचे खांब सुद्धा नक्षीदार आहेत. भिंतीला झंरोखे सोडलेले आहेत. विशेष म्हणजे तिथे सुद्धा सुंदर कोरीव काम केले आहे. खांब मधील कमानीवर सुद्धा उत्कृष्ट कोरीवकाम केले आहे. गर्भग्रहाच्या छतावर सुंदर चित्र चितारलेल आहे. मंदिराच्या छतावर चारी बाजूने मूर्ती बसवलेल्या आहेत. समोरून पाहिल्यास महादेव मंदिर न वाटता महालच वाटतो. मंदिरात फोटो काढण्यास मनाई आहे. वास्तू बघूनच तुमचं मन प्रसन्न होत. आजूबाजूला भरपूर मोकळी जागा आहे. महादजी शिंदे छत्री वास्तूची शिंदे देवस्थान ट्रस्ट यांच्या कडून देखभाल केली जाते.

Mahadev Mandir.jpgrsz_img_20160131_165021236.jpgrsz_img_20160131_165053630.jpgrsz_img_20160131_165111147_hdr.jpgrsz_img_20160131_165318578_hdr.jpgrsz_img_20160131_165416936.jpgrsz_img_20160131_165548532.jpgSamadhi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात राहून बघायची राहुन गेली. फक्त पु. ल. आठवतात..
'छतरी? छत्रीत काय बघायचं? उद्या कुणाचा रेनकोट पण असेल..' Proud