Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कालचा सगळ्यात दाद घेऊन गेला
कालचा सगळ्यात दाद घेऊन गेला तो कैवल्य सुजयचा सीन. असंच धूमधडाक्यात रेश्माचंही लग्न झालं असणार, किती स्वप्नं घेऊन ती मुंबईत आली असणार.. पंधराव्या मजल्यावरून... इतके दिवस ते एकत्र होते पण हा विचार मनातही आला नव्हता पण जेव्हा हे सगळं प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा त्या घटनेचं रेश्माच्या आयुष्यातलं महत्त्व लक्षात आलं. आणि ते ही या दोघांच्या. या वाक्यांसाठी या दोघांची निवड करणं, त्या साठी एकदम अचूक पार्श्वभूमी आणि टायमिंग ठरवणं, आणि पोहे उपम्यावरून मूड पुन्हा लाईट करणं या सगळ्यासाठी लेखक, दिग्दर्शकांचं कौतुक. हुशारी असली की आपोआप दिसतेच. प्रेक्षकांना मठ्ठ समजणार्या इतर मालिकांपेक्षा ही मालिका म्हणूनच उजवी ठरली.
>> कैवल्य सुजयचा सीन
>> कैवल्य सुजयचा सीन ....>>
हो अगदी!
आशूडी, अगदी अगदी. तो सीन फार
आशूडी, अगदी अगदी. तो सीन फार भारी होता. आशूचं अॅनाला प्रोटेक्ट करणं पण आवडलं खूप.
Sagalyana +१ झालं आता.....
Sagalyana +१
झालं आता..... चंबू गबाळं आवरायला घेतलंय.आज शाम आणि रेवाला खरं काय ते कळालं.
बघुयात आता काय होतंय.
आणि राकेश रेश्माकडे परत आला,कबीरने मिनलला होकार दिला,किंजल आणि आशूचं लग्न झालं किंवा किंजल कशी मुर्ख आहे हे आशूला कळाल्याने त्याने तिचा नाद सोडून देऊन दुसरी कडुन ईंग्लिश शिकून आशू अमेरिकेला गेला,पियु एकदम टकाटक बरी होऊन कैवल्य आणि पियू कैवल्याच्या त्याच्या आई बाबांसोबत घरी सुखाने नांदू लागले, ॲनाचे आईबाबा एकत्र आले आणि ती त्यांच्याकडे निघुन गेली वगैरे न दाखवता रिअल लाईफ मधल्या शेवटांवर मालिका संपतेय या सारखं ग्रेट काहीच नाही. रोज रोज मसाला भरून नंतर मालिका पांचट न करता संपवली म्हणुनच ही मालिका लोकप्रिय ठरली,रिलेट झाली आणि म्हणुनच लोकांनी उचलून डोक्यावर घेतली.
बाकीच्या मालिकांनी यातून योग्य तो बोध घ्यावा हीच इच्छा
बाय दिल दोस्ती दुनियादारी. वी वील मिस यू ऑल :*
अजुन ॲडलं
रिअल लाईफ मधल्या शेवटांवर
रिअल लाईफ मधल्या शेवटांवर मालिका संपतेय या सारखं ग्रेट काहीच नाही.>> +१
येणार आहेतना नेक्स्ट सिझन
येणार आहेतना नेक्स्ट सिझन घेऊन. हीच टीम असुदे. पण तरी किती महिने gap काही सांगता येत नाहीना. रेश्माच्या डोळ्यातलं पाणी बघुन आज माझ्याही डोळ्यात पाणी आले. एरवी ती सारखी रडत असते तर विशेष काही वाटत नाही. आज Anaने तिने घातलेला गोंधळ छान दाखवला.
मी पण मिस करणार सोमवारपासून.
रिया गुड पोस्ट. फक्त अबीरच्या ऐवजी कबीर लिही.
Oh sorry. Changing
Oh sorry.
Changing it....
Sundar malikancha part two lawkar nahi yet. Sarabha vs sarabhai cha udaharan bagh na
Kiman warshbhar tari watat nhiye parat yeil as
मग कलाकार तोपर्यंत दुसऱ्या
मग कलाकार तोपर्यंत दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बिझी होतील. त्यांना demand खूप असणार ना. तीन महिने gap ठीक आहे त्यावर गेला तर काही खरं नाही. खरं म्हणजे इतक्या लवकर बंद करायची गरज नव्हती. एरवी दळत असतात वर्षानुवर्षे.
शेवटच्या आठवड्यात इतके छान
शेवटच्या आठवड्यात इतके छान भाग का दाखवतायत
त्यामुळे अजूनच जास्त miss करणार मालिकेला !!
मस्त होतायत हे एपिसोड. पण
मस्त होतायत हे एपिसोड. पण अॅना फारच मठ्ठ दाखविली काल.
कालचा भाग रेश्मा आणि आशूचा
कालचा भाग रेश्मा आणि आशूचा होता. हळद लावणार का काय बघताना एकेकाचे चेहरे बघण्यालायक होते. रेश्माच जिंकली. आणि शेवटी आशू.
कालच्या भागात मिनल अनि अॅना
कालच्या भागात मिनल अनि अॅना दोघी सुंदर दिसत होत्या..
रेश्माचा उखाणा मिनल ने पुर्ण केला तेव्हा जोरात हसु आल.. अनै मग वाईट ही वाटल.
रेश्माचा उखाणा मिनल ने पुर्ण
रेश्माचा उखाणा मिनल ने पुर्ण केला तेव्हा जोरात हसु आल.. अनै मग वाईट ही वाटल. >>>> काय होता तो उखाणा?
सोन्याचा दिवा, चांदीची
सोन्याचा दिवा, चांदीची वात,
राकेशने लावलीय आयुष्याची वाट. ( मीनल )
जन्मोजन्मी लाभेल का राकेशरावांची साथ? ( रेश्मा )
कालपरवाचे भाग चांगले होते.
कालपरवाचे भाग चांगले होते.
>>>> प्रेक्षकांना मठ्ठ समजणार्या इतर मालिकांपेक्षा ही मालिका म्हणूनच उजवी ठरली. <<< सहमत.
मी गेले ४ दिवस पाहू नाही
मी गेले ४ दिवस पाहू नाही शकले.
रेश्माच्या घरच्यांना कसं कळलं निशा बद्दल? हे लोक्स तिला का घेऊन गेले रेवा च्या लग्नाला?
चै अजुन नाही कळालं. उद्या
चै अजुन नाही कळालं. उद्या कळेल.आशूमुळे रेवाला कळालं.
आशू वैतागुन म्हणत होता की ताई तू हे सगळं सांगुन टाक आणि तेंव्हा ऐकलं रेवाने.
आज रेश्माने स्वत:च सांगितलं.
हो रेश्मा स्वतःहून सांगेल ते
हो रेश्मा स्वतःहून सांगेल ते बरं आहे. आज आशु रडला, मीपण रडले. कित्ती इनोसंट वाटतो तो मला नेहेमीच.
सुजू, कैवल्य आणि मीनल तिघे जास्त छान दिसत होते आजच्या गेटपमधे. राकेश स्वतः चुकला आणि रेश्माला काय उपदेश करत होता, लग्न चालू असताना. मी आधी महिनाभर नव्हती बघितली मालिका पण त्याने रेश्माला फसवलेना. तिची फरपट नाही का झाली ह्यामध्ये काही चूक नसताना. हा छानपैकी राहतोय की gf बरोबर. असे फ्रेंड्स आहेत म्हणून रेश्मा आनंदात आहे.
केतन सासूसासऱ्यांकडून पाय धुवून घ्यायला नकार देतो, ते खूप आवडलं मला. असे संदेश लोकप्रिय मालिकांच्या थ्रू पटकन पोचतात, पार खेड्यापाड्यातही.
Anjutai practically tyach
Anjutai practically tyach tari Kay chukal g?
Vadilanwarchya ati prema payi tyana dukhavata aal nahi ani swatalahi sagal sahan nahi zaal.
Tohi mala १००% chukicha nahich watat atasha
नाही मी पहिल्यांदा बघितलीच
नाही मी पहिल्यांदा बघितलीच नाहीना त्यामुळे नक्की काय घडलं, ते मला पण नाही माहिती. तो आशु त्याला fan ला उलटा टांगायला जातो etc ते पण मी नाही बघितलं. नंतर फ्रेंडने सांगितलं मला.
एक मात्र आहे राकेश-रेश्मामध्ये राकेशपेक्षा परिस्थिती जास्त व्हिलन वाटते तरीपण त्याने रेश्माला रेवाच्या लग्नात असं म्हणायला नको होतं असं वाटतं. तिचा तर काडीमात्रही दोष नाहीयेना.
रीया रेश्माने अखेरीस सांगून
रीया
रेश्माने अखेरीस सांगून टाकले, फक्त लग्नच झालेय संसार झालाच नाही. राकेश निशासोबत राहतो आणि ती अशू-सुजय-मीनल इ. कंपूसोबत!
आता पेरेंट्स लोकांनी सेंटी मारायला नको आणि मारलीच तरी रेश्माने ठाम राहावं. मला वाटत होतं श्यामला सांगितल्याप्रमाणे रेश्मा - सुजय खरोखरी जुळवलेलं दाखवतील. (नाही जुळवलं तर जास्त छान)
मला राकेशसारख्या बुळचट विचाराच्या माणसांची कीव येते. घरी मान्य होणार नाही तर आधीच त्या वळणाला जाऊ नये बरं झालंच प्रेम तर ठामपणे, शांतपणे आपली बाजू समजवण्याचे धैर्य हवे तेही नसेल तर सरळ एकटं राहावं तीन आयुष्यं अशी त्रिशंकुसारखी लोंबकळती ठेवण्यापेक्षा! तात्पुरती वेळ साजरी करून नंतर आयुष्यभर भिजतं घोंगडं ठेऊन कोणाच्याही आयुष्याची अनमोल वर्षे वाया घालवण्याचा काहीही अधिकार नसतो. रेश्माऐवजी दुसरी मुलगी असती तर फसवणुकीचा दावा करू शकते. आईवडीलांचं प्रेम काळजी वै. कारणं अगदीच बुळबुळीत आहेत. (ती मग आधी रेश्मा देत होती तेव्हाही! )
दिदोदु आता आटोपतं घेतेय कारण त्याजागी रात्रीस खेळ चाले येणारेय बहुदा.
मला राकेशसारख्या बुळचट
मला राकेशसारख्या बुळचट विचाराच्या माणसांची कीव येते. घरी मान्य होणार नाही तर आधीच त्या वळणाला जाऊ नये बरं झालंच प्रेम तर ठामपणे, शांतपणे आपली बाजू समजवण्याचे धैर्य हवे तेही नसेल तर सरळ एकटं राहावं तीन आयुष्यं अशी त्रिशंकुसारखी लोंबकळती ठेवण्यापेक्षा! तात्पुरती वेळ साजरी करून नंतर आयुष्यभर भिजतं घोंगडं ठेऊन कोणाच्याही आयुष्याची अनमोल वर्षे वाया घालवण्याचा काहीही अधिकार नसतो. >+१
एवढं करून राकेशचं नुकसान
एवढं करून राकेशचं नुकसान काहीच नाही, तो मजेत आहे. रेश्मा सासऱ्यांची लाडकी असल्याने ती त्यांना समजावेल की निशा आणि राकेशचं लग्न लावून द्या. तिचा स्वीकार करा.
जर नेक्स्ट सिझन आणणार असतील तर ती कदाचित मुंबईत नोकरी करतेय दाखवतील, कारण तिने एम.ए. केलंय ना इंग्लिश लिटरेचरमध्ये.
ते संवाद चालू असतानाचे
ते संवाद चालू असतानाचे पार्श्वसंगीत फार मस्त आहे.
वा! हे शेवटाले भाग आणि
वा! हे शेवटाले भाग आणि प्रतिसाद सर्वच छान!
राकेश चा राग यायचा... पण तो ही हतबल होता हे पटतेय. पण तरिही मधे मधे रेश्मा वर दादागिरी करतो तेंव्हा एक ठेवुन द्यावीशी वाटते.
नीशा चा मात्र राग येत नाही. जेंव्हा ती रेश्मा ला समजुन घेते तेंव्हा ती आवडतेच.
हे नक्की वाचा-
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5490000322543767173&Se...मनोरंजन&NewsDate=20160214&Provider=मनस्विनी लता रवींद्र manaswini.lr@gmail.com&NewsTitle='थ्रीडी'च्या अल्पविरामाच्या निमित्तानं... (मनस्विनी लता रवींद्र)
हो, मी बघितलं तेव्हापासून
हो, मी बघितलं तेव्हापासून निशाचा राग मलाही नाही आला.
झी मराठीने आता भाग दाखवणे बंद
झी मराठीने आता भाग दाखवणे बंद केले आहे. कुठे मिळतील हे सगळे भाग? मिसींग इट
ते यु ट्युबवर नाहीत का याचे
ते यु ट्युबवर नाहीत का याचे भाग. असे काढुन का टाकतात. असंभव मालिकेचे अजुन आहेत.
मंडळी, या शो चे भाग
मंडळी, या शो चे भाग बघण्यासाठी ----
http://www.desirulez.me/forums/1299-Zee-Marathi
सांगितलं रेश्माने घरी. तिचे
सांगितलं रेश्माने घरी. तिचे आई-वडिल काहीच कसे रिअॅक्ट झाली नाहीत? राग- दु:ख, धक्का काहीच नाही. एकदम थंड रिअॅक्शन.
राकेशला, त्याच्या वडिलांना काहीही बोलले नाहीत.
Pages